युती संपली, पुढे काय?
In reply to हा हा हा.... =)) =)) याद्या by संदीप डांगे
In reply to तुम्हीच याद्या मेंटेन करता की by श्रीगुरुजी
In reply to तुम्हाला हरामखोर ह्या शब्दात by संदीप डांगे
महापालिका पातळीवर कोण सत्तेत येतो त्यामुळे खरोखरच काहीही फरक पडत नाही. रस्त्यावरचे खड्डे, अनधिकृत बांधकामे वगैरे गोष्टी कोणीही आले तरी तशाच चालू राहणार आहेत त्यामुळे माझा या निवडणुकांमधला इंटरेस्ट फक्त शिवसेना पराभूत व्हावी इतकाचमपात सत्तेवर कोणीही आल्याने काहीच फरक पडणार नाही. मग शिवसेना पराभूत व्हायचा आग्रह कशासाठी? त्यापेक्षा भाजप विजयी व्हावा असं म्हणणं योग्य नाही का? २.
एकीकडे बोलताना समाजकारणाचा जप करायचा पण दुसरीकडे गुंडगिरी करायचीतरीपण लोकं सेनेला निवडून देतात. याचं कारण हणजे खाकी वर्दीतल्या गुंडांपेक्षा शाखेवरचा गुंड सामान्यांना परवडतो. शाखागुंड निदान ऐकून तरी घेतो. कधीमधी दरबार भरवतो आणि तक्रारी निस्तरतो. वर्दीगुंड यांतलं काहीच करंत नाही. उलट खऱ्या गुंडांना तक्रारदाराची टीप देतो (ऐकीव माहिती). बघा, समाजकारण म्हणजेच गुंडगिरीच नव्हे काय? आ.न., -गा.पै.
In reply to गॅरी ट्रुमन, by गामा पैलवान
मपात सत्तेवर कोणीही आल्याने काहीच फरक पडणार नाही.याविषयी दुमत नसावे. जर तुम्हाला असे वाटत असेल की भाजप किंवा काँग्रेस सत्तेत आल्यामुळे शहरातील रस्ते खड्डेमुक्त होतील किंवा नगरसेवक आणि बिल्डर यांची युती बंद होईल तर ते जरूर सांगावे.
मग शिवसेना पराभूत व्हायचा आग्रह कशासाठी?याचे एकच कारण म्हणजे २०१४ पासून उध्दव ठाकरेंनी जे एकेक प्रकार चालवले आहेत ते. सत्तेत असून विरोधी पक्षांप्रमाणे वागायचे, मधूनमधून सामनामधून जाहिरपणे भाजपला टोले लगावायचे, गोव्यात जितकी तितकी ताकद असेल ती घेऊन भाजपमधून फुटून निघालेल्या गटाबरोबर युती करायची इत्यादी इत्यादी. उध्दव ठाकरेंच्या या मुजोरीचा स्त्रोत मुंबईतील सत्ता आहे. म्हणूनच ती जायला पाहिजे असे वाटते.
In reply to :) by गॅरी ट्रुमन
In reply to कॉन्ग्रेसवाले 'गठबंधन की by संदीप डांगे
In reply to शिवसेनेला पारदर्शिकतेवरून by हतोळकरांचा प्रसाद
In reply to सरकारी अहवालांवर विश्वास by संदीप डांगे
In reply to शिवसेनेला पारदर्शिकतेवरून by हतोळकरांचा प्रसाद
In reply to शिवसेना काय डोंबल घेरणार by श्रीगुरुजी
बा य स्ड वि धा न
कैच्याकै. नालायकपणाचा कळस विधान. कॉमेंटकर्त्याला पूर्ण महाराष्ट्रात हिंदुत्वाच्या बेसिसवर सेनेने केलेलं ग्राउंडवर्क नाकारायची इच्छा दिसते.In reply to युतीच्या जीवावर पर्यायाने by फेदरवेट साहेब
In reply to त्यांच्यासाठी कोथ्रुड म्हणजेच by संदीप डांगे
In reply to म्हणजे तुमच्या ट्रकचालकाच्या by श्रीगुरुजी
In reply to बाकी, गुरुजींकडे काय राहिलं by संदीप डांगे
In reply to आता याच्यात कसला आलाय थयथयाट? by श्रीगुरुजी
In reply to भाजपच्या जीवावर शिवसेना मोठी by संदीप डांगे
In reply to उद्धव राज्यातली आणि by अप्पा जोगळेकर
In reply to २०१४ च्या विधानसभा निवडणुकीत by श्रीगुरुजी
In reply to वास्तव असे आहे कि, by जय२७८१
हार्दिक राष्ट्रद्रोही वक्तव्ये न करता पाटीदार समाजाच्या आरक्षणासाठी गुजरात मध्ये लढा देतोयतीच तर गोम आहे. स्वतः बाळासाहेबांनी कायमच जातीवर आधारीत आरक्षणाचा विरोध केला होता आणि या हार्दिकचा मुख्य मुद्दा जातीवर आधारीत आरक्षण हाच आहे. म्हणजे हार्दिकला शिवसेनेने गुजरातमध्ये मुख्यमंत्रीपदाचे उमेदवार बनवले तर शिवसेनेने बाळासाहेबांच्या या मुद्द्याला हरताळ फासला असा अर्थ घ्यायचा का त्याचा? Politics makes strange bedfellows असे म्हणतात. मागे आआपने शिवसेनेची राजकीय पक्ष म्हणून मान्यता रद्द करावी अशी मागणी केली होती. हार्दिकने काहीही टिवटिवाट केला की लगेच तो केजरीवाल रिटिवटिवाट करतात आणि हार्दिकला आपल्या बाजूकडे वळवून घ्यायचे प्रयत्न केजरीवालांनीही केले होते. आता त्याच हार्दिकबरोबर शिवसेना आणि शिवसेनेची मान्यता रद्द करावी कारण ५० वर्षात शिवसेनेने द्वेषाचे राजकारण सोडून दुसरे काही केले नाही अशी मागणी करणारा आआपही!!
