काय वेडेपणा चाललाय! सर्वोच्च न्यायालयाने बंदी घातलेली जालिकट्टू नावाची क्रूर प्रथा पुन्हा एकदा सुरू करावी यासाठी तामिळींचा जीव चाललाय. काही ठिकाणी बंदी झुगारून जालिकट्टू आयोजित करण्याचे प्रयत्न झाले. पण पोलिसांनी ते हाणून पाडले. तामिळनाडूचे मुख्यमंत्री ओ पनीरसेल्वम् यांनी तर केंद्र सरकारने सर्वोच्च न्यायालयाचा निर्णय झुगारून जालिकट्टू पुन्हा सुरू करण्याचा अध्यादेश काढावा अशी विनंती करण्यासाठी थेट दिल्ली गाठून पंतप्रधान मोदींची भेट घेतली. सर्वात वाईट भाग म्हणजे संगीतकार रहमान, माजी जागतिक बुद्धीबळ विश्वविजेता विश्वनाथन् आनंद याने सुद्धा जालिकट्टू पुन्हा सुरु करण्यासाठी पाठिंबा दिलाय. ही आमची अत्यंत जुनी परंपरा आहे, आम्ही ती चालू ठेवणारच, आमच्या परंपरेवर बंदी घालण्याचा अधिकार सर्वोच्च न्यायालयाला कोणी दिला अश्या आविर्भावात निदर्शने सुरू आहेत. जालिकट्टू तामिळींच्या जीवनमरणाचा प्रश्न झाला आहे.
जुनी परंपरा, प्रथा इ. गोष्टी खर्या असल्या तरी असल्या प्रथेत मुक्या प्राण्याचा छळ होतोय त्याचं काय? ते बैल काय स्वतः यातना सहन करून तुमची करमणू़क करण्याकरता या जगात आलेत का? एका वाहिनीवर दाखवित होते. एका बैलाभोवती सातआठ लुंगीधारी उभे होते. त्यातला एकजण बैलाची शेपटी ओढून जोरात पिरगाळत होता. दुसरा एकजण शेपटी दाताखाली धरून चावत होता. अरे कशासाठी त्या बैलाला यातना देता? परंपरा आणि प्रथा म्हणून? ही कसली क्रूर परंपरा? मुक्या प्राण्याला यातना देऊन कसली आलीय करमणू़क आणि प्रथा? अंगात एवढी मस्ती असेल तर एकमेकांशी फ्रीस्टाईल कुस्त्या खेळा की. प्राण्यांचा छळ का करता?
स्वतःच्या जिव्हालौल्यासाठी व करमणुकीसाठी मुक्या प्राण्यांना यातना देऊन त्यांचा छळ करण्याची प्रथा व परंपरा खूप जुनी आहे व जगात अनेक देशात ती अजून जिवंत आहे. स्पेनमध्ये बुलफाईट प्रकारात एका बैलाला गल्लीबोळातून पळविले जाते. अनेक जण बैलाच्या मागे पळून त्याला जखमी करायचा प्रयत्न करीत असतात. बैल पळताना बाजूला उभे असलेले बघ्ये बैलाला छोटे बाणाच्या आकाराचे लोखंडी भाले फेकून मारतात. अंगात ठिकठिकाणी भाले घुसलेला तो बैल शेवटी बुलफाईटच्या मैदानात येतो. तिथे तलवारी घेऊन तीनचार जण त्याला तलवारीने जखमी करतात. शेवटी मुख्य मॅटॅडोर येतो व जीवाच्या भीतिने आकांताने धावून थकलेल्या, तलवारीच्या वारांमुळे व अंगात घुसलेल्या भाल्यांच्या जखमांच्या यातनांनी कळवळणार्या बैलाचे मस्तक तो तलवारीच्या एका घावात घडावेगळे करतो. जमलेले हजारो प्रेक्षक या मुक्या प्राण्याच्या यातनामय कत्तलीचा आनंद लुटत असतात. मुक्या प्राण्याला इतक्या यातना देताना आनंद कसा मिळू शकतो? वेदनांनी कळवणार्या बैलाच्या वेदनांनी करमणूक कशी होऊ शकते?
