मराठी साहित्य, संस्कृती आणि लेखनाचे व्यासपीठ

सूपरबोल - रामायण आणी महाभारत

फेरफटका · · काथ्याकूट
काल रात्री अमेरिकन फूटबॉल लीग (NFL) चा अंतिम सामना - सूपरबोल - पार पडला. मस्त झाला गेम. चारातल्या तीन क्वार्टर्स अ‍ॅटलांटा फाल्कन्स ने वर्चस्व गाजवल्यावर न्यू ईंग्लंड पेट्रियट्स ने मागून येत, बरोबरी साधली आणी सूपरबोल च्या ईतिहासात प्रथमच सामना एक्स्ट्रॉ टाईम मधे गेला, ज्यात न्यू ईंग्लंड पेट्रियट्स ने टचडाऊन (गोल) करत बाजी मारली. मागाहून पुढे येत असताना, त्यांनी रचलेले डावपेच, आत्यंतिक तणावाच्या वेळी दाखवलेली शांत पण झुंजार वृत्ती आणी त्या खेळाचा थरार, सगळच अफलातून होतं. ३९ वर्षाच्या टॉम ब्रेडी ह्या क्वार्टरबॅक ने हा स्वप्नवत विजय प्रत्यक्षात आणला. खेळ बघत असताना काही रँडम विचार मनात येत होते, तेच ईथे मांडतोय. ईतकी वर्षं सूपरबोल बघताना जाणवतं की ह्या एका खेळानं अमेरिकेला किती एकत्र बांधून ठेवलय. गेम सुरू व्हायच्या आधी अमेरिकन एअरफोर्स ची विमानं स्टेडियम वरून उडत जातात. सुरूवातीच्या राष्ट्रगीताच्या वेळी स्पेस-स्टेशन मधले अंतराळवीर वगैरे सुद्धा दाखवतात. राष्ट्रगीत म्हणायला कुणातरी सेलिब्रीटीज ची निवड होते. काल तर टॉस करायला अमेरिकेचे माजी अध्यक्ष जॉर्ज बुश सपत्निक आले होते. मध्यांतरातला 'हाफ टाईम शो' हा एक महत्वाचा मानबिंदू असतो. काल लेडी गागा चा शो सुद्धा परंपरेला साजेसा नेत्रदिपक झाला. हा शो चालू असताना, आत्ता ईथे एक फूटबॉल ची मॅच चालू होती, किंवा ह्या मध्यंतरानंतर पुन्हा सामना चालू होणार आहे ह्याच क्षणभर विसर पडावा ईतका भव्य देखावा उभारला जतो. सूपरबोल च्या वेळी दाखवल्या जाणार्या जाहिराती तयार करण्यात (खर्च, कल्पना) कंपनीज कसलीही कंजुशी करत नाहीत. ह्या जाहिरातीमधे सुद्धा सगळ्यात चांगली कुठली होती वगैरे चर्चा, रँकिंग वगैरे असतं. सामान्य प्रेक्षकांमधे, सूपरबोल पार्टीज त्यातला पिझ्झा-विंग्ज-बीअर असा 'पारंपारिक मेन्यू' असं एक वेगळच वातावरण तयार होतं सगळीकडे. मस्त वाटतं. मग एक प्रश्न पडला की भारताला असं एकत्र बांधून ठेवणारा धागा कुठला? भाषा नाही, क्रिकेट सुद्धा आपण समजतो तितकं नाही. कितपत क्रिकेट चे चाहते रणजी, ईराणी वगैरे करंडक फॉलो करतात माहीत नाही, पण फारसे नसावेत. आंतरराष्ट्रीय सामन्यांना प्रचंड फॅन फॉलोइंग आहे. पण मग तो काही फक्त भारताचा सोहळा रहात नाही. गेल्या अनेक वर्षात असं दूरदर्शन ला मोठ्या प्रमाणात, भारतभर पसरलेल्या जनतेला बांधून ठेवणार्या दोनच गोष्टी मला आठवल्या - रामायण आणी महाभारत. (नंतर चा अपवाद सचिन च्या बॅटींग चा). ह्या दोन मालिकांमधे नुसता मनोरंजनाचा भाग नव्हता, तर भावनिक गुंतवणूक होती. फर्स्ट ऑफ अ काईंड असण्याचा फायदा तर मिळालाच. पण तरिही त्यापलिकडे जाऊन मोठ्या प्रमाणात लोकं त्या कथांशी भावनिक पातळीवर गुंतली होती. त्या कथानकांशी, त्यातल्या पात्रांशी आपलेपणा वाटला होता. रविवारी सकाळी टीव्ही वर रामायण आणी नंतर महाभारत लागायचं तेव्हा कर्फ्यू लागला आहे असं वाटावं ईतक्या मोठ्या प्रमाणात रस्ते ओस पडत. ही परिस्थिती बर्याच ठिकाणी होती. ह्या दोन सिरियल्स च्या टीव्ही वरच्या ब्रॉडकास्टिंग च्या वेळेनुसार लग्ना-मुंजीचे मुहूर्त पुढे-मागे ढकलले गेल्याच्या कथा आणी अनुभव आहेत. भारताचा सर्वसमावेशक धागा, रामायण आणी महाभारत च आहे का? मिपाकरांचे प्रतिसाद वाचायला आवडेल.