मोदी - शहा या जोडगोळीच्या मनमानी कारभाराला उत्तर देणे गरजेचे आहे आणि मुंबई महानगरपालिका शिवसेनेकडे राखून तसे उत्तर देण्याची नामी संधी मुंबईकर मतदारांना प्राप्त झाली आहे.एकूणच कुठलेतरी काल्पनिक शत्रू उभे करायचे आणि त्यापासून केवळ आपणच लोकांचे रक्षण करू शकतो असे चित्र उभे करायची कला शिवसेना सोडून इतर कोणालाच इतक्या पूर्णपणे जमलेली नाही. भाजपवाले मोदींच्या नावावर महापालिका निवडणुकांमध्ये मते मागत असतील तर ते जितके चुकीचे आहे तितकेच महापालिका निवडणुकांच्या निमित्ताने मोदी-शहा जोडगोळीला उत्तर द्यायची अपेक्षा करणे. महापालिकेत शिवसेनेची कामगिरी काय आहे? मुंबईतले रस्ते कसे आहेत हे सर्वांनाच माहित आहे. प्रत्येक पावसाळ्यात एकदा तरी मुंबई बंद पडतेच. आणि मुंबईत गेल्या ३२ पैकी २८ वर्षे महापौर देणार्या आणि स्थायी समितीचे अध्यक्षपद भूषविणार्या शिवसेनेवर या प्रश्नाचे उत्तर द्यायची जबाबदारी सर्वात जास्त आहे. ते न करता आपल्या अपयशाला झाकण्यासाठी मुंबई महाराष्ट्रापासून वेगळी करणार, मराठी माणसाला मुंबईतून हद्दपार व्हावे लागेल वगैरे कोल्हेकुई करायची याला काय अर्थ आहे? तुम्ही जर महापालिका निवडणुकांमध्ये मोदींचे नाव वापरणार असाल तर मग त्या नावावर भाजप मते मागायचा प्रयत्न करत असेल ते चुकीचे कोणत्या तोंडाने म्हणणार? या निवडणुकांमध्ये मोदी हा मुद्दा नाहीच आणि शहा तर त्याहूनही नाही. तुमच्या महापालिकेतल्या कामगिरीविषयी बोला आणि त्या आधारावर मते मागा. ती कामगिरी अत्यंत सुमार आहे. म्हणूनच सगळ्यात महत्वाचा मुद्दा-- तुमची कामगिरी सोडून इतर सर्व गोष्टींविषयी बडबड चालू आहे. आणि मनमानी म्हणाल तर शिवसेनेत अगदी सगळे लोकशाही मार्गानेच चालते नाही का?
२२% लोकसंख्येतील काही मंडळी शिवसेनेचे कायम विरोधक म्हणूनच भूमिका निभावत आले. समाज माध्यमात या घटनेकडे नकारार्थी दृष्टीने पाहून सेनेला दोष देणारे मराठीच आघाडीवर आहेत. ईश्वर या सर्वांचे भले करो.तांत्रिकदृष्ट्या माझे नाव मुंबईच्या मतदारयादीत नाही त्यामुळे मी त्या २२% पैकी नाही. पण शिवसेनेचा विरोधक मात्र नक्कीच आहे. अगदी पहिल्यापासून शिवसेनेची गुंडगिरी, शिवराळ भाषा, उगीचच भावना भडकावायची वाईट खोड या सगळ्या गोष्टी कधीच आवडल्या नाहीत. तरीही वाजपेयींसारखे नेते बाळासाहेबांना मान द्यायचे म्हणून माझ्यासारखे अनेक लोक इच्छेविरूध्द शिवसेनेचे समर्थन करत होते. आता बाळासाहेब नाहीत आणि वाजपेयीही सक्रीय नाहीत. अशा परिस्थितीत उधोजीरावांनी त्यांचे खरे रंग दाखवून दिल्यानंतर शिवसेनेचे समर्थन करायची अजिबात गरज मला तरी वाटत नाही. तरीही आमचे भले व्हावे यासाठी तुम्ही प्रार्थना करत आहात त्याबद्दल आभारी आहे. खरे सांगायचे तर मुंबई महाराष्ट्रापासून वेगळी झाली, स्वतंत्र झाली, केंद्रशासित झाली तरी नक्की काय फरक पडणार आहे? तो निर्णय घेताना केवळ तसे केल्याने मुंबईचा कारभार सक्षमपणे चालायला मदत होईल का हा आणि हाच एकमेव मुद्दा हवा. मराठी बाणे वगैरे गेले उडत. मी मुंबईत दररोज नोकरीनिमित्ताने जातो तेव्हा मला मुंबईत चांगले रस्ते, बेस्टच्या मार्गांवर भरपूर बस, पावसाळ्यात पाणी न तुंबणे अशा माफक अपेक्षा आहेत. या अपेक्षा महापालिकेच्या कार्यकक्षेत आहेत. त्या पूर्ण झाल्या की झाले. मग मुंबई महाराष्ट्रात राहून महाराष्ट्र सरकारच्या मदतीने पूर्ण केल्या किंवा मुंबई गुजरातमध्ये जाऊन गुजरात सरकारच्या मदतीने पूर्ण केल्या किंवा केंद्रशासित राहून केंद्र सरकारच्या मदतीने पूर्ण केल्या काय-- नक्की काय फरक पडतो? शिवसेनेचे हिरीरीने समर्थन करणार्यांनाही त्यामुळे खरा तर घंटा काही फरक पडणार नाही पण होते असे की मराठी बाणा ही अफूची गोळी शिवसेनेने देऊन ठेवली आहे त्यामुळे महत्वाच्या मुद्द्यांपेक्षा लोक असल्या फालतू मुद्द्यांना भूलतात.
