Skip to main content

काय, कधी कुठे? - अमेरिका

लेखक पिलीयन रायडर यांनी शनिवार, 27/08/2016 18:34 या दिवशी प्रकाशित केले.
अमेरिकेत अनेक ठिकाणी अनेक गोष्टी चालु असतात. आम्हा नवीन माणसांना पटकन समजत नाही की कोणते कार्यक्रम पाहु शकतो, कुठे जाऊ शकतो, कोणत्या सीझन मध्ये काय पहायला हवं.. तेव्हा मोदकने जसे पुणे - मुंबईसाठी धागे काढले आहेत, तसा अमेरिकेसाठी एक धागा असावा म्हणलं. जसं की ह्या वीकांताला (२५-२८ ऑगस्ट) अमेरिकेतले सर्व नॅशनल पार्क्स फ्री असतात. ह्या वर्षी नॅशनल पार्क सर्विसला १०० वर्ष झाली आहेत. आणि आता सांगण्यात अर्थ नाही पण मागच्या रविवारी इंडिया डे परेड होऊन गेली! किंवा दर गुरुवारी ब्रुकलिन चिल्ड्रन म्युझियम ३-५ ह्या वेळात फ्री असतं! अमेरिकेतल्या समस्त मिपाकरांनी अशी उपयुक्त माहिती इथे टाकलीत तर फार बरं होईल! धन्यवाद!
लेखनविषय:
लेखनप्रकार

वाचने 107857
प्रतिक्रिया 227

प्रतिक्रिया

In reply to by पिलीयन रायडर

आलं असेल तर मी म्हणेन कि तुमची तुम्ही ट्रीप प्लॅन करा. कोणत्या सीजन मधे करणार आहे त्यानुसारही काय काय करता येईल ते बदलेल. सॅन फ्रान्सिस्को पासुन ३ तासांच्या ड्राईव्ह्वर योसेमिटी नॅशनल पार्कपण आहे आणि नक्कीच भेट देण्यासारखे आहे.

In reply to by पिलीयन रायडर

पहिली गोष्ट म्हणजे स्वतः गाडी चालवायची तयारी असेल तर सर्व गोष्टी एकदम सोप्या होऊन जातात. मी NJ मधून विमानाने लास वेगासला गेलो. तेथे विमानतळावरून गाडी घेतली व दुसऱ्या दिवशी गाडीने ग्रँड कॅन्यन करून आलो. मग पुढे २ दिवस वेगास मध्ये फिरून घेतले आणि मग गाडीने ने लॉस अँजेल्सला गेलो. तिथे २ दिवस राहून डिस्ने वर्ल्ड बघितलं आणि परत वेगासला आलो, गाडी परत केली आणि परतीचे विमान पकडले. राहण्यासाठी डिस्ने/ युनिवर्सल जवळ बरीच हॉटेल्स असतात जी फार महाग नसतात. थोड्या संशोधनावर ४-७ माइल्स वर एखादं हॉटेल मिळेल. फार लांब घेऊ नका कारण LA मध्ये खूप ट्रॅफिक असतं. तरी पण तुम्ही २ पेक्षा जास्त लोक गाडीत असाल तर HOV लेन वापरू शकता. वेगास पण बघण्यासारखं आहे. कॅसिनोज मध्ये पण, गॅम्बलिंग भाग सोडून, लहान मुलांना घेऊन जाता येतं. पण उर्वरित भागच बघण्यासारखे आहेत. वेगास हे सूर्यास्तानंतर फिरायचं शहर आहे त्यामुळे दिवसभर तुम्ही इतर उद्योग करू शकता. ग्रँड कॅन्यन पण सुंदर आहे. अजून काही स्पेसिफिक माहिती हवी असेल तर व्यनी करा. जमेल तेवढं सांगीनच :) माझं मत: युनिवर्सल स्टुडिओमध्ये रोलर कोस्टर राईड्स बऱ्याच आहेत. त्यामुळे वयाचे व उंचीचे बंधन ८०% राइड्स मध्ये आहे. दुसऱ्या शब्दात, लहान मुलांना (५ वर्षाच्या आतील व ४८ इंचापेक्षा कमी उंची असेल तर) बसता येणार नाही अश्या बऱ्याच राईड्स आहेत. जर का तुम्ही हार्ड कोअर रोलर कोस्टर आवडणारे असाल तर युनिवर्सल बेस्ट आहे. त्यापेक्षा डिस्ने वर्ल्डमध्ये लहान मुलांना बसता येईल अश्या बऱ्याच राइड्स आहेत. मी तर म्हणेन की कॉम्बिनेशन आहे की लहान मुलं आणि मोठी माणसं पण एन्जॉय करतील. मी युनिव्हर्सलमध्ये गेलो पण फार तर ३-४ राईड्स मध्ये आम्ही बसू शकलो. त्यामुळे माझी पसंती डिस्नेला असेल.

