नमस्कार !
महाराष्ट्रात भाजप-सेना युतीचे राज्यसरकार बनल्यापासुन अनेक कुरबुरी चालू होत्या. रोज रोज एकमेकांवर आरोप तर करायचे पण एकत्र सत्तेतही राहायचे हे पाहून माझ्यासारख्या सामान्य आणि निष्पक्ष व्यक्तींना नक्कीच उबग आला असेल.
काल २६ जानेवारी २०१७ च्या मुहुर्तावर शिवसेनेने युती तोडण्याची घोषणा केली आणि भाजप, शिवसेना, राष्ट्रवादी, काँग्रेस यांच्या कार्यकर्त्यांना जितका आनंद झाला नसेल तितका एक सामान्य माणूस म्हणून मला झाला.
प्रत्येक पक्ष आतापर्यंत बेडीकीने बैलाचे सोंग घेतल्याप्रमाणे आपली ताकद फुगवून दाखवत होता त्यांची खरी ताकद आता कळणार आहे.
मुंबई, ठाणे, पुणे आणि इतर शहरात होणार्या पालिका / जि.प. आता भाजपा, सेना स्वतंत्रपणे लढतील तर काही ठिकाणी राष्ट्रवादी-कॉग्रेस युती करतील. शिवाय या खेचाखेचीत निवडणूकांसाठी १ महिन्यापेक्षाही कमी कालावधी राहिला असल्यामुळे या वेळची निवडणूक वेगळी ठरणार आहे. प्रत्येक पक्ष वेगवेगळे लढत असल्यामुळे पक्षातील तिकिट इच्छूकांना बर्याच प्रमाणात वाव मिळेल त्याचप्रमाणे इंपोर्टेड इच्छूकांना देखील बर्याच प्रमाणात वाव मिळेल. एकंदरीत निवडणूकीच्या तोंडावर पक्ष सोडून जाणार्यांची संख्या घटेल असा अंदाज आहे.
शिवाय एकाच वॉर्डात चार ते पाच मोठे पक्ष, स्थानिक वजनदार नेतेमंडळी निवडणूक लढविणार असल्यामुळे ऐनवेळी 'बशी घेणार्या' उमेदवारांना घसघशीत फायदा होण्याचा संभव आहे. पण नोटबंदी नंतरच्या या काळात हा प्रश्न वेगवेगळे पक्ष कसा सोडविणार हे पाहणे रोचक ठरणार आहे.
मुंबईत मागील वेळी मराठी मतांमधे जो सेना-मनसेच्या मागे एकवटण्याविषयी संभ्रम होता तो आता बर्याच प्रमाणात निवळला असून मराठी मतदाराला या दोघांपैकी नेमके कोणाला मत द्यायचे हे नक्की कळाले असावे असाही एक अंदाज आहे. मात्र काही नेते, सेना-मनसे समर्थक अजुनही सेना-मनसे युती होईल असे मनातल्या मनात मांडे खात आहे. मात्र ठाकरेंचा सध्याचा पवित्रा पाहता ते कोणाशीही युती करतील असे वाटत नाही. मात्र मतदानाचे निकाल आल्यानंतर मात्र सगळ्यांनाच सगळे ऑप्शन ओपन असतील असे वाटत आहे.
गुजराती, मारवाडी मतदार प्रामुख्याने भाजपचा मतदार मानला जातो. मात्र मुंबईतील बहुसंख्य गुजराती / मारवाडी समाज व्यापारक्षेत्रात गुंतला आहे. त्यांच्या प्रत्येकाच्या व्यवसायावर नोटबंदीनंतर काय आणि किती प्रमाणात परिणाम झाला यावर त्यांचे यंदाचे मतदान अवलंबून असेल की ते काहीही झाले तरी भाजपालाच मते देतील काय हे बघणे देखील रोचक ठरेल. त्यातच कालच शरद पवार साहेबांना पद्मविभुषण जाहिर झाला असल्यामुळे निवडणूकीच्या तोंडावर भाजपा राष्ट्रवादी अशी नवी युती होणार काय असादेखील संभ्रम उत्पन्न होण्याचा संभव आहे. मात्र अशी शक्यता निकालांअगोदर तरी दिसत नाही. कदाचित शिवसेनेने मुंबई / पुणे राखले तर ते भविष्यात राज्यसरकारमधून बाहेर पडू शकतात व त्यावेळी राष्ट्रवादी मदतीला येऊ शकेल अशीही एक शक्यता दिसते. (साहेबांना पदक अगोदरच्या कामगिरीबद्द्ल मिळाले आहे पण तो वेगळा मुद्दा आहे.)