वाचने 5525 वाचनखूण प्रतिक्रिया 29

In reply to by राघवेंद्र

संदीप डांगे Mon, 02/06/2017 - 23:34
हे सर्वात प्रखर राष्ट्रवादी उत्तर आहे. ह्यात कोणताही उपरोध नाही. भारतात जर लोक एखाद्या खेळापे़क्षा (ज्याचा मनोरंजन सोडून काही उपयोग नाही) निवडणूक प्रक्रियेला (ज्याचा मनोरंजनासोबत इतरही अनेक महत्त्वाचे उपयोग आहेत) जास्त महत्त्व देत असतील तर अभिमानाचीच गोष्ट आहे.

In reply to by संदीप डांगे

स्रुजा Mon, 02/06/2017 - 23:54
बाकी सगळं ठीक आहे पण खेळाचा मनोरंजन सोडून काही उपयोग नाही हे पटलेलं नाही. अशाच विचारसरणीमुळे अजुनही आपल्याकडे खेळाला (क्कोणत्याही असो ) आणि त्यातील कौशल्याला म्हणावं इतकं महत्त्व नाही.

In reply to by स्रुजा

संदीप डांगे Tue, 02/07/2017 - 00:37
अर्रर्र... असं नै ते... थोडक्या शब्दात मोठा अर्थ समजवण्याचं सामर्थ्य अजून तरी माझ्याकडे आलं नाही स्रुजातै... मेगाबायटीस वेळ नाही आज. अभी के लिये माफ कर दो! ;-)

In reply to by राघवेंद्र

स्रुजा Mon, 02/06/2017 - 23:52
अगदी हेच म्हणणार होते. निवडणुका अगदी झाडून सगळ्यांच्या जिव्हाळ्याचा विषय असतो. अख्खी अमेरिका यात इन्व्हॉल्व्ह असते असं मी म्हणणार नाही. पण बहुतांश लोकांना याचं वेड आहे. बरेच माझ्या सारखे लोकं काय आहे तरी ही भानगड म्हणुन बघायला जातात आणि त्याकडे ओढले जातात. पण वैयक्तिकरित्या मला तो माहोल त्या गेमपेक्षाही आवडतो. शिवाय या टीम्स इतकाली वर्षं आहेत की ब्रँड लॉयल्टी आता सणसणीत तयार झाली आहे. आपल्याकडे मुळातच कुठलाच गेम / टीम इतकी वर्षं नाहीये. अजुन २५ वर्षांनी कदाचित आयपीएल किंवा कबड्डी टीम्स ना ही अशा प्रकारचा प्रतिसाद (फॅन फॉलोविंग ) मिळेल, मग ते सोहळे पण चर्चेचा विषय होतील.

In reply to by स्रुजा

फेरफटका Tue, 02/07/2017 - 02:59
"आपल्याकडे मुळातच कुठलाच गेम / टीम इतकी वर्षं नाहीये." - क्रिकेट च्या टीम्स स्वातंत्र्यपूर्वीपासून आहेत जेव्हा चौरंगी - पंचरंगी सामने होत. रणजी ट्रॉफी १९३४-३५ साली सुरू झाली. पण स्वतःच्या राज्याच्या टीम मधल्या खेळाडूंची नावं सुद्धा सगळ्या क्रिकेट प्रेमींना माहीत नसतात.

