Skip to main content

आर्किटेक्चर आणि मी !

लेखक स्वतन्त्र यांनी मंगळवार, 28/02/2017 01:38 या दिवशी प्रकाशित केले.
थोड माझ्या विषयी सांगतो. माझे वडील मी दहावीत असतानाच वारले.त्या नंतर अर्थातच घरातला मोठा असल्याने घराची जवाबदारी माझ्यावर पडली. त्यानंतर बारावी Science मधून केली.आधीपासूनच माझ drawing चांगला असल्यामुळे आणि आर्किटेक्चर ची ओढ असल्यामुळे ठरवलं होता कि architecture करायचे. पण त्यावेळीस माझ्या आईचा ऍक्सीडेन्ट झाला आणि जवळपास दीड लाख खर्च झाला.त्यावेळीस नुकतीच बारावीची परीक्षा संपली होती आणी ऍडमीशन्स ची गडबड सुरु होती.त्यावेळेस पाच हजाराची रक्कम सुद्धा खूप वाटणारा मी,त्या फीज,डोनेशन्स पाहून चक्रावलो. त्यावेळी काय झाला होता मला,एकदाचं ठरवलं,इतकी फी भरायची आपली ऐपत नाही.आपण तिकडे ना गेलेलाच बरं.आणि सांगायला पण कोणी नाही.त्यामुळे काय चूक काय बरोबर समजत नव्हते.घरात आई आजारी,बेड वर असताना तिला मी कसा सांगू ,मला काय करायच आहे हे समजतच नव्हत. मग ठरवलं,आपल्याला लवकरात लवकर स्वतःच्या पायावर उभा राहिल पाहिजे ,science मधून ग्रॅडज्यूएट हाच पर्याय दिसला ,मग तीन वर्षाचे ग्रॅडज्यूएशन (B.Sc ) करता करता छोटी मोठी कामं करून शिक्षण केल.पुढे जे मिळतंय जशी वाट दिसतेय तसं शिकत गेलो. ग्रॅडज्यूएशन झाल्यावर एका सॉफ्टवेअर कंपनीत डेटा एन्ट्री ऑपरेटर म्हणून जॉब मिळाला.तो करता करता आणखी कस शिकता येईल,पप्रोफाइल कसा चांगला करता येईल या हेतूने MCA केल.दिवसा कॉलेज करून Night Shift ला जॉब करू लागलो.MCAसुद्धा फर्स्ट क्लास मध्ये पास झालो. त्यानंतर MCA च्या बेसिस वर त्याच कंपनीत प्रोमोशन होऊन सॉफ्टवेअर इंजिनियर झालो. आता मला जवळपास ८-९ वर्षाचा अनुभव असून,सध्या टीम लीडर आहे. But MCA was not the choice I wanted to be ! ह्या सगळ्या वर्षात मला architecture करायचा राहूनच गेल.पण अजूनही मन स्वस्थ बसू देत नाही.मला अजूनही त्या क्षेत्राची ओढ वाटते. आत्ताही मी निवांत वेळेस डिजाईन करतो ,फ्लोर प्लॅन्स आखतो.ती ओढ मला स्वस्थ बसू देत नाही,मानसिक रित्या सुद्धा. मला अजूनही ते शिक्षण (B .Arch ) घ्यायची इच्छा असून मला जे शिकता नाही आल ते शिकायचंच आहे,व पुढे जाऊन स्वतःचा स्वतंत्र व्यवसाय करण्याचा मानस आहे. माझ सध्या वय २९ असून मला हे जॉब बरॊबर कस करता येईल याबाबत जाणकारांनी प्रकाश टाकावा .

वाचने 40778
प्रतिक्रिया 119

प्रतिक्रिया

सर्वप्रथम तुमच्या जिद्दीला सलाम...घरच्या परीस्थितीला जुळवून घेत तुम्ही तुमच्या पायावर उभे राहीलात याचे कौतूक वाटले. (तुमच्या पुढे आमचे कष्ट फारच तोकडे वाटतात). आक्रिटेक्चर या क्षेत्रासी फारसा संबंध नाही पण एकच सुचवेन की मनातली आस सोडू नका. पार्ट टाईम कोर्स करता येतो का ते पहा. कोठल्यातरी आक्रिटेक्चर फर्म बरोबर विकांताला जॉब करता येतो का ते पहा. यातून पुढचा मार्ग नक्कीच सापडेल. माझ्या माहीतीतल्या लोकांशी बोलून तुम्हाला कळवतो.

मला mechanical design engineer बनायचे आहे.कोणी आहे का मिपा वर

In reply to by लालगरूड

मी आहे मी!! ६ वर्ष ह्या प्रकारात मी घातली आहेत. (मला खरंच कल्पना नाही की का मला ही डिग्री घ्यावी वाटली. माझे वडील ह्याच क्षेत्रात आहेत म्हणुन असेल.) तर मी आहे mechanical design engineer. तुम्हाला नक्की काय हवंय? कारण हे बनायला तुम्हाला इंजिनियरिंगच करावं लागतं. ह्याला काही कोर्सेस नाहीत.

In reply to by लालगरूड

ओके. त्यात इंटरेस्ट असेल तर कोर्स करा. पण ते निव्वळ कागदावरचे उचलुन त्याचे ३डी मॉडेल करणे झाले. काम वाईट नाही, पण किती दिवस करणार? खरा डिझाईन इंजिनिअर हा ते स्पेसिफिकेशन्स बनवतो. जो ते फक्त मॉडेल करेल त्याला पुढे करियर मध्ये जास्त स्कोप नाही ना. तेव्हा जमल्यास डिग्री घ्याच.

एकदा ठरवल्यावर आणि प्रयत्न केल्यावर सगळं कांही शक्य आहे. तंत्रशिक्षणास वयोमर्यादा नाही, हे चांगलं आहे. प्रयत्न सुरू ठेवलेत तर यश नक्की. दोन महत्वाच्या गोष्टी साम्गितल्या नाहीत. एक आपण विवाहित आहात का? असल्यास पार्टनरचं त्याबाजूने मत आणि सहकार्य आवश्यक आहे. दुसरे- तुम्ही कोणत्या गावात रहाता ते महत्वाचे. वर सांगितल्याप्रमाणे एका विशारदाकडे काम सुरू करू शकता. अर्थिक स्थितीनुसार पांच वर्षे पूर्णवेळ शिकून त्याच वेळी नोकरीही करू शकता. (मी असेच शिकलो म्हणून म्हणत आहे) दक्षिण भारतातील चारही राज्यांत दूरशिक्षणाद्वारे 'बी आर्च' करता येते. जरा गुगलून पहा. आणि अगदी सोप्पा मार्ग पाहिजे तर आपले इंदिरा गांधी मुक्त विद्यापीठ आहेच!

त्यामुळे फॉर्मल डिग्रीचा हट्ट सोडा. पहिल्यांदा एखाद्या आर्किटेक्टकडे पार्ट-टाईम जॉब बघा. तिथं कामं कशी केली जातात ते पाहा. तुम्हाला कंप्युटरची माहिती आहे तर डिजाईन सॉफ्टवेअर वापरुन काम सोपं होईल का पाहा. जिथे प्लान सँक्शन लागतं तिथे आर्किटेक्ट लागतो पण डिजाईन स्टेजला कुणीही काम करु शकतं. मग जमल्यास यथावकाश डिग्री घेता येईल. आणखी एक शॉर्ट कट आहे. एखाद्या इंटीरीअर डिझाईन ऑफिसमधे पार्ट-टाईम जॉब बघा. त्याला क्वालिफिकेशन लागत नाही पण तिथे क्रिएटिविटीला जोरदार स्कोप आहे. माझा मुलगा आर्टीस्ट आहे पण नुकतंच त्यानं एक संपूर्ण कॅफे (एक्स्टीरीअर प्लस इंटीरीअर डिजाईन केलंय), धमाल माहौल केलायं.