In reply to :) by गॅरी ट्रुमन
In reply to बाकी उओधोजीरावांनी काय विचार by अनुप ढेरे
In reply to :) by गॅरी ट्रुमन
खरे सांगायचे तर मुंबई महाराष्ट्रापासून वेगळी झाली, स्वतंत्र झाली, केंद्रशासित झाली तरी नक्की काय फरक पडणार आहे? तो निर्णय घेताना केवळ तसे केल्याने मुंबईचा कारभार सक्षमपणे चालायला मदत होईल का हा आणि हाच एकमेव मुद्दा हवा. मराठी बाणे वगैरे गेले उडत.ये हुई ना बात. असे स्पष्ट विचार पाहिजेत. तर मराठी बाण्याचा आणि गटारं तुंबण्याचा एकमेकांशी काहीही संबंध नाही. मुंबई केंद्रशासित करून हे प्रश्न सुटण्याची जराही ग्वाही देता येत नाही. दिल्लीत कचऱ्याचे ढीग जागोजागी जमले आहेत. कचरावाल आणि त्याचं मंत्रिमंडळ जगभर उंडारण्यात मग्न आहेत. केंद्रशासित राहून काय मोठे दिवे लावलेत दिल्लीने? थोडं स्वातंत्र्यलढ्याकडे वळूया. त्यात पंजाब, बंगाल आणि महाराष्ट्र आघाडीवर होते. आज पंजाब आणि बंगाल अर्धे कापले गेले आहेत. महाराष्ट्र कापायचा का? मुंबई केंद्रशासित करणे याचा अर्थ महाराष्ट्राचे तुकडेतुकडे पडणे असाच आहे. गटारं तुंबतात म्हणून शिवसेनेस जबाबदार ठरवणं सोपं आहे. पण आज कित्येक हजार लोक दररोज मुंबई आणि परिसरात येऊन आदळत आहेत याची तड लावायची कोणी? आ.न., -गा.पै.
In reply to :) by गॅरी ट्रुमन
खरे सांगायचे तर मुंबई महाराष्ट्रापासून वेगळी झाली, स्वतंत्र झाली, केंद्रशासित झाली तरी नक्की काय फरक पडणार आहे? तो निर्णय घेताना केवळ तसे केल्याने मुंबईचा कारभार सक्षमपणे चालायला मदत होईल का हा आणि हाच एकमेव मुद्दा हवा. मराठी बाणे वगैरे गेले उडत. मी मुंबईत दररोज नोकरीनिमित्ताने जातो तेव्हा मला मुंबईत चांगले रस्ते, बेस्टच्या मार्गांवर भरपूर बस, पावसाळ्यात पाणी न तुंबणे अशा माफक अपेक्षा आहेत. या अपेक्षा महापालिकेच्या कार्यकक्षेत आहेत. त्या पूर्ण झाल्या की झाले. मग मुंबई महाराष्ट्रात राहून महाराष्ट्र सरकारच्या मदतीने पूर्ण केल्या किंवा मुंबई गुजरातमध्ये जाऊन गुजरात सरकारच्या मदतीने पूर्ण केल्या किंवा केंद्रशासित राहून केंद्र सरकारच्या मदतीने पूर्ण केल्या काय-- नक्की काय फरक पडतो? शिवसेनेचे हिरीरीने समर्थन करणार्यांनाही त्यामुळे खरा तर घंटा काही फरक पडणार नाही पण होते असे की मराठी बाणा ही अफूची गोळी शिवसेनेने देऊन ठेवली आहे त्यामुळे महत्वाच्या मुद्द्यांपेक्षा लोक असल्या फालतू मुद्द्यांना भूलतात.मुंबई महाराष्ट्रातच हवी. मुंबईला महाराष्ट्रापासून वेगळे करणे महाराष्ट्रासाठी हानिकारक ठरेल. एक तर मुंबई हा महाराष्ट्रासाठी भावनिक मुद्दा आहेच. तसाच तो आर्थिक मुद्दा सुद्धा आहे. एकट्या मुंबईतून प्रचंड प्रमाणात कर गोळा होतो. त्यातला काही वाटा केंद्राला जातो तर काही राज्याकडे येतो. मुंबईतून राज्याला मिळणारा सर्व कर फक्त मुंबईसाठीच वापरला जातो असे नाही. तो फक्त मुंबईसाठीच वापरला जावा असे कायदेशीर बंधनही नाही. महाराष्ट्रात इतरत्र त्याचा वापर होऊ शकतो. मुंबई महाराष्ट्रापासून वेगळी झाली तर राज्याला मुंबईतून मिळणारा महसूल बंद होईल. त्याचा उर्वरीत राज्याला सुद्धा फटका बसेल. मुंबई महाराष्ट्रात असल्याने काही प्रमाणात तरी तिथे मराठी लोकांना संधी उपलब्ध आहेत. मुंबई बाहेर गेली तर आहेत त्या थोड्याफार संधीही संपुष्टात येतील. मुंबईच्या दुर्दशेला फक्त महापालिका, राज्य किंवा नाकर्ते राज्यकर्ते कारणीभूत नाहीत. मुंबईत रोज मोठ्या संख्येने येऊन कायमस्वरूपी मुक्काम ठोकणार्या परप्रांतियांचा सुद्धा मुंबईची वाट लावण्यात वाटा आहे. बेस्टने रस्त्यावर किती बसेस आणाव्यात किंवा किती लोकल्स रोज पळाव्यात यावर मर्यादा आहेत. उद्या मुंबईची लोकसंख्या २ कोटींऐवजी ४ कोटी झाली तर लगेच बसेस किंवा लोकल्स दुप्पट करता येणार नाहीत. मुंबईत येण्यासाठी परमिट व्यवस्था सुरू करणे आवश्यक आहे. एखाद्या शहरात राहण्यासाठी राज्यघटनेने बंदी घातलेली नाही याचा अर्थ असा नाही की सर्वांनीच तिथे जाऊन मुक्काम ठोकावा आणि स्वतःबरोबरच इतरांचे जगणेही अवघड करून टाकावे.
