काय वेडेपणा चाललाय! सर्वोच्च न्यायालयाने बंदी घातलेली जालिकट्टू नावाची क्रूर प्रथा पुन्हा एकदा सुरू करावी यासाठी तामिळींचा जीव चाललाय. काही ठिकाणी बंदी झुगारून जालिकट्टू आयोजित करण्याचे प्रयत्न झाले. पण पोलिसांनी ते हाणून पाडले. तामिळनाडूचे मुख्यमंत्री ओ पनीरसेल्वम् यांनी तर केंद्र सरकारने सर्वोच्च न्यायालयाचा निर्णय झुगारून जालिकट्टू पुन्हा सुरू करण्याचा अध्यादेश काढावा अशी विनंती करण्यासाठी थेट दिल्ली गाठून पंतप्रधान मोदींची भेट घेतली. सर्वात वाईट भाग म्हणजे संगीतकार रहमान, माजी जागतिक बुद्धीबळ विश्वविजेता विश्वनाथन् आनंद याने सुद्धा जालिकट्टू पुन्हा सुरु करण्यासाठी पाठिंबा दिलाय. ही आमची अत्यंत जुनी परंपरा आहे, आम्ही ती चालू ठेवणारच, आमच्या परंपरेवर बंदी घालण्याचा अधिकार सर्वोच्च न्यायालयाला कोणी दिला अश्या आविर्भावात निदर्शने सुरू आहेत. जालिकट्टू तामिळींच्या जीवनमरणाचा प्रश्न झाला आहे.
जुनी परंपरा, प्रथा इ. गोष्टी खर्या असल्या तरी असल्या प्रथेत मुक्या प्राण्याचा छळ होतोय त्याचं काय? ते बैल काय स्वतः यातना सहन करून तुमची करमणू़क करण्याकरता या जगात आलेत का? एका वाहिनीवर दाखवित होते. एका बैलाभोवती सातआठ लुंगीधारी उभे होते. त्यातला एकजण बैलाची शेपटी ओढून जोरात पिरगाळत होता. दुसरा एकजण शेपटी दाताखाली धरून चावत होता. अरे कशासाठी त्या बैलाला यातना देता? परंपरा आणि प्रथा म्हणून? ही कसली क्रूर परंपरा? मुक्या प्राण्याला यातना देऊन कसली आलीय करमणू़क आणि प्रथा? अंगात एवढी मस्ती असेल तर एकमेकांशी फ्रीस्टाईल कुस्त्या खेळा की. प्राण्यांचा छळ का करता?
स्वतःच्या जिव्हालौल्यासाठी व करमणुकीसाठी मुक्या प्राण्यांना यातना देऊन त्यांचा छळ करण्याची प्रथा व परंपरा खूप जुनी आहे व जगात अनेक देशात ती अजून जिवंत आहे. स्पेनमध्ये बुलफाईट प्रकारात एका बैलाला गल्लीबोळातून पळविले जाते. अनेक जण बैलाच्या मागे पळून त्याला जखमी करायचा प्रयत्न करीत असतात. बैल पळताना बाजूला उभे असलेले बघ्ये बैलाला छोटे बाणाच्या आकाराचे लोखंडी भाले फेकून मारतात. अंगात ठिकठिकाणी भाले घुसलेला तो बैल शेवटी बुलफाईटच्या मैदानात येतो. तिथे तलवारी घेऊन तीनचार जण त्याला तलवारीने जखमी करतात. शेवटी मुख्य मॅटॅडोर येतो व जीवाच्या भीतिने आकांताने धावून थकलेल्या, तलवारीच्या वारांमुळे व अंगात घुसलेल्या भाल्यांच्या जखमांच्या यातनांनी कळवळणार्या बैलाचे मस्तक तो तलवारीच्या एका घावात घडावेगळे करतो. जमलेले हजारो प्रेक्षक या मुक्या प्राण्याच्या यातनामय कत्तलीचा आनंद लुटत असतात. मुक्या प्राण्याला इतक्या यातना देताना आनंद कसा मिळू शकतो? वेदनांनी कळवणार्या बैलाच्या वेदनांनी करमणूक कशी होऊ शकते?