In reply to by संजय क्षीरसागर

संक्षींशी सहमत, मात्र तुम्ही सॉफ्टवेअर कंपनीत असताना दुसरी पार्ट टाईम पगारी नोकरी करणे शक्य होणार नाही. ऑफर लेटर नीट वाचून बघा. त्यामुळे तो पर्याय काळजीपूर्वक निवडा. तुम्ही शनिवार रविवार किंवा अगदी दिवसातल्या शिल्लक वेळी फ्री लान्सिंग करू शकता. पुन्हा पैसे कसे घ्यावेत हा प्रश्न येईलच. पण पैशांच्या बदल्यात तुम्ही एखादी सोय / सवलत मागू शकता. उदा. पैसे नकोत पण सकाळी ३ तास काम करेन किंवा फक्त शनिवार / रविवार उपलब्ध असेन. सुरूवातीला तुमच्याकडे स्टँडबाय प्रकारचे किंवा डेडलाईन नसणारे काम येईल. (आता मला आर्किटेक्चर मधले माहिती नाही पण) तुमच्या सवडीच्या वेळात फाऊंडेशन प्रकारचे काम तुम्ही करून देऊ शकता ज्यावर फायनल काम मेन / फुल टाईम आर्किटेक्ट करेल असे काहीतरी. तुम्हाला त्या इंडस्ट्रीत असा शिरकाव करून घेता येईल. नंतर तुमची आवड आणि किती प्रमाणात पगार मिळेल यानुसार क्षेत्र बदलायचे ते ठरवा. (कांहीही झाले तरी परतीचे दोर कापू नका. स्वच्छंद जगा वगैरे सांगायला ठीक असते - पण त्याने दोन वेळेचा प्रश्न सुटत नाही.) आणखी एक वेळखाऊ मार्ग म्हणजे आहे त्या कंपनीत कांही आहे का ते शोधा. मात्र त्यामध्ये सध्याचा मॅनेजर, त्याचा मॅनेजर आणि तुमचा क्लायंट अशा अनेक लोकांच्या "कां..??" ला उत्तर द्यावे लागेल.

In reply to by संजय क्षीरसागर

फॉर्मल डिग्रीचा हट्ट सोडा. याच्याशी मी अजिबात सहमत नाही. कारण आपल्याला त्या विषयातच करियर करायचे असेल तर औपचारिक पदवीची आवश्यकता कधी तरी पडेल त्या वेळेस आपल्याला पश्चात्ताप होईल. आज केलेले कष्ट उद्या आपल्याला नक्की फायद्यात ठरतील. माझ्या स्वतःच्या वडिलांना केवळ पदवी नाही म्हणून बढती नाकारली होती त्यामुळे त्या जिद्दीतून ते द्विपदवीधर झाले बी ए, एल एल बी आणि त्यानंतर त्यांनी जमनालाल बजाज सारख्या संस्थेतून व्यवस्थापनाचा पदव्युत्तर डिप्लोमा केला. हे सर्व शिक्षण आम्ही शाळेत असताना त्यांनी केले आहे. आपणही असेच जिद्दीचे आहेत म्हणून असे सांगावेसे वाटते. माझ्या माहितीचा एक सर्जनचा सहाय्यक आहे तो केवळ एम बी बी एस आहे म्हणून स्वतंत्र व्यवसाय करू शकत नाही अन्यथा सहाय्यक म्हणून काम करून मिळवलेल्या ज्ञानातुन त्याचे शल्यक्रियेतील कौशल्य इतके आहे कि कित्येक हृदयरोग शल्यक्रियेतील सुपर स्पेशालिस्ट तोंडात बोट घालतील. परंतु केवळ पदवी नाही म्हणून तो आजही शल्यक्रिया विशारदाला सहाय्यक म्हणूनच काम करतो. त्याला ते सर्जन दोन लाख रुपये महिना देत असत( २००९).

In reply to by सुबोध खरे

आर्किटेक्टला फक्त प्लान टाकायला सही लागते बाकी सर्व डिजाइन्स ज्युनिअर्सच करतात. शिवाय डिग्री नाही म्हणून खंत करत बसण्यापेक्षा हँडस-ऑन कामला सुरुवात करणं लगेच आनंद मिळवून देईल.

In reply to by संजय क्षीरसागर

संक्षीसाहेब, विथ ड्यु रिस्पेक्ट, तुम्ही फक्त B.Com च्या डिग्रीवर आत्ता करताय ते काम करत असता तर किती क्लायंट मिळाले असते..? असा विचार करा. कृपया प्रतिसाद वैयक्तीक घेऊ नये. तुमच्या फील्डचे उदाहरण जास्ती लवकर रिलेट होईल म्हणून हे उदाहरण दिले आहे. फॉर्मल डिग्री गरजेची आहेच. फॉर्मल डिग्री / सर्टिफिकेशन यांमुळे नवीन क्षेत्रात सुरूवात करणे सोपे जाते कारण डिग्री आहे म्हणजे आवश्यक किमान ज्ञान आहे असा अर्थ घेतला जातो. चुकीचे असल्यास जरूर प्रतिसादावे.

In reply to by मोदक

ज्यात केवळ सहीनं कागदाला ऑथेंसिटी येते. आर्किटेक्टचं तसं नाही त्याचं डिजाइन उत्तम असावं लागतं आणि प्लान पास व्हायला एमाअर्चवाला लागतो. म्हणजे डिजाइन करणारा अन्क्वालिफाइड असेल तरी फरक पडत नाही . आणि त्यांना डिजाइनमधे इंटरेस्ट आहे म्हणून आर्किटेक्चर करायचंय

In reply to by संजय क्षीरसागर

>>>आर्किटेक्टचं तसं नाही त्याचं डिजाइन उत्तम असावं लागतं आणि प्लान पास व्हायला एमाअर्चवाला लागतो हे माहिती नव्हते, धन्यवाद.

In reply to by संजय क्षीरसागर

प्लॅन पास व्हायला "एम आर्च" असायला लागते इतकी शुद्ध आणि लोणकढी थाप बऱ्याच दिवसात वाचली नव्हती. हसून हसून पुरे वाट . संक्षी साहेब अजून येऊ द्या. असा कोणताही कायदा नाही. मुंबईत नाही आणि पुण्यातही नाही. हे दोन्ही महापालिकेतील सक्षम लोकांकडून खात्री करूनच मी लिहीत आहे. ज्याला आर्किटेक्चर करायचे आहे त्याला अशी चुकीची माहिती बेधडकपणे पुरवण्यात काय हशील आहे? बाकी मुंबई महापालिकेत आजही काही जुने स्थापत्य अभियंते( सिव्हिल इंजिनियर) आर्किटेक्त्त म्हणून काम करीत आहेत कारण तेंव्हा त्याला असे परवाने दिले गेलेले होते. काही काळानंतर ते थांबवले गेले.