In reply to खरे सांगायचे तर मुंबई by श्रीगुरुजी
In reply to प्रशासकिय सोय by गॅरी ट्रुमन
In reply to मुंबईच्या समस्या सोडविणे by श्रीगुरुजी
In reply to वास्तव असे आहे कि, by जय२७८१
वास्तव असे आहे कि, शिवसेनेच्या तिकिटावर पश्चिम उपनगरात पालिका निवडणूक लढविणाऱ्या गुर्जर भाषिक मित्राला (आता सेनेला मराठी उमेदवार मिळाला नाही का? असा प्रश्न विचारू नका) शुभेच्छा प्रदान करण्यासाठी आणि जमल्यास त्याच्या प्रचारासाठी हार्दिक मुंबईत आला. मुंबई - महाराष्ट्रात येणारी अनेक नेते मंडळी मातोश्रीवर जाऊन ठाकरे परिवाराची शुभेच्छा भेट घेतात.या बातमीत पूर्णपणे वेगळीच माहिती आहे. ही भेट अचानक झालेली नसून पूर्वनियोजित होती. या वृत्तानुसार "विधानसभा निवडणुकीत भाजपने युतीबाबत दिलेला धक्का लक्षात घेता शिवसेनेने पालिका निवडणुकीसाठी अत्यंत सावधपणे रणनीती आखली आहे. त्याचाच एक भाग म्हणून शिवसेनेने मुंबईमधील पाटीदार समाजाला आपलेसे करण्यासाठी हार्दिक पटेलची मदत घेण्याचा निर्णय घेतला होता. "
पूर्वनियोजित नसलेली हि भेट जेव्हा व्यापक चर्चा करून संपते तेव्हा हार्दिक पत्रकारांच्या प्रश्नांना उत्तर देण्यासाठी म्हणतो "शेर जंगल मे रहे या पिंजरे मे, शेर शेर ही होता है, इनको (शिवसेना) किसकी जरुरत नाहीं, यह लोगो की मदत करते है. इन्होने मुझे बुलाया नही बल्की मै इनके आशिर्वाद लेने आया हूं. " राजस्थान, उत्तर प्रदेश, गोवा, इ राज्यात शिवसेनेने शिरकाव केल्यानंतर गुजरात मध्ये त्यांना हार्दिकचा चेहरा मिळणार असेल आणि सेनेचे पाय रोवले जाणार असतील तर त्यात वावगे ते काय ? हार्दिक पटेल आणि कन्हैय्या कुमार या दोन भिन्न व्यक्ती आणि प्रवृत्ती आहेत. हार्दिक राष्ट्रद्रोही वक्तव्ये न करता पाटीदार समाजाच्या आरक्षणासाठी गुजरात मध्ये लढा देतोय तर कन्हैय्या आपलेच खाऊन आपल्याच मातीत राहून राष्ट्द्रोही भाषणे देतोय. राहिला प्रश्न त्याचि मदत घेण्याचा. त्याची मदत मागायला कुणी गेले नव्हते. त्यामुळे समाजमाध्यमात चालत असलेल्या चर्चेला तेथेच पूर्णविराम मिळतो.ही भेट पूर्वनियोजितच होती. या भेटीची तयारी अत्यंत गुप्ततेने करण्यात आली होती. त्यासाठी एक खाजगी विमान ठरविलेले होते. भाजपला अंधारात ठेवण्यासाठी तीन वेगवेगळ्या राज्यांचा प्रवास करून हे खाजगी विमान शेवटी मुंबईत उतरले. गुजराती मते मिळविण्यासाठीच त्याची मदत शिवसेनेने मागितली आहे. इतर राज्यात शिवसेनेने पाय पसरण्यात काहीच वावगे नाही. परंतु मुंबईत गुजरात्यांना शिव्या द्यायच्या आणि त्याच गुजरात्यांच्या मतांसाठी गुजराती हार्दिकचे पाय धरायचे हा विरोधाभास नाही का? आयुष्यभर जातीवर आधारीत राखीव जागांना विरोध करायचा आणि राखीव जागांची मागणी करणार्याचेच पाय धरायचे हा विरोधाभास नाही का? हार्दिक स्वतः दुसर्या वर्गात बी कॉम झालेला आहे. अशी सामान्य कामगिरी करणार्याने गुणवत्तेच्या गफ्फा माराव्यात हे आश्चर्यकारक आहे. राखीव जागांचे आंदोलन करताना "पोलिसांवर हल्ले करा", "पोलिसांना मारून टाका", "नासधूस करा" असे तो आपल्या सहकार्यांना फोनवरून सांगत होता व त्याचे फोनकॉल्स पोलिसांनी रेकॉर्ड केले होते. याच कॉल्सच्या आधारावर पोलिसांनी त्याच्यावर देशद्रोहाचा गुन्हा दाखल केला होता व न्यायालयाने देखील त्याच्यावरील देशद्रोहाच्या गुन्ह्याचे कलम काढण्यास नकार दिला होता.