In reply to by पिलीयन रायडर

प्रत्येकाच्या आवडीनिवडीनुसार ट्रीपमधली स्थळं निवडली किंवा काढली जातात, त्यामुळे मी जर ईस्टला राहून वेस्ट कोस्टची ट्रिप प्लॅन केली तर कशी करेन असा विचार करून खालचा प्रतिसाद लिहिला आहे. ट्रिपचा काळ - ५ ते ७ दिवस विमानाने Los Angeles आणि तिथून पुढे विमानतळावरून घेतलेली भाड्याची गाडी. १. युनिव्हर्सल स्टुडिओ - १ दिवस २. डिस्ने लँड (?) - १ किंवा २ दिवस ३. Los Angelesच हंटिंग्टन आणि इतर आवडतील तसे समुद्रकिनारे - १ दिवस ४. किंवा सरळ दोन दिवसाची पॅसिफिक कोस्ट हायवे वर रोड ट्रिप (एका दिवशी रात्री हर्स्ट कॅसल च्या आसपास समुद्रकिनाऱ्यावरच्या हॉटेलात राहावे). खरे तर Monterey ते मोरो Morro Bay या दोन ठिकाणांमधला कोस्टल हायवे अतिशय सुंदर आहे पण सुरुवात जर लॉस एन्जिलिसपासून करायची ठरली तर Monterey पर्यंत पोचणे बऱ्यापैकी वेळ खाणारे होऊ शकते. त्यामुळे ते उपलब्ध वेळ आणि आवडीनिवडीचा प्रार्थमिकतेनुसार ठरवावे लागेल. ५. अचाट गोष्टी पाहायला आवडत असतील तर Los अँजेल्स पासून Sequoia National Park साधारण २०० माइल्स असेल. प्रचंड मोठा Sequoia वृक्ष पाहणे हा खरोखरीच विस्मयकारक अनुभव होता. इथे जातांना जर बेकर्सफील्ड मार्गे गेले तर तिथल्या ऑइल फिल्ड्स मधून रस्ता जातो. क्षितिजापर्यंत शेकडो पम्प सतत ना थांबता सुरु असतात, काहीसे खालच्या फोटोसारखे दिसेल. oil fileds

In reply to by आनंदयात्री

+१ हेच सूचवणार होते. लॉस अँजेलिस हुन कोस्ट हायवे ही रोड ट्रिप हा एक आत्यंतिक महत्त्वाचा भाग आहे माझ्या मते. अप्रतिम सुंदर ड्राईव्ह !! लायसनस तो पर्यंत काढुन घ्याच. एल ए हुन निघुन मलिबु , सॅन डिएगो सारखी ठिकाणं एक दोन दिवसात करता येतात. पूर्ण एसेफो पर्यंत ड्राईव्ह केलं तर त्यासारखी गोष्ट नाही. एसेफो मध्ये कदाचित फार गाडी लागणार नाही पण एल ए (युनिव्हर्सल + डिझ्ने + हॉलिवुड सारख्या क्लिशे जागांमध्ये रस असेल तर ते, आम्हाला नव्हता सो आम्ही ते दिलं सोडुन + बीचेस + लास व्हेगस+ ग्रँड कॅनयन + सॅन डिएगो + कोस्टल हायवे) करताना गाडी ने फार फार सोय होईल आणि तो एक चांगला, स्मरणीय अनुभव असेल. युनिव्हर्सल मध्ये राईड मध्ये अबीर च्या वयाची मुलं होती आणि तो स्टुडिओ हा एक अप्रतिम अनुभव आहे. त्यांची स्टुडिओ टुअर नक्की , नक्की घे कारण त्यात अनेक मजेदार, सुरस गोष्टी बघायला मिळतात. फक्त आत खायला फार काही नीट मिळत नाही त्यामुळे घेऊन जा बरोबर काही तरी. एसेफो आणि एल ए वेगवेगळे करावे अशा मताची मी आहे. कारण एक आठवडा एल ए + आजुबाजुचं आणि एक आठवडा एसेफो + आजुबाजुचं असा वेळ असेल तर नीट न्याय देता येईल आणि तो द्यावाच. एसेफो च्या आजुबाजुला सॉफ्टवेअर वाल्यांची पंढरी आहे. गुगल सारखी ऑफिसेस + स्टॅनफर्ड ची टुअर पण नक्की घ्यावी. नॅपा व्हॅली तर आहेच पण तिथे अजुनही जवळपास काही अप्रसिद्ध पण नितांत सुंदर जागा आहेत. एक एक दिवस नक्की घालवावा अशा. त्यामुळे हे दोन्ही एकत्र करायचं असेल तर २ आठवडे + गाडी हे असू द्या .

