लय आयकून होतो दंगल दंगल. टिवी लावा के तेच चालू रायते हानिकारक बापू नाहीतर धाकड. जो तो सांगत होता लइ मस्त पिक्चर हाय. तवा म्हटल आपण बी दंगल पाहाले जाच. कापसाचा चुकारा उचलला आन बंद्या फॅमिलेले पिक्चर पाहाले घेउन गेलो, ते बी साध्यासुध्या टॉकीजमधे नाही तर नागपुरातल्या मॉलमंधी. असा पचतावा झाला ना. तुमाले सांगतो राजेहो लइ म्हणजे लइच भंगार पिक्चर हाय. असा का पिक्चर रायते भाऊ? लइ बेक्कार पिक्चर हाय. मी तुमाले येकयेक मुद्दा बराबर समजावून सांगतो.
लवस्टोरी
आता मले सांगा पिक्चरमंधी कमीत कमी येकतरी लवस्टोरी पायजेन का नाही. लवस्टोरी बिना पिक्चर रायते का कधी? येथ कोण स्टोरी लिवली का पण बंद्या पिक्चरमंधी लवस्टोरीच नाही. लवस्टोरी नसन तर पिक्चरमंधी हीरोइनी घ्यायच्याच कायले म्हणतो मी. त्यायले कामच का रायते जी या बगीच्यातून त्या बगीच्यात मस्त झकपक कपडे घालून हिंडाच, गाण म्हणाच, नाचाच. हिरोनबी मंग तिच्या मांग मांग फिरत गाण म्हणाच, नाचाच. तवा कुठ पिक्चर पायल्यावाणी वाटते पण यायन बंद्या पिक्चरमंधी लवस्टोरी काय बगीच्या बी नाही दाखवला. अस रायते का जी कधी? कोणी म्हणे ते कान कोण्या का पहेलवाणाची खरी स्टोरी हाय. खरी स्टोरीच दाखवाची होती तर तीन घंट्याचा पिक्चर कायले बनवाचा पंधरा मिनिटाच्या बातम्यात बी काम भागले असते ना. स्टोरी लिहनाऱ्याले पैसे द्याच जीवावर आल असन म्हणून खरीच स्टोरी घेतली. स्वस्तात निपटाले पायते लेकाचे पण तिकिट मात्र काही कमी करत नाही. बर जाउ द्या खरी स्टोरी तर खरी स्टोरी पण खऱ्या स्टोरीत लवस्टोरी राहात नाही अस काही कायदा हाय का? धोनी मंदी दोन दोन लवस्टोऱ्या होत्या, तो जिंदा है वाला कणचा पिक्चर होता त्याच्यात बी दोन लवस्टोऱ्या होत्या. येथच का घोड मेल होत. तो अमीर खान जवा जवान होता तवा त्यान त्या बहू( सिरेलमधली बहू. तेथ बी कंजूषी हीरोइन घ्याची सोडून सिरेलवालीच घेतली) सोबत लव केला असलच ना. एखांद मस्तपैकी गाणगिन टाकल असत, अस इहीरीवर, वावरात दोघ फिरली असती पायनाऱ्यालेबी बर वाटल असत. यायन लवगिव करन देल्ल सोडून आन शिद्दया चार पोरी झाल्या तेच दाखवल. अस रायते का जी कधी? पोर नाही झाले तरी चालते पण लवतर दाखवाच लागते न जी. मले तरी वाटत त्या डायरेक्टरले लवच अजीर्ण असन म्हणूनच त्यान लवस्टोऱी कट केली.
फायटा
आपण मोठ्या भाउचे पिक्चर पायले, मंग मिथुन दादाचे पायले, आता सल्लू भाइचे पायतो काहून. सांगा काहून, बराबर फायटा. पिक्चरमंधी कमीत कमी चार फायटा तरी पायजेन का नाही. मले समजल का पहेलवाणाचा पिक्चर हाय तवा म्हटल मस्त फायटा असन. कायच का तो पहलवाण नुसता कुस्त्याच खेळतो. कुस्त्या पाहाले आम्ही आखाड्यात जाउ, टाकीजमधी कायले येउ जी. कुस्ती पायताना मले तर समजतच नव्हत आपण पिक्चर पाहून रायलोय का टिव्ही पाहून रायलो ते. कोणी म्हणे खरच कुस्त्या खेळल्या म्हणून, मले नाही वाटत बातम्या घेउन काहीतरी कॅमेऱ्य़ाची करामत केली होय. अशा खऱ्याखुऱ्या कुस्त्या रायते का कधी?