सगळ्यांत महत्वाचे म्हणजे मुंबई शहरात २२% मराठी आणि उर्वरित ७८% अमराठी भाषिक रहातात. शिवसेनेने जात - पात - भाषा - प्रांत भेद कधी मानला नाही.शिवसेनेने हा एक मोठा भ्रम पसरविला आहे. सुरवातीच्या काळात शिवसेना दाक्षिणात्यांविरूद्ध आंदोलन करीत होती. नंतर बिहारी, उत्तर प्रदेशांविरूद्ध आंदोलन झाले, त्यानंतर गुजरात्यांना शिव्या हासडून झाल्या. शिवसेना कायम एक काल्पनिक शत्रू उभा करून आपण त्या शत्रूविरूद्ध लढत आहोत असा आभास निर्माण करीत असते. अगदी जातीची फूटपट्टी लावायची झाली तर शिवसेनेच्या १८ खासदारांपैकी तब्बल फक्त १४ खासदार एकाच जातीचे कसे आहेत याचे उत्तर उधोजी देतील का?
हिंदुस्थानात हिंदूंसाठी आणि महाराष्ट्रात मराठी माणसासाठी शिवसेना लढत राहिली.महाराष्ट्रात मराठी माणसांसाठी व हिंदूंसाठी शिवसेना लढत राहिली हा अजून एक भ्रम पसरविला गेला आहे. काँग्रेस व इतर पक्षांपासून आपले वेगळेपण दाखविण्यासाठी शिवसेनेने मराठी मुद्दा उचलला. प्रत्यक्षात शिवसेनेने मराठी माणसांसाठी, मराठी भाषेसाठी, महाराष्ट्रासाठी, मुंबई व इतर शहरातील अमराठींचे लोंढे रोखण्यासाठी फारसे काहीही केलेले नाही. ज्यांची मुले कॉन्वेंटमध्ये शिकली त्यांचा मराठीपणाचा मुद्दा म्हणजे तद्दन भंपकपणा आहे. शिवसेनेने आजवर अनेक अमराठी नेत्यांना व उद्योगपतींना राज्यसभेची तिकिटे विकली (राम जेठमलानी, चंद्रिका केनिया, प्रीतीश नंदी, संजय निरूपम, राजकुमार धूत, राहुल बजाज, मुकेश पटेल इ.). राज्यसभेची खासदारकी देताना यांना मराठी चेहरे आठवले नाहीत? मुंबईत येणार्या अमराठींना शिधापत्रिका, दाखला इ. देऊन त्यांचे मुंबईतील वास्तव्य कायमस्वरूपी करण्यामध्ये इतर पक्षांबरोबरच शिवसेनेचे नगरसेवक सुद्धा आहेत. परंतु यात जास्त दोष शिवसेनेचा आहे कारण महापालिकेत अनेक वर्षे सत्ताधारी पक्ष असल्याने त्यांचीच जबाबदारी जास्त आहे.
मुंबईतील मराठी माणसाचे अस्तित्व राखण्यासाठी हार्दिकला प्रचारासाठी उतरविले जाणार असेल तर त्याचे स्वागतच आहे.शिवसेनेचे नगरसेवक भाजपच्या जीवावर निवडून येत होते. भाजपमुळेच त्यांना अमराठी मते मिळत होती. आता भाजप स्वतंत्र लढत असल्याने शिवसेनेला फारशी अमराठी मते मिळणार नाहीत. या वास्तवाचे भान आल्याने गुजराती मतांसाठी उधोजींना हार्दिकचे पाय धरावे लागले. मुंबईतील मराठी माणसाचे अस्तित्व गगैरे राखण्यासाठी हार्दिकला प्रचारासाठी उतरविले जाणार नसून त्याच्या माध्यमातून अमराठी मतदारांना चुचकारण्याचा प्रयत्न होत आहे.