In reply to by आनंदयात्री

LA मध्ये हॉटेल निवडताना शटल सर्व्हिस असलेली हॉटेलं निवडा. जेणेकरून पार्कात येणे जाणे सुखाचे होईल. विशेषतः दिवसभर चालून पायाचे तुकडे पडलेले असतांना रात्री बसने येणे सोपे वाटते. अनाहेम ऑरेंज कौंटीत बेस्ट वेस्टर्न, रेड लायन किंवा आयरिस इन सारखे बरेच ऑप्शन मिळतील. काही ठिकाणी हॉटेलातले पार्किंगही पेड असते, ते पाहूनच बुकिंग करा. दिसणे लँड आणि युनिवर्सल हे दोन्हीही पार्क करणार असला तर सिटी पास असणारे तिकीट जास्त सोयीचे पडेल. https://www.getawaytoday.com/ सारख्या बऱ्याच वेबसाईट पूर्ण ट्रिप प्लॅन करून देतील. त्यांच्याकडून हॉटेल आणि तिकिटे दोन्ही घेतली तर बऱयापैकी पैसे वाचतात असा अनुभव आहे.

In reply to by आनंदयात्री

हायला, आमच्या कर्मभुमीतून गेलात की राव. या मशीनींबरोबर ३.५ वर्षे काढली. माझे बेकर्सफील्ड...

युनाइटेड ची स्वस्त तिकिटे मिळण्याची ची वेबसाईट. इथे दर मंगळवारी त्या वीकांताची स्वस्त तिकिटे मिळतात https://www.united.com/web/en-US/apps/booking/specials/default.aspx

अमेरिकेत कधी कुणी volunteering केले आहे का? मला प्रत्यक्ष जागी जाऊन २-३ तास काम करायला आवडेल. volunteermatch ह्या वेबसाईटवर जाऊन पहात आहे. इथे अमेरिकन रेडक्रॉससाठी काम करायची संधी दिसतेय. पण एकंदरित हे प्रकरण काय असतं, कोणत्या संस्था चांगल्या, काय प्रकारचे काम करावे अथवा करु नये ह्याची माहिती हवी आहे.

In reply to by पिलीयन रायडर

फीड माय स्टार्विंग चिल्ड्रन अन सेकन्ड हार्वेस्ट हार्टलँड या संस्थांमध्ये जाऊन अन्नाची पाकिटं बनवण्याच्या कामाचं श्रमदान मी केलं आहे. दोन्ही संस्थांची कार्यपद्धती स्पृहणीय वाटली. यासारख्या अनेक संस्था अमेरिकाभर पसरल्या आहेत.