In reply to by संजय क्षीरसागर

सीए हा एकमेव असा व्यावसाय आहे ज्यात केवळ सहीनं कागदाला ऑथेंसिटी येते. लाल डबा सांडला आहे. डॉक्टर किंवा मंत्री किंवा सनदी अधिकारी काय प्राध्यापक यांच्या पण "सहीशिक्क्या"शिवाय कागद ढीम हलत नाही. (प्राध्यापकाची सही नसेल तर आपला थिसीस विद्यापीठ कचऱ्याच्या टोपलीत टाकते) उगाच आपलीच लाल कशासाठी?

In reply to by सुबोध खरे

प्रतिसाद ठोकण्यापूर्वी नीट वाचत चला. त्यानी काय विचारलंय ते पाहा : तुम्ही फक्त B.Com च्या डिग्रीवर आत्ता करताय ते काम करत असता तर किती क्लायंट मिळाले असते..? असा विचार करा. त्यानं सीएबद्दल विचारलंय म्हणून लिहीलं. त्यात तुम्हाला काय त्रास झाला समजलं नाही. शिवाय पुढे लेखकाला उमेद मिळावी म्हणून लिहीलंय : डिजाइन करणारा अन्क्वालिफाइड असेल तरी फरक पडत नाही . आणि त्यांना डिजाइनमधे इंटरेस्ट आहे म्हणून आर्किटेक्चर करायचंय तुम्ही बहुदा ते वाचलेलंच दिसत नाही. दुसरी गोष्ट : मी म्हणतोयं बिल्डर्ससाठी जे आर्किटेक्ट काम करतात त्यांची सही कॉप्रोरेशनला प्लान सबमीट करते वेळी लागते. डोळे उघडे ठेवून चालणार्‍याला, प्रत्येक बिल्डींगचं बांधकाम सुरु असतांना आर्किटेक्टचं नांव डिस्प्ले बोर्डवर दिसेल. थोडक्यात, लेखक अनक्वालीफाइड असतांनाही आर्किटेक्टकडे काम करु शकेल, फक्त नांव त्या आर्किटेक्टचं लागेल.

In reply to by संजय क्षीरसागर

मला अजूनही ते शिक्षण (B .Arch ) घ्यायची इच्छा असून मला जे शिकता नाही आल ते शिकायचंच आहे,पुढे जाऊन स्वतःचा स्वतंत्र व्यवसाय करण्याचा मानस आहे. हे लेखकाने स्पष्टपणे निसंदिग्ध भाषेत लिहिलेले असताना तुम्हाला पदवीची गरज नाही हे "शहाणपण" त्यांना शिकवण्याची गरज काय होती? प्रतिसाद "ठोकण्या"अगोदर मुंबई महापालिकेतील उपायुक्तांशी आणि मोठ्या बांधकाम व्यवसायातील संचालकांशी बोलून चर्चा करून माहिती घेतली आहे. त्यांची सही कॉप्रोरेशनला प्लान सबमीट करते वेळी लागते. हि सही बिना पदवीची कशी मिळणार आहे? प्लॅन पास व्हायला "एम आर्च" असायला लागते याचा काही पुरावा विदा याबद्दल बोलायचे नाही. ज्याला "बी आर्च" साठी पाच वर्षे काढणे कठीण आहे त्याला "अजून दोन वर्षे" लागतील म्हणून नाउमेद करायचा अधिकार तुम्हाला कुणी दिला? कोणत्याही विषयावर अधिकारवाणीने बोलण्याअगोदर त्याबद्दल "तज्ज्ञांकडून" माहिती घ्यावी हा शिष्टमान्य संकेत आपल्याला मान्य नाही असे दिसते.

In reply to by सुबोध खरे

हळूहळू प्रतिसाद नीट वाचायची सवय लागेल आणि त्यामुळे मग अर्थ सुद्धा कळायला मदत होईल. मी प्रतिसादात लिहीलंय जिथे प्लान सँक्शन लागतं तिथे आर्किटेक्ट लागतो पण डिजाईन स्टेजला कुणीही काम करु शकतं. मग जमल्यास यथावकाश डिग्री घेता येईल. शेवटचं वाक्य पुन्हा वाचायचं राहिलेलं दिसतंय . मी डिग्रीसाठी नाऊमेद करत नाही तर आत्ता जी उर्मी आहे ती तगून राहाण्यासाठी काय करता येईल हे सांगतो आहे.

In reply to by संजय क्षीरसागर

अगोदर तुम्ही मूळ लेख नीट वाचायची सवय लावून घ्या म्हणजे असे गोल प्रतिसाद द्यायची गरज पडणार नाही आपलं स्वतः च पहिलं वाक्य वाचा त्यामुळे फॉर्मल डिग्रीचा हट्ट सोडा. स्वयंमपि लिखितम स्वयंमपि न वाचति एवं अगोदर एक लिहायचं मग दुसरंच लिहायचं. मग थाप मारायची "एम आर्च" लागतो. एवढे घोळ घालण्यापेक्षा मूळ लेखनच नीट वाचत चला. उगाच एखाद्या माणसाला नाउमेद करण्यासाठी असे लिखाण केल्यामुळे अशीच भाषा वापरावी लागली त्याबद्दल खेद तर मुळीच नाही

In reply to by सुबोध खरे

पुन्हा वाचा मग जमल्यास यथावकाश डिग्री घेता येईल. यात नाऊमेद करण्याचा प्रश्नच नाही आणि याच काय माझ्या कोणत्याही प्रतिसादात कुणालाही नाऊमेद करण्याचा हेतू नसतो. तुम्हाला कळला नसेल तरी मोदकला अर्थ कळला आहे यावरनं तरी ही गोष्ट लक्षात यायला हरकत नाही. बीआर्च ऐवजी एमार्च लिहीलं ही टेक्निकल मिस्टेक मंजूर आहे पण क्वालिफेकेशन कुठे लागतं हे सांगत होतो त्यामुळे डिग्रीचा हट्ट (सध्या) सोडा इतकाच सांगण्याचा उद्देश होता. उगाच एखाद्या माणसाला नाउमेद करण्यासाठी असे लिखाण केल्यामुळे अशीच भाषा वापरावी लागली त्याबद्दल खेद तर मुळीच नाही गैरसमज दूर झाल्यास खेद वाटला नाही तर तुमची मर्जी. मी हेतू स्पष्ट केला आहे तो किमान इथून पुढे लक्षात ठेवला तरी पुरे.