भारत देखील या घॄणास्पद प्रकारापासून दूर नाही. शेतीसाठी बैल वापरण्याआधी मोठ्या दांडक्याने बैलाचे वृषण चेचून भुगा करून टाकतात जेणेकरून तो गायीबरोबर आपले नैसर्गिक कृत्य करू शकणार नाही. माणूस त्याची नैसर्गिक उर्मीसुद्धा स्वतःच्या स्वार्थासाठी नष्ट करतो व तीसुद्धा अत्यंत वेदनादायक पद्धतीने. उर्मिला पवार यांच्या 'आयदान' पुस्तकात बैलाच्या खच्चीकरणाचे वर्णन दिले आहे. दांडक्याने वृषण चेचले जात असताना बैलाला किती यातना होत असतील. माणूस त्याला एवढ्या यातना का देतो? बैलाचे वृषण खच्ची करण्याचे काम करणार्या नराधमाचे वृषणही असेच चेचून काढले पाहिजेत म्हणजे त्याला त्या यातना कशा असतील ते कळेल. बैलगाडीला जोडण्यासाठी बैलांच्या तळपायात खिळे ठोकून नाल बसवितात. नाल बसविण्यासाठी आधी बैलाला खाली बसवून आडवे पाडतात व त्याचे चारही पाय बांधून मग खिळे ठोकून नाल बसवितात. नाल बसविताना बैलाच्या डोळ्यातून वेदनांनी पाणी वाहत असते. कशासाठी हा क्रूरपणा? मला कधी कधी वाटते की बैलांच्या तळतळाटामुळेच कदाचित शेतकर्यांची हलाखीची परिस्थिती असावी. आपल्याला यातना देणार्याला बैलांचे शिव्याशाप भोवत असतील.
काही दिवसांपूर्वी कोल्हापूरमध्ये झालेली'पारंपारिक' मेंढ्यांची टक्कर दाखवित होते. जमलेले प्रेक्षक दोन मेंढ्यांच्या आपापसातील टकरीचा आनंद लुटत होते. दोन्ही मेंढे आपल्या पूर्ण ताकदीनिशी दुसर्याच्या कपाळावर जोरदार धडक मारत होते. दोघांनाही वेदना होत असणारच. कदाचित कपाळाची हाडेही मोडत असतील. आणि असल्या क्रूर प्रकाराचा प्रेक्षक आनंद लुटत होते.
काही ठिकाणी कोंबड्यांची झुंज सुद्द्धा लावतात. या झुंजीत कोंबड्याच्या एका पायाला ब्लेडचा अर्धा तुकडा बांधलेला असतो जेणेकरून समोरच्या कोंबड्याचे रक्त निघेल. दोन्ही कोंबडे मूर्खासारखे एकमेकांशी लढाई करून जखमी होतात व माणसे आपली करमणूक करून घेतात.
बैलगाडी शर्यत हा असाच एक क्रूर प्रकार. सुदैवाने सर्वोच्च न्यायालयाने या प्रकाराला सुद्धा बंदी घातली आहे. तरीसुद्धा बैलगाडी शर्यत पुन्हा सुरू करावी यासाठी महाराष्ट्रात जोरदार प्रयत्न सुरू आहेत. या शर्यतीतही बैलांना जोरात पळविण्यासाठी शेपटी पिरगाळणे, खिळा लावलेल्या चाबकाचे फटकारे लावणे असे क्रूर प्रकार केले जातात आणि वेदना होत असताना भीतिने बैल जोरात गाडी पळवितात कारण आपली उच्च प्रथा आणि परंपरा!
नवसासाठी व धार्मिक परंपरेसाठी कोंबड्या, बकर्या कापणे हा प्राण्यांना यातना देण्याचाच एक प्रकार. हे बळी थांबावेत म्हणून संत गाडगेबाबांनी प्रबोधन करण्याचा खूप प्रयत्न केला. परंतु अजूनही हा प्रकार सुरूच आहे. मांग जातीत एखाद्याचे लग्न ठरताना किंवा त्याआधी काही वर्षे लग्नासाठी नवर्यामुलाच्या नावाने एक डुक्कर सोडले जाते. ऐन लग्नाच्या वेळी हे डुक्कर पकडून त्याला जिवंत जाळून त्याचे मांस खाल्ले जाते. जिवंत जळताना त्या डुकराला किती भयानक वेदना होत असतील. प्रथा व परंपरा या नावाखाली हे क्रूर प्रकार कायमच सुरू राहणार का?
जिव्हालौल्यासाठी जिवंत प्राणी क्रूर पद्धतीने मारणे हे जगभर सर्वत्र केले जाते. कासव, शिंपले, बेडूक, खेकडे इ. प्राण्यांना जिवंतपणीच उकळत्या पाण्यात टाकणे, बदक/हंस इ. प्राण्यांची आत असलेली मान बाहेर काढण्यासाठी त्याच्या तोंडासमोर खाणे धरणे व खाणे खाण्यासाठी त्याने मान सरळ केल्यावर मानेवर घाव घालून त्यांना मारणे अशा क्रूर पद्धतीने हे प्राणी जिभेचे चोचले पुरविण्यासाठी मारले जातात. अरे प्राणी मारायचा असेल तर निदान त्या प्राण्याला भूल देऊन वीजेचा शॉक देऊन वेदनारहीत मरण तरी द्या. हालहाल कशाला करता?