भारत देखील या घॄणास्पद प्रकारापासून दूर नाही. शेतीसाठी बैल वापरण्याआधी मोठ्या दांडक्याने बैलाचे वृषण चेचून भुगा करून टाकतात जेणेकरून तो गायीबरोबर आपले नैसर्गिक कृत्य करू शकणार नाही. माणूस त्याची नैसर्गिक उर्मीसुद्धा स्वतःच्या स्वार्थासाठी नष्ट करतो व तीसुद्धा अत्यंत वेदनादायक पद्धतीने. उर्मिला पवार यांच्या 'आयदान' पुस्तकात बैलाच्या खच्चीकरणाचे वर्णन दिले आहे. दांडक्याने वृषण चेचले जात असताना बैलाला किती यातना होत असतील. माणूस त्याला एवढ्या यातना का देतो? बैलाचे वृषण खच्ची करण्याचे काम करणार्या नराधमाचे वृषणही असेच चेचून काढले पाहिजेत म्हणजे त्याला त्या यातना कशा असतील ते कळेल. बैलगाडीला जोडण्यासाठी बैलांच्या तळपायात खिळे ठोकून नाल बसवितात. नाल बसविण्यासाठी आधी बैलाला खाली बसवून आडवे पाडतात व त्याचे चारही पाय बांधून मग खिळे ठोकून नाल बसवितात. नाल बसविताना बैलाच्या डोळ्यातून वेदनांनी पाणी वाहत असते. कशासाठी हा क्रूरपणा? मला कधी कधी वाटते की बैलांच्या तळतळाटामुळेच कदाचित शेतकर्यांची हलाखीची परिस्थिती असावी. आपल्याला यातना देणार्याला बैलांचे शिव्याशाप भोवत असतील.
काही दिवसांपूर्वी कोल्हापूरमध्ये झालेली'पारंपारिक' मेंढ्यांची टक्कर दाखवित होते. जमलेले प्रेक्षक दोन मेंढ्यांच्या आपापसातील टकरीचा आनंद लुटत होते. दोन्ही मेंढे आपल्या पूर्ण ताकदीनिशी दुसर्याच्या कपाळावर जोरदार धडक मारत होते. दोघांनाही वेदना होत असणारच. कदाचित कपाळाची हाडेही मोडत असतील. आणि असल्या क्रूर प्रकाराचा प्रेक्षक आनंद लुटत होते.
काही ठिकाणी कोंबड्यांची झुंज सुद्द्धा लावतात. या झुंजीत कोंबड्याच्या एका पायाला ब्लेडचा अर्धा तुकडा बांधलेला असतो जेणेकरून समोरच्या कोंबड्याचे रक्त निघेल. दोन्ही कोंबडे मूर्खासारखे एकमेकांशी लढाई करून जखमी होतात व माणसे आपली करमणूक करून घेतात.
बैलगाडी शर्यत हा असाच एक क्रूर प्रकार. सुदैवाने सर्वोच्च न्यायालयाने या प्रकाराला सुद्धा बंदी घातली आहे. तरीसुद्धा बैलगाडी शर्यत पुन्हा सुरू करावी यासाठी महाराष्ट्रात जोरदार प्रयत्न सुरू आहेत. या शर्यतीतही बैलांना जोरात पळविण्यासाठी शेपटी पिरगाळणे, खिळा लावलेल्या चाबकाचे फटकारे लावणे असे क्रूर प्रकार केले जातात आणि वेदना होत असताना भीतिने बैल जोरात गाडी पळवितात कारण आपली उच्च प्रथा आणि परंपरा!
नवसासाठी व धार्मिक परंपरेसाठी कोंबड्या, बकर्या कापणे हा प्राण्यांना यातना देण्याचाच एक प्रकार. हे बळी थांबावेत म्हणून संत गाडगेबाबांनी प्रबोधन करण्याचा खूप प्रयत्न केला. परंतु अजूनही हा प्रकार सुरूच आहे. मांग जातीत एखाद्याचे लग्न ठरताना किंवा त्याआधी काही वर्षे लग्नासाठी नवर्यामुलाच्या नावाने एक डुक्कर सोडले जाते. ऐन लग्नाच्या वेळी हे डुक्कर पकडून त्याला जिवंत जाळून त्याचे मांस खाल्ले जाते. जिवंत जळताना त्या डुकराला किती भयानक वेदना होत असतील. प्रथा व परंपरा या नावाखाली हे क्रूर प्रकार कायमच सुरू राहणार का?