युपी बिहारी मंडळी आपापल्या राज्यात सपा, बसपा, जनता दलाला आणि काही प्रमाणात भाजपाचे पाठीराखे असले तरी एकेकाळी ही मंडळी मुंबईमधे बर्याच अंशी काँग्रेस समर्थक होती. मात्र सध्याची काँग्रेसची अवस्था पाहता ही मंडळी कोणामागे उभी राहतात हे पाहणे रोचक ठरेल. कदाचित बर्याच ठिकाणी हीच मते निर्णायक ठरण्याची शक्यता आहे.
मुस्लीमबहूल भागात सपा ची कसोटी लागणार आहे तर ओवेसींची पार्टी काय करते यावर देखील लक्ष ठेवावे लागेल. ओवेसींनी कालच "मोदींना परदेशी दाढीवाले का आवडतात" असा वरवर योग्य वाटणारा सवाल विचारुन टीआरपी खेचून घेतला आहे.
सगळ्यात कठीण अवस्था विविध आंबेडकरवादी पक्षांची आहे. आठवलेंचा पक्ष भाजपाबरोबरच राहतो की कसे हे देखील २८ जानेवारीपर्यंत माहित पडेल. मात्र सध्यातरी त्यांच्यासमोर दुसरा पर्याय दिसत नाहिये.
अगदी ५०-१०० मतांनी पराभव / विजय होण्याची शक्यता असणारी यावर्षीची निवडणूक अगदी रोचक होणार आहे हे नक्की. कोण कोठे जिंकेल हे आजच सांगणे अवघड असले तरी आपण आपापले अंदाज मांडू शकता. मात्र स्थानिक उमेदवाराचे कर्तुत्व, त्याचा इतिहास पाहूनच त्याला निवडून द्यावे ही माझीतरी अपेक्षा आहे. पक्ष कोणताही असो, काही फरक पडू नये असे मला वाटते.
आमच्या ठाण्यात विविध पक्षांनी आपापल्या विभागातील सोसायट्यांना भेटणे सुरु केले आहे. आम्हीही आमच्या समस्या / मागण्या त्यांच्यापुढे मांडून काही अपेक्षा ठेवल्या मात्र सध्या कोणताही उमेदवार कोणतेही वचन देण्यास राजी नाही यावरुन त्यांच्या मनाची अस्थिरता देखील दिसून येते. एकंदरीत उमेदवारांसाठीही ही निवडणूक वेगळी ठरणार आहे हे निश्चित.
तुम्हाला काय वाटते ते जाणून घेण्यास इच्छुक आहे.
अवांतर : मी लेखाच्या शिर्षकात मुंबईचा उल्लेख केला असला तरी धागा मुंबई, ठाणे, पुणे आणि इतर शहरांतल्या निवडणूकींच्या चर्चांसाठी वापरला जाऊ शकतो. राज्यांच्या निवडणूकांवर इथे अगोदरच एक धागा असल्यामुळे त्याची चर्चा त्याच धाग्यावर केली तर ते संदर्भांसाठी उपयुक्त राहिल.