In reply to by स्रुजा

निवडणुका अगदी झाडून सगळ्यांच्या जिव्हाळ्याचा विषय असतो.
हे जरी खरे असले तरी, निवडणूक हा विषय सगळ्यांना एकत्र बांधून ठेवतो का हा एक प्रश्नच आहे! मला तर कधी कधी वाटते कि निवडणुकांचा कालावधी हा सर्वात जास्त नेगेटिव्हिटी तयार करणारा कालावधी असावा (टिपिकल घाणेरड्या राजकारणी वृत्तीमुळे).

रेवती Tue, 02/07/2017 - 02:22
असं काही नाही. कालच्या म्याचमुळे माझ्यासारख्या झोपाळू मनुष्यप्राण्यांना कटकट झाली. लोकांचं सेलिब्रेशन संपेचना! कामाच्या ठिकाणीही लोक्स सुपरबोलचीच चर्चा करत होते, जांभया देत होते. भारतात असं होत नसावं का? मला वाटतं क्रिकेट वर्ल्ड कपच्यावेळी असं झालं होतं. जुने धागे असतील त्या चर्चेचे. आपल्याकडील जीवनपद्धती वेगळी आहे. हातावरचं पोट असणारे लोक, घरात टीव्ही नसणारे किंवा घरच नसणारे लोक अस्तित्वात असताना खेळ हा बांधून ठेवणारा धागा असण्याची अपेक्षा करणे त्यांच्यावर अन्यायकारक असेल. आपल्या आजूबाजूला लोक सुपरबोलमध्ये गुंग असताना ज्यांचा हा (खाद्य पेय)व्यवसायाचा दिवस होता त्यांना येताजाता टीव्हीवर नजर टाकण्याशिवाय जास्त काही करता आले असेल असे वाटत नाही. काल घरोघरी पिझ्झा डिलिव्हरी देणारे लोक सुपरबोल सलग कसा पाहणार? जास्त कमाई करणे किंवा हातावरील पोट असणार्‍यांना अशा कितीतरी सुपरबोलची काय फिकीर? काल काही लोकांनी आता आपण काही जिंकत नाही असे वाटल्याने लवकर टीव्ही बंद करून झोपणे पसंत केले ते म्हणे आज डोक्याला हात लावून बसले. जसे वर्ल्ड कपच्यावेळी मी बाथरुमबाहेर बसल्यास सिक्सर मारले जात होते तसे एकीने सांगितले की ती कंटाळून उठली व जिन्यात जाऊन बसली की इकडे चांगली प्रगती झाली म्हणून तिला तिच्या वडिलांनी जिन्यातून उठू दिले नव्हते. ;) यासाठी सुपरस्टिशस झालेलं चालतय की दोन्हीकडे!

In reply to by रेवती

फेरफटका Tue, 02/07/2017 - 02:56
" खेळ हा बांधून ठेवणारा धागा असण्याची अपेक्षा करणे त्यांच्यावर अन्यायकारक असेल. " मी खेळच असावा असं काही म्हणट नाही. किंबहूना असा धागा असावाच असाही काही आग्रह नाही. मला किंबहूना वाटलं की खेळ नसून तो धागा अजूनही रामायण-महाभारत च आहे की काय?

In reply to by फेरफटका

रेवती Tue, 02/07/2017 - 04:03
कदाचित काळ बदललाय म्हणून स्वरूप बदलले असेल. लहान गटात बांधले गेले असतील. त्यात समान आवडी, निवडी, भाषा (अमेरिकेत एक भाषा प्रामुख्याने वापरतात, तसे आपल्याकडे नाही), वेष, हवामान यानुसार वेगळे असेल. तुम्ही म्हणताय तसे आख्ख्या देशाला बांधले जाईल असे (रस्ते ओस पाडण्याचे) काम हे लहान गट करू शकणार नाहीत ............................हम्म, नाही सांगता यायचे.

