
तो निघाला आणि 'ती' वेडीपीशी झाली. तिने आतुर नजरेने त्याच्या नेत्रात स्वतःला गुंतवले. पण तो बधला नाही; तेव्हा मात्र ती शांतपणे म्हणाली,"जातोस? जा! तुला अडवणार नाही. हे अर्थहीन... प्राणहीन....जीवन तुझ्या आठवणींवर कंठेन आणि तुझ्यातच विलीन होईन. मात्र तुला मी आठवेन..मग मात्र......" तिने त्याच्याकडे पाठ केली. यमुनेच्या काळ्या मऊशार वाळूतून तिची सुकुमार पावलं आपली ओळख उमटवत राहिली......
द्वारका वसली आणि तो विसावला. आता समुद्र किनाऱ्यावर उतरत्या सूर्य किरणांमध्ये त्याला ती हवी होती...त्याची दमदार पावलं शुभ्र मऊशार वाळूतून अस्तित्व उमटवत तिला शोधत होती. वाऱ्यावर उठणारे पाव्याचे मंद...मधुर स्वर आणि उडणारे उत्तनिय तिची आठवण जागवत होते......आज द्वारकाधिशाला 'ति'च्या अर्ध्या वाक्याचा अर्थ लागत होता....
वाचने
4009
प्रतिक्रिया
11
मिसळपाव
प्रतिक्रिया
मतदान कसं करायचंय नक्की?
मतदान कसं करायचंय नक्की? म्हणजे इथे दिलेले +१ मोजणार आहात का? की त्यासाठी वेगळी पद्धत आहे यंदा?
वेगळा धागा येईल. प्रशांत
In reply to मतदान कसं करायचंय नक्की? by पिलीयन रायडर
वेगळा धागा येईल. प्रशांत काहीतरी व्यवस्था करतोय :)!
कॅप्टन
In reply to वेगळा धागा येईल. प्रशांत by कॅप्टन जॅक स्पॅरो
कॅप्टन, दर धाग्यात ती ती इमेज जोडली तर वाचकांना शतशब्दकथा नेमकी कोणत्या छायाचित्रासाठी लिहली आहे ते कळणे सोपे होईल आणि मतदान करणे सोयीचे होईल.
प्रत्येक धाग्यामधे इमेज देणं
In reply to कॅप्टन by आनंदयात्री
प्रत्येक धाग्यामधे इमेज देणं म्हणजे मोबाईल डेटा वाल्यांच्या शिव्या खाणं :). मी लिंक आणि फोटोचं नावं उद्या धाग्यामधे अपडेटवतो. म्हणजे तो गोंधळ उडणार नाही.
ज्यांनी सगळी चित्र बघितली
ज्यांनी सगळी चित्र बघितली आहेत त्यांना कथा लक्षात येईल.पण सर्व वाचकांसाठी चित्र असावं असं वाटत
सहमत.. अगदी थंबनेलच्या आकारात
In reply to ज्यांनी सगळी चित्र बघितली by ज्योति अळवणी
सहमत.. अगदी थंबनेलच्या आकारात असलं तरी चालेल.
कथा आवडली!
मस्त! आवडली कथा!
मस्त! आवडली कथा!
मस्तच
कथा आवडली
कथा चांगलीये फक्त उत्तनिय
कथा चांगलीये फक्त उत्तनिय च्या ऐवजी उत्तरीय हवे
कथा आवडली.
कथा आवडली.
आवडली
आवडली