वर्गीकरण
वाचने
61707
प्रतिक्रिया
405
मिसळपाव
प्रतिक्रिया
लिन्क देण्याआधी संबंधितांना
In reply to लिन्क देण्याआधी संबंधितांना by संदीप डांगे
काय गुरुजी... तुम्हाला तर
In reply to लिन्क देण्याआधी संबंधितांना by श्रीगुरुजी
तुम्हाला बरोबर समजलं. गंमत
In reply to काय गुरुजी... तुम्हाला तर by संदीप डांगे
किती खोटं बोलाल गुरुजी.. बस
In reply to तुम्हाला बरोबर समजलं. गंमत by श्रीगुरुजी
परत तेच पालुपद. कितीही वेळा
In reply to किती खोटं बोलाल गुरुजी.. बस by संदीप डांगे
संदीप डांगेंजी,
लोभ असावा ,,!!
In reply to संदीप डांगेंजी, by हतोळकरांचा प्रसाद
घराणेशाहीच्या जोरावर पहिली
In reply to लोभ असावा ,,!! by विशुमित
मला तेच म्हणायचे आहे कि समाज
In reply to घराणेशाहीच्या जोरावर पहिली by विशुमित
हो बरोबर आहे...
In reply to मला तेच म्हणायचे आहे कि समाज by हतोळकरांचा प्रसाद
पंकजा मुंडेना त्या लिस्ट
In reply to हो बरोबर आहे... by विशुमित
मराठवाड्यातील जनतेला काय
In reply to पंकजा मुंडेना त्या लिस्ट by हतोळकरांचा प्रसाद
पूर्णपणे असहमत! वेळ मिळेल
In reply to मराठवाड्यातील जनतेला काय by विशुमित
विशुमित यांनी जी एक ओळ लिहून
In reply to पूर्णपणे असहमत! वेळ मिळेल by हतोळकरांचा प्रसाद
हो मलाही तसेच वाटले, किंवा
In reply to विशुमित यांनी जी एक ओळ लिहून by संदीप डांगे
पंकजा डॅशिंग आहे. बीड परभणी
In reply to हो मलाही तसेच वाटले, किंवा by हतोळकरांचा प्रसाद
उदयनराजे भोसलेंचा उदाहरण
In reply to हो बरोबर आहे... by विशुमित
तुमच्याबद्दलचा आदर दिवसेंदिवस
In reply to उदयनराजे भोसलेंचा उदाहरण by विशुमित
मोदक जी ..
In reply to तुमच्याबद्दलचा आदर दिवसेंदिवस by मोदक
म्हणजे साताऱ्यात तेवढ्यापुरती
In reply to उदयनराजे भोसलेंचा उदाहरण by विशुमित
अवांतर आहे.. पण सातार्याचा
In reply to म्हणजे साताऱ्यात तेवढ्यापुरती by चिनार
चंद्रविलास भुवन चांगला पर्याय आहे की...........
In reply to अवांतर आहे.. पण सातार्याचा by मोदक
सातारा मेढा रोडवर २-३ चांगले
In reply to अवांतर आहे.. पण सातार्याचा by मोदक
हे उदाहरण अतिशय चुकीचे आहे.
In reply to उदयनराजे भोसलेंचा उदाहरण by विशुमित
सामान्य जनतेबद्दल चे मत बरोबर
In reply to हे उदाहरण अतिशय चुकीचे आहे. by तेजस आठवले
तुम्हाला पाहिजे तसा अर्थ
In reply to सामान्य जनतेबद्दल चे मत बरोबर by संदीप डांगे
तुम्ही तुमच्याच मताला
In reply to तुम्हाला पाहिजे तसा अर्थ by हतोळकरांचा प्रसाद
असं बघा तुम्ही म्हणता कि
In reply to तुम्ही तुमच्याच मताला by संदीप डांगे
मला काय वाटतं हे मी लिहलं
In reply to हे उदाहरण अतिशय चुकीचे आहे. by तेजस आठवले
स्पार्टन्स ..................
हाहाहाहा! भारीच होता तो विडिओ
In reply to स्पार्टन्स .................. by अभ्या..
