✍ मराठी साहित्य, संस्कृती आणि लेखनाचे व्यासपीठ
प्रवेश करा | सदस्य व्हा
मिसळपाव
मिसळपाव मराठी साहित्य

Main navigation

  • मुख्य पान
  • पाककृती
  • कविता
  • नवीन लेखन
  • भटकंती

मी आज केलेला व्यायाम - जानेवारी २०१७

ग
गवि यांनी
Mon, 01/02/2017 - 13:03  ·  लेख
लेख
. नमस्कार मंडळी. "मी आज केलेला व्यायाम" या धाग्यांना उदंड प्रतिसाद मिळत आहे आणि अनेकांनी यातून प्रेरणा घेऊन व्यायाम सुरू केला आहे. व्यायाम सुरू केलेल्या आणि व्यायामात सातत्य ठेवलेल्या सर्वांचे अभिनंदन. आपण सर्वांनी केलेला व्यायाम पुढीलप्रमाणे - नोव्हेंबर २०१६ - सायकलिंग - ८०१० किमी आणि रनिंग / वॉकिंग - २४८ किमी. डिसेंबर २०१६ - सायकलिंग - ९६१३ किमी आणि रनिंग / वॉकिंग - २९१ किमी. ************************************************** मी आज केलेला व्यायाम - डिसेंबर २०१६ या धाग्यावर अनेकांनी घामटा काढला, धापा टाकल्या आणि एकमेकांचा हुरुप वाढवत एक नवीन "मिशन" लाँच केलं. अगदी आमच्यासारखे लठ्ठंभारतीदेखील पोट सावरत धावायला नाही तरी किमान चालायला तरी लागले. "सिम्पली वॉकिंग" या साध्यासरळ अ‍ॅपमुळे कोणत्याही सोशल मीडियाशिवाय आणि संपूर्ण डेटा आपल्याच डिव्हाईसवर ठेवून शेअरिंगचा कंट्रोल आपल्या हातात ठेवणं सोपं झालं. बाकी मॅप, स्टॅटिस्टिक्स वगैरे सगळं यात उत्तमपैकी आहे. तर पहिला धागा भरुन वाहू लागल्याने जानेवारी २०१७ साठी नवा भाग काढतो आहे. यावेळी सर्वांना सहज जमणारा आणि तुलनेत सुरक्षित असा "चालणे" हा जो व्यायाम आहे त्यावर भर द्यावा आणि अगदी बिगिनरपासून रेग्युलर फिटनेस फ्रीकांना "चालणारा" चालणं हा व्यायाम अधिकाधिक लोकांनी सुरु करावा आणि त्याबाबत चर्चा करावी अशी विनंती. मी स्वतः शून्य किलोमीटर चालत चालत बरीच वर्षं काढली. आता दीड महिना झाला, सातत्य बर्यापैकी आहे. भराभर चाललं की भरपूर दमतो पण तसंच न थांबता चाललं की एक प्रकारची सुखद "हाय" नशासदृश जाणीव होते. असा अनुभव आणखी कोणाला आहे का? लठ्ठ व्यक्ती वेगाने चालली असता गुडघे भरपूर दणकतात. यावर काय करावं? शिवाय मांड्या एकमेकांवर घासून वेदनादायक स्किन इरिटेशन होतं, ऑफिसच्या मधल्या वेळात चालणं साधता येतं पण इतका घाम येतो की फॉर्मल कपडे भिजून जातात आणि जवळजवळ ओल्या अंगाने एसीत परत यावं लागतं. कोणाला अशाच इतर अडचणी येतात का? चला ...लिटरली चला... चाला..... कीप वॉकिंग... चियर्स... A
वर्गीकरण
लेखनविषय (Tags)
वावर
आरोग्य
लेखनप्रकार (Writing Type)
प्रकटन
आरोग्य

प्रतिक्रिया द्या
45682 वाचन

💬 प्रतिसाद (135)

प्रतिक्रिया

२१ किमी सायकलिंग करून हाफिसात

मोदक
Mon, 01/16/2017 - 14:03 नवीन
२१ किमी सायकलिंग करून हाफिसात पोहोचलो.

२१ किमी - हाफिस ते घर.

मोदक
Mon, 01/16/2017 - 23:27 नवीन
२१ किमी - हाफिस ते घर.
↩ प्रतिसाद: मोदक

बाळ सप्रे आणि आनिल मोरे.