पर्णिका Tue, 02/07/2017 - 03:24
जबरी झाला कालचा गेम. या वर्षी ज्यु. मंडळींच्या दोन्ही टीम्स सूपरबोलमध्ये नसल्याने मस्त एन्जॉय (काहीही गडबड, टेंशन न घेता) केला. :) बाकी मला सर्वात जास्त आवडलेली सूपरबोल जाहिरात : Kia Super Bowl Commercial 2017 Melissa McCarthy

एस Tue, 02/07/2017 - 23:55
जल्ला हे सुपरबोल का काय ते असतंय कुठल्या खेळात? फुटबॉल? मग टचडाऊन बिचडाऊन ही काय भानगड आहे? ह्या कोणत्या टिमा आहेत? कधी ऐकलं नाय ह्यांच्याबद्दल. ते आपल्याकडं (म्हणजे भारतात (म्हणजे इंडियात)) कसं वल्कप म्हंजे किरकेटचा वल्कप, तसं करू नका. नाव घ्या. खेळाचं. इस्कटून बैजवार सांगा.

In reply to by एस

स्रुजा Wed, 02/08/2017 - 00:43
हीहीही... हे बघा https://en.wikipedia.org/wiki/Super_Bowl सुपर बोल म्हणजे त्यांच्या एन एफ एल -नॅशनल फुटबॉल लीग - चा फायनल गेम :) आपल्या आयपील सारखा त्यांचा एन एफ एल. खरं तर आपली आय पी एल तिथुन प्रेरीत आहे असं म्हणायला हरकत नाही.

In reply to by एस

फेरफटका Wed, 02/08/2017 - 01:24
ते सुरूवातीलाच छापून आलय ना भौ, "काल रात्री अमेरिकन फूटबॉल लीग (NFL) चा अंतिम सामना - सूपरबोल - पार पडला." आनि मंग, पुन्यांदा 'कुठल्या खेळात' म्हून काहून विचारून रैले भै?

In reply to by फेरफटका

त्यांचा फुटबॉल आणि आपला फुटबॉल वेगळा है ना भौ! :) आपल्या फुटबॉलला ते लोक सॉकर म्हणतात. टचडाऊन काय यामुळे त्यांना प्रश्न पडला असावा. :)

In reply to by हतोळकरांचा प्रसाद

फेरफटका Wed, 02/08/2017 - 20:43
असल, असल, तसंबी असल. अमेरिकन फूटबॉल मधे फूटा-फूटाने (यार्डा-यार्डाने) गोलपर्यंत पोहोचतात. सॉकर मधे बॉल फूट (पाय) ने गोलपर्यंत पोहोचवतात.

In reply to by एस

ट्रेड मार्क Wed, 02/08/2017 - 02:07
हा फुटबॉल म्हणजे पाय न लावता खेळायचा खेळ आहे. बादवे - हामेरिकेतला कुठलाबी खेळ आणि कुठलीबी लीग ही क्रिकेट/ सॉकर वर्ल्ड कप येवढीच न्हवे तर ज्यास्तच म्हत्वाची असते.

अनरँडम Wed, 02/08/2017 - 01:09
अमेरिकेत ज्याला फुटबॉल म्हणतात तो हा खेळ मनापासून आवडत नाही. बॉल दिसत नाही पण हेल्मेट्स घातलेले खेळाडू, कानात हेडफोन्स आणि काय काय गॅजेट्स घेऊन उभे असलेले कोच आणि त्यांचा लवाजमा, टाइट इजारींमुळे उठून दिसणारी खेळाडूंची ढुंगणे हे सर्व व्यवस्थित दिसते. या खेळात डोक्याला मार लागून अनेक खेळाडूंच्या मेंदुवर विपरीत परिणाम होतात हे सिद्ध झालेले आहे. असे सर्व असूनही हा अमेरिकेतला सर्वात लोकप्रिय (?) खेळ आहे. या खेळाची लोकप्रियता आणि अमेरिकेतला स्वमग्नता यावर भाष्य करण्याचा मोह होत असूनही टाळत आहे.
ईतकी वर्षं सूपरबोल बघताना जाणवतं की ह्या एका खेळानं अमेरिकेला किती एकत्र बांधून ठेवलय.
एकत्र बांधून ठेवलं आहे म्हणजे नेमके काय ते कळले नाही. एकत्र बांधल्याने अमेरिकन लोकांमधला वंशभेद या (यातले अनेक खेळाडू कृष्णवर्णिय असूनही) खेळामुळे कमी झाला आहे का? की विविध समाजघटक या खेळामुळे जवळ आले आहेत असे आहे? खरेदी करायला जायचे असल्यास मोठ्या फुटबॉल सामन्याच्या वेळी जावे. एकत्रपणे लोक सामना पाहत असतात आणि आपल्याला निवांत खरेदी करता येते.