मुक्या प्राण्यांना प्रथा व परंपरेच्या नावाखाली आपल्या करमणुकीसाठी व जिव्हालौल्यासाठी वेदना, यातना देऊन त्यांचा छळ करणे व नंतर मारून टाकणे हे अत्यंत क्रूरकर्म आहे व या प्रकाराचा मला अतिशय संताप येतो. हे सर्व प्रकार तातडीने कायमस्वरूपी बंद व्हायला हवेत. सुदैवाने सर्वोच्च न्यायालय याविषयी सक्रीय असून या प्रकाराला कायद्याने बंदी घालण्यात येत आहे ही समाधानाची गोष्ट आहे.
वाचने
74908
प्रतिक्रिया
282
मिसळपाव
प्रतिक्रिया
माझ्या प्रतिसादात कोणताही
In reply to (इथे फक्त सहभागी माणसांबद्दल by अस्वस्थामा
गुरुजी, कधी कधी हद्द करता राव
In reply to माझ्या प्रतिसादात कोणताही by श्रीगुरुजी
पुन्हा तेच. इथे मुख्य मुद्दा
In reply to गुरुजी, कधी कधी हद्द करता राव by अस्वस्थामा
तसं असेल तर या प्रतिसादात
In reply to पुन्हा तेच. इथे मुख्य मुद्दा by श्रीगुरुजी
जालिकट्टू हे फक्त बैलांसाठी
In reply to तसं असेल तर या प्रतिसादात by अस्वस्थामा
http://www.thehindu.com/news
In reply to आज जालिकट्टूमुळे फक्त २ by श्रीगुरुजी
गुरुजी, दूध व्यवसायाबद्दल
प्रश्न बरोबर आहे. याविषयी जरा
In reply to गुरुजी, दूध व्यवसायाबद्दल by संदीप डांगे
दुभत्या जनावरांचे दूध नियमित
In reply to प्रश्न बरोबर आहे. याविषयी जरा by श्रीगुरुजी
खरं तर विषय भरकटतोय. पण इथे
In reply to दुभत्या जनावरांचे दूध नियमित by संदीप डांगे
सॉरी गुरुजी, पण परत एकदा गडबड
In reply to खरं तर विषय भरकटतोय. पण इथे by श्रीगुरुजी
एक मात्र खरे, 'भूतदया' हा
In reply to दुभत्या जनावरांचे दूध नियमित by संदीप डांगे
मी वाट पाहतोय कधी भारताचा
हाहाहा
In reply to मी वाट पाहतोय कधी भारताचा by Ram ram
=)) =))
In reply to हाहाहा by शब्दबम्बाळ
आमचा कसाई हिंदू आहे, मुसलमान
In reply to मी वाट पाहतोय कधी भारताचा by Ram ram
http://www.thehindu.com/news
ए गुर्जी, दक्षिणेकडे डोक्यावर
In reply to http://www.thehindu.com/news by श्रीगुरुजी
http://www.loksatta.com
दुटप्पी कुबेर
In reply to http://www.loksatta.com by श्रीगुरुजी
+१
In reply to दुटप्पी कुबेर by अप्पा जोगळेकर
अगदी अगदी! हेच लिहिणार होतो..
In reply to +१ by फेदरवेट साहेब
+१. अंजन कसले? जिथे कुठे मोदी
In reply to +१ by फेदरवेट साहेब
हा हा हा हा..
In reply to http://www.loksatta.com by श्रीगुरुजी
गुरुजी अडचणीचे प्रश्न सतत
सहमत
In reply to गुरुजी अडचणीचे प्रश्न सतत by संदीप डांगे
सहमत
In reply to गुरुजी अडचणीचे प्रश्न सतत by संदीप डांगे
कृपया एक प्रतिसाद उडवून
In reply to सहमत by फेदरवेट साहेब
गुरुजी उत्तरे टाळत आहेत हे
In reply to गुरुजी अडचणीचे प्रश्न सतत by संदीप डांगे
सहसा उत्तरे नसल्यावर(च)
In reply to गुरुजी उत्तरे टाळत आहेत हे by अप्पा जोगळेकर
उगाच चर्चेला नसलेला रंग देऊ
In reply to गुरुजी उत्तरे टाळत आहेत हे by अप्पा जोगळेकर
हा धागा माझ्यावर नाही. हा
In reply to गुरुजी अडचणीचे प्रश्न सतत by संदीप डांगे
पेटाच्या जल्लिकटूच्या
शेतकरी बैलाला आसुडाचा फटका
In reply to पेटाच्या जल्लिकटूच्या by संदीप डांगे
एखाद्यावर अत्याचार होताहेत हे
In reply to शेतकरी बैलाला आसुडाचा फटका by विशुमित
बैलांवर अत्याचार होतात हे
In reply to पेटाच्या जल्लिकटूच्या by संदीप डांगे
पुन्हा सोईस्कर अप्रोच
In reply to बैलांवर अत्याचार होतात हे by श्रीगुरुजी
लोकहो,
एक पाकिस्तानी आहे हसन निसार
स्वार्थासाठी शहाबानो प्रकरणात
काय सांगता राव ....!