आम्हांस कालपासून भेटलेल्या अनेक अमराठी मंडळींनी देखील या घटनेचे स्वागतच केले आहे. मोदी - शहा या जोडगोळीच्या मनमानी कारभाराला उत्तर देणे गरजेचे आहे आणि मुंबई महानगरपालिका शिवसेनेकडे राखून तसे उत्तर देण्याची नामी संधी मुंबईकर मतदारांना प्राप्त झाली आहे. २२% लोकसंख्येतील काही मंडळी शिवसेनेचे कायम विरोधक म्हणूनच भूमिका निभावत आले. समाज माध्यमात या घटनेकडे नकारार्थी दृष्टीने पाहून सेनेला दोष देणारे मराठीच आघाडीवर आहेत. ईश्वर या सर्वांचे भले करो.मोदी-शहा हे राष्ट्रीय राजकारणात आहेत. महापालिकेचा व त्यांचा संबंध नाही. मुंबई महापालिकेत कोणालाही सत्ता मिळाली तरी त्यांना शष्प फरक पडणार नाही. शिवसेनेने मराठी मराठी असा घोष करीत मराठी माणसांचीच फसवणूक केली आहे. अशा पक्षाला शिक्षा मिळालीच पाहिजे. शिवसेना व त्यांचे नेते यांचे बांगलादेशचा क्रिकेट संघ व तेथील जनता यांच्यात विलक्षण साम्य आहे. बांगलाच संघ तसा लिंबूटिंबू. पण प्रचंड माज करतात. बहुतेक वेळा ते इतरांकडून हरतात. क्वचित कधीतरी जिंकतात. अनेक सामने लागोपाठ हरल्यानंतर जेव्हा एखादा विजय मिळतो तेव्हा आपण फार थोर आहेत असे दाखवित प्रचंड माज करतात व दुसर्या संघाला अत्यंत खालच्या पातळीला जाऊन खिजवतात. त्यामुळे बांगलाच्या प्रेक्षकांवर व संघावर इतर सर्व देश अत्यंत चिडून आहेत. गतवर्षी भारत बांगलात ३ एकदिवसीय सामन्यांची मालिका १-२ अशी हरल्यावर त्यांनी कोहली व इतर खेळाडूंचे बांगलाच्या गोलंदाजांनी मुंडने केल्याचे अत्यंत असभ्य व्यंगचित्र छापले होते. मागील वर्षी ट-२० विश्वचषक स्पर्धेत भारताविरूद्ध शेवटच्या ३ चेंडूत विजयासाठी फक्त २ धावा हव्या असताना भारताने तीनही चेंडूंवर बांगलाचे ३ फलंदाज बाद करून सामना १ धावेने जिंकला होता. नंतर उपांत्य फेरीत भारताचा विंडीजकडून पराभव झाल्यावर बांगलाच्या मुशफकीरने ट्विटरवरून अत्यंत आनंद व्यक्त केल्यावर गावसकरने भारताने जिंकलेल्या सामन्याचे शेवटच्या क्षणाचे चित्र टाकून "आता हसून दाखव" असा टोमणा मारल्यानंतर त्याने घाईघाईत आपले ट्विट काढून टाकले होते. २०१५ च्या विश्वचषक स्पर्द्घेत भारताकडून पराभव झाल्यावर तर संपूर्ण बांगलादेशाने थयथयाट केला होता. त्यांच्या क्रिकेट बोर्डाच्या अध्यक्षाने (जो आयसीसी चा सुद्धा अध्यक्ष होता) तर अंतिम सामन्यावरच बहिष्कार टाकला. त्यांच्या पंतप्रधाने शेख हसीना यांनीही सामन्यावर टीका केली होती. एका सामन्यातील पराभव इतका जिव्हारी लागावा हे अपरिपक्वतेचे लक्षण आहे. काही महिन्यांपूर्वी इंग्लंडच्या संघाने बांगलात जाऊन बांगलाला हरविताना बांगलाच्या खेळाडूंनी इंग्लिश खेळाडूंना खिजविणारे टोमणे मारल्याने इंग्लिश खेळाडूही भडकले होते. शिवसेनेचं बांगलासारखंच आहे. कधीतरी एखाद्या नगरपालिकेची निवडणुक जिंकल्यावर अगदी जग जिंकल्याच्या थाटात ते आनंदोत्सव साजरा करतात. जेव्हा त्यांच्यावर टीका होते किंवा ते हरतात तेव्हा ते अत्यंत खालच्या पातळीवर उतरतात. फुशारक्या आणि वल्गना तर विचारायलाच नको. भाजपबरोबर युती तोडली हा निर्णय त्यांनी अत्यंत परिपक्वतेने स्वीकारणे आवश्यक होते. परंतु परिपक्वतेचा संपूर्ण अभाव असल्याने त्यांचा थयथयाट सुरू आहे.
In reply to वास्तव असे आहे कि, by श्रीगुरुजी
हार्दिक स्वतः दुसर्या वर्गात बी कॉम झालेला आहे. अशी सामान्य कामगिरी करणार्याने गुणवत्तेच्या गफ्फा माराव्यात हे आश्चर्यकारक आहे.
या न्यायाने मी मिपावर प्रतिसाद दिले तर चालतील ना..? माझी शैक्षणीक कामगिरी अत्यंत सामान्य आहे.In reply to वास्तव असे आहे कि, by श्रीगुरुजी
In reply to (स्वतः बाळासाहेबांनी कायमच by जय२७८१
असो तुम्ही शिवसेनेला विरोध करत राहा आणि २२ % चे २ % कधी होतात त्याची वाट पहा.ओक्के. वाट बघतो.
In reply to (स्वतः बाळासाहेबांनी कायमच by जय२७८१
(स्वतः बाळासाहेबांनी कायमच जातीवर आधारीत आरक्षणाचा विरोध केला होता ) हो आजही शिवसेनेची हीच भूमिका कायम आहे मात्र सरकार एका जातीला आरक्षण देते आणि दुसर्या जातीला वाऱ्यावर सोडतेय. तुम्ही आरक्षण देताच आहेत तर मागासलेल्या सर्वच जातींना आरक्षण द्या. हि ठाम भूमिका शिवसेना मांडते.नाही. जातीवर आधारीत राखीव जागा न देता त्या आर्थिक आधारावर दिल्या पाहिजेत अशी सेनेची भूमिका होती. यांना देत आहात तर त्यांना पण द्या अशी त्यांची भूमिका नव्हती. परंतु आता मराठ्यांना राखीव जागा देण्यासाठी पाठिंबा देऊन व राखीव जागांचे आंदोलन करणार्या हार्दिकचे पाय धरून शिवसेनेने आपली भूमिका बदलली आहे. बदलण्यास हरकत नाही. पण निदान बदललेल्या भूमिकेवर तरी ठाम रहा.
