मग निळ्या दरीतुन हाक
येताच काफिला उठला
नक्षत्रजडित रात्रीला
हु॑दका अनावर फुटला
त्या निळ्या दरीच्या गर्भी
घननीळ गूढसे काही
नि:शब्द काफिला भोगी
ती पिठुर रानभुल देही
काफिल्यात विरघळताना
गारूड निळेसे पडले
की स्वप्न निळावन्तीचे
मी माझ्यावर पा॑घरले
काव्यरस
| लेखनविषय: |
|---|
वाचने
3545
प्रतिक्रिया
12
मिसळपाव
प्रतिक्रिया
सुर्रेख!
छानच!
आवडली पण
सुरेख कविता !!
अप्रतिम !!
मस्त...
धडपड चालू आहे
हो, बरोबर
In reply to धडपड चालू आहे by अनन्त्_यात्री
खूप छान! आवडली कविता!
कवितेची गुढता अद्याप पुरेशी
सुंदर रचना
आह.. आवडलीच !