शलभ
Mon, 01/16/2017 - 14:04 नवीन
बाळ सप्रे आणि आनिल मोरे..अभिनंदन..खूप मस्त वेळ आहे तुम्हा दोघांचा..४.१०, ४.२९..रियली हॅट्स ऑफ.. माझी पहिलीच पुर्ण मॅरेथॉन..५.४१ वेळ आहे..मी ४.३० तासाखाली पुढच्या वर्षीसाठी टार्गेट ठेवतो आता.. तुम्ही दोघांनी आता लेख लिहा पुर्ण मॅरेथॉन च्या तयारीसाठी..

धन्यवाद!!!

अनिल मोरे
Mon, 01/16/2017 - 15:33 नवीन
शलभदादा, मॅरॅथॉन पूर्ण केल्याबद्दल अभिनंदन !!!
↩ प्रतिसाद: शलभ

हार्दिक अभिनंदन!

हकु
Tue, 01/17/2017 - 00:31 नवीन
अनिल मोरे, बाळ सप्रे आणि शलभ, तुम्हा तिघांचंही हार्दिक अभिनंदन! हाफ मॅरेथॉन धावल्यावर फुल मॅरेथॉन धावायला काय कष्टं करावे लागत असतील याचा पुरेपूर अंदाज आला. प्रचंड प्रचंड विल पॉवर लागत असणार, नक्कीच!
↩ प्रतिसाद: शलभ

अभिनंदन ....

डॉ श्रीहास
Tue, 01/17/2017 - 18:23 नवीन
पहीली फुल मॅरेथाॅन पूर्ण केल्याबद्दल अभिनंदन...
↩ प्रतिसाद: शलभ

गेल्या आठवड्यापासून माझं

सूड
Mon, 01/16/2017 - 14:34 नवीन
गेल्या आठवड्यापासून माझं काहीतरी गंडतंय ब्रेस्ट स्ट्रोक करताना, मध्यापर्यंत व्यवस्थित जातोय. शेवटपर्यंत जाऊ की नाही ही भीती म्हणा की आणखी काही, नंतर किक नीट होत नाही. कोणाला असा अनुभव आलाय? असल्यास काय केलं परत रुळावर यायला?

३-४ लॅप्स फक्त किकची प्रक्टिस

बाळ सप्रे
Mon, 01/16/2017 - 14:39 नवीन
३-४ लॅप्स फक्त किकची प्रक्टिस करा.. बोर्ड घेउन. .. तसे केल्याने मसल मेमरी बिल्ड होते.. सगळं ताळ्यावर येतं !!
↩ प्रतिसाद: सूड

ह्म्म, करुन बघतो उद्या.

सूड
Mon, 01/16/2017 - 14:44 नवीन
ह्म्म, करुन बघतो उद्या.
↩ प्रतिसाद: बाळ सप्रे

हाफ मॅरेथॉन

हकु
Tue, 01/17/2017 - 00:26 नवीन
कालची माझी पहिलीच हाफ मॅरेथॉन. २तास १४ मिनिटे लागली.

हार्दिक अभिनंदन!

अनिल मोरे
Tue, 01/17/2017 - 09:42 नवीन
हार्दिक अभिनंदन!
↩ प्रतिसाद: हकु

पहिल्याच प्रयत्नात २:१४..

बाळ सप्रे
Tue, 01/17/2017 - 10:20 नवीन
पहिल्याच प्रयत्नात २:१४.. खूपच छान!! अभिनंदन..
↩ प्रतिसाद: हकु

सर्व मॅरेथॉन पटु नच मनःपूर्वक

माझीही शॅम्पेन
गुरुवार, 01/19/2017 - 15:31 नवीन
सर्व मॅरेथॉन पटु नच मनःपूर्वक अभिनंदन __/\__ सलग २१ / ४२ किमी पळणे म्हणजे काय हे फक्त पळलेले लोकच सांगू शकतात , हा असा प्रकार आहे जो तुम्ही सुरु करू शकता पण माघार घेऊ शकत नाही मी घोट्याची दुखापत घेऊन हाफ मॅरेथॉन यशस्वी पूर्ण केली आणि आता पूर्ण बरा आहे , ह्या वर्षी राहिलेली कसर भरून काढण्यात येईल , सातत्याने पळत असताना जो शरीर बरोबर सवांद साधला जातो तो खरंच अप्रतिम असतो जसा सायकल वाल्यांचा व्हाट्सअँप ग्रुप आहे तसा लॉन्गरनर्स चा करूया का ( भ्रमण ध्वनी व्यनि करावा)
↩ प्रतिसाद: बाळ सप्रे

