✍ मराठी साहित्य, संस्कृती आणि लेखनाचे व्यासपीठ
प्रवेश करा | सदस्य व्हा
मिसळपाव
मिसळपाव मराठी साहित्य

Main navigation

  • मुख्य पान
  • पाककृती
  • कविता
  • भटकंती
  • नवीन लेखन

शतशब्दकथा स्पर्धा-२०१७: ती आणि द्वारकाधीश

ज
ज्योति अळवणी यांनी
Mon, 01/30/2017 - 22:13  ·  लेख
लेख
aa तो निघाला आणि 'ती' वेडीपीशी झाली. तिने आतुर नजरेने त्याच्या नेत्रात स्वतःला गुंतवले. पण तो बधला नाही; तेव्हा मात्र ती शांतपणे म्हणाली,"जातोस? जा! तुला अडवणार नाही. हे अर्थहीन... प्राणहीन....जीवन तुझ्या आठवणींवर कंठेन आणि तुझ्यातच विलीन होईन. मात्र तुला मी आठवेन..मग मात्र......" तिने त्याच्याकडे पाठ केली. यमुनेच्या काळ्या मऊशार वाळूतून तिची सुकुमार पावलं आपली ओळख उमटवत राहिली...... द्वारका वसली आणि तो विसावला. आता समुद्र किनाऱ्यावर उतरत्या सूर्य किरणांमध्ये त्याला ती हवी होती...त्याची दमदार पावलं शुभ्र मऊशार वाळूतून अस्तित्व उमटवत तिला शोधत होती. वाऱ्यावर उठणारे पाव्याचे मंद...मधुर स्वर आणि उडणारे उत्तनिय तिची आठवण जागवत होते......आज द्वारकाधिशाला 'ति'च्या अर्ध्या वाक्याचा अर्थ लागत होता....
वर्गीकरण
लेखनविषय (Tags)
कथा
लेखनप्रकार (Writing Type)
प्रकटन

प्रतिक्रिया द्या
3948 वाचन

💬 प्रतिसाद (11)

प्रतिक्रिया

मतदान कसं करायचंय नक्की?

पिलीयन रायडर
Mon, 01/30/2017 - 22:32 नवीन
मतदान कसं करायचंय नक्की? म्हणजे इथे दिलेले +१ मोजणार आहात का? की त्यासाठी वेगळी पद्धत आहे यंदा?
  • Log in or register to post comments

वेगळा धागा येईल. प्रशांत

कॅप्टन जॅक स्पॅरो
Mon, 01/30/2017 - 22:37 नवीन
वेगळा धागा येईल. प्रशांत काहीतरी व्यवस्था करतोय :)!
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: पिलीयन रायडर

कॅप्टन

आनंदयात्री
Mon, 01/30/2017 - 22:43 नवीन
कॅप्टन, दर धाग्यात ती ती इमेज जोडली तर वाचकांना शतशब्दकथा नेमकी कोणत्या छायाचित्रासाठी लिहली आहे ते कळणे सोपे होईल आणि मतदान करणे सोयीचे होईल.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: कॅप्टन जॅक स्पॅरो

प्रत्येक धाग्यामधे इमेज देणं

कॅप्टन जॅक स्पॅरो
Mon, 01/30/2017 - 22:46 नवीन
प्रत्येक धाग्यामधे इमेज देणं म्हणजे मोबाईल डेटा वाल्यांच्या शिव्या खाणं :). मी लिंक आणि फोटोचं नावं उद्या धाग्यामधे अपडेटवतो. म्हणजे तो गोंधळ उडणार नाही.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: आनंदयात्री

ज्यांनी सगळी चित्र बघितली

ज्योति अळवणी
Mon, 01/30/2017 - 22:54 नवीन
ज्यांनी सगळी चित्र बघितली आहेत त्यांना कथा लक्षात येईल.पण सर्व वाचकांसाठी चित्र असावं असं वाटत
  • Log in or register to post comments

सहमत.. अगदी थंबनेलच्या आकारात

रुपी
Tue, 01/31/2017 - 03:01 नवीन
सहमत.. अगदी थंबनेलच्या आकारात असलं तरी चालेल. कथा आवडली!
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: ज्योति अळवणी

मस्त! आवडली कथा!

रातराणी
Tue, 01/31/2017 - 00:05 नवीन
मस्त! आवडली कथा!
  • Log in or register to post comments

मस्तच

लोथार मथायस
Tue, 01/31/2017 - 03:58 नवीन
कथा आवडली
  • Log in or register to post comments

कथा चांगलीये फक्त उत्तनिय

अॅस्ट्रोनाट विनय
Tue, 01/31/2017 - 10:04 नवीन
कथा चांगलीये फक्त उत्तनिय च्या ऐवजी उत्तरीय हवे
  • Log in or register to post comments

कथा आवडली.

यशोधरा
Tue, 01/31/2017 - 19:30 नवीन
कथा आवडली.
  • Log in or register to post comments

आवडली

निओ
गुरुवार, 02/02/2017 - 13:16 नवीन
आवडली
  • Log in or register to post comments

मिसळपाव वर स्वागत आहे.

प्रवेश करा

  • नवीन खाते बनवा
  • Reset your password
मिसळपाव.कॉम बद्दल
  • 1आम्ही कोण?
  • 2Disclaimer
  • 3Privacy Policy
नवीन सदस्यांकरीता
  • 1सदस्य व्हा
  • 2नेहमीचे प्रश्न व उत्तरे
लेखकांसाठी
  • 1लेखकांसाठी मार्गदर्शन उपलब्ध
  • 2लेखन मार्गदर्शन
संपर्क
  • 1सर्व मराठीप्रेमींचे मनापासून स्वागत!
  • 2अभिप्राय द्या
  • 3संपर्क साधा
© 2026 Misalpav.com  ·  Disclaimer  ·  Privacy Policy मराठी साहित्य व संस्कृतीसाठी  ·  प्रवेश  |  सदस्य व्हा