काल रात्री अमेरिकन फूटबॉल लीग (NFL) चा अंतिम सामना - सूपरबोल - पार पडला. मस्त झाला गेम. चारातल्या तीन क्वार्टर्स अॅटलांटा फाल्कन्स ने वर्चस्व गाजवल्यावर न्यू ईंग्लंड पेट्रियट्स ने मागून येत, बरोबरी साधली आणी सूपरबोल च्या ईतिहासात प्रथमच सामना एक्स्ट्रॉ टाईम मधे गेला, ज्यात न्यू ईंग्लंड पेट्रियट्स ने टचडाऊन (गोल) करत बाजी मारली. मागाहून पुढे येत असताना, त्यांनी रचलेले डावपेच, आत्यंतिक तणावाच्या वेळी दाखवलेली शांत पण झुंजार वृत्ती आणी त्या खेळाचा थरार, सगळच अफलातून होतं. ३९ वर्षाच्या टॉम ब्रेडी ह्या क्वार्टरबॅक ने हा स्वप्नवत विजय प्रत्यक्षात आणला.
खेळ बघत असताना काही रँडम विचार मनात येत होते, तेच ईथे मांडतोय.
ईतकी वर्षं सूपरबोल बघताना जाणवतं की ह्या एका खेळानं अमेरिकेला किती एकत्र बांधून ठेवलय. गेम सुरू व्हायच्या आधी अमेरिकन एअरफोर्स ची विमानं स्टेडियम वरून उडत जातात. सुरूवातीच्या राष्ट्रगीताच्या वेळी स्पेस-स्टेशन मधले अंतराळवीर वगैरे सुद्धा दाखवतात. राष्ट्रगीत म्हणायला कुणातरी सेलिब्रीटीज ची निवड होते. काल तर टॉस करायला अमेरिकेचे माजी अध्यक्ष जॉर्ज बुश सपत्निक आले होते. मध्यांतरातला 'हाफ टाईम शो' हा एक महत्वाचा मानबिंदू असतो. काल लेडी गागा चा शो सुद्धा परंपरेला साजेसा नेत्रदिपक झाला. हा शो चालू असताना, आत्ता ईथे एक फूटबॉल ची मॅच चालू होती, किंवा ह्या मध्यंतरानंतर पुन्हा सामना चालू होणार आहे ह्याच क्षणभर विसर पडावा ईतका भव्य देखावा उभारला जतो. सूपरबोल च्या वेळी दाखवल्या जाणार्या जाहिराती तयार करण्यात (खर्च, कल्पना) कंपनीज कसलीही कंजुशी करत नाहीत. ह्या जाहिरातीमधे सुद्धा सगळ्यात चांगली कुठली होती वगैरे चर्चा, रँकिंग वगैरे असतं. सामान्य प्रेक्षकांमधे, सूपरबोल पार्टीज त्यातला पिझ्झा-विंग्ज-बीअर असा 'पारंपारिक मेन्यू' असं एक वेगळच वातावरण तयार होतं सगळीकडे. मस्त वाटतं.
मग एक प्रश्न पडला की भारताला असं एकत्र बांधून ठेवणारा धागा कुठला? भाषा नाही, क्रिकेट सुद्धा आपण समजतो तितकं नाही. कितपत क्रिकेट चे चाहते रणजी, ईराणी वगैरे करंडक फॉलो करतात माहीत नाही, पण फारसे नसावेत. आंतरराष्ट्रीय सामन्यांना प्रचंड फॅन फॉलोइंग आहे. पण मग तो काही फक्त भारताचा सोहळा रहात नाही.