जिव्हालौल्यासाठी जिवंत प्राणी क्रूर पद्धतीने मारणे हे जगभर सर्वत्र केले जाते. कासव, शिंपले, बेडूक, खेकडे इ. प्राण्यांना जिवंतपणीच उकळत्या पाण्यात टाकणे, बदक/हंस इ. प्राण्यांची आत असलेली मान बाहेर काढण्यासाठी त्याच्या तोंडासमोर खाणे धरणे व खाणे खाण्यासाठी त्याने मान सरळ केल्यावर मानेवर घाव घालून त्यांना मारणे अशा क्रूर पद्धतीने हे प्राणी जिभेचे चोचले पुरविण्यासाठी मारले जातात. अरे प्राणी मारायचा असेल तर निदान त्या प्राण्याला भूल देऊन वीजेचा शॉक देऊन वेदनारहीत मरण तरी द्या. हालहाल कशाला करता?
मुक्या प्राण्यांना प्रथा व परंपरेच्या नावाखाली आपल्या करमणुकीसाठी व जिव्हालौल्यासाठी वेदना, यातना देऊन त्यांचा छळ करणे व नंतर मारून टाकणे हे अत्यंत क्रूरकर्म आहे व या प्रकाराचा मला अतिशय संताप येतो. हे सर्व प्रकार तातडीने कायमस्वरूपी बंद व्हायला हवेत. सुदैवाने सर्वोच्च न्यायालय याविषयी सक्रीय असून या प्रकाराला कायद्याने बंदी घालण्यात येत आहे ही समाधानाची गोष्ट आहे.
वाचने
74908
प्रतिक्रिया
282
मिसळपाव
प्रतिक्रिया
Chukicha Samaj.
In reply to गुर्जींचा आय्डी हॅक झाला by अप्पा जोगळेकर
पुनरुत्पादन- प्रसुती ही प्रक्ऱुती आहे
In reply to गुरुजी...तुमचा by चिनार
खरंय हो , नाथ गेले वैकुंठी
In reply to पुनरुत्पादन- प्रसुती ही प्रक्ऱुती आहे by nanaba
या खेपेला गुर्जींचा स्टान्स
गुरुजी तुम्ही दूध/दुग्धजन्य
ते सोया मिल्क पीत असतील.
In reply to गुरुजी तुम्ही दूध/दुग्धजन्य by अनुप ढेरे
श्री गुरुजी
येस मागं आपुन सकाळ ऍग्रो वन
In reply to श्री गुरुजी by Ranapratap
क्रूरपणाची उदाहरणे खूप
कौतुक
त्येनला हारत असलेल्या डिबेट
जालिकट्टू
अध्यादेश
सर्वोच्च न्यायालयात निर्णय
In reply to अध्यादेश by गॅरी ट्रुमन
मुळात जल्लीकट्टू किंवा बैल
संस्कृतीच्या नावाखाली मुक्या
In reply to मुळात जल्लीकट्टू किंवा बैल by अमितदादा
या प्रकारात थोडीफार क्रूरता
In reply to संस्कृतीच्या नावाखाली मुक्या by श्रीगुरुजी
बोकड कापणे
In reply to या प्रकारात थोडीफार क्रूरता by अमितदादा
हहपुवा
In reply to बोकड कापणे by गॅरी ट्रुमन
अहो ह्या गोष्टी प्रत्येक
In reply to या प्रकारात थोडीफार क्रूरता by अमितदादा
असो शेवटी हे तुमच मत आहे,
In reply to अहो ह्या गोष्टी प्रत्येक by श्रीगुरुजी
बैलांच्या शर्यतीवरील बंदी
In reply to असो शेवटी हे तुमच मत आहे, by अमितदादा
अहो गुरुजी मी हि उपहासच केला
In reply to बैलांच्या शर्यतीवरील बंदी by श्रीगुरुजी
असो. आपण दोघेही आपापल्या
In reply to अहो गुरुजी मी हि उपहासच केला by अमितदादा
जल्लीकट्टूला विरोध =
मी इथे हिंदूविरोधी
In reply to जल्लीकट्टूला विरोध = by नितिन थत्ते
श्रीगुरुजी,भाजप काँग्रेस
धन्यवाद टफि!
In reply to श्रीगुरुजी,भाजप काँग्रेस by टर्बोचार्जड फिलॉसॉफर
पुर्ण वाचा
In reply to धन्यवाद टफि! by श्रीगुरुजी
धन्यवाद!
