Skip to main content
मिसळपाव

Main navigation

  • मुख्य पान
  • पाककृती
  • कविता
  • भटकंती
  • नवीन लेखन
Submitted by गवि on Mon, 01/02/2017 - 13:03
लेखनविषय (Tags)
वावर
आरोग्य
लेखनप्रकार (Writing Type)
प्रकटन
आरोग्य
. नमस्कार मंडळी. "मी आज केलेला व्यायाम" या धाग्यांना उदंड प्रतिसाद मिळत आहे आणि अनेकांनी यातून प्रेरणा घेऊन व्यायाम सुरू केला आहे. व्यायाम सुरू केलेल्या आणि व्यायामात सातत्य ठेवलेल्या सर्वांचे अभिनंदन. आपण सर्वांनी केलेला व्यायाम पुढीलप्रमाणे - नोव्हेंबर २०१६ - सायकलिंग - ८०१० किमी आणि रनिंग / वॉकिंग - २४८ किमी. डिसेंबर २०१६ - सायकलिंग - ९६१३ किमी आणि रनिंग / वॉकिंग - २९१ किमी. ************************************************** मी आज केलेला व्यायाम - डिसेंबर २०१६ या धाग्यावर अनेकांनी घामटा काढला, धापा टाकल्या आणि एकमेकांचा हुरुप वाढवत एक नवीन "मिशन" लाँच केलं. अगदी आमच्यासारखे लठ्ठंभारतीदेखील पोट सावरत धावायला नाही तरी किमान चालायला तरी लागले. "सिम्पली वॉकिंग" या साध्यासरळ अ‍ॅपमुळे कोणत्याही सोशल मीडियाशिवाय आणि संपूर्ण डेटा आपल्याच डिव्हाईसवर ठेवून शेअरिंगचा कंट्रोल आपल्या हातात ठेवणं सोपं झालं. बाकी मॅप, स्टॅटिस्टिक्स वगैरे सगळं यात उत्तमपैकी आहे. तर पहिला धागा भरुन वाहू लागल्याने जानेवारी २०१७ साठी नवा भाग काढतो आहे. यावेळी सर्वांना सहज जमणारा आणि तुलनेत सुरक्षित असा "चालणे" हा जो व्यायाम आहे त्यावर भर द्यावा आणि अगदी बिगिनरपासून रेग्युलर फिटनेस फ्रीकांना "चालणारा" चालणं हा व्यायाम अधिकाधिक लोकांनी सुरु करावा आणि त्याबाबत चर्चा करावी अशी विनंती. मी स्वतः शून्य किलोमीटर चालत चालत बरीच वर्षं काढली. आता दीड महिना झाला, सातत्य बर्यापैकी आहे. भराभर चाललं की भरपूर दमतो पण तसंच न थांबता चाललं की एक प्रकारची सुखद "हाय" नशासदृश जाणीव होते. असा अनुभव आणखी कोणाला आहे का? लठ्ठ व्यक्ती वेगाने चालली असता गुडघे भरपूर दणकतात. यावर काय करावं? शिवाय मांड्या एकमेकांवर घासून वेदनादायक स्किन इरिटेशन होतं, ऑफिसच्या मधल्या वेळात चालणं साधता येतं पण इतका घाम येतो की फॉर्मल कपडे भिजून जातात आणि जवळजवळ ओल्या अंगाने एसीत परत यावं लागतं. कोणाला अशाच इतर अडचणी येतात का? चला ...लिटरली चला... चाला..... कीप वॉकिंग... चियर्स... A
  • 45682 views

प्रतिक्रिया

Submitted by पिलीयन रायडर on Sat, 01/07/2017 - 00:23

In reply to ट्रेडमिलवर पळण्यापेक्षा, by सूड

Permalink

इथे थंडी आहे हो खुप. बाहेर

इथे थंडी आहे हो खुप. बाहेर पडुन पळणं सध्या शक्य नाहीये.