खूप छान अनुभव असतो पिरा. मी एका ओल्ड एज होम मधे, एका शाळेत आणि एका अजुन एका संस्थेत ( बहुतेक रेड क्रॉस) मधे वोलंटियरिंग केलंय काही काळ. ओल्ड एज होम मधे दिवसातले दोन तीन तास अती वृद्ध लोकांच्या कक्षात मी असायचे. तिथे आजी आजोबा लोकांशी गप्पा मारायचे, त्यांच्या व्यायामाला मदत करायचे. एकदा तर एक गोड आजी मला म्हणाल्या आज माझी नात येतेय मला भेटायला मला नेलपेण्ट लावून देशील का गं? मग त्यांना मला जमेल तसं मी मॅनिक्यूवर करून दिले त्यांना. आजीबाई खुश झाल्या अगदी :) शाळेत टीचर असिस्टेंट म्हणून काम होतं. मजा यायची प्री के च्या मुलांबरोबर काम करायला. थोडीफार स्पेलिंग मधे हेल्प. त्यांना पुस्तक वाचून दाखविणे, स्नॅक टाइम ला खाऊ वाटणे अशी कामं. दोन्हीकडे मी खूप एन्जॉय केलं. रेड क्रॉस मधे काम मात्र जरा बोअर वाटलं मला. मला वाटलं की मी समाज उपयोगी किंवा इण्टरेस्टिंग काहीतरी काम करीन पण तिथे काम होतं फक्त डेस्कवर बसून फोन उचलणे :( बाकी हॉस्पिटल्स मधे पण वोलंटियरिंग ची खूप कामे असतात. माझ्या एक ओळखीच्या आजी खूप वर्षे हॉस्पिटल मधे वोलंटियरिंग करायच्या.

In reply to by पद्मावति

रेड क्रॉसचं काम तसंच दिसतंय. मॅनेजमेंट टाईप. मला माहिती नाही की लहान मुलांशी किती पेशन्सने खेळु शकेन कारण एक मुलगा घरी सहनशक्तीचा अंत पहातोय आजकाल!! पण एकंदरित अनुभव चांगला असेल तर मी एखादया ठिकाणी जाऊन बघते.

प्रत्येक संस्थेला एकाच प्रकारची मदत लागेल असं नाही. एका शेल्टरला काही लोकांचा ग्रूप येऊन स्वयंपाक करून जात असे. मग भारतीय लोकांचा गट (ज्यात माझा नवरा, मुलगा जात असत. मी एकदाच गेले होते) वाढप्यांची कामे करत. येथील एका देवळात पाणी वाढणे, स्वच्छता अशी कामे असतात. तुमचे किती तास काम झाले याची नोंद ठेवता येते व त्यावर सही शिक्के घेऊन ठेवता येतात. आता माझ्या मुलाला शाळेत हे दाखवावे लागते म्हणून एका शेल्टरमध्ये जाऊन त्यांची शनिवारी येणारी ग्रोसरीची गाठोडी सोडवून जागेवर वस्तू लावणे वगैरे तीन तासात होते. मग त्याच्या गटाने त्याची नोंद ठेवली आहे. तू रेडक्रॉसमध्ये जाऊन किंवा फोनवर, ईमेलवर कामाच्या स्वरुपाबद्दल जाणून घेण्यासाठी विचारू शकतेस.

जर्सी सिटी मध्ये शाळांच्या अ‍ॅडमिशन्स चालु होत आहेत. मागच्या वर्षी ही माहिती मिळवायला मला खूपच त्रास झाला. यंदा कुणी इथे असेल तर उपयोग होऊ शकतो म्हणून किमान ह्या एरियाची माहिती देऊन ठेवते. इतर सदस्यांन त्यांच्या भागाची माहिती दिलीत तर अजुनच उत्तम! जर्सी सिटी मध्ये मुलांसाठी ३र्‍या वर्षी पासुन शाळा आहेत. शाळांना काहीही फिस नसते. फक्त युनिफॉर्म आणि डबा आपला. जेवणही फ्री च आहे खरं तर. पण इथे काही तरी गोंधळ चाललाय त्याबाबत. मध्येच पैसे घेताएत, मध्येच फ्री म्हणताएत. पण तसंही आपली पोरं रोज चीझ सॅण्डविच सारखं जेवण नाही करु शकत म्हणुन डबा बरा. वय ३ - Prek-3 - स्वतंत्र डेकेअर मध्ये हे वर्ग चालतात. ह्या खाजगी शाळा असून त्यांना सरकार अनुदान देते. वय ४ - Prek-४ - हे वर्ग पब्लिक स्कुल मध्ये चालतात. पण मुख्य इमारतीपेक्षा वेगळे वर्ग असतात आणि शिक्षकही वेगळ्या डिपार्ट्मेंटचे असतात. वय ५ - किंडरगार्डन - हे मुख्य पब्लिक स्कुलचा भाग असतात - charter school मध्येही हे वर्ग असतात. वय ३ आणि ४ साठी जे डिपार्टमेंट काम करते त्याचे नाव आहे - अर्ली चाईल्डहुड. जर्सी सिटी बोर्ड ऑफ एज्युकेशनच्या वेबसाईटवर सर्व माहिती मिळेल. ही साईट पहा :- http://www.jcboe.org/boe2015/index.php?option=com_content&view=article&i... http://www.jcboe.org/boe2015/images/pdf/depts/ec/17-18/Registration_Flye... - ही बेसिक माहिती. शाळा ४ सप्टेंबरच्या सुमारास चालु होतील. अ‍ॅडमिशनसाठी - बर्थ सर्टीफिकेट, रहिवासी पुरावा आणि मुलाचे वॅक्सिनेशनचे रेकॉर्ड लागेल. भारतातून येताना सर्व आणा. इथे आलात की लगेच एक डॉक्टर गाठा. तो अमेरिकन पद्धतीच्या कार्डवर माहिती भरून देईल. मुल भारतात जन्मलेलं असेल तर त्याची टिबी टेस्ट होईल. ती पॉझिटिव्ह आली तर एक्स रे करावा लागेल. तो इथे खूप महाग आहे. हे भारतातूनच करुन घेता येईल. इथे चालेल बहुदा. मला १००% खात्री नाही. पण मी विचारु शकते. काही माहिती हवी असेल तर - https://www.facebook.com/groups/jcboe/ हा फेसबुक ग्रुप जॉइन करा. लगेच उत्तर मिळतं. **** हे सर्व जर्सी सिटीला लागु आहे. एडीसन मध्ये ५ व्या वर्षी शाळा सुरु होतात****