In reply to by संजय क्षीरसागर

कशाला उगाच या बोटावरची थुंकी त्या बोटावर करताय ? लेखकाने मला अजूनही ते शिक्षण (B .Arch ) घ्यायची इच्छा असून मला जे शिकता नाही आल ते शिकायचंच आहे,व पुढे जाऊन स्वतःचा स्वतंत्र व्यवसाय करण्याचा मानस आहे इतके स्पष्ट लिहिले असताना औपचारिक पदवीची गरज नाही म्हणून अनाहूत सल्ला दिला. "आवडीचं काम करायला क्वालिफीकेशन लागत नाही""त्यामुळे फॉर्मल डिग्रीचा हट्ट सोडा."हा पहिलाच प्रतिसाद मग जमल्यास यथावकाश डिग्री घेता येईल. मग हि सारवासारव त्यानंतर आर्किटेक्टला फक्त प्लान टाकायला सही लागते हा सल्ला त्यानंतर आपलीच लाल करायला सीए हा एकमेव असा व्यावसाय आहे ज्यात केवळ सहीनं कागदाला ऑथेंसिटी येते हे लिहिले. सी ए च्या कार्यालयात कारकून आणि आर्टिकल करणारी मुलेच सगळी कामं करत असतात आर्किटेक्टच्या कार्यालयात काय वेगळे असते का? उगाच आम्हीच हुशार कशाला? यानंतर आर्किटेक्टचं तसं नाही त्याचं डिजाइन उत्तम असावं लागतं आणि प्लान पास व्हायला एमाअर्चवाला लागतो. आणि वर हि टेक्निकल मिस्टेक आहे हि सारवासारव ती सुद्धा मी स्पष्ट पणे तुम्ही थापा मारता आहात असे लिहिल्यावर. वर मला लिहिता आहात प्रतिसाद "ठोकल्या" बद्दल. परत मला भाषा सुधारण्याबद्दल लिहीत आहात हळूहळू प्रतिसाद नीट वाचायची सवय लागेल आणि त्यामुळे मग अर्थ सुद्धा कळायला मदत होईल. मान्य आहे कि आम्हाला अशी अलंकारिक भाषा समजत नसेल जी नंतर कोलांट्या मारण्या साठी सोयीची आहे. मी लष्करी पठडीतील माणूस आहे. उगाच अलंकारिक भाषा वापरून लोकांना थुका लावायची सवय नाही आणि चूक झाली तरी आपलीच लाल म्हणण्याची सवय हि नाही. चूक झाली तर चूक झाली म्हणून माफी मागून मोकळे होता येते. उगाच पिसारा घेऊन नाचायला लागले तर पार्श्वभाग उघडा पडतो. पाहिल्यान्दा लेखकाने काय विचारले आहे ते न पाहता अनाहूत सल्ले देणे. मग आपलीच लाल करणे आणि शेवटी थापा मारल्यावर उघडे पडल्यावर टेक्निकल मिस्टेक म्हणून या बोटावरची थुंकी त्या बोटावर करत आहात. हे पाहून करमणूक मात्र भरपूर झाली .

In reply to by सुबोध खरे

बी आर्च जमलं नाही तर काय करावं ? AMIE ला तेवढा स्कोप आहे का ? ऐकून आहे कि M.Arch full time without attendance सुद्धा करू देतात काही कॉलेज. तसं करता येईल का ?

In reply to by संजय क्षीरसागर

अस ज्युनिअर्स वर काम सोपवून नाही चालत हो. फक्त सही पुरते पाच वर्शाचे खडतर शिक्षण कोण घेइल?

In reply to by संजय क्षीरसागर

बी आर्च आणि कॉपोरेशनमधे राजिस्ट्रेशन असल्याशिवाय प्लानवर सही करता येत नाही इतका उघड मुद्दा मी सांगितलायं . तुम्ही अर्थ काढतायं की नुसती सही करण्यासाठी पाच वर्ष शिक्षण घेणं !

मला फ्रॉम अ स्क्रॅच प्रोग्रामिंग शिकायचे आहे, सी लँग्वेज पासून सुरुवात करावी म्हणतो, कोणी मदत करू शकेल का? मला व्यवसायभिमुख शिकायचे नाहीये सर्टिफिकेशन वगैरे नसले तरी चालेल, फक्त उत्तम प्रोग्रामर व्हायचे आहे, प्रोग्रामिंगमुळे सुस्पष्ट विचार करायला मदत होईल असे वाटते. कानिटकर ह्यांचे लेट अस सी विकत आणले पण प्रामाणिकपणे सांगता मला त्यातला काही सुधरेना. कोणी मदत करू शकले तर उपकृत होईल हेवेसांन :)

In reply to by फेदरवेट साहेब

नका फॉलो करू. ते सर्टिफिकेशन कोर्स कॉलेज मध्ये असतात त्या साठी आहे .त्यामुळे तुम्हाला नुसतं प्रोग्रामर व्हायचंय तर बरीच पुस्तकं उपलब्ध आहेत .

In reply to by फेदरवेट साहेब

सी चा नाद सोडा. "लेट अस सी" सिझन्ड प्रोग्रामरलाही कळणार नाही इतकं किचकट आहे. का प्रसिद्ध झालं कोणास ठाऊक. तुम्ही पायथॉन शिका. आजची घडीची सर्वात सोपी प्रोग्रामिंग लॅंग्वेज आहे ती. आणि सोपी असूनही प्रचंड ताकदवान. आणि हो, प्रोग्रामिंगमधील येणारा काळ पायथॉनचा आहे. :)

In reply to by आदूबाळ

ऑनलाईन कोर्सेसबद्दल काही कल्पना नाही. मी स्वतः A Beginner's Python Tutorial इथून शिकलो. एक सांगण्यासारखी गोष्ट म्हणजे, बरीचशी पायथॉनची ऑनलाईन टुटोरियल्स व्हर्जन २.क्ष ची आहेत. यातील print "Hello, World!" ही ओळ व्हर्जन ३.क्ष मध्ये print("Hello, World!") अशी लिहावी लागते. सध्या पायथॉनचे 3.6.0 हे अद्ययावत व्हर्जन आहे. पायथॉनमध्ये एन्ट्री लेव्हल प्रोग्रामिंग खुपच सोपे आहे. ऑनलाईन टुटोरियल्स वाचूनही सहज जमून जाईल.

In reply to by सतिश गावडे

सुरुवातीला बिगिनर्सनी पायथॉन शिकावी या सल्ल्याशी सहमत आहे. नॉन प्रोग्रॅमर्स साठी तोंडओळख आणि अभ्यासासाठी हि पायथॉन डॉट ऑर्गवरची विकी उपयुक्त आहे. https://www.pythonanywhere.com/ सारखे क्लाउड बेस्ड आयडीई वापरून सराव करणे अत्यंत सोपे आहे. एकदा सराव झाल्यावर मात्र कॉम्पुटर सायन्स मुळातून शिकावे. यासाठी इंटरनेटवर भरपूर चांगले रिसोर्सेस उपलब्ध आहेत. MIT Open CourseWare हा त्यापैकी अतिशय चांगला रिसोर्स.

In reply to by सतिश गावडे

+१००००००० कोर्सेरा वर चांगले कोर्सेस आहेत. एक पायथॉन फॉर किड्स म्हणुन पण पीडी एफ आहे. हवी असल्यास सांगा , पाठवेन. नाही तर गुगल करा, सहज डालो करता ये ईल.

In reply to by फेदरवेट साहेब

फेदरवेट साहेब.. मी आयटी क्षेत्रात आहे. प्रोगामर म्हणून सुरुवात केली आणि हळू हळू वरच्या पायर्‍या चढत आहे. स्पष्ट सांगायचे म्हणजे मला तुमचा प्रश्न नीटसा उमगला नाही. तुम्हाला उत्तम प्रोग्रामर व्हायचे आहे म्हणजे नक्की काय? उत्तम प्रोग्रामर होऊन नक्की कुठल्या प्रकारचे सॉफ्टवेअर तयार करणार आहात? ह्या प्रश्नामागचा उद्देश असा की समजा तुम्ही आत्ता सी शिकला तर त्याचा उपयोग फक्त काही विशिष्ट क्षेत्रात होतो. त्यामुळे घरातल्या घरात तुम्हाला फार लिमिटेड प्रोग्रामिंग करता येईल. प्रोग्रामिंगमुळे सुस्पष्ट विचार करायला मदत होईल असे तुम्ही लिहीले आहे. सी च्या high learning curve मुळे बराचसा वेळ शिकण्यात जाईल आणि डिसकरेज व्हाल. त्यापेक्षा माझे सजेशन असे असेल की HTML शिका मग हळूहळू javascript शिकून वेब पेज बनवायला लागा. खूप समाधान मिळेल. आणि तुमचे प्रोग्रामिंगचे स्वप्न पण पुर्ण होईल. जर इलेक्ट्रॉनिक्र क्षेत्राशी संबंध नसेल तर सुरूवातीला सी शिकण्याच्या नादाला लागू नका. फार डिसकरेज व्हाल. HTML, Javascript मध्ये फास्ट शिकू शकाल.

