झेंगट कॉपीराईटचं, शैक्षणिक झेरॉक्सींगच !
नव्हेंबर डिसंबर २०१६ नोटबंदी निर्णयामुळे इतर छोट्या मोठ्या बातम्या पडद्या आड राहील्या त्यातील एक छोटी बातमी दिल्लीच्या रामेश्वरी फोटोकॉपी सर्वीसेसची.
आजुबाजूच्या फोटोकॉपींग सेंटरवरच्या विद्यार्थ्यांकडून (आणि इतरांकडून) पुस्तकांच्या झेरॉक्सींगच्या वेळी लेखक-प्रकाशकांच्या कॉपिराईटचे काय खोबरे होते याची कुणि फारशी काळजी करत नाही. कारण सरसामान्यपणे सर्वसामान्य भारतीयांची वृत्ती कायद्यांकडे झेंगट म्हणून पहाण्याची झाली असावी. झेरॉक्ससेंटरवाल्यांना कॉपीराईटची नोटीस आल्याचे २०१२ पर्यंत फारसे ऐकिवात नव्हते आणि कुठे आली तरी बातम्यात येणे आणि केस कुठल्यातरी उच्चन्यायालयापर्यंत जाणे फारच क्वचित झाले असेल त्यामुळे त्या संबंधाने फारसे भारतीय न्यायालयांचे न्यायालयीन दाखले वाचण्यास मिळत नाहीत. २०१२ मध्ये मात्र दिल्ली विद्यापीठाच्या दिल्ली स्कूल ऑफ इकॉनॉमीक्स मधील 'रामेश्वरी फोटोकॉपी सर्वीसेस'ला बातम्यामध्ये येण्याचे भाग्य मिळाले. केवळ एका नव्हे ऑक्सफर्ड युनिव्हर्सिटी प्रेस, केंब्रिज युनिव्हर्सिटीप्रेस अशा जान्यामान्या तब्बल चारपाच प्रकाशकांनी मिळून कॉपीराईट नोटीस पाठवली.
शैक्षणिक जिवन म्हणजे परिक्षार्थीपणा झालेल्या जमान्यात अभ्यासक्रमास लावलेली सर्व पुस्तके विकत घेण्यापेक्षा पुस्तकांमधील आवश्यक धड्यांच्या आणि प्रश्नोत्तरांच्या झेरॉक्स मारलेले कोर्सपॅक विकत घेतले की विद्यार्थ्यांचे काम मोकळे तर दैनंदीन झेरॉक्सींग व्यतरीक्त कोर्सपॅक बनवून विकणे आणि काही प्रमाणात अक्ख्या पुस्तकाची झेरॉक्स बनवून विकणे असा झेरोक्सींगचा व्यवसाय इतर फोटोकॉपीसेंटर प्रमाणेच रामेश्वरी फोटोकॉपी सर्वीसेसचाही चालू होता आणि आहे. रामेश्वरी फोटोकॉपी सर्वीसेसला विद्यापीठाशी कॉपी किती पैसेदराने विकावी याचा कराराचे आणि संकुलात असण्याचे फायदे मिळत असावेत. त्याच्या झेरॉक्सींग व्यवसायाला जान्यामान्या प्रकाशकांनी आव्हान देऊनही डिसंबर २०१६ मधला दिल्ली उच्च न्यायालयाचा निकाल अजून पूर्ण व्हायचा असला तरी अगदीच नुकसानदायकही लागला नाही.
यातली गंमतीची उपकथ अशी की जेव्हा २०१२ मध्ये कॉपीराईट प्रकरण उपस्थित झाले, प्रकाशकांना लेखन सर्विसेस दिलेली अथवा कॉपीराईट हक्क विकलेली काही प्राध्यापक लेखकमंडळींनी ऐनवेळी प्रकाशकांकडे पाठ फिरवून बसण्याचा निर्णय घेतला असावा.
मी या लेखात केसची पुर्ण माहिती लिहिण्या आधी केस अजून दोनदा तरी स्वतः वाचणे जरुरी आहे. इंग्रजी विकिपीडियावर या केसवर एक लेख लिहिण्याचा विचार करतो आहे .(Rameshwari Photocopy Service shop copyright case इंग्रजी विकिपीडियावर अथवा मराठी विकिपीडियावर कुणि सोबत लिहू इच्छित असेल तर स्वागतच आहे.) त्या सोबत सोबत जे वाचन होईल तसे इकडे सुद्धा लिहिण्याचा मानस आहे. (पण चर्चेत लगेच सहभागी होऊ शकेन असे नाही) ज्यांना केसबद्दल लगेच माहिती हवी आहे त्यांच्यासाठी खालील दुवे उपलब्ध आहेत.
* उत्तरदायकत्वास नकार लागू
*इंडियन एक्सप्रेसवृत्त
*दिल्ली उच्चन्यायालयाच्या निकालाचा इंडीयाकानून डॉट ऑर्गवरील दुवा
*लेक्झॉलॉजी संस्थळावरील विश्लेषण
* अ ट्वीस्ट इन डियू फोटोकॉपी केस
* इंग्रजी विकिस्रोतावर भारतीय कॉपीराईट कायदा
***डिसेंबर २०१६ च्या आधीचे संदर्भ***
* दिवाकर किशोर यांचा सप्टेंबर मधला समस्येच्या बाजू मांडणारा एक चांगला ब्लॉग] अनफॉर्च्यूनेटली इंगजी विकिपीडिया ब्लॉग संदर्भ स्विकारत नाही.
*Are You A Corporate Pirate? - शैक्षणिक आणि कार्पोरेट तुलना
वर्गीकरण
प्रतिक्रिया
या केसबद्दल तेव्हा वाचलं होतं
बातम्यांमध्ये गाजावाजा आहे
डिटिएच चानेलवरचे सिनेमे
असे असेल तर हा केवळ 'पुढे
यात बरेच बारकावे आहेत, पण
>>मग गाणी, चित्रपटही आपण
Copyright is not a divine right: Delhi HC
साशंकता
नंतरची काही बातमी आहे ?
होय ना, ९ डिसेंबरला दोन
बातम्यांमध्ये कधी कधी एक
या संदर्भाने बर्यापैकी
अमूक वाहिनीच्या सौजन्याने असा
फुटेज हे सरसकट कॉपी पेस्ट
उत्तम चर्चा
दुर्दैवाने नाही. शिक्षण महाग
हेच म्हणते आहे
त्यासाठीच डिजिटलकडे १००% वळणं
बहुतेक मोजरबीअर ने स्वस्तात
हो बरोबर
या परिच्छेदाच्या मराठी अनुवादात साहाय्य हवे आहे.