Skip to main content

क्रेडिट कार्ड वापरणं खरंच फायदेशीर आहे का?

लेखक ट्रेड मार्क यांनी गुरुवार, 19/01/2017 06:39 या दिवशी प्रकाशित केले.
भारतात आणि मिपावरही नोटबंदीच्या निमित्ताने कॅशलेस होण्यावर बराच गदारोळ झाला आहे. हा धागा त्या गदारोळात भाग घेण्यासाठी नसून कॅशलेस पर्यायांपैकी एक पर्याय म्हणजे क्रेडिट कार्ड वापरणे खरंच फायद्याचे आहे का नाही हे स्वानुभवातून व उदाहरणासहित सांगण्याचा प्रयत्न आहे. सगळ्यात आधी हे सांगणे महत्वाचे आहे की हे अनुभव अमेरिकेतील आहेत. येथे आता बहुतेक सर्व दुकानांमध्ये क्रेडिट कार्ड्स वापरली जातात. किंबहुना एखाद्या ठिकाणी रोख दिले तर "बऱ्याच दिवसात एवढी रोख रक्कम बघितली नाही" असे बिलिंग काउंटरवरील व्यक्ती गमतीने म्हणते. तर खूप वर्षे भारतात नोकरी केल्यावर आमच्या कंपनीने एकदाचे आम्हाला अमेरिकावारी घडवून आणण्याचे ठरवले. नियमाप्रमाणे सुरुवातीच्या खर्चासाठी $३००० हे ऍडव्हान्स म्हणून देतात, त्यातील $२८०० हे HDFC च्या प्री लोडेड डेबिट कार्डवर तर $२०० रोख अश्या स्वरूपात मिळतात. मला $२०० हे $१०० च्या २ नोटा अश्या स्वरूपात मिळाले. तेव्हा अमेरिकेची काहीच माहिती नसल्याने एवढा विचार केला नाही आणि $१०० च्या २ नोटा आणि बरोबर स्वतः घेतलेले थोडे डॉलर्स घेऊन न्यू यॉर्क मध्ये पाऊल ठेवले. जवळचे सुट्टे डॉलर्स तर लगेच संपून गेले आणि $१०० च्या २ नोटा व डेबिट कार्ड वरचे $२८०० उरले. बहुतेक सर्व दुकानांमध्ये $२० च्या वरील नोटा स्वीकारल्या जाणार नाहीत असे बोर्ड्स लावलेले असतात. आता आली का पंचाईत, पक्का भारतीय असल्याने कॅशने खर्च करण्याची सवय आड येत होती आणि वर HDFC डेबिट कार्ड असल्याने काही ठिकाणी स्वीकारले जायचे तर काही ठिकाणी प्रॉब्लेम यायचे. दुकानदारांना HDFC म्हणजे काय हे माहित नसल्याने त्यांचीही काही मदत होऊ शकत नव्हती. शेवटी बँक ऑफ अमेरिकेत खाते उघडताना त्यात सुरुवातीची रक्कम म्हणून भरून सुटका करून घेतली. मग BOA च्या डेबिट कार्डवरून ATM मधून $२० च्या नोटा मिळू लागल्या. तर, अमेरिकन बँकेचे डेबिट कार्ड मिळवून एक अडथळा पार झाला. पण माझे मित्र म्हणत होते की क्रेडिट कार्ड काढणे महत्वाचे आहे कारण त्यातून क्रेडिट हिस्टरी तयार होते व ते पुढे बरेच फायदेशीर पडते. हे काही माझ्या डोक्यात शिरत नव्हते की एक तर क्रेडिट हिस्टरी का बनवायची आणि त्यासाठी क्रेडिट कार्ड कशाला पाहिजे? मी माझी सगळी बिलं, म्हणजे विजेचं; पाण्याचं; फोनचं बिल, व्यवस्थित भरलं की झालं. पण तसं नाही, क्रेडिट कार्ड हे एक प्रकारचं कर्ज आहे आणि तुमची पत तयार करायची असेल तर हे कर्ज घेऊन ते सलग वेळच्या वेळी फेडले पाहिजे. तरी पण विचार होता की क्रेडिट कार्ड कशाला पाहिजे, उगाच कर्ज काढून नसतं लचांड मागे लावून घ्यायचं. पण मग एकदा गाडी भाड्याने घेताना लक्षात आलं की क्रेडिट कार्ड गरजेचे आहे. डेबिट कार्डवर मिळत नाहीच असं नाही पण कमी रेंटल कंपन्या डेबिट कार्ड स्वीकारतात. मग आता क्रेडिट कार्ड मिळवणे आले. पण ते एवढे सोपे नाही. बँक ऑफ अमेरीकेने क्रेडिट कार्ड द्यायचे नाकारले म्हणून मग इथे सिक्युअर्ड क्रेडिट कार्ड म्हणून मिळते ते घ्यायचे ठरवले. हे थोडक्यात असे असते की तुम्ही बँकेत एक ठराविक रक्कम म्हणजे उदा. $१००० ठेवायची आणि त्याबदल्यात बँक तुम्हाला $१००० चे क्रेडिट कार्ड देणार, वर $४० वार्षिक फी पण घेणार. मी $१००० दिले व कार्डसाठी अर्ज दिला. पण इथेही नशीब असं की तो अर्ज पण रिजेक्ट झाला. इथे माझ्या नंतर आलेल्यांना महिन्याभरात क्रेडिट कार्ड्स मिळत होती आणि तब्बल १ वर्ष अकाउंट असूनही मला मात्र मिळत नव्हते. अखेरीस दीड वर्षांनी एकदाचे बँक ऑफ अमेरिकेने कृपा केली आणि मला एक क्रेडिट कार्ड दिले. मग त्याचे बिल मी अगदी नित्यनेमाने भरले. होताहोता क्रेडिट स्कोअर वाढू लागला. मग हळू हळू कार्डच्या ऑफर यायला लागल्या. त्यात पहिली मिळालेली म्हणजे तुम्ही त्या कार्डवर, तुमच्या लिमिटच्या आत, कितीही खर्च करा पण जर का बिल वेळेवर भरलं तर प्रत्येक तिमाहीला $२५ कार्डवर क्रेडिट देणार. मग काय घेऊन टाकलं. थोड्या दिवसांनी अजून एका कार्डावर काहीतरी ऑफर मिळाली असं करता करता कार्ड्स जमा होऊ लागली. पण मग त्यांचे बिल वेळेवर भरणे ही एक डोकेदुखी होऊ लागली. जर का एक जरी दिवस उशीर झाला तरी भरभक्कम लेट फी आणि व्याज भरायला लागणार. पण मग ऑटो पे नावाची एक सुविधा कामी आली. मग कार्ड्स वरच्या जमा झालेल्या पॉइंट्सने एखादी वस्तू घेता यायला लागली. उदाहरणार्थ एक कार्डच्या पॉईंट्स वरून मला एकही पैसे न देता $८० चे ब्लूटूथ हेडसेट्स घेता आले. पण हे किरकोळ ठरेल असे दोन फायदे अजून दोन कार्डने मिळाले. एका कार्डची ऑफर आली की कार्ड मिळाल्यावर पहिल्या ३ महिन्यात $३००० खर्च केले तर ५०००० पॉईंट्स मिळणार. या कार्डची वार्षिक फी $९५ होती जी पाहिलं वर्ष माफ असणार. म्हणून घेतलं कार्ड, पण $३००० खर्च करायचे? मग एक आयडिया काढली. तसंही घराचं भाडं भरायला लागतंच ते कार्ड वर भरूया. पण जर कम्युनिटीच्या (सोसायटी) च्या वेबसाईट वरून $३५ फी लागत होती. मग अजून शोध घेतला तर rent.कॉम नावाच्या एका साईटवर $२० चार्जेस होते. पण म्हणजे $६० खर्च करायचे? अजून एक आयडिया काढली की ३ महिन्याचं भाडं एकदम भरायचं मग त्याला पण $२० चार्जेस पडणार. पण मग $३००० ची एकदम सोय करायची? तर नाही, जर का नीट बघितलं तर पहिल्या महिन्याच्या शेवटी भाडं भरायला लागलं आणि ते भरायला जवळपास ५० दिवसाचा अवधी मिळाला. म्हणजे उलट मला $१००० ते $२००० वापरायला मिळाले. आता या ५०००० पॉईंट्स चा काय फायदा होऊ शकतो? ५०००० पॉईंट्स म्हणजे ५०० डॉलर्स, एक मार्ग म्हणजे हे पॉईंट्स वापरून तुम्ही ऑनलाईन खरेदी करू शकता. पण मी दुसरा मार्ग निवडला. हे पॉईंट्स युनाइटेड एरलाईन्सला ट्रान्सफर करायची सुविधा होती. आणि ४२५०० पॉईंट्स वापरून पुणे ते अमेरिका वन वे तिकिट काढता येते, ज्याची तशी किंमत जवळपास ९००-१००० डॉलर्स असते. मला माझ्या वडिलांचे एका बाजूचे तिकीट या पॉईंट्सवर निघाले. पण आता परतीची पण सोय बघणे आवश्यक होते. पण ते वर्षभर थांबणार असल्याने वेळ होता. या कार्डला एक वर्ष पूर्ण होताच ते बंद करून टाकलं आणि अजून एक ऑफर घेतली ज्यात पहिल्या ३ महिन्यात $२००० खर्च केले की ४०००० पॉईंट्स आणि एक कार्ड वापरणारी व्यक्ती ऍड केली की १०००० पॉईंट्स असे ५०००० पॉईंट्स मिळणार होते. माझ्या कॅनडा ट्रीपचं बुकिंग मी या २००० डॉलर मध्ये केलं आणि टार्गेट पूर्ण केलं. त्यामुळे वडिलांचं परतीचं तिकीटसुद्धा ४२५०० पॉईंट्स च्या बदल्यात अमेरिका ते पुणे मिळालं. म्हणजे माझे जवळपास १५००-१७०० डॉलर्स वाचले. पुढे दुसऱ्या एका कार्डवर एक ऑफर आली की ३ महिन्यात २००० डॉलर्स खर्च करायचे, यामध्ये तुम्ही तुमच्या पसंतीचा फोन सगळे पैसे देऊन घेऊ शकता. आणि मग त्यातले ६५० डॉलर्स तुम्हाला परत मिळणार. म्हणजे मला ८०० डॉलर्सचा फोन फक्य २५० डॉलर्स ला पडला (बाकीचे खर्च मिळून). तर मंडळी, क्रेडिट कार्ड वापरणं खरंच फायदेशीर आहे का? मी म्हणीन जर तुम्ही कार्डचं बिल वेळच्यावेळी पूर्णपणे भरू शकत असाल तर नक्कीच फायदेशीर आहे. पण मग ट्रान्झॅक्शन चार्जेसचं काय? अमेरिकेत तरी बहुतेक कुठल्याही दुकानात, पेट्रोल पंपावर चार्जेस लागत नाहीत. अर्थात अमेरिकेतली काही भारतीय दुकानं अपवाद आहेत, ज्यात $१० च्या आतल्या बिलासाठी क्रेडिट कार्ड वापरलं तर ५० पैसे जादा द्यावे लागतात. पण त्याव्यतिरिक्त मला कुठे चार्जेस लागले नाहीत. उलट एक विशिष्ट सोय असलेलं कार्ड असेल तर दुसऱ्या देशात केलेल्या ट्रान्झॅक्शनवर पण Foreign Transaction चार्जेस लागत नाहीत. अजून सांगायचे फायदे म्हणजे काही कार्ड्स अशी सुविधा देतात की रेंटल कार घेताना जर का ते कार्ड वापरलं तर इन्शुरन्स वेगळा घ्यायला लागत नाही. जर तुमच्याकडे स्वतःची गाडी आणि त्याचा इन्शुरन्स असेल तर तो रेंटल कारला पण वापरता येतो. पण जर नसेल तर मात्र रेंटल कंपनीकडून इन्शुरन्स घ्यायला लागतो तो जवळपास गाडीच्या भाड्याएवढा असतो. तसेच कार्ड वापरून खरेदी केलेल्या वस्तूंना आपोआप जास्तीची वॉरंटी किंवा इन्शुरन्स आपोआप मिळतो. उदा. मी जर रेबॅनचा गॉगल एक कार्ड वापरून घेतला. पण ३ महिन्यांनी तो फुटला किंवा चोरीला गेला तर जरी रेबॅनने मला पैसे किंवा नवीन गॉगल द्यायला नकार दिला (माझा गहाळपणा हे कारण सांगून) तर मला कार्ड कंपनीकडून परतावा मिळतो. एखादी मोठी खरेदी, म्हणजे समजा आमची ४ जणांची भारतवारीची तिकिटं मी कार्ड वापरून काढली तर जवळपास ४-५ हजार डॉलर्स खर्च येतो. अश्या वेळेला मला बॅलन्स ट्रान्सफरची सुविधा वापरता येते आणि त्याला भरायला बिनव्याजी १२-१८ महिन्यांचा कालावधी मिळतो. इथे स्टोअर कार्ड वापरून तुम्हाला त्या स्टोअरमधील खरेदीवर सूट मिळते. तसेच जमा झालेले पॉईंट्स पुढील खरेदीवर जास्तीची सूट मिळवून देतात. अमेरिकेतसुद्धा कार्ड्स वापरणे किंवा रोखीशिवाय व्यवहार करणे ही संकल्पना रुजवताना त्रास झाला असेलच. उलट आता इथे नवीन आलेल्याला जर कार्ड लगेच मिळालं नाही तर त्रास होतो. तसेच तुम्ही केलेल्या काही उद्योगांमुळे क्रेडिट हिस्टरीवर परिणाम झाला असेल तरी कार्ड्स मिळत नाहीत व त्रास होतो. हे सगळे माझे स्वतःचे अनुभव आहेत इतरांना वेगळे अनुभव येऊ शकतात. या धाग्याचा उद्देश फक्त कार्ड्स वापरून फायदा कसा करून घेता येईल हे सांगण्याचा आहे. ज्यांना घेता येईल त्यांनी फायदा करून घ्यावा अथवा ....

