Skip to main content

जुन्या संदर्भ साहित्याचे डीजीटायझेशन व विकिस्रोत कार्यशाळा

लेखक माहितगार यांनी रविवार, 29/01/2017 15:01 या दिवशी प्रकाशित केले.
आयोजक : महाराष्ट्र ग्रंथोत्तेजक संस्था, महाराष्ट्र ज्ञान मंडळ (MKCL), द सेंटर फॉर इंटरनेट अँड सोसायटी - अॅक्सेस टू नॉलेज (CIS-A2K) यांच्या संयुक्त विद्यमाने कृतीतून प्रत्यक्ष अनुभव देत प्रशिक्षण देणारी कार्यशाळा आयोजित केली जाणार आहे. उल्लेखित कार्यशाळेचे नियोजन सुरु आहे. सहभाग जागा/संधी बहुधा मर्यादीत आहेत संपर्क subodhkiran@gmail.com उद्दिष्टे : दि.१७/२/१७ जुन्या ग्रंथ संपदेचे संवर्धन करण्यासाठी डीजीटायझेशन करणे प्रताधिकार , मुक्त परवाना इ. सदर ग्रंथ संदर्भासाठी इंटरनेटवर उपलब्ध करणे दि १८/२/१७ PDF मजकुराचे ओसिआर टूल वापरून टेक्स्ट मध्ये रुपांतर करणे साहित्य प्रथम अर्काईव्हज या संकेत स्थळावर चढविणे विकिस्रोत वर आणण्यासाठीची प्रक्रिया तांत्रिकदृष्ट्या पूर्ण करणे अंतिमत: हे ग्रंथ अधिकृतरीत्या इन्टरनेटवर प्रकाशित करणे कालावधी : दि. १७ व १८ फेब्रुवारी २०१७ स्थान : महाराष्ट्र ग्रंथोत्तेजक संस्था,ज्ञान प्रबोधिनी - सदाशिव पेठ,पुणे व महाराष्ट्र ज्ञान मंडळ (MKCL),सेनापती बापट रोड,पुणे
लेखनविषय:
लेखनप्रकार

वाचने 1350
प्रतिक्रिया 6

प्रतिक्रिया

सदर ग्रंथ संदर्भासाठी इंटरनेटवर उपलब्ध करणे
हे कुठे उपलब्ध आहेत (डीएलाय, उस्मानिया वगैरे वगळता) याची यादी मिळू शकेल काय?

कार्यक्रमास स्वतः सुबोध कुलकर्णीं आणि उदय पंचपोर यांच्या व्यतरीक्त खालील माननीयांचे मार्गदर्शन लाभण्याची शक्यता आहे अशी माहिती मिळाली आहे. प्रा.सदानंद मोरे, प्रा.माधव गाडगीळ, प्रा.सपना देव, प्रा.अविनाश चाफेकर. इच्छूकांनी सुबोध कुलकर्णींशी त्यांच्या इमेलवर संपर्क करावा.