Skip to main content

भारत

३१ डिसेंबर : एक काळा दिवस

लेखक अज्ञात यांनी सोमवार, 31/12/2018 23:16 या दिवशी प्रकाशित केले.
■31 डिसेंबर हा काळा दिवस आहे ह्याच दिवशी भारताचे प्रधानमंत्री अटलबिहारी बाजपेयीं ह्यांनी कट्टर अतिरेकी व त्यांचा मास्टर माईंड ना कंदहार येथे नेऊन सोडले होते. सन 1999 ? ■अशीही बातमी आहे कि 100 कोटी रुपये परकीय चलनात दिले गेले होते.

पुराणातल्या विमान शास्र वैगेरे वांग्याच चमचमीत भरीत !

लेखक डँबिस००७ यांनी शुक्रवार, 18/08/2017 19:06 या दिवशी प्रकाशित केले.
भारताच्या ग्रंथ संपदेत ब्रम्हास्त्र, वेगवेगळी अस्त्रे , शस्त्रे , शास्त्रे जसे विमान शास्त्र वैगेरेचे विस्मयकारक उल्लेख आलेले आहेत. भारतीय समाजातील काही लोक अश्या विस्मयकारक उल्लेखाचा दाखला देत भुत काळातील भारत टेक्नॉलॉजीत खुप पुढे होता असा दावा करत असतात . पण त्याच वेळेला समाजातील काही सुशिक्षीत लोक हा दावा खोडताना ह्या सर्व मात्र कवि कल्पनाच आहेत असा दावा करतात. भारताने जगाला अंक मोजायला शिकवल. शुन्य, दशांश पद्धती ही भारताची जगाला भेट आहे. पण ह्या गोष्टी शाळेत शिकवल्या जात नाहीत. शाळेत विदेशी लोकांनी काय शोधुन काढल त्यावर जोर दिला जातो.

थेट गहुंजेवरून . . .

लेखक श्रीगुरुजी यांनी बुधवार, 22/02/2017 23:18 या दिवशी प्रकाशित केले.

भारत वि. ऑस्ट्रेलिया ४ कसोटी सामन्यांची मालिका

उद्यापासून भारतात ऑस्ट्रेलियाच्या क्रिकेट संघाविरूद्ध ४ कसोटी सामन्यांची मालिका सुरू होत आहे. मालिकेतील पहिला सामना गहुंजे (पुणे) येथे गुरूवार २३ फेब्रु ते सोमवार २७ फेब्रु या कालावधीत खेळला जाईल. मी गहुंजे येथील पहिला कसोटी सामना बघण्यास जाणार आहे. जमल्यास तिथूनच किंवा नंतर संध्याकाळी घरी आल्यानंतर सामन्याविषयी लिहीन व काही फोटोही टाकेन.

सूपरबोल - रामायण आणी महाभारत

लेखक फेरफटका यांनी सोमवार, 06/02/2017 23:01 या दिवशी प्रकाशित केले.
काल रात्री अमेरिकन फूटबॉल लीग (NFL) चा अंतिम सामना - सूपरबोल - पार पडला. मस्त झाला गेम. चारातल्या तीन क्वार्टर्स अ‍ॅटलांटा फाल्कन्स ने वर्चस्व गाजवल्यावर न्यू ईंग्लंड पेट्रियट्स ने मागून येत, बरोबरी साधली आणी सूपरबोल च्या ईतिहासात प्रथमच सामना एक्स्ट्रॉ टाईम मधे गेला, ज्यात न्यू ईंग्लंड पेट्रियट्स ने टचडाऊन (गोल) करत बाजी मारली. मागाहून पुढे येत असताना, त्यांनी रचलेले डावपेच, आत्यंतिक तणावाच्या वेळी दाखवलेली शांत पण झुंजार वृत्ती आणी त्या खेळाचा थरार, सगळच अफलातून होतं.