तो पहलवाण तर मले पहलवाण वाटलाच नाही. येवढा पहलवाण गडी त्याले गाववाले काही काही नाव ठेवते आन हा चुपचाप आयकून घेतो. अस रायते का कधी? पहलवाण हाय ना मंग दाखव न पहलवाणकी. एखांदी हवेत उडून फाइट माराची, दोन चार दुकान तोडाची, हातगाड्या उडवाच्या. हा बुवा थेंबभर रगत सांडवत नाही. याची सारी पहलवाणकी घरातल्या पोरीवर, सकाळी उठा धावाले जा, सकाळी उठा पोहाले जा, सकाळी उठा दंडबैठका मारा. त्यायच्यावर पहारा ठेवाले स्वतः त्यायच्या मांग मांग स्कुटर घेउन हिंडतो. पहलवाण गडी तवा बुलेटवरुन हिंडाव का नाही हा गडी कालेजातल्या प्रोफेसरासारखा स्कुटरवर हिंडतो. नाहीच काही तर एमएटी घ्याची. हेल्मेट घालून स्कुटर चालवनारा माणूस कधी पहलवाण रायते का जी. असा लुलुपुच्या पहलवाण रायला तर स्वतःच्याच पोरीच्या हातचा मार खाणार नाहीतर का. त्याले जवा त्याच्या पोरीन पटकनी देल्लीना तवा मले लइ आनंद झाला. म्हटल याले असच पायजेन जेथ पहलवाणकी दाखवाची तेथ नाही दाखवली आता भोग लेका.
हीरोइनी
पिक्चरमधल्या हीरोइनी म्हणजे कशा? आहा. त्यायचे ड्रेस, त्यायच्या साड्या, त्यायच्या अदा, त्यायच नाचन, त्यायचे केस, त्यायन झटका देल्ला का पदर कसा हवेत उडतो, केस हवेत उडतात. पायनाऱ्याले कस पैसा वसूल. हिमालयात थंडीत बी शुटींग असन ना तर तेथ बी पंखा लावून पदर आणि केस उडवते म्हणते. याले म्हणते पिक्चर पायनाऱ्याच्या पैशाची कदर करने. येथ हा बुवा लहानपणीच पोरीले हाफपँट घालाले लावतो, साड्या सलवार अस काही घालू देत नाही. त्यायचे केस कापून टाकतो. अशा रडते ना पोरी तवा, तुमाले सांगतो लइ बेक्कार वाटल राजेहो. मायाच्यान तर ते पायनच झाल नाही वाटल अस उठाव आन त्या पहलवाणाले तेथच झोडून काढाव. आर माणूस हाय का हैवान. अशा हैवानाले खोलीत कोंडून ठेवला ना ते बरच केल अशायले असच पायजे.
गाणे
पिक्चर म्हटल का गाणे आलेच. एखाद आयटम साँग, लग्नाच गाण, लवच गाण, सॅड गाण हे बंद आलच पायजे. त्याच काय आहे आपल्या येथ सणवार रायते, लगीनसराई रायते त्याले गाण लागते ना. चांगल लग्नाच गाण चालू रायते तेथ हा पहलवाण जाउन टपकतो आन गाण बंद करुन येतो. अमदाच्या लगीनसराइत कोणत गाण वाजवाच ‘दंगल दंगल’ का ‘हानिकारक बापू’. कस वाटन जी ते? नवरा बायकोच्या गळ्यात हार टाकतोय आन इकड गाण वाजतय ‘दंगल दंगल’. पोरगी सासरी चालली, बापाजवळ येउन उभी रायली, रडून रायली. तेथ का आता ते ‘बापू तू तो हानिकारक है’ अस गाण वाजवाच. दरवर्षी लगीनसराइले नव गाण द्याच हे पिक्चरवाल्यायची जिम्मेवारी हाय. यायन गाणे नाही दिले तर त्या बँडवाल्यायन कोणाकड पाहाच? त्यायन का वाजवाच? त्यायच्या पोटावर लाथ काहून माराची म्हणतो मी.