वाचने 86867
प्रतिक्रिया 290

प्रतिक्रिया

In reply to by कैवल्यसिंह

डेबिट कार्ड हे तुमच्या एका बँक खात्याशी (सेविंग वा करंट) लिंक असते. खात्यात असलेल्या शिलकेप्रमाणे तुम्ही खर्च करु शकता. तुम्ही खर्च केलेली रक्कम जेव्हा तुमच्या अकाऊंटमधून तात्काळ कमी होते आणि व्यापार्‍याच्या अकाउंटला जमा होते (प्रत्यक्ष त्याच्या अकाउंटला जमा होण्यात काही अवधी लागतो पण तो भाग वेगळा), यात सगळ्यात महत्वाचं म्हणजे तुम्हाला आज जितका खर्च करायचा आहे किमान तितकी रक्कम तुमच्या खात्यात असणं आवश्यक आहे क्रेडीट कार्डंच तस नसतं. तुमचं एक क्रेडीट अकाउंट असतं , तुमची जी पत आहे त्याप्रमाणे क्रेडीट लिमिट निश्चित होते. त्या लिमिटपर्यंत तुम्ही महिनाभरात खर्च करु शकता, यावेळी तुमच्या बॅक खात्यात शुन्य रक्कम अस्ली तरी त्याने काही फरक पडत नाही. पुढच्या महिन्यात क्रेडिट कार्डचे बिल आले की तुम्ही ते भरायचं. हे म्हणजे घराजवळच्या वाण्याकडे उधारीचं खातं असण्यासारखं आहे, तुमची पत पाहून तुम्हाला किती रकमेपर्यंत उधार देता येईल याचा विचार वाण्याने केलेला असतो त्या मर्यादेपर्यंत खरेदी करत रहा आणि पुढच्या महिन्याला पैसे द्या.. मग पुन्हा उधारि करा...

In reply to by मराठी कथालेखक

धन्यवाद.. पन मग यापैकी फायदेशीर काय ठरते? कोणते कार्ड वापरायला चांगले आहे व कमी त्रासदायक ठरनाऱ्या आहेत?

In reply to by कैवल्यसिंह

माझ्या दूसर्‍या प्रतिसादात मी डेबिट कार्डच्या तुलनेने क्रेडिट कार्डचा फायदा लिहिला आहे. तो वाचा काही शंका असल्यास व्यनी करा कारण पुन्हा कधी धाग्यावर येईनच याची खात्री नाही. डेबिट कार्डाचा मोठा फायदा हा की ते सहज मिळते, त्यासाठी उत्पन्नाची अट नसते. तुमच्या बॅक अकाउंटला ठराविक मिनिमम बॅलन्स असायला हवा (अगदी चेकबूकसारखे समजा ना.. फक्त डेबिटकार्डचे पेमेंट हा तात्काळ क्लिअर होणारा चेक आहे असं म्हणू शकता). त्यातही राष्ट्रीयकृत बँकेत वा सहकारी बँकेतही ही रक्कम (मिनिमम बॅलन्स) खूप लहान असते (शक्यतो १००० रुपये). बहूतेक सर्वच बँका डेबिट कार्डासाठी वार्षिक शुल्क आकारतात. (बहूधा रु १०० + सर्विस टॅक्स इतके असते.. पण कुणाचे वेगळेही असू शकते). पण ATM कार्ड आणि डेबिट कार्ड आता बहूतांशी एकच असते म्हणून तुम्ही शुल्क टाळावे म्हणून डेबिट कार्ड घ्यायचे नाकारले तर ATM ची सूविधा पण मिळणार नाही. आणि काउंटरवरुन पैसे काढावे लागतील. शिवाय खर्चाला लागतात म्हणून तुम्ही बर्‍यापैकी रक्कम काढून ठेवली तर तुम्हाला त्या रकमेवर सेविंग मध्ये मिळणारे व्याजपण मिळणार नाही. समजा तुम्ही वर्षात प्रत्येक दिवशी तुमच्याकडे सरासरी रु ५००० इतकी कमी रक्कम जरी रोख हवी अशा प्रकारे रक्कम काढत राहिलात तरी ५००० वर सेविंगच्या दराने एका वर्षात मिळणारे (४% दसदशे) व्याज म्हणजेच २०० रु व्याजाला तुम्ही मुकणार. शिवाय बँकेच्या शाखेतून पैसे काढण्यासाठी वेळ घालवणे, बँकेपर्यंत जाण्याकरिता येणारा खर्च हा वेगळा.

मी फक्त अमेरिकेतच क्रेडिट कार्ड वापरले आहे. अमेरिकेत क्रेडिट कार्ड वापरण्यासाठीचे इन्फ्रास्ट्र्क्चर पूर्णपणे तयार झालेले आहे आणि इथे आयडेंटिटीची चोरी हा धोका सोडल्यास क्रेडिट कार्ड वापरणे हे अत्यंत सोयिस्कर आहे. पण अमेरिकेचा अनुभव हा भारतात क्रेडिट कार्ड वापरण्याबाबत शून्य मार्गदर्शन करतो. अमेरिकेते क्रेडिट कार्डचा वापर हा सरकारी धोरणातून नागरिकांवर लादला गेलेला नाही. ग्राहक आणि विक्रेता दोघांचा फायदा होत असल्याने (म्हणजे त्यांना क्रेडिट कार्ड वापरल्याने पैसे मिळतात म्हणून नाही तर कॅश वापरण्याच्या गैरसोयीमूळे नॉन-मॉनेटरी ट्रान्सॅक्शन कॉस्ट कमी होत असल्याने) क्रेडिट कार्डचा वापर सार्वत्रिक झाला. त्यासाठीचे इन्फ्रास्ट्रक्चरही हळूहळू विकसीत झाले. (जेथे अत्यंत गरीब लोक राहतात (कृष्णवर्णीय, मेक्सिकन) अशा भागांमध्ये अजुनही कॅशच मोठ्या प्रमाणात वापरली जाते.) भारतात ग्राहक आणि विक्रेता दोघांनाही रोख व्यवहार केल्याने (कर बुडवून) फायदा होतो म्हणून सोय असूनही क्रेडिट कार्ड वापरले जात नाही. तर भारत सरकारने पहिल्यांदा करप्रणाली आणि तिचे अंमलबजावणी यात सुधारणा केली पाहीजे. पण अशा सुधारणा हळुहळू होतात. लोकांना चटकण दिसत नाहीत. म्हणून नोटाबंदीसारखे (वाचाळ) मध्यमवर्गियांना कमी त्रासाचे कार्यक्रम शून्य गृहपाठ करून राबवले जातात.