साहेब, मला अअ‍ॅडवाल का या

अप्पा जोगळेकर
Tue, 01/24/2017 - 12:34 नवीन
साहेब, मला अअ‍ॅडवाल का या ग्रुप मधे. नंबर व्यनि करतो. या रविवारी हाफ मॅरेथॉन धावणार आहे. पाहू काय होत ते. पहिलीच हाफ मॅरेथॉन आहे.
↩ प्रतिसाद: माझीही शॅम्पेन

आज ४६ मिनिटांचा व्हिडीओ सुरु

शुचि
Tue, 01/17/2017 - 04:48 नवीन
आज ४६ मिनिटांचा व्हिडीओ सुरु केला पण १८ मिनिटात घामाघुम झाल्याने आणि मुख्य धाप लागल्याने, थांबले. गेले काही दिवस १२ सूर्यम्नमस्कार घातले. डॉक्टर म्हणाले वजन कमी होण्याकरता कार्डिओ व्यायाम हवा. खालील व्यायामपटुचे व्हिडीओ जे की पहात एकाच जागी चालता येते, अए डॉक्टरांनी सुचविले. पाहू यात. . या वर्षी तरी फिट होण्याचे सिरीअस ध्येय ठेवले आहे. https://www.youtube.com/user/walkathomemedia .

२२ किमी - घर ते हाफिस.

मोदक
Tue, 01/17/2017 - 15:45 नवीन
२२ किमी - घर ते हाफिस.

घर ते ओपिडी ....

डॉ श्रीहास
Tue, 01/17/2017 - 18:32 नवीन
घर ते ओपिडी हे अंतर २२ पावले असल्यानी सकाळी उठून ३५.४६ किमी सायकलींग (MTB) केली.
↩ प्रतिसाद: मोदक

बाळ सप्रे,अनिल मोरे आणि हकु ..... मन:पुर्वक अभिनंदन

डॉ श्रीहास
Tue, 01/17/2017 - 18:29 नवीन
फुल आणि हाफ मॅरेथाॅन (स्वप्नवत वेळात ) पूर्ण केल्याबद्दल परत एकदा अभिनंदन _/\_.

Runners high

पिरतम
Wed, 01/18/2017 - 13:23 नवीन
सारखे धावल्यानंतर उत्साहित वाटणे, थकवा येण्याऐवजी जास्त पाळावे असे वाटणे याला runners high असे म्हणतात....विकी वर आणखी माहिती आहे https://en.m.wikipedia.org/wiki/Neurobiological_effects_of_physical_exercise

रुंनर्स high

पिरतम
Wed, 01/18/2017 - 13:37 नवीन
khup वेळ धावल्यानंतर sukhad वाटणे याला runners high म्हणतात https://en.m.wikipedia.org/wiki/Neurobiological_effects_of_physical_exercise

हॅ. रनर्स हाय हा एक वेगळाच

अप्पा जोगळेकर
Tue, 01/24/2017 - 12:37 नवीन
हॅ. रनर्स हाय हा एक वेगळाच प्रकार आहे. सुखद वाटणे म्हणजे रनर्स हाय नव्हे. बहुधा लॅक्टिक अ‍ॅसिडच पुन्हा लॅक्टोज बनते आणि अगणित काळ धावत राहता येईल असे वाटते त्याला रनर हाय म्हणतात. ते फक्त अल्ट्रा मॅरेथॉनलाच अनुभवता येते असे वाचले आहे.
↩ प्रतिसाद: पिरतम

आजचे सायकलिंग - 42 किमी

मोदक
Wed, 01/18/2017 - 23:25 नवीन
आजचे सायकलिंग - 42 किमी

मागचे तीन दिवस

अनरँडम
Wed, 01/18/2017 - 23:30 नवीन
रोज साधारण पावणे चार मैल पळालो. सातत्य हा पळणार्‍याचा सर्वात मोठा मित्र आहे असे माझे मत झाले आहे. गुडघे, मांड्या, पोटर्‍या प्रत्येक भागाने अनेकदा चालता न येण्या इतपत असहकार पुकारलेला असतांनाही मी सातत्याशी मैत्री बाळगल्याने आता फारसा त्रास होत नाही.