In reply to by पिलीयन रायडर

अ‍ॅडमिशनचा पहिला राऊंड मार्चमध्ये होतो. दुसरा जुन पहिल्या आठवड्यात होतो आणि शेवटचा सप्टेंबरमध्ये शाळा सुरु झाल्या की उरलेल्या जागांसाठी होतो. अगदी सप्टेंबरमध्ये गेलात तरी तुम्हाला अ‍ॅडमिशन मिळणार हे १००%. ती जवळच्या होमस्कुल मध्ये मिळाली तर उत्तम. पण नाही मिळाली तरी तुम्ही मुलांना होमस्कुललाच सोडायचे. बस त्यांना जिथे प्रवेश मिळाला तिथे घेऊन जाते. आणि परत आणुन सोडते. ह्या दरम्यान तुमच्या मुलाला होमस्कुलला जागा देण्याचे प्रयत्न चालुच असतात. आणि शक्यतो काही दिवसात मुल परत होमस्कुलला येईलच हे पाहिले जाते.

उन्हाळ्याच्या सुट्ट्यांसाठी - १. होम डेपोमध्ये दर महिन्याच्या पहिल्या शनिवारी लहान मुलांसाठी फ्री वर्कशॉप असते. रजिस्ट्रेशन इथे करु शकता - http://www.homedepot.com/workshops/#change_store ह्या महिन्याचे वर्कशॉप येत्या शनिवारी होते आहे. २. डाऊनटाऊन बोटहाऊस, मॅनहॅटन इथे संपुर्ण समर मध्ये फ्री कयाकिंग करता येऊ शकते. अनेक ठिकाणी ही सोय असु शकते, गुगलुन बघता येईल. http://www.downtownboathouse.org/free-kayaking/ ३. जर्सी सिटी मध्ये नवीन असणार्‍यांसाठी - अनेक ठिकाणी मुव्ही इन द पार्क चालु आहे. जवळपास रोज एखाद्या बागेत चित्रपट दाखवला जातोय. आठवड्याच्या ठरलेल्या दिवशी (लेबर डे) पर्यंत रात्री ८-८:३० ला पिक्चर दाखवतात. शक्यतो लहान मुलांचे पिक्चर्स असतात. अशाच काही कार्यक्रमांची माहिती कुणाला असेल तर नक्की सांगा.

सप्टेंबर ६-९ दरम्यान हा समारोह शिकागो मध्ये पार पडत आहे. बरेच रथी महारथी या निमित्ताने उसगावात दाखल होत आहेत. अधिक माहिती : http://www.worldhinducongress.org/ रच्याकने, शिकागो मधे कोणी मिपाकर आहेत का? कोलोरॅडो डेलिगेट म्हणून तीन दिवस माझा मुक्कम तिथे आहे... तसेच, सप्टेंबर २९-३० न्यूयॉर्क भागात प्रवास आहे, तिथलेही कोणी मिपाकर असल्यास भेटायला आवडेल...