In reply to by अनरँडम

मी तुलना कुठेच केली नाहीये कारण ती होऊ शकत नाही. अमेरिकेत १००% कार्ड्स वापरतात असा सुद्धा माझा दावा नाही. लेखाचा उद्देश फक्त क्रेडिट कार्ड्स वापरून माझा कसा फायदा झाला हे सांगण्याचा आणि ज्यांना शक्य असेल आणि इच्छा असेल त्यांना पण करून घेता यावा एवढाच आहे. भारतात क्रेडिट कार्ड कसं वापरावं हे मी अजिबात सांगत नाहीये कारण सध्याचा तिथला अनुभव मला नाही. भारतात हे होऊ शकतं आणि व्हावं असं मात्र मला मनापासून वाटतं. नोटबंदीवर इतरत्र बरीच चर्चा/ वादावादी झाली आहे त्यामुळे परत इथे चर्चा करण्याचा अजिबात हेतू नाही. मध्यमवर्गीयांना वाचाळ म्हणण्याचा उद्देश मात्र मला समजला नाही.

In reply to by ट्रेड मार्क

आणि तुम्ही केली असे माझ्या प्रतिसादात ध्वनितही होत नाही. मध्यमवर्गिय आंजावर चर्चा करतात, फेसबुकवर चर्चा करतात म्हणून वाचाळ म्हटले. तुम्हाला पटत नसल्यास सोडून द्या. वाचाळ म्हणजे वाईट असे काही नाही.

In reply to by ट्रेड मार्क

'लेख रँडमली वाचला का?' हे विधान माझ्या सदस्यनामाला उद्देश्यून (विषयाला सोडून) आहे आणि त्यामुळे सकारात्मक चर्चेस बाधक आहे.

In reply to by अनरँडम

हे विधान माझ्या सदस्यनामाला उद्देश्यून (विषयाला सोडून) आहे आणि त्यामुळे सकारात्मक चर्चेस बाधक आहे. मान्य आणि क्षमस्व पण एकूण तुमचा प्रतिसाद सकारात्मक वाटला नाही. एक तर प्रतिसादाचे हेडिंग "संत्रे सफरचंद तुलना" हेच म्हणताय की मी तुलना केली पण चुकीची केली. पुढे "पण अमेरिकेचा अनुभव हा भारतात क्रेडिट कार्ड वापरण्याबाबत शून्य मार्गदर्शन करतो." हे पण विषयाला सोडूनच आहे कारण लेखाचा उद्देश हा नाहीये. बाकी वाचाळ असण्याबाबत - मी हे लिहिलेलं सगळं स्वतः केलंय आणि मग सांगितलंय. बाकी कोणी वाचाळ आहेत आणि का आहेत हे तुम्ही का सांगताय ते कळलं नाही. असो. पण सकारात्मक चर्चा करायची असेल तर नक्कीच करूया पण कृपया ती विषयाला धरून असावी.

In reply to by ट्रेड मार्क

तुम्ही तुलना केलेली नाही. तुमच्या लेखाचा उद्देश्य तुम्ही प्रथमच स्पष्ट केला आहे. त्या उद्देश्याला पूरक असेच माझे मत आहे की अमेरिकेत क्रेडिट कार्ड वापरणे हे निश्चितच (व्यक्तिगत अनुभव आणि अमेरिकन अर्थव्यवस्थेसाठीही) फायदेशीर आहे (आयडेंटिटी चोरीचा मुद्दा सोडल्यास). पण कोणी (तुम्ही नाही) या फायद्याचे भारतीय अर्थव्यवस्थेसंदर्भात (ढोबळपणे कारण काही लोकांना क्रेडिट कार्ड वापरणे भारतातही फायदेशीर ठरू शकेल.) सामान्यीकरण केल्यास ती तुलना चुकीची ठरेल. तुम्ही तुमच्या लेखाच्या शेवटी पूर्ण अर्थव्यवस्थेसंदर्भात काही विधान केले आहे ("अमेरिकेतसुद्धा कार्ड्स वापरणे किंवा रोखीशिवाय व्यवहार करणे ही संकल्पना रुजवताना त्रास झाला असेलच.") त्यासंदर्भात माझा प्रतिसाद पाहील्यास तो विषयाशी संबंधित कदाचित वाटू शकेल.

माहितीपूर्ण आणि मनोरंजक लेख. तुमच्या वडिलांना वर्षभर अमेरिकेत रहाता आले, ते कोणत्या व्हिसावर ? व्हिजिटर्स व्हिसावर एका वेळी सहा महिनेच रहाता येते ना? आम्ही दर वर्षी भारतातून अमेरिकेत येतो, आणि सहा महिन्यांच्या आत परततो, म्हणून विचारत आहे. तुमचे स्वतःचे/वडिलांचे ग्रीन कार्ड झालेले आहे किंवा कसे ?

In reply to by चित्रगुप्त

लेखाचा उद्देश माहिती देण्याचा आहे आणि कोणाला करता आला तर उपयोग करता येईल हा फायदा आहेच. फारसं काही न करता एका व्यक्तीचं विमानाचं तिकीट फुकट मिळणं म्हणजे मोठी गोष्ट आहे. माझे वडील टुरिस्ट विसावरच आले होते. पण ६ महिने पूर्ण व्हायच्या आधी अजून ६ महिने वास्तव्य वाढवण्यासाठी अर्ज करता येतो. याची फी साधारणतः $३५० प्रतिव्यक्ती असते. पण अडचणीच्या वेळेला असा अर्ज करून मुक्काम वाढवता येतो. जाण्यायेणाचा त्रास आणि विमानाची तिकिटं यापेक्षा कमी पैसे लागतात. पण हे एकसारखं करू नये आणि सलग एका वर्षापेक्षा जास्त टुरिस्ट विसावर राहू नये असं म्हणतात. पुढच्यावेळेला येताना इमिग्रेशन ऑफिसर अडवू शकतो.

In reply to by ट्रेड मार्क

एक शंका. अमेरिकेन आयकराच्या अधिकारात येऊ नये यासाठी (काही विशिष्ट कारणे सोडता) अमेरिकेत एका वर्षात १८० दिवसांपेक्षा कमी वास्तव्य असणे आवश्यक आहे असे वाचले होते. हे फार महत्वाचे आहे, कारण अमेरिकेत आयकर ठरवताना करदात्याचे सर्व जगातले (ग्लोबल) उत्पन्न (सर्व जगातले उत्पन्न, मग त्या उत्पन्नाचा अमेरिकेशी काही संबंध असो वा नसो, किंवा अमेरिकेतले उत्पन्न शून्य असले तरी) करपात्र धरले जाते. मात्र हे १८० दिवस सद्य वर्षातले नसून त्यांचे मोजमाप खालीलप्रमाणे होते : १८० = सद्य वर्षातील वास्तव्याचे दिवस + (गेल्या वर्षातील वास्तव्याचे दिवस / ३) + (गेल्या वर्षांच्या अगोदरच्या वर्षातील वास्तव्याचे दिवस / ६) या नियमांने, अमेरिकेन आयकराच्या अधिकारात अडकायचे नसल्यास, भेटीची पहिली २-४ वर्षे सोडली तर, इतर प्रत्येक वर्षात १२० दिवसांपेक्षा (अंदाजे ४ महिने) अमेरिकेत वास्तव्य शक्य होत नाही असा समज होता. या पार्श्वभूमीवर, अमेरिकेत करपात्र न होता, तेथे ६ महिने (वास्तव्याचे पहिले वर्ष सोडून) किंवा १२ महिने (कोणत्याही वर्षात) वास्तव्य कसे शक्य होते हे जरा समजावून सांगू शकाल का ? माहितीसाठी आगावू धन्यवाद !

In reply to by डॉ सुहास म्हात्रे

डॉक्टरसाहेब, तुम्ही म्हणताय ते बरोबर आहे पण ते वर्क व्हिसावर येणाऱ्यांसाठी. आयकराच्या कक्षेत टुरिस्ट येत नाहीत. सरकारच्या दृष्टीने टुरिस्टने येथे काम करणे नियमाविरुद्ध आहे. जर का त्या प्रवाश्याचे त्याच्या मूळ देशात उत्पन्न असेल तर त्याने तिथे आयकर भरणे आवश्यक असते. त्यामुळे तो अमेरीकेत आयकराच्या कचाट्यात सापडत नाही. मुळात आयकर भरण्यासाठी SSN/ ITIN असणे आवश्यक आहे, तो असेल तर आयकर खाते तुमच्यावर नजर ठेवू शकते. टुरिस्ट व्हिसावर SSN मिळत नाही, ITIN बहुतेक मिळेल पण तो तुम्हाला मेन टॅक्सपेयर ठरवत नाही. माझ्यामते टुरिस्ट व्हिसावर येणाऱ्यांना प्रत्येक वर्षात ६ महिने कुठल्याही अडचणीशिवाय राहता येते. मी माझ्या वडिलांच्या वेळेला CPA (CA) ला विचारलं होतं आणि त्यांनी मला वडिलांचा ITIN काढून माझ्या टॅक्स रिटर्न मध्ये एक dependent म्हणून दाखवता येईल असं सांगितलं. त्यादृष्टीने बघता माझे वडील इथे Dependent म्हणून येतात. त्यांचा व्हिसा काढताना मी त्यांचा येण्याजाण्याचा, राहण्याचा आणि इतर जे काही खर्च लागतील ते मी करणार आहे असं शपथपत्र देतो. त्यामुळे ते इथे राहिले त्याचा खर्च मला माझ्या आयकरात दाखवता येतो. पण त्यात सुद्धा एक अट आहे. जर का हा खर्च दाखवायचा असेल तर तुम्हाला त्या व्यक्तीचे आरोग्यविम्याचे डिटेल्स देणे बंधनकारक आहे. जर आरोग्यविमा नसेल तर त्यासाठी पेनल्टी भरायला लागते.