In reply to by योगी९००

HTML शिकायला सोपी आहे. शिवाय आपलं स्वतंचं "वेब पेज" बनवताना समाधान मिळतं. मात्र HTML डीझाईन आहे प्रोग्रामिंग नव्हे. प्रोग्रामिंगसाठी तुम्ही म्ह्टल्याप्रमाणे Javascript वापरावी लागते. मात्र HTML + Javascript ही जोडीही थोडीशी अवघड आहे शिकायला.

In reply to by सतिश गावडे

मात्र HTML + Javascript ही जोडीही थोडीशी अवघड आहे शिकायला हो खरंच..पण सी पेक्षा सोप्प पडेल. बाकी तुम्ही सुचवलेला पायथॉनचा पर्याय पण चांगला आहे.

In reply to by फेदरवेट साहेब

Pluralsight.com हि एक वेबसाईट खूप फायदेशीर ठरेल. अर्थात ही पेड मेंबरशिप आहे (६००० एका वर्षासाठी, २००० रु. ३ महिन्यांसाठी). या संकेतस्थळावर कुठल्याही प्रोग्रामिंग लँग्वेज चे बेसिक ते एडवांस्ड टुटोरिअल विडीओज आहेत. कुठलीही लँग्वेज खूप सोप्या पद्धतीने शिकता येईल.

आर्कीटेक्चर हे शिक्षण कला आणि तंत्र ह्यावर जास्त अवलंबून असते. हौशेने चित्र काढणारे खूप जण असतात. चित्रकला महाविद्यालयात ५ - ५ वर्षे शिकवतात ते काय शिकवणार असेच वाटते. पण अनुभवाने सांगतो ती ५ वर्षे कमी पडतात. चार नॉर्मल लोकात चांगला चित्रे काढणारा असणे अन आपल्यासारख्या सगळ्या चित्रं जमणार्‍यातच राहून शिकणे ह्यातला फरक तेथे कळतो. आपल्या कलेचा कस लागतो. आर्कीटेक्चरचे तसेच आहे (जेजे चे आर्कीटेक्चर आणि आर्ट हे म्हणून संलग्न आहे.) तुम्ही एमसीए केले आहे, सॉफ्टवेअरचे अन अ‍ॅप्लिकेशनचे ज्ञान आहे. त्याचा तुम्हाला फायदा होईल. चारपाच वर्षे आर्थिक स्थितीला हँडल करु शकत असाल तर अवश्य शिका. ह्यातले कॉन्स असेकी, लग्न, करीअर, स्थिरता हे सारे तुमच्या सध्याच्या वयातच गाठून येते. ह्या वेळेत असा धाडसी निर्णय घेणे म्हणजे ह्याचा परिणाम ज्या कुणा आप्तेष्ट, कुटुंबिय ह्यांच्यावर होईल त्यांना कल्पना देऊन, डिस्कस करुन ठरवणे. एक सुवर्ण मध्य म्हणजे थ्रीडी (मॅक, माया) प्रायव्हेट इन्स्टिट्युट्मध्ये शिकून थ्रीडी रेंडरिंग, वॉकथ्रु, प्लान्स अशी फ्रीलान्स कामे करणे. एखाद्या आर्कीटेक्टबरोबर अ‍ॅटॅच्मेंट घेऊन कामे मिळू शकतात. पैसाही मजबूत मिळतो. आपला स्वतःची नोकरी सांभाळून फावल्या वेळात करण्यासरखा हा व्यवसाय आहे.

In reply to by अभ्या..

एक सुवर्ण मध्य म्हणजे थ्रीडी (मॅक, माया) प्रायव्हेट इन्स्टिट्युट्मध्ये शिकून थ्रीडी रेंडरिंग, वॉकथ्रु, प्लान्स अशी फ्रीलान्स कामे करणे. एखाद्या आर्कीटेक्टबरोबर अ‍ॅटॅच्मेंट घेऊन कामे मिळू शकतात. पैसाही मजबूत मिळतो. आपला स्वतःची नोकरी सांभाळून फावल्या वेळात करण्यासरखा हा व्यवसाय आहे. यानं लगेच सुरुवात होईल.

In reply to by अभ्या..

अभ्याशी सहमतच! स्वतंत्र व्यवसाय करायचा किंवा नावापुढे आर्किटेक्ट अशी उपाधी हवी असेल तर रितसर पदवीशिवाय गत्यंतर नाही. खेडूत सरांचे मार्गदर्शन उपयुक्त आहे. आर्किटेक्टची चार-पाच वर्षे आणि तिथून पुढे तीन वर्षे अशी आठ वर्षे इन्कमची दुसरी सोय असावी लागेल. आता तुम्ही २९ म्हणजे अजून ३६ व्या वर्षापर्यंत व्यावसायिक वास्तुकार होऊ शकाल. हेच ध्येय असेल तर तेच करा.. काही व्यवसाय असे आहेत जिथे डिग्री असल्याशिवाय मजा नाही, आर्किटेक्चर त्यापैकी एक. हिम्मते मर्दा तो मदत दे खुदा! आमच्या सगळ्यांच्या शुभेच्छा तुमच्यासोबत आहेतच.

ए. एम आय ई सारखे आर्किटेक्टची पण मला वाटते परिक्षा/मेंबरशिप असते. आताही असेल. ती सरकारमान्य आहे. कृपया चौकशी करावी. मला वाटते ती परिक्षा आपल्या सारख्या लोकांसाठीच आहे...