भाजप वाले पुढे जाऊन मोदी-शहाना ग्रामपंचायतीच्या निवडणुकींना सुद्धा बोलावू शकतात. आणि त्यात काही नवल नाही. कारण मुळी त्याच्याच नावावर हे पोट भरतात. आता बघाना भाजप मध्ये कुणाला हि घ्या. कसा स्वच्छ व पवित्र होतो. मग तो जेलची हवा खाणारा खुनी पप्पू कलानी का नसो. सब धूल जात है. ह्यांना फक्त शिवसेनेची ऍलर्जी ....!जर एखादा पक्ष आपल्या सर्व शक्तिनिशी निवडणुक जिंकण्याचा प्रयत्न करीत असेल तर त्यात चुकीचे काय? त्यात काही घटनाविरोधी, बेकायदेशीर, अनैतिक किंवा चुकीचे आहे का? स्वतःला राष्ट्रीय नेते समजणारे शरद पवार सुद्धा महापालिका निवडणुकीत हिरिरीने प्रचार करतात. स्वच्छ आणि पवित्र म्हणाल तर शिवसेनेतील खिमबहादुर थापा, राणे इ. मंडळी आठवत असतीलच. २०१४ च्या विधानसभा निवडणुकीत बाहेरून येणार्यांना तिकिट देणार्या पक्षांमध्ये शिवसेना प्रथम क्रमांकावर होती.
मुंबई महानगर पालिका शिवसेने कडे म्हणजे संपूर्ण मुंबई शिवसेने कडे असे होत नाही. MMRD मुख्यमंत्री पाहतात तर काही भाग केंद्रसरकार पाहते . मागे लालबागचा ब्रिजला भेगा पडल्या म्हणून बंद केला. तर म्हणे BMC काय करते, पैसे खालले असतील, अमुक-तमुक ....आणि तो ब्रिज MMRD चा होता. तसेच मुंबई मधील अनेक भाग केंद्रसरकारच्या अखत्यारीत येतात. काही रस्ते तर खाजगी मालकीच्या जागेत हि आहेत. पण सगळ्याला जवाबदार शिवसेना .....! मुंबई मध्ये येणारे परप्रांतीय, दिवसेन दिवस वाढतच आहेत. आणि त्या मुळे येथील प्रत्येक साधन सामुग्रीवर प्रचंड भार येतोय. जर इतर राज्याची व गावांची प्रगती झाली. त्यांना तिथे रोजगार मिळाला. तर मग तुमच्या सारख्याना नोकरीनिमित्ता मुंबई यायची गरज भासणार नाही. असो तुम्ही शिवसेनेला विरोध करत राहा आणि २२ % चे २ % कधी होतात त्याची वाट पहा.मुंबईत येणार लोंढे थांबविण्यासाठी हे अधिकार महापालिकेला असतात ते तरी सेनेने वापरले होते का? परप्रांतियांना १५ वर्षे वास्तव्याचा अधिवास दाखला देणे, शिधापत्रिका मिळवून देणे, मतदार यादीत नाव नोंदविणे इ. प्रकार करण्यामध्ये सेनेचेही नगरसेवक होते. किती सरकारी/खाजगी भूखंडांवरील अतिक्रमणे/झोपडपट्ट्या सेनेने उठविल्या? १९९७ ते १९९९ या काळात सेना महापालिका, राज्य व केंद्र अशा तीनही ठिकाणी सत्तेत होती. त्या काळात हे काम करण्यास कोणाचीही आडकाठी नव्हती. तरीसुद्धा सेना का गप्प राहिली? १९९९ मध्ये पुण्यातील अतिक्रमणे हटविणार्या आयुक्त अरूण भाटियांची फक्त ६ दिवसात कोणी हकालपट्टी केली? ४-५ महिन्यांपूर्वी आयुक्त तुकाराम मुंडेंना हटविण्यात कोणाकोणाचा सहभाग होता? आपण मराठीचे कैवारी अशा सेना फक्त गफ्फा हाणते. प्रत्यक्ष कागगिरी शून्य आहे.
In reply to (स्वतः बाळासाहेबांनी कायमच by श्रीगुरुजी
In reply to कमाल आहे by वरुण मोहिते
In reply to तुकाराम मुंडेंना हटविण्याच्या by श्रीगुरुजी
In reply to म्हणजे ६ नगरसेवकांनी कोणाच्या बाजूने मतदान केलं by वरुण मोहिते
In reply to (ही भेट अचानक झालेली नसून by जय२७८१
जर एखादा पक्ष आपल्या सर्व शक्तिनिशी निवडणुक जिंकण्याचा प्रयत्न करीत असेल तर त्यात चुकीचे काय? त्यात काही घटनाविरोधी, बेकायदेशीर, अनैतिक किंवा चुकीचे आहे का? स्वतःला राष्ट्रीय नेते समजणारे शरद पवार सुद्धा महापालिका निवडणुकीत हिरिरीने प्रचार करतात. स्वच्छ आणि पवित्र म्हणाल तर शिवसेनेतील खिमबहादुर थापा, राणे इ. मंडळी आठवत असतीलच. २०१४ च्या विधानसभा निवडणुकीत बाहेरून येणार्यांना तिकिट देणार्या पक्षांमध्ये शिवसेना प्रथम क्रमांकावर होती.श्रीगुरुजी, वरील विधानांचा अर्थ 'सर्वच पक्ष सारखेच' असा होतो... मग कायम भाजपचाच प्रचारकी किल्ला लढवत राहण्यामागची तुमची भूमिका काय आहे? कमाल आहे पण.. भाजपकडे बोट दाखवलं की गुरुजी दुसरीकडे बोट दाखवतात. भाजपवर भाजपशीच संबंधीत थेट प्रश्नांची थेट उत्तरे देत नाहीत. थेट बोललं की ह्यांना भाषा समजत नाही, वेगळा धागा काढून हवा असतो, पक्षाचं धोरण, इ. इ. कोलांट्याउड्या ठरलेल्याच!
