Skip to main content

निळावन्ती

लेखक अनन्त्_यात्री यांनी बुधवार, 11/01/2017 14:46 या दिवशी प्रकाशित केले.
मग निळ्या दरीतुन हाक येताच काफिला उठला नक्षत्रजडित रात्रीला हु॑दका अनावर फुटला त्या निळ्या दरीच्या गर्भी घननीळ गूढसे काही नि:शब्द काफिला भोगी ती पिठुर रानभुल देही काफिल्यात विरघळताना गारूड निळेसे पडले की स्वप्न निळावन्तीचे मी माझ्यावर पा॑घरले
काव्यरस
लेखनविषय:

वाचने 3555
प्रतिक्रिया 12

प्रतिक्रिया

"चांदणे शिंपित जाशी" मधे ही निळावंति भेटली होती. त्या नंतर बर्‍याच दिवसांनी तिच्याशी गाठ पडतीय. आवडली तुमची निळावंती. पैजारबुवा,

पैजारबुवा, राजा बढ्यान्ची चा॑दण॑ शि॑पत जाणारी निळावन्ती मेघडम्बरीत अवगुण्ठित आहे. तिच॑ "मेघांविण मोकळे सौंदर्य" पाहाण्यासाठीची विराट धडपड चालू आहे!

कवितेची गुढता अद्याप पुरेशी उलगडली नाही; 'मनुष्य मनाची अनाकलनीय धाव' असे काही ? या कवितेतून कविला सुचवायचे आहे का ?