तो पिक्चर पायल्यापासून माया घरचा तर तालच बिघडला. आमच्या बायकोच डोस्कच फिरल. पिक्चर पायला तवापासून तिच्या मनात पक्क भरल आमची पोरगी पहलवाणच हाय म्हणून. मी म्हटल
“कशावरुन म्हणते तू?”
“तुमाले आठवत नाही लहाणपणी घोडा घोडा खेळताना पोरगी कस तुमाले लोळवत होती”
“अव ते मले लोळवत नव्हती म्या असाच पडत होतो.”
“तुमाले पोरीच कवतुकच नाही. तुमी पायजा येक दिवस कोणीतरी पोरगा येइन आन सांगन का आपल्या पोरीन त्याले धुतला, चांगला झोडून काढला. माये डोये त्याच दिवसाची वाट पाहून रायले.”
म्या तिच्याकड पायत रायतो. ते कोण्या पोराले खरचटल बी दिसल ना तर हे हातची बोरींग हापसाची सोडून त्याले जाउन इचारते
“का र कोण मारल?”
लिहनार
जानराव जगदाळे
ता हिंगणघाट, जि. वर्धा.
मित्रहो
https://mitraho.wordpress.com/
| लेखनविषय: | |
|---|---|
| लेखनप्रकार |
वाचने
20749
प्रतिक्रिया
44
मिसळपाव
प्रतिक्रिया
निर्राच धुळला क्येला तुमि
=)) =))
=)) मज्जा आली वाचायला. असं
मस्त, खुसखुशीत, चाबूक!!
सही
=)) मस्तच.
अगगगगं! कहर! जानराव जगदाळेंना
:))
मस्त खुसखुशीत !!
लय भारी.
काय लिवलंय जानराव !!
जाम भारी
मजाच!
मस्त ! एकदम सही !!
हा लेख वाचत असताना मनात आल कि
वाचन
In reply to हा लेख वाचत असताना मनात आल कि by सही रे सई
आपलं घरचं चॅनल असताना कशाला
In reply to वाचन by मित्रहो
+१
In reply to आपलं घरचं चॅनल असताना कशाला by स्रुजा
धन्यवाद! बोलीभाषेची मजा लहजात
In reply to वाचन by मित्रहो
ओ काय?!!! युट्युबवर का नाही
In reply to धन्यवाद! बोलीभाषेची मजा लहजात by संदीप डांगे
टाकतो मातारानी... टाकतो. :-)
In reply to ओ काय?!!! युट्युबवर का नाही by पिलीयन रायडर
धन्यवाद संदीप भाऊ. वाचन
In reply to टाकतो मातारानी... टाकतो. :-) by संदीप डांगे
सुपर्ब, सुपर्ब रेकॉर्डिंग.
In reply to धन्यवाद! बोलीभाषेची मजा लहजात by संदीप डांगे
+1111111111111111111111111111
In reply to सुपर्ब, सुपर्ब रेकॉर्डिंग. by पद्मावति
हायला....भारी काम आहे हे...
In reply to धन्यवाद! बोलीभाषेची मजा लहजात by संदीप डांगे
=)))) लैच भारी!!
व्वा !
धन्यवाद
हा हा ! भारी आहे!
भारी लिहलंय
भन्नाट!
मस्त!
जानराव, जबराट लिवल॑य
लयच भारी लिवलय रव..
लयच भारी लिवलय राव..
भारी
डांगे अण्णा
छान लिहिलय . एकदम भैताडच ..
मस्त लिवुन रायेल ना भाउ
जबराट लिहिलंय
लैच भारी लिवलंय! लै आवडला लेख
हा हा कसलं भारी लिहलंय!
लैच दंगल माजव्लीय !!! =)) =))
ते कोण्या पोराले खरचटल बी दिसल ना तर हे हातची बोरींग हापसाची सोड