मी पहिली ते ११ वी शाळेतील सर्वात हुशार विद्यार्थी होतो. पण अचानक ११ वी च्या परीक्षेत गणिताचा पेपर अवघड गेला व एकदम सरासरी ७८ वरून ६८ वर आली. ( त्याकाळी ८२ टक्के वाला मुलगा पहिल्या पन्न्नसात येत असे. सबब ७८ टक्के हा स्कोर हुशार विद्यार्थ्याचाच. मी काहीतरी वेगळे करायचे म्हणून व थोडीफार चित्रकला बरी म्हणून पुण्याला अभिनव मधे नाव घातले. त्यावेळी महिन्याची फी कॉलेजची रूपये ५० व रहाण्याजेवण्याचा महिन्याचा खर्च ५० होता. २५ पैशाला अप्सरा पेन्सील मिळत असे इम्पिरियल पेपर ५० पैसे. शिकवायला काही हुशार शिक्षक होते पण त्यांची खाजगी प्रॅक्टीस फार चाललेली आहे असे चित्र नव्हते. ( डफ्फड वकील न्यायाधीश होतो असे म्हणतात ). इथे हुशारांना धन्दा मिळत नसे. त्यावेळी ५ वर्ष सलग पास होणे हे दुरापास्त होते. एकूण ३७ विषय ५ वर्षात शिकावे लागत. त्यामाने बी ई सिव्हील हा कोर्स फारच साधा असे. जवळ जवळ आठवड्याला दोन ते तीन या दराने सबमिशन करावी लागत. मी तो कोर्स दोन वर्षानंतर सोडून दिला. कारण २ र्‍या वर्षाला मी एकाच विषयात ५ मार्काने नापास झालो( अप्लाईड मेकॅनिक्स) .त्या अभ्यासक्रमात ५० टक्के ला पासिंग होते. व सर्व विषयात कमीत्यकमी ५० टक्के तरच वर्ष सुटणार असा कडक नियम. नो ए टी के टी.. ७५ टक्के उपस्थिती नसेल तर परीक्षेतला परवानगीच नाही. व कोणत्याही तासाला रॅन्डम रोलकॉल असायचा. एक तास अबसेण्ट म्हणजे एक दिवस अबसेंट. आता मी ज्या स्थितीला आहे त्यापेक्षा माझे त्या कॉलेजमधील वर्ग मित्र यांनी फार मोठे मैदान आयुष्यात मारले आहे असे नाही. या क्षेत्रात डिझाईनचे बक्शिस ब्राह्मण अर्किटक्टला पण कामाचे टेडर मराठा आर्किटेक्टला याचा अनुभव अनेक वेळा घेऊन माझ्या एका मित्राने प्राध्यापकी स्वीकारली. मोठमोठ्या गाजलेल्या डोक्टरला मोठा व्यवसाय पुढे अपोपाप मिळत जातो तसे इथेही आहे. माझ्या त्याच मित्राला मोठी कामे मिळण्यासाठी जवळ जवळ १९८० ते २००८ इतका काळ वाट पहावी लागली. एकाच आयुष्यात जी डी आर्क, एम ई. व एल एल बी अशा तीन क्षेत्रातील पदव्या असलेल्या या मित्राची आता कोठे कीर्ती होऊ लागली आहे. आता बरेच आर्किटक्ट इन्टेरिअर डेकोरेटर होऊन होतात. यात पैसा मिळतो. पण पाच वर्षे जर घासायची तर ती इन्टेरिअर साठी का.... ? असा प्रश्न आहे. आजची काही डिझाईन पाहिली की याना कुणी पास केले असा प्रशन पडतो. अर्थात बिल्डर च्या लेखी वास्तुविदाची किंमत शून्य असते. केवळ सहीचा धनी.

In reply to by संजय क्षीरसागर

अगदी अपवाद असे असतात की एखादे प्रोजेक्ट फार प्रतिष्ठेचे , पैशाची काळजी करू नका असे असेल तर मग वास्तुविदाला असे काम मिळाल्याने सर्जनाचा आनंद मिळतो. असे एक जरी काम आख्या आयुष्यात मिळाले तर त्याला धन्योहं असे वाटते. अशी ज्याना संधि मिळाली त्याना आपला मुजरा ! अच्युत कानविंदे हे असेच एक नाव !

In reply to by संजय क्षीरसागर

बिल्डरच्या लेखी स्थापत्य अभियंत्याचीच(BE CIVIL) काय स्ट्रक्चरल इंजिनियर(M TECH STRUCTURE) ची पण किंमत सुद्धा शून्य असते अन्यथा एवढ्या इमारती आणि पूल पडले नसते. आपले म्हणणे खरे करण्यासाठी दुसऱ्याची री ओढणे ओडून द्या

थ्री इडियट्स सिनेमात मूळ रणछोडदास चांचडचा बाप म्हणतो कि समोर सगळे सलाम करतात पण पाठीमागे अंगुठा छाप म्हणतात. ते दुःख काय असते ते त्या माणसालाच समजेल. एक वर्ष मेडिकल चा प्रवेश हुकला तेंव्हा काय वाटते ते मी प्रत्यक्ष अनुभवले आहे. डॉक्टर व्हायचे असेल तर डॉक्टरची पदवीच पाहिजे. बाकी कामातील अनुभव इ आपल्या जागी आहेत त्याचे महत्त्व कमी होत नाही तरीही . सी ए च्या कार्यालयात काम करणारी पण सी ए न झालेली (आर्टिकल करून परीक्षेच्या वाऱ्या करणारी) मुले पहा. ३०००-४००० रुपये महिना वर्षानुवर्षे राबवून घेतली जातात. शेवटी काय होते. पदवी हातात पडली तर ठीक अन्यथा वेठबिगारी आहेच

सौजन्यपूर्ण भाषेत वार्तालाप करणे नसते का? असा सहज एक प्रश्न पडला, का संक्षीचे नावही कानफाट्या पडलंय ? (गोंधळलेला) फेदूदा

लष्करी पठडीत सुरुवातीची भाषा नेहेमी आणि सौजन्यपूर्णच असते. प्रतिसाद पहिल्यापासून नीट वाचा. पण थापा मारणे, या बोटावरची थुंकी त्या बोटावर करणे, लोकांची दिशाभूल करणे अशा वागण्याला ज् रा कडक भाषाच वापरावी लागते.

In reply to by सुबोध खरे

इतकंच नशीब समजा . एकदा तो सुरू झाला की इतक्या फालतू प्रतिसादांचा यथोचित समचार घ्यायला फारसा वेळ लागणार नाही.