क्रेडिट कार्ड चांगले आहे. मी hdfc आणि icici अशी 2(फुकट) कार्डे वापरते परवाच hdfc चे पॉईंट्स redeem करून 4000 रु जमा करून घेतले आणखी एकदा मुंबई ते frankfurt विमानाचे तिकीट घेतले Payback चे पण बरेच पॉईंट जमले आहेत याशिवाय पण कार्डचे फायदे असतात जसे की icici कार्ड ने महिन्यातल्या एका मंगळवारी bigbasket वर 400 रु(किंवा25%) डिस्काउंट मिळतो बऱ्याच रेस्टॉरंट मध्ये, दुकानात, वेबसाइट्स वर डिस्काउंट असतो.

मी पण HDFC regalia क्रेडिट कार्ड वापरते. शक्यतो परदेशाची तिकिटं काढायला माझा या कार्डाचा वापर होतो. त्यामुळे बरेच points जमतात. त्या कार्डाबरोबर मिळणारा विमानतळावरचा लाउंज अॅक्सेस अनेक देशात मिळतो. ते फिचर फार उपयोगी पडते. आत्ता जुनमध्ये ट्रॅव्हल कंपनीने झुरिक एअरपोर्टवर एक सफरचंद आणि एक ज्युस पॅक देऊन आणुन टाकलं फ्लाइटच्या चार तास आधी. त्यात माझं आणि नवर्याचे वेगळे फ्लाइट होते. पण थँक्स टु क्रेडिटकार्ड लाउंज फॅसिलिटी ,मला व्यवस्थित स्विस पाहुणचार मिळाला! वेळही मस्त गेला. क्रेकाचे आॅनलाइन शाॅपिंग कुपन आणि इतर फायदे मी अजुन फारसे वापरलेले नाहीत.

क्रेडिट कार्डचा (डेबिट कार्डच्या तुलनेने) अप्रत्यक्ष फायदा हा की महिन्याचा खर्च विचारात घेवून तुम्हाला सेंविग अकाउंट मध्ये पैसे ठेवण्याची गरज नाहि. माझा पगार महिन्याच्या शेवटच्या कामाच्या दिवशी होतो, मग त्यातली काही रक्कम खात्यात ठेवून (ही रक्कम : थोडी कॅश काढता यावी , पण यातली बरीचशी केवळ अधून मधून मार्केट खाली जाईल तसे काही शेअर्स /mutual funds व units खरेदी करता यावेत व ठरलेल्या दिवशी mutual fund व्हावी SIP यासाठी असते ) बरीचशी रक्कम liquid fund मध्ये गुंतवतो. (शक्यतो tata floater fund , दुसरा एखादा चांगला सुचवल्यास आभारी असेन). दहा तारखेला माझा गृहकर्जाचा हप्ता जायचा असतो. त्या आधी दोन तीन दिवस जर शेअर मार्केट वर असेल असेल तर काही शेअर्स विकून टाकतो (profit booking) ..हे असे शेअर्स असतात ज्यात मला खूप दीर्घकाळ गुंतवणूक्क करायची नसते, किंवा काही mutual funds मधून गुंतवणूक कमी करायची असे ठरवलेले असेल आणि त्यांचा NAV थोडा वधारला असेल तर काही units विकून टाकतो. आणि यातलं काही शक्य नसेल तर liquid funds काही units विकून गृहकर्जाच्या हप्त्याची सोय करतो. दहा तारखेलाच माझ्या पहिल्या क्रेडिट कार्डचे स्टेटमेंट येते (Tata SBI) माझा जास्तीत जास्त खर्च याच कार्डावरुन असतो त्यामुळे बिलाचा आकडा मोठा असतो. पुर्वी मी स्टेटमेंट आले की लगेच एक-दोन दिवसात पैसे भरुन टाकायचो (डोक्याला टेन्शन नको ही भावना). पण पैसे भरण्याची मुदत ३० तारखेपर्यंत असते तेव्हा आता मी २५-२६ तारखेला पैसे भरतो. त्यावेळीही वरील प्रमाणेच शेअर्स, म्युच्युअल फंड वा लिक्विड फंड मधून पैसे काढतो. सेविंग मध्ये ४% दसादशे व्याज मिळते पण लिक्विड फंड मधला परतावा साधारण वार्षिक सुमारे ८.५% च्या आसपास असतो. सोयीसाठी ८% धरला तरी ८-४=४ % चा फायदा मिळतो. कल्पना करा की क्रेडीट कार्ड असल्यामुळे तुम्ही वर्षभरात सरासरी १०,००० रु सेविंग अकाउंट मध्ये न ठेवता लिक्विड फंड मध्ये ठेवलेत तरी तुम्ही सरळ ४०० रुचा नफा कमावला आहे.

In reply to by मराठी कथालेखक

पैसे मिळवण्याचा हा पण एक मार्ग आहे. याला बरंच प्लॅनिंग आणि सतत निरीक्षण आवश्यक आहे. तुम्ही नेटाने हे करताय याचे खरंच कौतुक आहे. एकेकाळी मी सुद्धा शेअर मार्केटमध्ये सक्रिय होतो. नुसते शेअर्सच नाही तर derivatives, commodity, forex (फार नाही) यात पण सहभाग होता. पण आता फारसा उत्साह राहिला नाही. जे शेअर्स आहेत ते आहेत व derivatives, commodity तर पूर्णपणे बंद झालंय.

ट्रेडमार्क भाऊ.. कारच्या आणि मोबाईलच्या तुलनेसाठी जश्या वेबसाईट्स आहेत तश्या क्रेडिट कार्डासाठी आहेत का? असल्यास कळवावे..

In reply to by चिनार

अमेरिकेतल्या कार्ड्ससाठी https://www.creditkarma.com/credit-cards/search-cc : इथे तुम्हाला रजिस्टर करून तुमचा क्रेडिट स्कोअर (जो फारसा अचूक नसतो) कळतो आणि त्याप्रमाणे तुम्हाला कुठली कार्ड्स मिळतील आणि त्याचे फायदे सांगितले जातात. http://www.creditcards.com/ http://www.comparecards.com/ भारतातल्या कार्ड्ससाठी https://www.bankbazaar.com/credit-card.html http://www.paisabazaar.com/credit-card/

इकडे बरेच जण अमेरिका निवासी असल्यामुळे एक बाळबोध प्रश्न विचारतोय. अमेरीकेत दोन किंवा जास्त मोबाईल नंबर वापरणारे लोक्स आढळतात काय ? भारतात तरी दोन नंबर वापरणे काळाची गरज बनली आहे असे वाटतेय.

In reply to by धर्मराजमुटके

इथे २-२ मोबाईल वापरणारे फार बघितले नाहीत. अगदीच स्वतःचा एक आहेच पण ऑफिसने अजून एक दिलाच तर. पण त्यातही भारतीय लोक्स जास्त आहेत. सहसा अमेरिकन्स २ मोबाईल वापरताना मी बघितले नाहीत. एवढंच काय इथे ड्युअल सिमचे फोनसुद्धा सहज मिळत नाहीत. तसंही फोन सर्व्हिस बरीच महाग आहे, त्यामुळे स्वतःहून २ फोन आणि नंबर्स वापरणारे कमीच असतात.

अमेरिकेत एखादं कार्ड जर काही फायद्यांसाठी घेतलं आणि वर्षभर वापरून बंद केल तर क्रेडिट स्कोअर वर याचा वाईट परिणाम होतो का.मी सध्या BOA च कार्ड काही फायद्यांसाठी घ्यायचा विचार करत आहे. तसच एका पेक्षा अनेक कार्ड असण्याचा सुद्धा परिणाम स्कोअर वर होतो का? (गृहीत धरलंय कि मी सगळ्या कार्ड्स च पेमेंट वेळेत करत आहे)

In reply to by सही रे सई

क्रेडिट रिपोर्टमध्ये तुमच्या नावावर किती एन्क्वायरीज आहेत आणि तुमच्या सर्वात जुन्या अकाऊंटचे वय किती हे दोन मुद्दे असतात. समजा तुम्ही वर्षभर एखादे कार्ड वापरलेत तर सुरवातीला तुमच्या नावावर एक एन्क्वायरी येईल आणि भविष्यात नवे क्रेडिट कार्ड हवे असेल तर दुसरी एन्क्वायरी येईल. त्यातून सर्वात जुने कार्ड बंद केलेत तर दिसताना सर्वात जुन्या अकाऊंटचे वय कमी दिसेल. म्हणजे समजा दोन कार्डे असतील---एक १० वर्षे जुने आणि दुसरे ४ वर्षे जुने. त्यातील १० वर्षे जुने कार्ड बंद केले तर सर्वात जुन्या कार्डाचे वय ४ वर्षे दिसेल आणि त्यामुळे क्रेडिट स्कोअर कमी होईल.