In reply to स्वार्थासाठी शहाबानो प्रकरणात by अस्वस्थामा
जल्लिकट्टू ला परवानगी
=)) =)) =)) लै भारी... बीफ
In reply to जल्लिकट्टू ला परवानगी by गणामास्तर
जालीकट्टूबद्दल अधिक वाचताना
संदर्भ....???
In reply to जालीकट्टूबद्दल अधिक वाचताना by पुंबा
http://www.livemint.com
In reply to संदर्भ....??? by संदीप डांगे
रोमन साम्राज्यातील
अज्जीबात साम्य वाटत नाही.
In reply to रोमन साम्राज्यातील by पुंबा
रोमन साम्राज्यातील
In reply to रोमन साम्राज्यातील by पुंबा
तुम्ही बैल आणि मनुष्य समान
In reply to रोमन साम्राज्यातील by श्रीगुरुजी
वेदनेची जाणीव, यातनेची जाणीव
In reply to तुम्ही बैल आणि मनुष्य समान by गणामास्तर
टैमप्लीज
काल मद्रासमध्ये राडा झाला
In reply to टैमप्लीज by पैसा
समाज जसा सुसंस्कृत होत जातो
'Jallikattu can't be played
'Jallikattu can't be played without torturing bulls'
The Supreme Court passed an interim order stating that certain steps must be taken for the event. The apex court ordered that bulls must not be beaten, there should be more space on both side of the game arena, before and after the event bulls must get adequate rest, there should be no beating or biting of bulls, no alcohol or drugs must be given to them, etc. These were the key measures that were introduced by the Supreme Court in 2009 under the TNRJA. When bulls come for a Jallikattu event, they are put in queues. They are made to stand for long hours. There is no water for them, and that is cruelty. When a bull reaches the Vaadivaasal (the entrance to the arena), he sees some 20,000 people shouting and dancing, which is very scary for him. Now, a bull, which is just two years old, does not want to go into the arena. He will do everything possible not to go in front of the crowd. This is where the cruelty starts. The bull does not want to go in front of the crowd and then they have to put chillies on his private parts to make him enter the game arena. I have photographed this and this is mentioned in the Supreme Court judgment too. They also make the bull drink alcohol and attack him with a sickle so that he feels that it is worse to stay in the Vadivassal and better to go in front of the crowd. Jallikattu cannot be played without torturing bulls. There are two reasons for it. The first reason is that the bull is scared. He is in a catch-22 situation. He wonders whether to sit quietly in the Vaadivaasal or go into the crowd. He would prefer to stay in the Vaadivaasal instead of facing 20,000 people. He doesn't want to come out. To force him to move out, something more painful and torturous needs to be done, to make the bull uncomfortable in the Vaadivaasal. That is the crux of the cruelty. In the Vaadivaasal, the bull is constantly tortured and therefore it runs into the game arena. This arena is a limited space. Everyone here jumps on the bull to take away the prize from the horns of the bull. These 20,000 people have not come to see the game, but to participate in it. That is the second problem. In such a situation, a bull can fall into the village well or get injured because someone takes out their knife and injures the bull.महाराष्ट्र सरकारने बैलगाडी
श्रीगुरूजी, जालिकट्टू आणि
In reply to महाराष्ट्र सरकारने बैलगाडी by श्रीगुरुजी
>> शिवाय, बैलगाडा शर्यत ही
In reply to श्रीगुरूजी, जालिकट्टू आणि by पुंबा
सरकारचा माझ्यासाठी चांगला
In reply to >> शिवाय, बैलगाडा शर्यत ही by सतिश गावडे
धोकादायक
In reply to >> शिवाय, बैलगाडा शर्यत ही by सतिश गावडे
बैलगाडी शर्यतीत बैलांची शेपूट
In reply to श्रीगुरूजी, जालिकट्टू आणि by पुंबा
जालिकट्टू ही मानसाच्या
In reply to श्रीगुरूजी, जालिकट्टू आणि by पुंबा
कर्जमाफीच्या मागणीची धार कमी
In reply to महाराष्ट्र सरकारने बैलगाडी by श्रीगुरुजी
आमच्या गुरुजींचे
बैलगाड्याच्या शर्यती
सात्विक संताप
कोणी सांगितलं बैलांचा छळ होतो?
थँक्यू हो
जर बैलगाडी शर्यतीत बैलांचा छळ
https://www.youtube.com/watch
In reply to जर बैलगाडी शर्यतीत बैलांचा छळ by श्रीगुरुजी