In reply to by सुबोध खरे

प्रथम डिजाइन काय चिज़ आहे ते पाहू सी ए च्या कार्यालयात कारकून आणि आर्टिकल करणारी मुलेच सगळी कामं करत असतात आर्किटेक्टच्या कार्यालयात काय वेगळे असते का? उगाच आम्हीच हुशार कशाला?यानंतर आर्किटेक्टचं तसं नाही त्याचं डिजाइन उत्तम असावं लागतं हरेक आर्किटेक्ट शिकवल्या बरहुकूम तंतोतंत काम करेल पण प्रत्येक आर्किटेक्ट हा उत्तम डिजायनर असेलच असं नाही. इतका बारकावा आपल्याला झेपेल का ? तरीही प्रयत्न करतो. आर्किटेक्टचं काम हा त्याचा वैयक्तिक लँडमार्क असतो. म्हणजे एखादी इमारत हाफ़िज काँट्रॅक्टरनी डिझाइन केली तर ती इतरांपेक्षा वेगळी असते म्हणून त्याचं नांव आहे. त्या अर्थानं आर्किटेक्चरमधे `डिझाईन' महत्त्वाचंय. या उलट कोणत्याही सीएनं सही केली तरी फायनल अकाऊंटस `एकसारखेच दिसतात'. तस्मात, आर्किटेक्चरला `डिजाइन' महत्त्वाचंय. इतक्या वास्तू घडतात पण त्यात एखादाच ताजमहाल निर्माण होतो. त्याला डिजाइन म्हणतात. सीए आणि आर्किटेक्चर या व्यावसायात हा फरक आहे. म्हणून सीएच्या `सहीला' महत्त्व आहे आणि वास्तुविशारदाच्या `डिजाइनला' महत्त्व आहे. अर्थात सीएच्या सहीला महत्त्व आहे यात कुणाचा न्यूनगंड उफाळून येण्याचं काहीच कारण नाही. पाहिल्यान्दा लेखकाने काय विचारले आहे ते न पाहता अनाहूत सल्ले देणे. मग आपलीच लाल करणे आणि शेवटी थापा मारल्यावर उघडे पडल्यावर टेक्निकल मिस्टेक म्हणून या बोटावरची थुंकी त्या बोटावर करत आहात. बिल्डरच्या लेखी स्थापत्य अभियंत्याचीच(BE CIVIL) काय स्ट्रक्चरल इंजिनियर(M TECH STRUCTURE) ची पण किंमत सुद्धा शून्य असते अन्यथा एवढ्या इमारती आणि पूल पडले नसते. कॉर्पोरेशनमधे प्लान सबमीट करायला आर्किटेक्टची फॉर्मल डिग्री लागते ती बीआर्च ऐवजी एमार्च लिहीली गेली ही टेक्निकल मिस्टेक आहे. इतकी साधी गोष्ट आपल्याला कळत नसेल असं नाही. तरीही यावरनं मी लेखकाला नाऊमेद करतो हा निष्कर्ष कसा निघतो ? याचं एकदा शांतचित्तानं आत्मपरिक्षण केल्यास गैरसमज दूर होण्याची शक्यता आहे. चौरा म्हणतायंत की बिल्डरच्या लेखी आर्किटेक्टच्या डिझाइनला किंमत नसते (त्याला फक्त कमाल एफएसाय मिळवून देणारा आणि महापालिकेत काँटॅक्टस असलेला आर्किटेक्ट लागतो) त्यामुळे एखादाच अच्युत कानविंदे आपल्या मनाजोगं आणि स्वतःच्या शर्तींवर काम करु शकतो. अर्थात अच्युत कानविंदे किंवा हाफ़िज काँट्रॅक्टर वगैरे समजण्या इतका व्यासंग नसावा त्यामुळे तो प्रतिसादच समजला नाही आणि परिणामी ` स्ट्रक्चरल इंजीनीयरची इमारत आणि पूल पडणे' इतका विसंगत प्रतिसाद दिला आहे. बाकी प्रतिसादात किरकोळ गोष्टी आहेत पण तरी ही क्लिअर करतो. मग जमल्यास यथावकाश डिग्री घेता येईल. मग हि सारवासारव ?त्यानंतर आर्किटेक्टला फक्त प्लान टाकायला सही लागते हा सल्ला सद्य काळात प्रॅक्टीसींग आर्किटेक्टची सही लागणारं ते सर्वात महत्त्वाचं काम आहे. त्यानंतर आपलीच लाल करायला सीए हा एकमेव असा व्यावसाय आहे .... भाषेतून न्यूनगंडाची पुरेपूर प्रचिती येते. आधीच्या प्रतिसादात लिहील्याप्रमाणे सही कुठे लागते (म्हणजे फॉर्मल डिग्री कुठे लागते याविषयी तो प्रतिसाद आहे.) पण पूर्वग्रहच दूषित त्यामुळे गैरसमज तसाच राहाणार त्याला इलाज नाही. उगाच पिसारा घेऊन नाचायला लागले तर पार्श्वभाग उघडा पडतो. आता स्वतःचा कितपत झाकायला जमतोयं ते पाहा !

In reply to by संजय क्षीरसागर

सो मच फॉर बीइंग स्नॉब विथ संक्षी, तुम्हाला एक नंबर मंदी ब्रिटिश सिटीझनशिप भेटणार दिकरा!! इफ यु कम अक्रोस अ स्नॉब रुईन हिम लाईक एनिथिंग

In reply to by संजय क्षीरसागर

अर्थानं आर्किटेक्चरमधे `डिझाईन' महत्त्वाचंय. या उलट कोणत्याही सीएनं सही केली तरी फायनल अकाऊंटस `एकसारखेच दिसतात'. तस्मात, आर्किटेक्चरला `डिजाइन' महत्त्वाचंय. इतक्या वास्तू घडतात पण त्यात एखादाच ताजमहाल निर्माण होतो. त्याला डिजाइन म्हणतात.
माझी ह्याला किंचित असहमती आहे. तुम्हाला बहुदा जे समोर दिसतंय त्याला डीझाईन म्हणायचं आहे. एखाद्या गोष्टीला किती सुंदर आणि कलात्मकतेने बनवले आहे किंवा व्हिज्युअली ती कशी दिसतेय.. ह्याला तुम्ही डिझाईन म्हणत आहात. आणि हाफिज कॉन्ट्रॅक्टरचा उल्लेख करताय म्हणजे "हटके कल्पना" असल्याने तो वेगळाय असं तुम्हाला वाटत असावं. तर डिझाईन फक्त तेवढंच नसतं. मी मेकॅनिकलची आहे, पण आर्किटेक्चर साधारण त्याच तत्वावर आधारित आहे. उत्तम डिझाईन करायला तुम्हाला त्यामागचे विज्ञान समजुन घेणे आवश्यक आहे. त्यासाठी प्रत्येक्ष अनुभव महत्वाचा आहे, वादच नाही. पण शिक्षण तेवढेच महत्वाचे आहे. हे म्हणजे थोडं असं झालं की गॅरेजमधल्या मेकॅनिकला माझ्याहुन जास्तच माहिती असेल इंजिनची. पण म्हणुन इंजिन डिझाइन करणे त्याला जमेलच असं नाहीये. त्यामागे करोडो गोष्टी असतात. आणि शिकाव्याच लागतात. लेखकाने नीट विचार करुन निर्णय घ्यावा कारण त्यांचे वय २९ आहे. ह्या वयात नोकरी सोडून फुल्ल टाईम शिकणे अवघडच आहे थोडे. आवड म्हणुन संक्षींचा सल्ला प्रॅक्टिकल वाटतो. पण शिक्षण अत्यंत महत्वाचे आहे.

सर्व प्रथम तुमच्या जिद्दी ला अनेक सलाम आणि पुढील वाटचाली साठी शुभेच्छा. या धाग्यावरची चर्चा वाचली. काही अनुभवाचे ..बोल सांगावेसे वाटले. मी गेले १५ वर्षे पुणे इथे अंतर्गत रचना कार ...सजावट कार नव्हे..म्हणून काम करत आहे. माझा एक खांबी तंबू आहे. वास्तू विषारदाचं आणि माझं काम यात खूप फरक आहे. मला एखाद्या घराचा किंवा कार्यालयाचा इंच इंच लक्षात घ्यायला लागतो. वा.वि. मोठ्या स्केल वर काम करतात. पण दोघे ही क्लायंट ची गरज, पैसे आणि raw मटेरियल ची उपलब्ध ता यांचा मेळ बसवत आपली रचना सुंदर आणि सर्वांत वेगळी कशी असेल याचा प्रयत्न करत असतात. हे काम शिक्षण (formal education) घेतल्या शिवाय शक्य नाही. चांगली रचना/डिझाईन हे फक्त अनुभव किंवा आवडीतून तयार होत नाही. तुम्हाला वा.वि. चे formal education घेणं शक्य असेल तर नक्कीच घ्या. शुभेच्छा.