In reply to by सही रे सई

ट्रुमन यांनी सांगितल्याप्रमाणे सर्वात पहिले कार्ड बंद केले तर स्कोअरवर परिणाम होतो कारण क्रेडिट हिस्टरीचा कालावधी कमी दिसतो. पण नंतर घेतलेले कार्ड बंद केले तर स्कोअरवर परिणाम होणार नाही. स्कोअरवर परिणाम करणाऱ्या प्रमुख गोष्टी खालीलप्रमाणे १. क्रेडिट हिस्टरीचा कालावधी किंवा वय - सगळ्यात जुन्या क्रेडिट कार्डचे वय २ वर्षांपेक्षा कमी असेल तर स्कोअर वर परिणाम होतो. २. किती टक्के वेळा सगळ्या कार्डचे बिल वेळेत आणि पूर्ण भरले - म्हणजे वेळेवर तुम्ही स्टेटमेंट बॅलन्स भरला तर स्कोअरमध्ये वाढ होते. पण जर का तुम्ही मिनिमम बॅलन्स भरत असाल तर ते रिवोलविंग क्रेडिट मध्ये धरले जाते, ज्यामुळे स्कोअर कमी होतो. थोडक्यात घेतलेले कर्ज (कार्डवर) वेळेत पूर्ण भरायची तुमची कपॅसिटी नाही असा अर्थ धरला जातो. ३. एकूण कार्ड लिमिटच्या किती टक्के खर्च करता - उदाहरणार्थ जर का एखाद्याच्या सगळ्या कार्ड्सच्या लिमिटची टोटल $५०००० आहे. जर का खूप चांगला क्रेडिट स्कोअर ठेवायचा असेल तर कुठल्याही महिन्यात त्याने या लिमिटच्या १०% वर म्हणजे $५००० च्या वर खर्च करू नये. जसा जसा हा खर्च वाढत जातो तसा तसा स्कोअरवर परिणाम होतो. जर का $१०००० खर्च करून तो वेळेत पूर्ण भरत असेल तर फारसा परिणाम होणार नाही. पण मग एवढे उत्पन्न कुठून येते याचा शोध घेतला जाईल. ४. सतत नवीन कार्ड्स घेत राहिलं तर - जर कोणी एकसारखं क्रेडिट कार्ड साठी अर्ज करत असेल तर त्या व्यक्तीला पैश्यांची गरज आहे असे समजले जाते. जेव्हा अर्ज केला जातो तेव्हा ती कार्ड कंपनी क्रेडिट रेटिंग एजेन्सीकडे चौकशी करते याला हार्ड inquiry म्हणतात, ज्याने स्कोअर कमी होतो. ५. एखादं बिल भरलं नाही तर - फक्त क्रेडिट कार्ड्सचेच नव्हे तर बाकी कुठलेही बिल जर भरले नाही तर ३ रिमाइंडर नंतर ते कलेक्शनला जाते व हे लगेच क्रेडिट रिपोर्टवर दिसते. याचा खूप मोठा परिणाम रेटिंगवर होतो तसेच नवीन कर्ज मिळायला त्रास होतो आणि जे मिळते ते बऱ्याच जास्त टक्के व्याजाने मिळते. या बिलांमध्ये युटिलिटी बिल्स, मेडिकल बिल्स, क्रेडिट कार्डची बिले तसेच कर्जाचे हप्ते यांचा समावेश होतो. पण क्रेडिट कार्ड्स बंदच करु नयेत असे नाही. काही वेळेला दुसरं एखादं कर्ज (कार, घर) घेण्यासाठी तुम्हाला एखादं कार्ड बंद करायला लागू शकतं. एखाद्याला जास्तीत जास्त कर्ज किती मिळू शकतं हे त्याच्या उत्पन्नावर आधारित आहे. वरील उदा. मध्ये जर का त्या व्यक्तीची कमाल कर्ज मिळण्याची क्षमता $६०००० आहे त्यातले त्याने $५०००० क्रेडिट कार्डच्या स्वरूपात आधीच घेतलेले आहेत. समजा त्याला $२०००० वाहन कर्ज घ्यायचे असेल तर त्याला $१०००० चे कार्ड्स बंद करायला लागू शकतात.

In reply to by ट्रेड मार्क

धन्यवाद. खुप चांगली महिती दिलीत. याचा नक्कीच उपयोग होईल. माझ्या नवऱ्याच DCU च कार्ड आहे आणि त्याच्या मते मी पण तेच घ्याव. तर DCU च्या कार्ड बद्दल काही माहिती मिळेल का.

DCU चे क्रेडिट कार्ड ठीकठाक आहे. तुम्ही DCU कडून कार लोन घेतलं आणि त्यासाठी तिथे चेकिंग अकाउंट उघडलं असावं असा माझा अंदाज आहे. माझ्या मते जास्त फायदे देणारी बरीच कार्ड्स आहेत. ज्या बँकेत तुमचं चेकिंग अकाउंट आहे त्या बँकेचं एक कार्ड असावं आणि ते कायम ठेवावं (म्हणजे बंद करू नये). बाकी चांगल्या ऑफर्स देणारी कार्ड्स म्हणजे - BOA: Cash Rewards व better balance rewards - दोन्हीला वार्षिक फी नसते Chase: Freedom (वार्षिक फी नाही) व Saffire - $९५ वार्षिक फी पण पहिले वर्ष माफ, $३००० पहिल्या ३ महिन्यात खर्च केला तर ५०००० पॉईंट्स मिळतात. बाकी पण बरेच फायदे आहेत. United Mileage Plus - $९५ वार्षिक फी पण पहिले वर्ष माफ, $३००० पहिल्या ३ महिन्यात खर्च केला तर ५०००० पॉईंट्स मिळतात. बाकी पण बरेच फायदे आहेत जसे की United च्या flights ला preference, No Foreign Transaction Fee ई. ई. Citi Thank you Rewards - वार्षिक फी नाही Discover - वार्षिक फी नाही तुमच्या क्रेडिट स्कोअर प्रमाणे तुम्हाला कुठली कार्ड्स मिळू शकतात आणि त्यांची तुलना creditkarma वर मिळते.

In reply to by ट्रेड मार्क

चेस आणि United Mileage Plus हे दोन कार्ड्स खूप छान आहेत पण त्यांची वार्षिक वर्गणी अंमळ जास्त वाटते. जे लोक सतत प्रवास करतात त्यांच्या साठी हे दोन्ही कार्ड्स फार उपयुक्त आहेत. ह्या दोन शिवाय कॅपिटल वन व्हेंचर पण खूप उपयुक्त आहे. वार्षिक फी $५९ (पहिल्या वर्षी फी नाही), प्रत्येक डॉलर मागे २ माइल्स मिळतात. आता माइल्सचा हिशोब हा १०० माइल्स म्हणजे १ डॉलर असा आहे. म्हणजे एक माईल = १ सेंट पहिल्या तीन महिन्यात मिळून $३००० जर बिल झाले तर ४०००० माइल्स मिळतात जे कि $४०० आहेत. हे माइल्स हॉटेल बुकिंग, विमानाचे तिकीट, आणि कार रेंटलसाठी वापरता येतात. कॅपिटल वनचे अजून एक क्विकसिल्व्हर कार्ड (नो फी) पण आहे. ह्या दोन कार्ड्स च्या तुलनेसाठी हा दुवा पहा.

ज्यांना कोणाला क्रेडिट किंवा डेबिट कार्ड नको असतील त्यांनी आपापली कार्डे मला पाठवा बघू! =)) (पिनसकट)

In reply to by पैसा

पैसाताई, माझ्या प्रतिसादात मी अमेरिकन एक्सप्रेसचे कार्ड वापरतो असे म्हटले होते. ते कार्ड इथे देत आहे. ते पाहिजे तेव्हा आणि पाहिजे तसे वापरा. वेळ मिळेल त्याप्रमाणे एच.डी.एफ.सी चे कार्डही देतोच. card

In reply to by गॅरी ट्रुमन

=)) ठँक्यु! तेवढं CVV आणि पिन सांग की! =)) =))

In reply to by गॅरी ट्रुमन

कार्ड इम्मॉर्टल आहे वाट्टं???? ;) अमेक्स कार्डाचा CVV चार आकडी असतो "छोट्याश्या" तृटीकडे दुर्लक्ष करण्यात आले आहे!! ;)

उदा. द्यायचं झालं तर मी पण नोकरी करत असूनही मनाला येईल तेव्हा सुट्टी घेऊ शकतो, फिरायला जाऊ शकतो. प्रश्न सुट्टी घेता येण्याचा नाही, काम न करण्याचा विकल्प कायम उपलब्ध आहे का ? असा आहे. सकाळी उठल्यावर जर अनिवार्यपणे कामाचे वेध लागत असतील तर जीवन स्वच्छंद होत नाही. कर्ज घेतलेली व्यक्ती काम न करण्याचा विकल्प डेली रुटीनमधे आणू शकत नाही. रीतसर रजा घेऊन ( शक्यतो बॉसच्या मर्जीनं) ती लिमीटेड स्वातंत्र्य घेऊ शकते. त्यामुळे कर्ज घेतलं, इएमआयचं शुक्लकाष्ठ मागे लागलं म्हणजे आयुष्याची वाट लागली असं काही नाहीये. काम न करण्याचा विकल्प हाच स्वच्छंद आहे. इएमआयच्या दडपणामुळे तो हरवतो. बाकी पैसा हा भाग सोडून जबाबदारी हा एक मोठा फॅक्टर आहे. स्वच्छंदी व्यक्ती जवाबदारी सहज पेलू शकते. कर्ज घेतलेली व्यक्ती हरवलेल्या स्वच्छंदाला जवाबदारीचं लेबल लाऊन मनाची समजूत काढते. कारण छंद म्हणा वा सवय, आपण सर्व मिपावर वेळ घालवतो, ज्यातून पैसे मिळत नाहीत. इथे केलेला टिपी हा संपूर्ण दिवसाच्या पाच टक्के पण नसेल त्याची तुलना स्वच्छंदाशी होऊ शकत नाही. स्वच्छंद हे दिवसभरासाठी आणि सदैव उपलब्ध असलेलं स्वातंत्र्य आहे.

In reply to by संजय क्षीरसागर

काम न करण्याचा विकल्प कायम उपलब्ध आहे का ? म्हणजे तुम्ही १२ ही महिने एकही दिवस काम न करण्याबद्दल बोलताय का? तर माझ्याकडे तेवढे पैसे नाहीयेत. कारण मधेच १ दिवस ते काही दिवस सुट्टी घेण्याचा विकल्प मलाही उपलब्ध आहे आणि बहुतांशी लोकांना असतो. माझा छंद म्हणजे माझ्या कुटुंबाला घेऊन विविध ठिकाणांना भेटी देणे, वेगवेगळे Cuisines खाणे आणि मित्रांबरोबर पार्टी करणे. हे सर्व मी मनाला येईल तेव्हा करतो. काम न करण्याचा विकल्प हाच स्वच्छंद आहे. इएमआयच्या दडपणामुळे तो हरवतो. माझे पण इएमआय चालू आहेत. पण ते चालू आहेत म्हणून मी माझ्या जीवनाचा आनंद घेण्याचं सोडलं नाहीये. काम न करणे म्हणजे आयुष्यात अजिबात कामधंदा न करणे म्हणताय का? बाकी इएमआय आहे म्हणून मला काम करणं बंद करता येणार नाही असं वाटत असेल तर मी ते घर कधीही विकून कर्ज फेडू शकतो. माझ्या मते हे सगळं तुमची पार्श्वभूमी काय आहे त्यावर अवलंबून आहे. आधी सांगितल्याप्रमाणे २००१ साली मला १८ लाख एकरकमी भरणे शक्य नव्हते आणि आता १.२५ कोटी भरणे पण शक्य नाही. कर्ज घेतलेली व्यक्ती हरवलेल्या स्वच्छंदाला जवाबदारीचं लेबल लाऊन मनाची समजूत काढते. असं सरसकट तुम्ही म्हणू शकत नाही. प्रत्येकाचं आयुष्य, त्यांचे प्रॉब्लेम्स; प्रेफरन्सेस, त्यांचा आवडीनिवडी हे वेगळं असतं. आता एखाद्याचा काम करणं हा छंद असू शकतो. जबाबदारी फक्त इएमआय फेडायचाय ही नसून एक मुलगा, पती व पिता या नात्यांमुळे येणाऱ्या कर्तव्यांमुळे पण आहे. याचबरोबर हाती घेतलेले कार्य व्यवस्थित पूर्णत्वास नेणे हे पण जबाबदारीत मोडते. मी तुम्हाला माझ्या आधीच्या प्रतिसादात म्हणलं त्याप्रमाणे तुमच्याशी क्लायंट महत्वाच्या विषयावर बोलत असताना मूड नाही म्हणून तुम्ही उठून जाऊ शकत नाही. ऍडव्हान्स टॅक्सेस assess करायच्या व भरायच्या आणि टॅक्स रिटर्न्स फाईल करायच्या वेळेत तुम्ही ४ महिने तुमचं ऑफिस बंद करून बसू शकत नाही. आणि याचा इएमआयशी संबंध येत नाही.