राज ठाकरेंचा व्यक्तिशः विरोधक
माझा प्रतिसाद कापला तुम्ही :(
In reply to राज ठाकरेंचा व्यक्तिशः विरोधक by संदीप डांगे
मला आश्चर्य वाटते आहे. राज
In reply to राज ठाकरेंचा व्यक्तिशः विरोधक by संदीप डांगे
मागेच कुठल्यातरी धाग्यावर बोलो होतो
मनसे संपलेला पक्ष आहे. या
In reply to मागेच कुठल्यातरी धाग्यावर बोलो होतो by वरुण मोहिते
राज ठाकरेंचे भाषण
In reply to मनसे संपलेला पक्ष आहे. या by श्रीगुरुजी
मनसेविषयी आपले मत का चांगले
In reply to राज ठाकरेंचे भाषण by गॅरी ट्रुमन
कारण
In reply to मनसेविषयी आपले मत का चांगले by हतोळकरांचा प्रसाद
सहमत आहे. खरंतर मनसेची
In reply to कारण by गॅरी ट्रुमन
खरंतर मनसेची स्थापना झाली
In reply to सहमत आहे. खरंतर मनसेची by संदीप डांगे
मनसेची वाटचाल हा एक मोठा विषय
In reply to खरंतर मनसेची स्थापना झाली by हतोळकरांचा प्रसाद
वरुण जी --
In reply to मागेच कुठल्यातरी धाग्यावर बोलो होतो by वरुण मोहिते
सगळे मृतावस्थेत दिसत नाहीत.
In reply to वरुण जी -- by विशुमित
राज ठाकरे
कार्यकर्त्यांवर उपकार करतोय
In reply to राज ठाकरे by वरुण मोहिते
परत एकदा राज ठाकरेंची पुण्यात
+१११
In reply to परत एकदा राज ठाकरेंची पुण्यात by हतोळकरांचा प्रसाद
आजच्या वर्तमानप्रत्रात तीन
In reply to +१११ by अमितदादा
राज ठाकरे अत्यंत बिनभरवशाचे
In reply to +१११ by अमितदादा
जे भाजप शिवसेना बोलते त्यात
In reply to राज ठाकरे अत्यंत बिनभरवशाचे by श्रीगुरुजी
??
In reply to जे भाजप शिवसेना बोलते त्यात by हतोळकरांचा प्रसाद
शिवसेनेला मिळणार्या समर्थनात
In reply to ?? by गॅरी ट्रुमन
मला वाटत अनेक मुद्दे बोले हि आहेत
In reply to ?? by गॅरी ट्रुमन
:)
In reply to मला वाटत अनेक मुद्दे बोले हि आहेत by वरुण मोहिते
कामाचं बोलोय कि वरती
In reply to :) by गॅरी ट्रुमन
खेळात शिवसेनेचा हात कोणीही धरू शकणार नाही हेच खरे.
In reply to :) by गॅरी ट्रुमन
राग
In reply to मला वाटत अनेक मुद्दे बोले हि आहेत by वरुण मोहिते
राग आपला आहे .तो वैयक्तिक आहे
In reply to राग by गॅरी ट्रुमन
गॅरीजी,
In reply to ?? by गॅरी ट्रुमन
मोठा फरक
In reply to गॅरीजी, by हतोळकरांचा प्रसाद
तेच तर म्हणतोय मी! लोकांनी मत
In reply to मोठा फरक by गॅरी ट्रुमन
अजून एक फरक
In reply to तेच तर म्हणतोय मी! लोकांनी मत by हतोळकरांचा प्रसाद
मुंबईत काहीच केले नाही म्हणणे
In reply to अजून एक फरक by गॅरी ट्रुमन
काम
In reply to मुंबईत काहीच केले नाही म्हणणे by हतोळकरांचा प्रसाद
१. मुंबईत काय केले हे मुंबईकर
In reply to काम by गॅरी ट्रुमन
यश
In reply to १. मुंबईत काय केले हे मुंबईकर by हतोळकरांचा प्रसाद
मला वाटते हे फक्त शिवसेनेचे
In reply to यश by गॅरी ट्रुमन
धरसोड -
In reply to जे भाजप शिवसेना बोलते त्यात by हतोळकरांचा प्रसाद
२०१४ मध्ये गुजरातला भेट देऊन
In reply to धरसोड - by श्रीगुरुजी