In reply to जर एखादा पक्ष आपल्या सर्व by संदीप डांगे
In reply to 'सर्व पक्ष सारखेच' असा माझ्या by श्रीगुरुजी
In reply to मग ह्याच न्यायाने निवडणूक by जय२७८१
१०) उल्हासनगर: इथे कलानी घराण्याची मोनोपॉली आहे. त्यामुळे राष्ट्रवादी प्रथम क्रमांकावर असेल.आता कलानीचा दिवटाच भाजपच्या उमेदवारीवर लढतोय. भाजपाच्या फलकावर पप्पूसह मोदींची छबी झळकतेय. आता भाजपच पक्के हो उल्हासनगरात. टेन्शन नका घेऊ.
In reply to १०) उल्हासनगर: इथे कलानी by पुंबा
In reply to अहो तिथे कायमच भाजपचे मतदार by संदीप डांगे
In reply to मुंबईकरांनो, by जय२७८१
खरं तर मुंबई महापालिकेच्या अखत्यारीतील रस्ते हे मुंबई महापालिकेने चांगल्या प्रकारे मेनटेन केले होते व थोडे फार खड्डे उरले होते, त्याची जबाबदारी महापालिकेने घेतली होती व ते भरले पण होतेवाटेल त्या थापा मारू नका. मुंबईतल्या रस्त्यांवरचे खड्डे, प्रत्येक पावसाळ्यात मुंबई एकदा तरी बंद होणे हे प्रकार गेल्या कित्येक वर्षांपासून चालू आहेत.
In reply to आज घरी वॉर्डातील शिवसेनेच्या by श्रीगुरुजी
In reply to आज घरी वॉर्डातील शिवसेनेच्या by श्रीगुरुजी
सगळ्यांचा तोच फॉर्म्याट असतो.
रंगीत प्रचारपत्रक अगदी चकचकीत, गुळगुळीत कागदावर छापलेले आहे.न्युजप्रिंटवर छापायचे दिवस गेले आता. आजकाल सगळेच आर्ट पेपर वर छापतात. अपक्ष उमेदवार देखील. तुम्ही तर पुण्यामुंबईत राहता.
पहिल्या पानावर चारही उमेदवारांचे चित्र व त्याखाली त्यांची नावे दिली आहेत. पक्षचिन्ह व पक्षाचे नाव आहे.सगळ्यांचा तोच फॉर्म्याट असतो.
दुसर्या पानावर राष्ट्रवादी व काँग्रेस हे दोन्ही पक्ष किती वाईट आहेत व दोन्ही पक्षांनी गेल्या अनेक वर्षात पुण्यात किती वाईट कामे केली आहेत याबद्दल १५-१६ बुलेट पॉईंट्स दिले आहेत.सगळ्यांचा तोच फॉर्म्याट असतो.
तिसर्या पानावर भाजप किती वाईट आहे, भाजपचे पुण्यातील आमदार व खासदार किती वाईट आहेत हे सांगणारी १०-१२ मुद्द्यांची जंत्री आहे.सगळ्यांचा तोच फॉर्म्याट असतो. विरोधी पक्ष बदलतात फक्त.
चौथ्या पानावर केंद्र सरकार किती वाईट आहे, मोदी किती वाईट आहेत, मोदींच्या राजवटीत इंधन तेलाचे भाव किती वाढले, सर्जिकल स्ट्राईक करूनसुद्धा अतिरेकी हल्ले कसे सुरू आहेत, अजून काळा पैसा बाहेर आला नाहीत वगैरे वगैरे सांगणारे १०-१२ मुद्दे आहेत.सगळ्यांचा तोच फॉर्म्याट असतो. इथले बीजेपीवाले सेनेला शिव्या देतात.
याव्यतिरिक्त या प्रचारपत्रकात काहीही नाही.सगळ्यांचा तोच फॉर्म्याट असतो. . एकूण पाहता गुर्जी एक सांगतो बघा. प्रचाराचे फॉर्म्याट, अगदी पॅम्प्लेटपासून ते रिक्षातल्या ऑडिओपर्यंत ठरलेले असतात. मी स्वतः त्या व्यवसायात आहे. आम्ही फक्त उमेदवारांची नावे, प्रभाग क्र. अन चिन्हे बदलतो. टार्गेट पक्ष दिलेला असतो. त्यांना फॉर्म्याट्नुसार रीतसर शिव्या दिल्या जातात. सो. शिवसेनेने फार काही वेगळे केलेले नाहीये तसेच भाजपानेही.
इतका नकारात्मक प्रचार आजवर पाहण्यात आला नाही.अगदी खरे. बीजेपीचा प्रचार पाहता तेच आढळले
या सैल जिभेच्या नकली वाघोबांचा पराभव नक्की आहे.सगळ्यांच्याच सुटल्यात सैल. सगळे हरले तरी भारी वाटेल. (परत इलेक्शन, परत काम ;) )
In reply to आज घरी वॉर्डातील शिवसेनेच्या by अभ्या..
In reply to आज घरी वॉर्डातील शिवसेनेच्या by अभ्या..
In reply to आज घरी वॉर्डातील शिवसेनेच्या by अभ्या..
In reply to आत्ताच... 15 मिनिटापूर्वी घरी by जय२७८१
In reply to हैला, खरं कि काय? :):):) काय by हतोळकरांचा प्रसाद
In reply to पार्टी विथ डिफ़रन्स अशी आपली by जय२७८१
तुम्हीच याद्या मेंटेन करता की