In reply to by ट्रेड मार्क

म्हणजे तुम्ही १२ ही महिने एकही दिवस काम न करण्याबद्दल बोलताय का? नाही. मी रोज सकाळी उठल्यावर असणार्‍या ऑप्शनबद्दल बोलतो आहे. नोकरी करणार्‍याला तो नसतो आणि त्या उप्पर इएमआय असेल तर विषयच संपला ! (खरं तर सगळ्या उहापोहाचा इतकाच साधा मुद्दा आहे) बाकी इएमआय आहे म्हणून मला काम करणं बंद करता येणार नाही असं वाटत असेल तर मी ते घर कधीही विकून कर्ज फेडू शकतो. हे कधीही कुणी करत नाही. आता एखाद्याचा काम करणं हा छंद असू शकतो ज्याला काम न करण्याचा विकल्प आहे तोच काम स्वच्छंदानं करु शकतो. कोणतंही काम निर्वैयक्तिक आहे. स्वछंद वैयक्तिक आहे आणि तो कामात मजा आणतो.

In reply to by संजय क्षीरसागर

व्यवसायामुळे (आणि खासकरून नॉन-इमर्जन्सी स्वरूपाचा) मिळालेली मोकळीक यामुळे पर्यायाने जोपासायला मिळालेला स्वछंदीपणा आणि ईएमआय यांचा काही संबंध नसावा असं वाटतं! जर स्वछंदी आयुष्य जागण्याचीच मानसिकता असेल तर मग ईएमआय वगैरे गोष्टी त्यात खोडा घालतील असं वाटत नाही. शिवाय स्वछंदी जीवनाची प्रत्येकाची व्याख्या वेगवेगळी असू शकत नाही काय? मला ऑफिसला दांडी मारायला अजिबात आवडत नाही (दुर्दैवाने यामुळे माझ्या बऱ्याच राजा वर्ष अखेरीस वाया जातात). त्यामुळे माझ्या ऑफिसला जाण्याचा आणि स्वछंदी असण्याचा किंवा ईएमआयचा तसा अर्थाअर्थी काही संबंध नसावा. "घर घेणे" हे आयुष्यातलं नोकरी, लग्न, संतती यासारखंच एक स्वप्न किंबहुना टप्पा आहे. ते घेण्याचा सध्याचा एकमेक उपलब्ध मार्ग ईएमआय आहे हे उघड आहे (तुम्ही याव्यतिरिक्त घर रोखीत कसे घेतले किंवा घेण्याचे सुचवत आहात ते काही कळले नाही). आता ईएमआय चं म्हणाल तर कुठलीही बँक पगाराच्या 60% च्या वर ईएमआय असेल असं लोन देत नाही. त्यामुळे दर वर्षीची पगारवाढ गृहीत धरली तर साधारणपणे दोन वर्षं ईएमआयमूळे ओढाताण होते. त्यांनतर हा विषय फक्त २०/२५ वर्षे लोन चालू द्यायचं कि लवकर उरकायचं ह्या मुद्द्याभोवती फिरतो. आणि आजकालतर लोन सेवर अकाउंट्स मूळे तोही मुद्दा फारसा महत्वाचा नाहीये. थोडक्यात आर्थिक नियोजन आणि स्वछंदी जीवन याचा प्रत्यक्ष संबंध फारसा नसावा असे मला वाटते. उलटपक्षी असलाच तर तो प्रत्येकाच्या जीवनाकडे बघण्याच्या दृष्टिकोनावर असावा.

In reply to by संजय क्षीरसागर

मी रोज सकाळी उठल्यावर असणार्‍या ऑप्शनबद्दल बोलतो आहे. नोकरी करणार्‍याला तो नसतो आणि त्या उप्पर इएमआय असेल तर विषयच संपला ! माझा पण एक ईएमआय चालू आहे पण मी याच आठवड्यात एक दिवस मला वाटलं म्हणून काम केलं नाही. वाटलं असतं तर अजून १-२ दिवस सुट्टी घेऊ शकलो असतो. हातात असलेलं आणि ते सुद्धा मी स्वीकारलेलं काम पूर्ण केलं की झालं, मग काही प्रॉब्लेम नाही. हे कधीही कुणी करत नाही. पाहिलं घर सुद्धा २००९ साली कर्ज काढून घेतलं. कुठलाही ताण न घेता आणि इतर खर्चात कपात न करता ते कर्ज ४ वर्षात फेडून टाकलं. मग दुसरा फ्लॅट पण कर्ज काढून घेतला आहे. या दुसऱ्या घराचा ईएमआय चालू आहे. जर मला वाटलं की तो डोईजड होतोय तर ते घर मी विकून कर्ज फेडूनसुद्धा हातात पैसे राहतील.

In reply to by संजय क्षीरसागर

कर्ज घेतलेली व्यक्ती काम न करण्याचा विकल्प डेली रुटीनमधे आणू शकत नाही साफ चूक मी कर्ज घेतलेले असले तरी ते फेडण्यासाठी अतिरिक्त तरतूद केली असली म्हणजे झालं. अशी तरतूद मी केलेली आहे. कारण जर मला मिळणाऱ्या व्याजापेक्षा कर्जाचे कर वजा जात लागणारे व्याज कमी असेल तर पैसे दुसरीकडे गुंतवून त्याच व्याजात इ एम आय भरता येतो. मी घेतलेल्या घरांबाबत काही वर्षात अशी परिस्थिती होती तेंव्हा घरभाड्याचे धनादेश कर्जाचा हप्ता असलेल्या खात्यात भरून मी शांत बसलेला असे. काम न करण्याचा विकल्प हाच स्वच्छंद आहे. इएमआयच्या दडपणामुळे तो हरवतो. हे विधान आपोआपच चूक ठरते. जर मला अगोदर तयार केलेल्या ऍसेटमधून इ एम आय आणि माझ्या दैनंदिन गरजेला पुरेल इतके धन उपलब्ध होत असेल तर स्वच्छंद जोपासण्यात काय अडचण आहे? आजमितीला मी अशी तरतूद करून ठेवलेली आहे आणि हे सर्व मी कर्ज घेऊनच केलेले आहे( एक राहत्या घराचे सोडून सर्व कर्जे फेडून झालेली आहेत) कर्ज घेतलेली व्यक्ती हरवलेल्या स्वच्छंदाला जवाबदारीचं लेबल लाऊन मनाची समजूत काढते. काही लोक आपला छंद हाच आपला व्यवसाय म्हणून जगत असतात. उदा. एखादा चित्रकार जर आपल्या कलेवर भरपूर पैसे मिळवून सुखात जगात असेल तर त्याला इ एम आय ची चिंता नसते. मला आयुष्यात डॉक्टरच व्हायचे होते आणि पुनर्जन्म असेल तर मी परत डॉक्टरच होईन त्यामुळे मला दवाखान्यात जाण्यास आनंदच होतो. आजच माझ्याकडे माझ्या दैनंदिन गरजा आयुष्यभर भागतील इतका पैसा आहे. उद्या माझ्याकडे पैसे अतिरिक्त झाले तर मी फुकट रुग्ण सेवा करेन. मग मी माझ्या दवाखान्यात रोज येतो म्हणजे मी स्वच्छंदी नाही असा अर्थ काढून आपण मोकळे होता हेच आश्चर्य आहे. मी जगतो तेच "खरे आयुष्य" आणि मी करेन तोच व्यवहार बरोबर हा आपला दुराग्रह आहे हेच मी परत म्हणेन.

In reply to by सुबोध खरे

मला आयुष्यात डॉक्टरच व्हायचे होते आणि पुनर्जन्म असेल तर मी परत डॉक्टरच होईन त्यामुळे मला दवाखान्यात जाण्यास आनंदच होतो. आजच माझ्याकडे माझ्या दैनंदिन गरजा आयुष्यभर भागतील इतका पैसा आहे. उद्या माझ्याकडे पैसे अतिरिक्त झाले तर मी फुकट रुग्ण सेवा करेन.
हे अतिशय आवडलं.

In reply to by सुबोध खरे

मी जगतो तेच "खरे आयुष्य" आणि मी करेन तोच व्यवहार बरोबर हा आपला दुराग्रह आहे हेच मी परत म्हणेन. असं माझं म्हणणं नाही आणि प्रश्न तुमच्या आणि माझ्या जगण्याचा नाही. आजच्या किंमतीत फ्लॅट घेऊन सत्तर/ ऐंशी हजार रुपये इएमआय बसला तर आयुष्य स्वच्छंदपणे जगता येईल का? हा मुद्दा आहे. तुम्ही कर्ज काढूनही मोकळीक मिळवली कारण तुमचा दुसरा फ्लॅट बूमपूर्वीच्या किंमतीत मिळाला त्यामुळे हप्ता कमी बसला आणि समहाऊ भाड्याचं गणित जुळून गेलं. हा उघड नशीबाचा भाग आहे . माझ्या वहिनीला याच लाईन्सवर ७,००० रुपये पगार होता आणि ४,००० हप्ता होता तेंव्हा सॉलीड गोची झाली होती. पुढे वेतन आयोगामुळे पगार भरमसाठ वाढला आणि ग्लोबलायझेशनमुळे फ्लॅटची किंमत बेफाम वाढली, परिणामी भाडं हप्त्याच्या तिप्पट झालं. हे नशिब आहे. ते स्वच्छंद जगण्यासाठी केलेलं साहस नाही. मुद्दा इतका उघड आणि साधा आहे > उत्पन्नाच्या ६० / ६५ टक्के भाग जर इएमआय मधे गुंतला असेल तर इएमआय व्यक्तीला लाईनवर ठेवतो .