In reply to by अनरँडम

फेरफटका Wed, 02/08/2017 - 01:27
एकत्र बांधून ठेवलं म्हणजे काय ह्याचं उत्तर तुम्हीच दिलत, त्याबद्दल धन्यवाद. "खरेदी करायला जायचे असल्यास मोठ्या फुटबॉल सामन्याच्या वेळी जावे. एकत्रपणे लोक सामना पाहत असतात आणि आपल्याला निवांत खरेदी करता येते." माझा पुढचा रामायण-महाभारताचा उल्लेख ह्याच अनुशंगाने आलाय.

In reply to by फेरफटका

अनरँडम Wed, 02/08/2017 - 20:49
नोटाबंदी पर्फेक्ट आहे मग. देशात एकाच वेळी सगळीकडे. देशभक्त लोकांना काळा पैसा नष्ट होणार म्हणून भावनिक गुंतवणूक (देशभक्तांची) जबरदस्त. ह. घ्या

फेरफटका Wed, 02/08/2017 - 20:52
"नोटाबंदी पर्फेक्ट आहे मग. देशात एकाच वेळी सगळीकडे. देशभक्त लोकांना काळा पैसा नष्ट होणार म्हणून भावनिक गुंतवणूक (देशभक्तांची) जबरदस्त. ह. घ्या" - :) नोटाबंदी दरवर्षी कुठे होते पण? (थँक गॉड!!) ;)

In reply to by पिलीयन रायडर

संदीप डांगे Wed, 02/08/2017 - 21:19
अमेरिकेतला सगळ्यात जास्त टीआरपी खेचणारा कार्यक्रम आहे सुपर्बोल.. तस्मात जाहिराती तर असणारच! आणि जाहिरातींची जत्रा झाल्यामुळे प्रत्येकीला दुसरी पेक्षा जास्त मनोरंजक, उठावदार, धक्कादायक, लक्षात राहिल अशी असणे क्रमप्राप्त असते. त्याचसोबत उपलब्ध असणारा कमी वेळ (३० सेकंद) व स्पर्धा बघता सुपरबोलसाठी 'खास जाहिराती' बनवाव्याच लागतात. २०१३ साली ऐन गेममधे वीज गेली काही मिनिटांसाठी, तेव्हढ्यात ओरिओ बिस्किटांनी ट्विट केले की “you can still dunk in the dark” त्या वर्षी इतर सगळ्या लक्षावधी रुपये खर्चून बनवलेल्या जाहिरातींपेक्षा ओरिओची ट्विटरवरची वनलायनर फुकटात माहोल करुन गेली.... https://twitter.com/Oreo/status/298246571718483968/photo/1?ref_src=twsrc%5Etfw

In reply to by पिलीयन रायडर

फेरफटका Wed, 02/08/2017 - 22:50
सूपरबोल च्या वेळी दाखवल्या जाणार्या जाहिराती तयार करण्यात (खर्च, कल्पना) कंपनीज कसलीही कंजुशी करत नाहीत (सूपरबोल च्या वेळी दाखवल्या जाणार्या जाहिरातींसाठी अ‍ॅव्हरेज खर्च ३.५ मिलियन डॉलर्स आहे). ह्या जाहिरातीमधे सुद्धा सगळ्यात चांगली कुठली होती वगैरे चर्चा, रँकिंग वगैरे असतं. कोकाकोला, अ‍ॅनहाउजर बुश वगैरे कंपन्या ह्यात सातत्यानं आघाडीवर आहेत. बहूदा प्रेक्षक जाहिराती टाळतात (टीव्ही म्यूट करणं, ब्रेक घेणं वगैरे), पण सूपरबोल च्या जाहिराती आवर्जून पाहिल्या जातात.