सध्या पोहणं पुन्हा ट्रॅकवर

सूड
गुरुवार, 01/19/2017 - 19:57 नवीन
सध्या पोहणं पुन्हा ट्रॅकवर आणण्याचा प्रयत्न चालू आहे.

पुढची पाने दिसतच नाहीत. किती

एस
गुरुवार, 01/19/2017 - 20:06 नवीन
पुढची पाने दिसतच नाहीत. किती आहेत पाने? मला फक्त एकच पान दिसत आहे.

हा प्रतिसाद दिल्यानंतर मधले

एस
गुरुवार, 01/19/2017 - 20:10 नवीन
हा प्रतिसाद दिल्यानंतर मधले प्रतिसाद दिसू लागलेत. काहीतरी गडबड आहे.
↩ प्रतिसाद: एस

ह्या आठवड्यात....

डॉ श्रीहास
Fri, 01/20/2017 - 18:57 नवीन
सोमवार ते शुक्रवार मिळून १६१ किमी सायकलींग झालयं .

ओके, तसे माझे १८५ किमी झाले

मोदक
Sat, 01/21/2017 - 00:07 नवीन
ओके, तसे माझे १८५ किमी झाले आहेत. उद्या सरपंच धुव्वा करणारेत म्हणे. ;)
↩ प्रतिसाद: डॉ श्रीहास

आज 133 किमी सायकल चालवली

मोदक
Sat, 01/21/2017 - 23:49 नवीन
आज 133 किमी सायकल चालवली

मागच्या आठवड्यात

प्रशांत
Mon, 01/23/2017 - 13:03 नवीन
मागच्या आठवड्यात एकुन २६४ किमि सायकलिंग झाली. त्यातली १ मोठी राईड भुलेश्वर ची १३५ किमि या राईड्ला मोदक आणि सागर सोबत होता.

येस्स.. भुलेश्वरला मजा आली.

मोदक
Mon, 01/23/2017 - 13:16 नवीन
येस्स.. भुलेश्वरला मजा आली. येताना हॉटेल कांचनला व्हेज बिर्याणी आणि दालतडका जिरा राईस चांगले मिळाले. माझे मागच्या आठवड्याचे एकूण सायकलिंग - ३८२ किमी.
↩ प्रतिसाद: प्रशांत

दोन महिन्यांच्या खंडानंतर आज

अमर विश्वास
Tue, 01/24/2017 - 11:02 नवीन
दोन महिन्यांच्या खंडानंतर आज परत व्यायामाला सुरवात केली प्रभात रोडच्या नालपार्क मध्ये ४ किमी धावलो. २६ मिनिटे लागली. त्यानंतर माफक स्ट्रेचिंग ...

वॉर्म अप

वेल्लाभट
Tue, 01/24/2017 - 11:34 नवीन
वॉर्म अप १५ जोर १५ + १५ बैठका (बॉडीवेट) १५ पुश अप्स १५ सिट अप्स १५ हॅमर कर्ल्स आणि ५-६ बुलवर्कर चे व्यायामप्रकार हे सगळं अजिबात न थांबता

मंडळी, जानेवारीमध्ये केलेला

मोदक
Wed, 02/01/2017 - 14:24 नवीन
मंडळी, जानेवारीमध्ये केलेला व्यायाम येथे नोंदला गेला नसल्यास जरूर नोंदवा. या महिन्याचा धागा काढत आहे.

या महिन्यात

प्रशांत
Wed, 02/01/2017 - 22:52 नवीन
या महिन्यात एकुन ५०५ किमि सायकल चालवली.
  • «
  • ‹
  • 1
  • 2
  • 3

लेखन करा

लेखन करा

मिसळपाव वर स्वागत आहे.

प्रवेश करा

  • नवीन खाते बनवा
  • Reset your password
मिसळपाव.कॉम बद्दल
  • 1आम्ही कोण?
  • 2Disclaimer
  • 3Privacy Policy
नवीन सदस्यांकरीता
  • 1सदस्य व्हा
  • 2नेहमीचे प्रश्न व उत्तरे
लेखकांसाठी
  • 1लेखकांसाठी मार्गदर्शन उपलब्ध
  • 2लेखन मार्गदर्शन
संपर्क
  • 1सर्व मराठीप्रेमींचे मनापासून स्वागत!
  • 2अभिप्राय द्या
  • 3संपर्क साधा
© 2026 Misalpav.com  ·  Disclaimer  ·  Privacy Policy मराठी साहित्य व संस्कृतीसाठी  ·  प्रवेश  |  सदस्य व्हा