In reply to by संजय क्षीरसागर

अपवाद हाच नियम समजून बहुसंख्यकांच्या समस्यांकडे पाहणे योग्य नाही असे डॉक्टरसाहेबांना सांगायला जावे तर त्यांना तो आकस वाटतो ब्वॉ! बाकी, संक्षि, तुम्ही जे सांगू पाहताय तेही थोडं कठिण होतंय.. जरा फिलॉसॉफी बाजूला ठेवून प्रॅक्टिकली सांगता येईल काय...?

In reply to by संजय क्षीरसागर

प्रॅक्टिकली विचार करायचं म्हणालं तर हे जरा विचित्र वाटतंय. जरी काही कर्ज वा इएमआय डोक्यावर नसले तरी उद्या उठल्यावर काम न करण्याचा विकल्प या जगात अत्यंत तुरळक लोकांकडे उपलब्ध आहे असे वाटते. म्हणजे ज्या लोकांकडे अमाप पैसे गाठीला आहे तिचं लोकं भविष्याची चिंता सोडून वर्तमानात स्वच्छंदी जगू शकतील असे आपल्या प्रतिसादांतून ध्वनित होऊ शकते.

In reply to by गणामास्तर

म्हणजे ज्या लोकांकडे अमाप पैसे गाठीला आहे तिचं लोकं भविष्याची चिंता सोडून वर्तमानात स्वच्छंदी जगू शकतील असे आपल्या प्रतिसादांतून ध्वनित होऊ शकते.
हो ना. कर्ज घ्यायचे नाही तर घराची किंमत असेल तितकी सगळी (भले आय.टी मुळे किंवा अन्य कोणत्या कारणामुळे ती किंमत अवास्तव वाढलेली असू दे) आपल्याकडे असायला हवी. माझ्यासारखे अनेक लोक असे असतात की आपल्याकडे आहे नाही ते सगळे विकले तरी कसेबसे मुळातले २०% उभे करता येतात. मग उरलेल्या ८०% साठी कर्ज घेण्याशिवाय पर्याय नाही आणि म्हणून ई.एम.आय शिवाय पर्याय नाही. तेव्हा कर्ज घ्यायचे नसेल तर घराचे स्वप्न विसरायचे हा एकच पर्याय. आणि मग "आपल्या नावावर आपले स्वतःचे घर नाही" या बोचर्‍या जाणीवेसह आयुष्यभर जगायचे. अशा बोचर्‍या जाणीवेसह स्वच्छंदीपणे कसे जगता येणार आहे कोणास ठाऊक. आणि भरपूर पैसे गाठीला असतील तर कोणीही स्वच्छंदीपणे जगेल. किंबहुना स्वच्छंदीपणे नाही जगले तरच नवल. हे स्वच्छंदी जगण्यासाठी ई.एम.आय नको वगैरे नुसत्या बोलायच्या गोष्टी आहेत.

In reply to by गॅरी ट्रुमन

हे स्वच्छंदी जगण्यासाठी ई.एम.आय नको वगैरे नुसत्या बोलायच्या गोष्टी आहेत. एखाद्याला काहीच करायचे नसेल तर तो 'स्वच्छंदी जगतो' अशी बिरुदे चिकटवून घेता येतात. कोपर्‍यावर उभे राहून सकाळ संध्याकाळ सिगरेट फुकत बसणारी मवाली मुले सुद्धा स्वच्छंदी जीवन जगतात. त्याच्यासाठी ओशो, दीड कोटींचा फ्लॅट, संगीत, रिसॉर्ट कशाला पाहिजे ? स्वच्छंदी जीवन म्हणजेच आनंदी जीवन हा एक मोठाच गैरसमज आहे. कर्ज काढण्यासाठी स्वतःच्या कर्तबगारीवर विश्वास असावा लागतो. हे एक साहस आहे. आणि कर्जाचे इएमाय भरणारे बिझनेसमन किंवा नोकरदार सुद्धा आनंदी असू शकतात. कर्ज काढावे किंवा न काढावे हा पर्सनल चॉईस आहे पण जे इएमाय भरतात ती सगळी ओझ्याची गाढवे असे एखाद्याचे मत असेल तर...... संक्षी सरांना कोण समजावणार ?

In reply to by अप्पा जोगळेकर

भविष्याचे ओझे नको, कशाला उगाच समुद्र ओलांडायचा, इथे काय वाईट आहे म्हणणारे भारतीय दिडशे वर्ष पारतंत्र्यात सडले. निधड्या छातीने समुद्र पादाक्रांत करणार्‍या गोर्‍या साहेबाने जगावर राज्य केले.

In reply to by अप्पा जोगळेकर

कोपर्‍यावर उभे राहून सकाळ संध्याकाळ सिगरेट फुकत बसणारी मवाली मुले सुद्धा स्वच्छंदी जीवन जगतात.
हहपुवा

In reply to by अप्पा जोगळेकर

कोपर्‍यावर उभे राहून सकाळ संध्याकाळ सिगरेट फुकत बसणारी मवाली मुले सुद्धा स्वच्छंदी जीवन जगतात. मवालीपणा आणि स्वच्छंदीपणा या दोन वेगवेगळ्या गोष्टी आहेत. स्वच्छंदी जीवन म्हणजेच आनंदी जीवन हा एक मोठाच गैरसमज आहे. स्वच्छंद हाच आनंद आहे ! कर्ज काढण्यासाठी स्वतःच्या कर्तबगारीवर विश्वास असावा लागतो. हे एक साहस आहे. खरं साहस पैश्यावर किंवा कर्ज घेण्याच्या क्षमतेवर अवलंबून नाही. भविष्यकाळापासून मुक्त होण्यात आहे. आणि खरी कर्तबगारी मन मानेल तेव्हा काम करण्यात आहे. जे इएमाय भरतात ती सगळी ओझ्याची गाढवे असे एखाद्याचे मत असेल तर...... गैरसमज होतोयं ! कर्जमुक्त व्यक्तीला कर्जदार व्यक्तीपेक्षा मनमोकळं जगता येतं इतका साधा मुद्दा आहे.

In reply to by संजय क्षीरसागर

गैरसमज होतोयं ! कर्जमुक्त व्यक्तीला कर्जदार व्यक्तीपेक्षा मनमोकळं जगता येतं इतका साधा मुद्दा आहे. ओके. इथवर ठीक आहे. तुमची खालील खालील वाक्ये तुमच्याच एका प्रतिसादात वाचली. इएमआयचं ओझं असणारा दिवसाच्या प्राईम टाइममधे कर्ज फेडण्याची भ्रांत सोडू शकत नाही. त्याचा काल, आज आणि उद्या अगदी एकसारखा असतो. तो फक्त सुट्टीच्या वाटेकडे डोळे लावून खाली मान घालून ते ओझं ओढत राहातो. तो लाईन क्रॉस करायचा विचार सुद्धा करु शकत नाही. त्यावरुन माझा आणखीन काय वेगळा समज होणार ? असो. थांबतो.

In reply to by गणामास्तर

जरी काही कर्ज वा इएमआय डोक्यावर नसले तरी उद्या उठल्यावर काम न करण्याचा विकल्प या जगात अत्यंत तुरळक लोकांकडे उपलब्ध आहे असे वाटते. अर्थात ! बँकात आणि इतरत्र वॉलंटरी रिटायरमेंटची सुरुवात झाल्यावर तो ऑप्शन अनेकांनी निवडला. मजबूत पैसे मिळाले पण मोकळ्या दिवसाचं काय करायचं यानं सॉलीड घुसमट होऊन पब्लिकनं परत इकडेतिकडे नोकर्‍या धरल्या आणि पुन्हा तेच रुटीन चालू केलं ! म्हणजे ज्या लोकांकडे अमाप पैसे गाठीला आहे तिचं लोकं भविष्याची चिंता सोडून वर्तमानात स्वच्छंदी जगू शकतील असे आपल्या प्रतिसादांतून ध्वनित होऊ शकते. अजिबात नाही. भविष्याची चिंता सोडणं हा साहसाचा भाग आहे, पैश्यामुळे ते येईल असं वाटतं पण जोपर्यंत पैसा हाच आधार वाटतो तोपर्यंत साहस असंभव आहे. स्वच्छंद जगण्यासाठी जीवनातल्या विविध व्यासंगात रस हवा. खेळ, साहित्य, संगीत, लेखन, चित्रपट, नाटकं, पत्नीबरोबर रमण्याची कला, योगासनं, प्राणायाम, भोजनाच्या वैविध्याचा आनंद, भटकंतीची आवड आणि हे सर्व करण्यासाठी भरपूर वेळ आणि माफक पैसा इतकं असलं की झालं. मुख्य म्हणजे तुमचा इंटरेस्ट अ‍ॅक्टीव हवा, उदा. संगीताची आवड आहे आणि गाणी ऐकतो ही पॅसिविटी झाली. तुम्हाला स्वतःला गायन किंवा वादन जमलं तर मजा आहे. साहित्याची आवड आहे आणि वाचतो हे ठीके पण स्वतःच्या अनुभवाची किमान कविता तरी करता आली पाहिजे तर मजा. लोक रिसॉर्टला जातात आणि पंधराव्या मिनीटाला मोबाईलवर वॉटस अ‍ॅप बघायला लागतात किंवा टिवी चालू करतात, घरचंच रुटीन फक्त जागा बदलून सुरु होतं. रिसॉर्टला जाऊन पोहोण्यात मजा आहे, तिथल्या कराओकेवर पाच-सात गाणी म्हणण्यात आनंद आहे. तिथल्या पूल टेबलवर जमेल तसा स्नूकर खेळण्यात मजा आहे. जे येत नाही ते आत्मसात करत रोज काही तरी नवीन शिकलं तर जीवन बदलतं, स्वच्छंद जगण्यासाठी आवडीचे विकल्प उपलब्द्ध होतात.