तुमची 'आर्किटेक्चर' हि खरेच पॅशन असेल, आणि पुढे जाऊन तुम्हाला जर याच क्षेत्रात करिअर करायचे असेल, तर तुम्हाला 'डिग्री'ला ऍडमिशन घ्यावेच लागेल. B Arch हि पूर्णवेळ 'पदवी' असून, त्यासाठी तुम्हाला 'प्रवेश' परीक्षेपासून सुरुवात करावी लागेल... तुमचे सध्याचे काम सांभाळत हि पदवी मिळवण्यासाठी तुमच्याकडे पुढील पर्याय आहेत... १. काही मुक्त विद्यापीठे पण हा कोर्स देऊ करतात असे मी ऐकले आहे, तुम्ही त्याची चौकशी करू शकता. २. अशा कॉलेज मध्ये प्रवेश घ्या कि जिथे तुम्हाला पूर्ण वेळ कॉलेज करावे लागणार नाही. शुभेच्छा!!!

स्वतन्त्र, चर्चा वाचल्या. माझं मत देतो. मी वास्तुविशारदशास्त्राशी (=आर्किटेक्चरशी) आजीबात संबंधित नाही. तुम्हाला हे शास्त्र स्वान्तसुखाय शिकायचं असेल तर खुशाल संजय क्षीरसागर म्हणतात ते अंमलात आणा. ते जगातल्या बहुतेक गोष्टींचा स्वान्तसुखाय पद्धतीने अर्थ लावू पाहतात. वर प्रसाद_कुलकर्णी यांनी बी.आर्च. या पदवीची महती विशद केली आहे. अशा वेळेस संजय क्षीरसागर म्हणतील की पदवीच्या मागे लागू नका. सरळ पुस्तकं वाचून, सहअध्यायींचा व्हॉट्सप गट स्थापून त्यात चर्चा करून, विशारदाकडे काम करून त्यातून शिका. आणि हे शिकंत असतांना प्रक्रियेचा आनंद घ्या. पुढे प्रक्रियेत निपुणता आली की तुम्ही तुमच्या मनाप्रमाणे काम हाती घेऊ शकाल. या आगमात (=अप्रोचमध्ये) चुकीचं काही नाही. पण तो बहुतांश लोकांच्या पचनी पडंत नाही. कारण की या सर्व घडामोडींत संजय क्षीरसागर केवळ स्वत:लाच जबाबदार आहेत. याउलट तुम्हाला जर करियर करायचं असेल तर तुम्ही इतरांना जबाबदार असाल. निदान सुरुवातीला तरी. अशा वेळेस पाठीवर पदवीचा छाप असलेला बरा पडावा. स्वयंपाकाची आवड असलेला उत्तम आचारी असेलंच असं नाही. मोजक्या आप्तेष्टांसाठी जेवण बनवणे आणि त्रयस्थ शंभर लोकांसाठी जेवण बनवणे या दोन सर्वस्वी विभिन्न प्रक्रिया आहेत. तसेच उपाहारगृह (=हॉटेल) चालवणे हे या दोहोंहून पार वेगळं आहे. असाच प्रकार वास्तुविशारदशास्त्रांतही होत असावा. तुमची वास्तूसंकल्पनाची (=बिल्डींग डिझाईनची) ओढ निवांत वेळेतली आहे (असं तुम्ही लिहिलंय). भविष्यात तुम्हाला यांतून धंदा चालवायचा आहे. कुठला धंदा ते लेखातून स्पष्ट होत नाही. अशा वेळेस गणितं साफ म्हणजे साफंच बदलू शकतात. आपल्याला या क्षेत्रातलं नक्की काय आवडतं ते चाचपून पाहण्यासाठी माझ्या मते पदवीचा उपयोग व्हावा. आ.न., -गा.पै.

In reply to by गामा पैलवान

तुम्ही समजू शकाल म्हणून प्रतिसाद देतो. मी लगेच कामाला सुरुवात करा म्हणतोयं डिग्री नाही म्हणून खंत करु नका, ती यथावकाश घेता येईल. कारण एकदा कामला सुरुवात केल्यावरच त्यातले बारकावे कळतात. कारण की या सर्व घडामोडींत संजय क्षीरसागर केवळ स्वत:लाच जबाबदार आहेत. मी स्वतः व्यावसायिक आहे हो ! आणि प्रत्येक व्यावसायिक हा क्लायंटलाच जवाबदार असतो. स्वच्छंदानं केलेलं काम सुद्धा चोख आणि वेळेवरच होतं आणि करायला पाहिजे. मोजक्या आप्तेष्टांसाठी जेवण बनवणे आणि त्रयस्थ शंभर लोकांसाठी जेवण बनवणे या दोन सर्वस्वी विभिन्न प्रक्रिया आहेत. उपाहारगृह (=हॉटेल) चालवणे हे या दोहोंहून पार वेगळं आहे. बरोबर पण त्यासाठी हाताला चव पाहिजेच, मग तुम्ही आप्तेष्ठांसाठी जेवण बनवा की लग्नसमारंभासाठी की हॉटेल चालवा. तद्वत आर्किटेक्चरला निर्मितीच्या आनंदासाठी डिजाइनचं अंग हवं. त्यात बिल्डरशी किती आणि स्ट्रक्चरल डिजायनरशी किती तडजोड करायची याचा सही अंदाज हवा. तो हँडस ऑन काम केल्याशिवाय शक्य नाही. माझा मित्र पुण्यातला प्रख्यात आर्किटेक्ट आहे. त्याच्या आग्रहाखातर मी स्वतः त्याच्याबरोबर तीन दिवस रात्रंदिवस राहून तो व्यावसाय जवळून बघितला आहे. आपल्याला या क्षेत्रातलं नक्की काय आवडतं ते चाचपून पाहण्यासाठी माझ्या मते पदवीचा उपयोग व्हावा. माझ्या मते आधी त्या क्षेत्रात नक्की काय चालतं हे पाहून (अ‍ॅक्च्युअल काम करुन) नंतर डिग्री घेणं श्रेयस.

In reply to by संजय क्षीरसागर

जे तीन दिवस त्या आर्किटेक्ट मित्राबरोबर होतो त्यात त्याच्या ऑफिसच्या स्टाफ मिटींग्ज, त्याच्या असिस्टंट आर्किटेक्टसनी केलेली कामं, त्यातल्या कामांची सिलेक्शन प्रोसेस, बिल्डर्स बरोबरच्या मिटींग्ज, बिल्डर्सचा कामाकडे पाहाण्याचा दृष्टीकोन, बिल्डींग एलीवेशन्स, कॉस्ट कंस्ट्रेंटस, कॉर्पोरेशनमधलं काम, अ‍ॅक्च्युअल साइट विजीट, कॉर्पोरेशनच्या अधिकार्‍यांशी ऑन-साइट झालेली बोलणी हे सर्व होतं. थोडक्यात, डिजाइनची आवड असणं, डीग्री घेणं आणि नंतर मनाजोगतं काम करायला मिळणं यात महद अंतर आहे. एकूण व्यावसाय काय आहे याची पूर्ण माहिती असल्याखेरीज, आधी डीग्री घेण्याचा सल्ला देणं निर्बुद्धपणाचं आहे.

In reply to by संजय क्षीरसागर

मला अजूनही ते शिक्षण (B .Arch ) घ्यायची इच्छा असून मला जे शिकता नाही आल ते शिकायचंच आहे,व पुढे जाऊन स्वतःचा स्वतंत्र व्यवसाय करण्याचा मानस आहे. एवढे लेखकाने स्पष्ट लिहूनही आधी डीग्री घेण्याचा सल्ला देणं निर्बुद्धपणाचं आहे. बिस्मिलाहरहिमनुर्रहीम