मी आज केलेला व्यायाम - जानेवारी २०१७
नमस्कार मंडळी.
"मी आज केलेला व्यायाम" या धाग्यांना उदंड प्रतिसाद मिळत आहे आणि अनेकांनी यातून प्रेरणा घेऊन व्यायाम सुरू केला आहे.
व्यायाम सुरू केलेल्या आणि व्यायामात सातत्य ठेवलेल्या सर्वांचे अभिनंदन.
आपण सर्वांनी केलेला व्यायाम पुढीलप्रमाणे -
नोव्हेंबर २०१६ - सायकलिंग - ८०१० किमी आणि रनिंग / वॉकिंग - २४८ किमी.
डिसेंबर २०१६ - सायकलिंग - ९६१३ किमी आणि रनिंग / वॉकिंग - २९१ किमी.
**************************************************
मी आज केलेला व्यायाम - डिसेंबर २०१६ या धाग्यावर अनेकांनी घामटा काढला, धापा टाकल्या आणि एकमेकांचा हुरुप वाढवत एक नवीन "मिशन" लाँच केलं. अगदी आमच्यासारखे लठ्ठंभारतीदेखील पोट सावरत धावायला नाही तरी किमान चालायला तरी लागले.
"सिम्पली वॉकिंग" या साध्यासरळ अॅपमुळे कोणत्याही सोशल मीडियाशिवाय आणि संपूर्ण डेटा आपल्याच डिव्हाईसवर ठेवून शेअरिंगचा कंट्रोल आपल्या हातात ठेवणं सोपं झालं. बाकी मॅप, स्टॅटिस्टिक्स वगैरे सगळं यात उत्तमपैकी आहे.
तर पहिला धागा भरुन वाहू लागल्याने जानेवारी २०१७ साठी नवा भाग काढतो आहे. यावेळी सर्वांना सहज जमणारा आणि तुलनेत सुरक्षित असा "चालणे" हा जो व्यायाम आहे त्यावर भर द्यावा आणि अगदी बिगिनरपासून रेग्युलर फिटनेस फ्रीकांना "चालणारा" चालणं हा व्यायाम अधिकाधिक लोकांनी सुरु करावा आणि त्याबाबत चर्चा करावी अशी विनंती.
मी स्वतः शून्य किलोमीटर चालत चालत बरीच वर्षं काढली. आता दीड महिना झाला, सातत्य बर्यापैकी आहे. भराभर चाललं की भरपूर दमतो पण तसंच न थांबता चाललं की एक प्रकारची सुखद "हाय" नशासदृश जाणीव होते. असा अनुभव आणखी कोणाला आहे का?
लठ्ठ व्यक्ती वेगाने चालली असता गुडघे भरपूर दणकतात. यावर काय करावं? शिवाय मांड्या एकमेकांवर घासून वेदनादायक स्किन इरिटेशन होतं,
ऑफिसच्या मधल्या वेळात चालणं साधता येतं पण इतका घाम येतो की फॉर्मल कपडे भिजून जातात आणि जवळजवळ ओल्या अंगाने एसीत परत यावं लागतं.
कोणाला अशाच इतर अडचणी येतात का?
चला ...लिटरली चला... चाला.....
कीप वॉकिंग... चियर्स...
वर्गीकरण
प्रतिक्रिया
२१ किमी सायकलिंग करून हाफिसात
२१ किमी - हाफिस ते घर.
बाळ सप्रे आणि आनिल मोरे.
धन्यवाद!!!
हार्दिक अभिनंदन!
अभिनंदन ....
गेल्या आठवड्यापासून माझं
३-४ लॅप्स फक्त किकची प्रक्टिस
ह्म्म, करुन बघतो उद्या.
हाफ मॅरेथॉन
हार्दिक अभिनंदन!
पहिल्याच प्रयत्नात २:१४..
सर्व मॅरेथॉन पटु नच मनःपूर्वक
साहेब, मला अअॅडवाल का या
आज ४६ मिनिटांचा व्हिडीओ सुरु
२२ किमी - घर ते हाफिस.
घर ते ओपिडी ....
बाळ सप्रे,अनिल मोरे आणि हकु ..... मन:पुर्वक अभिनंदन
Runners high
रुंनर्स high
हॅ. रनर्स हाय हा एक वेगळाच
आजचे सायकलिंग - 42 किमी
मागचे तीन दिवस
सध्या पोहणं पुन्हा ट्रॅकवर
पुढची पाने दिसतच नाहीत. किती
हा प्रतिसाद दिल्यानंतर मधले
ह्या आठवड्यात....
ओके, तसे माझे १८५ किमी झाले
आज 133 किमी सायकल चालवली
मागच्या आठवड्यात
येस्स.. भुलेश्वरला मजा आली.
दोन महिन्यांच्या खंडानंतर आज
वॉर्म अप
मंडळी, जानेवारीमध्ये केलेला
या महिन्यात