In reply to पुर्ण वाचा by टर्बोचार्जड फिलॉसॉफर
मांसाहाराची लागलेली चटक कशी
In reply to श्रीगुरुजी,भाजप काँग्रेस by टर्बोचार्जड फिलॉसॉफर
हह
In reply to मांसाहाराची लागलेली चटक कशी by संजय पाटिल
बैंलांचे खच्चीकरण हे नक्की
मदनबाण.....
आजची स्वाक्षरी :- माशा अल्लाह माशा अल्लाह :- Asmara { اسمرا - ماشالله } { वरिजिनल ;) }याची कारणमीमांसा केली गेली आहे का?
१. जल्लीकट्टू बंद करण्यामागे
In reply to याची कारणमीमांसा केली गेली आहे का? by स्थितप्रज्ञ
सहमत
In reply to १. जल्लीकट्टू बंद करण्यामागे by श्रीगुरुजी
उत्तम प्रतिसाद
In reply to १. जल्लीकट्टू बंद करण्यामागे by श्रीगुरुजी
काही वर्षांपूर्वी चीनमधील
व्हॅनमध्ये एक चिंकी आपल्या
याचा जरा संदर्भ देता का?
In reply to व्हॅनमध्ये एक चिंकी आपल्या by संदीप डांगे
चिनी लोक:http://www
In reply to याचा जरा संदर्भ देता का? by श्रीगुरुजी
पहिल्या लिंकनुसार -
In reply to चिनी लोक:http://www by संदीप डांगे
चिंकी हा शब्द इशान्य
In reply to पहिल्या लिंकनुसार - by श्रीगुरुजी
इथल्या लोकांचे इलॉजिकल
गुरूजी तुम्हाला मॅच्युरिटी
मांसाहार आणि जल्लीकट्टू
जालिकट्टू सुरू करण्याच्या
मुळात कोणत्याही अध्यादेशाला
In reply to जालिकट्टू सुरू करण्याच्या by श्रीगुरुजी
उद्या जालिकट्टू सुरू
In reply to मुळात कोणत्याही अध्यादेशाला by अमितदादा
अहो सर्वोच न्यायालय सुद्धा या
In reply to उद्या जालिकट्टू सुरू by श्रीगुरुजी
जल्लीकाट्टूबद्दल विरोधी मतं
पटतोय हा लेख!
In reply to जल्लीकाट्टूबद्दल विरोधी मतं by बोका-ए-आझम
जालिकट्टूवर बंदी घालण्यामागे
In reply to जल्लीकाट्टूबद्दल विरोधी मतं by बोका-ए-आझम
तथाकथित हिंदुत्ववाद्यांचे कसे
व्हॉटसअप वर आलेले एक फॉरवर्ड इथे चिकटवत आहे.
व्हॉटसअप वर आलेले एक फॉरवर्ड इथे चिकटवत आहे.
फॉरवर्ड इथे
पेटा चे सभासद होण्याआधी
'पेटा' हा मूळ लेखाचा विषय
In reply to पेटा चे सभासद होण्याआधी by संदीप डांगे
जालीकट्टूवर बंदी केवळ बैलांवर
आज जालिकट्टूमुळे फक्त २
In reply to जालीकट्टूवर बंदी केवळ बैलांवर by पुंबा
अहो तुम्हीच वरती त्या
In reply to आज जालिकट्टूमुळे फक्त २ by श्रीगुरुजी
गुरुजी, जलिकट्टू मिनिटभर
In reply to आज जालिकट्टूमुळे फक्त २ by श्रीगुरुजी
हेल्मेटचा इथे काहीच संबंध
In reply to गुरुजी, जलिकट्टू मिनिटभर by अस्वस्थामा
बरेवाईट समजण्याइतकी बुद्धी
In reply to हेल्मेटचा इथे काहीच संबंध by श्रीगुरुजी
बैलांवर अत्याचार करून व
In reply to बरेवाईट समजण्याइतकी बुद्धी by हतोळकरांचा प्रसाद
तो संदर्भ तुमच्या वरील
In reply to बैलांवर अत्याचार करून व by श्रीगुरुजी
तो संदर्भ तुमच्या वरील
In reply to बैलांवर अत्याचार करून व by श्रीगुरुजी
स्वतःचं बरंवाईट ठरवण्याची
In reply to तो संदर्भ तुमच्या वरील by हतोळकरांचा प्रसाद
(इथे फक्त सहभागी माणसांबद्दल
In reply to हेल्मेटचा इथे काहीच संबंध by श्रीगुरुजी