In reply to by संजय क्षीरसागर

अर्थात ! बँकात आणि इतरत्र वॉलंटरी रिटायरमेंटची सुरुवात झाल्यावर तो ऑप्शन अनेकांनी निवडला. मजबूत पैसे मिळाले पण मोकळ्या दिवसाचं काय करायचं यानं सॉलीड घुसमट होऊन पब्लिकनं परत इकडेतिकडे नोकर्‍या धरल्या आणि पुन्हा तेच रुटीन चालू केलं !
हि नाण्याची एक बाजू झाली, अर्थात ज्या लोकांकडे भरपूर पैसा आहे त्यांची. मला म्हणायचंय कि ज्यांच्यावर काहीही कर्ज नाही तरी पण उद्या कामावर जायला लागेलचं अशी परिस्थिती सुद्धा बऱ्याच लोकांवर असतेच. व्हीआरएस घेतलेली लोकं सोडा, एखाद्या तरुणाला डोक्यावर कर्ज नाही म्हणून घरात बसून कसे चालेल? त्याच्या दैनंदिन गरजा भागवण्यासाठी आणि इतर खर्च वा लाड पुरवण्यासाठी सकाळी कामावर जावेचं लागेल ना. तस्मात, काम करण्याचा किंवा न करण्याचा विकल्प ९९% लोकांकडे नसतो. ते बाय डिफॉल्ट करावेचं लागते.
रिसॉर्टला जाऊन पोहोण्यात मजा आहे, तिथल्या कराओकेवर पाच-सात गाणी म्हणण्यात आनंद आहे. तिथल्या पूल टेबलवर जमेल तसा स्नूकर खेळण्यात मजा आहे. जे येत नाही ते आत्मसात करत रोज काही तरी नवीन शिकलं तर जीवन बदलतं, स्वच्छंद जगण्यासाठी आवडीचे विकल्प उपलब्द्ध होतात.
अमेनिटीज नि युक्त असलेल्या रिसॉर्टला जायला आणि नवनवीन गोष्टी शिकायला सुद्धा बऱ्यापैकी पैसा लागतो. पत्नीसोबत रमायला लग्न करावे लागते, ते झाले कि खर्च वाढतो,त्यामुळे मजबूत पैसे गाठीला झाल्यानंतरच तुमच्यासारखे जीवनमान प्रत्यक्षात आणणे शक्य आहे. एखाद्या तरण्याताठ्या नुकत्याचं उद्योगाला लागलेल्या माणसाला हे जमण्यासारखे नव्हे.

In reply to by संदीप डांगे

अशाने बाजारातली अनावश्यक फुगलेली मागणी कमी होईल, त्याने दर कमी होतील व गरजू लोकांना परवडणाऱ्या किंमतीत घरे मिळतील.हे आपले विधान आहे. डांगे अण्णा "आमच्यासारखे" लोक दुसरे घर घेतात त्यामुळे --बाजारातील घरांची मागणी अनावश्यक रित्या वाढते आणि गरजू लोकांना घर घेता येत नाही असा स्पष्ट अर्थ तुमच्या वरील वाक्यातून निघतो. आणि हे विधान आकसपूर्ण आहे हे स्पष्ट आहे. असे तोंडावर सांगितले तर तुम्ही राजकारण्यांसारखे माझ्या म्हणण्याचा विपर्यास होतो आहे, गोल गोल फिरवून "अपवाद हाच नियम समजून बहुसंख्यकांच्या समस्यांकडे पाहणे योग्य नाही हे सांगता आहात." मला गोल बोलायची किंवा लिहायची सवय नाही म्हणून मी स्पष्ट आकस असा शब्द वापरला किंवा संक्षी सारख्या वित्त विषयातील तज्ज्ञांची मते सुद्धा स्पष्टपणे पुराव्यासकट चूक म्हणतो आहे. मला गुळमुळीत बोलायची सवय नाही ( लष्करात असे बोलणे भंपकपणा समजला जातो). आणि मी तत्वज्ञानाचा प्राध्यापक नाही.

In reply to by सुबोध खरे

"आमच्यासारखे" लोक दुसरे घर घेतात त्यामुळे --बाजारातील घरांची मागणी अनावश्यक रित्या वाढते आणि गरजू लोकांना घर घेता येत नाही यात काय चूक आहे ? असंख्य लोकांनी गरज नसतांना `इनवेस्टमेंट' म्हणून दुसरे फ्लॅट घेतले आहेत आणि त्यामुळेच तर बिल्डर्सचं फावलं आहे. हे विधान आकसपूर्ण आहे हे स्पष्ट आहे आकसाचा प्रश्नच नाही. गरज नसलेल्यांनी घेतलेले दोन/ तीन फ्लॅटस, आयटीवाल्यांनी हेवी इएमआय पत्करुन घेतलेली कर्ज आणि त्यातून बिल्डर्सची केलेली धन, एनारायजनी किंमती वाढतायंत म्हणून खेळलेला सट्टा यामुळेच तर फ्लॅट सामान्यांच्या आवाक्याबाहेर गेलेत. मागच्याच महिन्यात परांजप्यांच्या फॉरेस्टट्रेल मधल्या क्लिफ रिसॉर्टला मी ट्रीपला गेलो होतो. सकाळी फिरायला गेलो तर इतक्या अफाट स्किममधे फक्त १०% लोक राहायला आले होते आणि ९०% बंगले बंद होते. आणि कहर म्हणजे परांजपे अजून कलोसल प्रमाणावर उरलेल्या जागेत नवे बंगले बांधत होते !

In reply to by संजय क्षीरसागर

असंख्य लोकांनी गरज नसतांना `इनवेस्टमेंट' म्हणून दुसरे फ्लॅट घेतले आहेत आणि त्यामुळेच तर बिल्डर्सचं फावलं आहे. हे वाचून उगाचच जयवंत द्ळवींच्या 'सारे प्रवासी घडीचे' या पुस्तकातले डॉ. रामदास हे कॅरेक्टर आठवले. दळवी लिहितात," मी डॉ. रामदासांच्या समोर बसून भाताची रास उठवू लागलो की ते धावत माझ्याकडे येत. बाळ आपू , गरगरीत फुगणे हा बटाट्याचा गुणधर्म आहे. माणसाचा नव्हे. तू चार घास कमी जेवलास तर २ गरीब माणसे आणखीन जेवू शकतील.".

In reply to by संजय क्षीरसागर

हे म्हणजे सर्व मध्यम वर्गाने १० किलो तांदूळ घरी साठवून ठेवल्याने तांदुळाच्या किमती वाढून गरिबांच्या आवाक्याच्या बाहेर गेल्या म्हणण्यासारखे आहे. १५ टक्के लोकसंख्या माध्यम वर्ग आहे जी थोडी थोडकी नव्हे तर २२ कोटी आहे. हसून हसून पुरे वाट झाली. लोकांनी घरे घेणे बंद केले तर गरिबांना घर घेणे सोडाच पण तीन कोटी दहा लाख कोटी गरीब लोकांना रोजगारही मिळणार नाही जे या घरबांधणी उद्योगात आणि त्याच्याशी संलग्न उद्योगात कामगार म्हणून काम करीत आहेत. http://planningcommission.nic.in/aboutus/committee/wrkgrp11/wg11_constr… हा २००७ चा अहवाल आहे आजमितीला यात अजूनच वाढ झालेली आहे आपण "वित्त क्षेत्रात" तज्ञ आहात आपण आपला मुद्दा सिद्ध करायला इतक्या टोकाला जाऊ शकता हेच आश्चर्य आहे.

In reply to by सुबोध खरे

लोकांनी घरे घेणे बंद केले तर..... मुद्दा वेगळा आहे आणि अगदी साधा आहे. लोकांनी इनवेस्टमेंट म्हणून, गरज नसतांना दोनदोन ( किंवा काही केसेसमधे तर तीनतीन) फ्लॅटवर सट्टा खेळणं बंद केलं तर घराच्या किंमती वाजवी होतील.

In reply to by संजय क्षीरसागर

आजच्या किंमतीत फ्लॅट घेऊन सत्तर/ ऐंशी हजार रुपये इएमआय बसला तर आयुष्य स्वच्छंदपणे जगता येईल का? हा मुद्दा आहे.
मनासारख्या फ्लॅटमध्ये राहाताय या गोष्टीकडे पाहिलत तर स्वच्छंदीपणे राहू शकाल. ई एम आय कडे पहात रहाल तर नाही राहू शकणार. कर्ज न घेता तेवढी रक्कम साठवून मग फ्लॅट घेणे यातही आयुष्य निघून जातेच..

In reply to by संजय क्षीरसागर

उत्पन्नाच्या ६० / ६५ टक्के भाग जर इएमआय मधे गुंतला असेल तर इएमआय व्यक्तीला लाईनवर ठेवतो . परत चूक कोणती पत संस्था उत्पन्नाच्या ६५ % इ एम आय असलेले कर्ज सर्वसामान्य माणसाला देते. तेंव्हा अशी परिस्थिती सामान्य माणसाच्या आयुष्यात येणे शक्य नाही.

In reply to by सुबोध खरे

उत्पनाच्या ६० ते ६५ % ही रिपेमेंट कपॅसिटी ग्राह्य धरली गेली आहे. घेतलेला फ्लॅट भाड्यानं लावायचा आणि त्यातून काही प्रमाणात इएमआय भागवायचा हाच फंडा पब्लिक वापरतं म्हणून घरखर्चाला पैसे पुरतात.

In reply to by संजय क्षीरसागर

कोणती पत संस्था उत्पन्नाच्या ६५ % इ एम आय असलेले कर्ज सर्वसामान्य माणसाला देते तेवढे फक्त सांगा. गोल बोलू नका. सरकारी माणूस ज्याला वरकड कमाई असली तरीही पगाराच्या ३५ % च्या वर कोणतीही संस्था कर्ज देत नाही.