गेल्या अनेक वर्षात असं दूरदर्शन ला मोठ्या प्रमाणात, भारतभर पसरलेल्या जनतेला बांधून ठेवणार्या दोनच गोष्टी मला आठवल्या - रामायण आणी महाभारत. (नंतर चा अपवाद सचिन च्या बॅटींग चा). ह्या दोन मालिकांमधे नुसता मनोरंजनाचा भाग नव्हता, तर भावनिक गुंतवणूक होती. फर्स्ट ऑफ अ काईंड असण्याचा फायदा तर मिळालाच. पण तरिही त्यापलिकडे जाऊन मोठ्या प्रमाणात लोकं त्या कथांशी भावनिक पातळीवर गुंतली होती. त्या कथानकांशी, त्यातल्या पात्रांशी आपलेपणा वाटला होता. रविवारी सकाळी टीव्ही वर रामायण आणी नंतर महाभारत लागायचं तेव्हा कर्फ्यू लागला आहे असं वाटावं ईतक्या मोठ्या प्रमाणात रस्ते ओस पडत. ही परिस्थिती बर्याच ठिकाणी होती. ह्या दोन सिरियल्स च्या टीव्ही वरच्या ब्रॉडकास्टिंग च्या वेळेनुसार लग्ना-मुंजीचे मुहूर्त पुढे-मागे ढकलले गेल्याच्या कथा आणी अनुभव आहेत.
भारताचा सर्वसमावेशक धागा, रामायण आणी महाभारत च आहे का? मिपाकरांचे प्रतिसाद वाचायला आवडेल.
वर्गीकरण
वाचने
5530
प्रतिक्रिया
29
मिसळपाव
प्रतिक्रिया
"भारतीय निवडणूक प्रकिया" - सुपरबोल
हे सर्वात प्रखर राष्ट्रवादी
In reply to "भारतीय निवडणूक प्रकिया" - सुपरबोल by राघवेंद्र
बाकी सगळं ठीक आहे पण खेळाचा
In reply to हे सर्वात प्रखर राष्ट्रवादी by संदीप डांगे
अर्रर्र... असं नै ते...
In reply to बाकी सगळं ठीक आहे पण खेळाचा by स्रुजा
लोल.. आरामात द्या. वाट पाहते
In reply to अर्रर्र... असं नै ते... by संदीप डांगे
हलकेच घ्या... :-)
In reply to हे सर्वात प्रखर राष्ट्रवादी by संदीप डांगे
वर बघा, इट्स देअर अलरेडी! :-)
In reply to हलकेच घ्या... :-) by व्हय
अगदी हेच म्हणणार होते.
In reply to "भारतीय निवडणूक प्रकिया" - सुपरबोल by राघवेंद्र
कालावधी
In reply to अगदी हेच म्हणणार होते. by स्रुजा
निवडणुका अगदी झाडून
In reply to अगदी हेच म्हणणार होते. by स्रुजा
असं काही नाही. कालच्या
खेळ च असं नाही
In reply to असं काही नाही. कालच्या by रेवती
कदाचित काळ बदललाय म्हणून
In reply to खेळ च असं नाही by फेरफटका
जबरी झाला कालचा गेम. या वर्षी
जल्ला हे सुपरबोल का काय ते
हीहीही... हे बघा https://en
In reply to जल्ला हे सुपरबोल का काय ते by एस
सूपरबोल म्हंजी...
In reply to जल्ला हे सुपरबोल का काय ते by एस
त्यांचा फुटबॉल आणि आपला
In reply to सूपरबोल म्हंजी... by फेरफटका
असल, असल, तसंबी असल.
In reply to त्यांचा फुटबॉल आणि आपला by हतोळकरांचा प्रसाद
अमेरिकन फुटबॉल
In reply to जल्ला हे सुपरबोल का काय ते by एस
मेंदु बिघडवण्याची कामे
एकत्र बांधून ठेवलं म्हणजे
In reply to मेंदु बिघडवण्याची कामे by अनरँडम
बरं बरं
In reply to एकत्र बांधून ठेवलं म्हणजे by फेरफटका
रिक्षाचालकांचा संप
In reply to बरं बरं by अनरँडम
नोटाबंदी
In reply to रिक्षाचालकांचा संप by फेरफटका
नोटाबंदी
ह्यातल्या जाहिरातींचा काय सीन
अमेरिकेतला सगळ्यात जास्त
In reply to ह्यातल्या जाहिरातींचा काय सीन by पिलीयन रायडर
जाहिराती
In reply to ह्यातल्या जाहिरातींचा काय सीन by पिलीयन रायडर