Submitted by आनंदयात्री on Sat, 01/07/2017 - 01:34

In reply to ३ जानेवारी- १ तास योगासने by पिलीयन रायडर

Permalink

ट्रेडमिल

मी शिकाऊ आहे, मागच्या ४-5 महिन्यात केलेली हि प्रगती. १. पहिला महिना - सलग ४० मिनिटे चालणे जमवले. सुरुवात २० मिनिटांपासून केली होती. रोज हळूहळू २-३ मिनिटे वाढवली. या महिन्यात चालण्याचा जास्तीत जास्त वेग ३.६ एलेव्हेशन ०. पायात दुखणे वैगेरे साध्य साध्य अडचणी आल्या. अगदी पहिल्या दिवसामध्ये दार दहा मिनिटांनी ३० सेकंदाचा ब्रेकही घेतला. काय शिकलो?- मध्ये मध्ये पाण्याचा घोट घेतला कि स्टॅमिना टिकून राहतो. २. दुसरा महिना - सलग ४० मिनिटे चालणे. एलेव्हेशन ०.५, ३.७ ते ३.८ ने चालता यायला लागले. काय शिकलो?- चालणे मोनोटोनस. वर्कआउटला साजेशी गाणे ४० मिनिटे ऐकणे म्हणजे कानांवर अन मेंदूवर अत्याचार व्हायला लागले. बातम्या किंवा आवडीच्या विषयांचे व्हिडीओ, लेक्चर्स पाहायला सुरुवात केली. ३. नंतर आजवर- २-३ आठवडे सलग गॅप पडला, भीती वाटली कि 'ये रे माझ्या मागल्या' .. पुन्हा चालणे बंद होतेय. पण सुरु करता आले. दर वीस मिनिटांच्या सेक्शन मध्ये २ मिनिटे असे पळायला सुरुवात केली. आता मागच्या दोन आठवड्यात सलग ४-५ मिनिटे जमायला लागले आहे. काय शिकलो?- पळणे आवडीच्या गाण्याला सुरु करावे. कमी स्पीडने पळाले तर जास्त काळ पळता येते. स्टॅमिना नुसार स्पीड आपोआप वाढेल. सध्या - चालणे ३.७-३.८ ने, पळणे ४.१ - ४.५ ने. एलेव्हेशन १.५. वीकडेज मध्ये ४० मिनिटे (२.५-३.० माईल) आणि विकेंडला ६० मिनिटे पूर्ण (3.५-4.० माईल). कॆलरीज? - यंत्रावर करेक्ट कॆलरीज मोजायला रोज वजन एंटर करावे लागते, त्यामुळे कॆलरीजचा ट्रॅक ठेवला नाहीये. फिटनेस गॅजेटहि घेतलेले नाही. गुगल फिट मध्ये नोंद मात्र ठेवतो. टार्गेट- बरोबर व्यायाम करणारा मित्र ६.५ च्या स्पीडने एक तास पळतो. साताठशे कॆलरी सहज उडवतो. त्याच्यासारखे पळणे जमवायचा मानस आहे .. त्यामुळे दिल्ली दूरही नाही बहोत दूर है .. हे जाणून आहे :) थोडक्यात काय पॅरामीटर्सचे आदर्श प्रमाण हे तुमच्या स्टॅमिनाशी डायरेक्ट्ली प्रपोर्शनल आहे, अशी माझी सध्याची धारणा आहे.

Submitted by पिलीयन रायडर on Sun, 01/08/2017 - 07:52

In reply to ट्रेडमिल by आनंदयात्री

Permalink

ओके!

ओके! तुमच्या प्रतिसादतुन मी काय शिकले? १५ मिनटं चालणं अगदीच बाळबोध आहे. अजुन फार म्हणजे फार जास्त चालायला हवंय. आणि ते ही रोज. साधारण तुमच्या सारखीच स्ट्रॅटर्जी ठेवते. आणि हळुहळु वाढवत नेते.

Submitted by अमर विश्वास on Sun, 01/08/2017 - 11:03

Permalink

एरवी ट्रेडमिलवर नीट पळणार्‍या

एरवी ट्रेडमिलवर नीट पळणार्‍या आम्हा लोकांना सणस ग्राऊंडचे दोन राउंड मारताना धापा टाकायला व्हायचं.... हे फारसे पटत नाही. मी स्वात: गेले ५+ वर्षे ट्रेडमिलवर पाळतो आहे . पण १० किमी रनिंग रेस कम्प्लिट करताना किंवा हिमालयात ट्रेकिंग करताना मला अजिबात धापा टाकाव्या लागत नाहीत. ट्रेडमिलवर पाळण्याची (अर्थात प्रत्येक व्यायामाची) एक पद्धत असते व योग्य पद्धतीने व्यायाम केल्यास योग्य फायदे मिळतात ट्रेडमिलवर पळताना मला जाणवलेल्या काही गोष्टी : १. ट्रेडमिल वर रोज पळू नये. आठवड्यात जास्तीतजास्त ३ ते ४ वेळा ट्रेडमिल वापरावी. उरलेले दिवस सायकलिंग / क्रॉस जॉगर वापरावा २. पळण्यात प्रगती होण्यासाठी पायाचे स्नायु तयार होणे फार म्हत्वाचे असते. आठवड्यातून किमान २ वेळा पायांचा व्यायाम करावा (Squats / lunges / calf Raises यासारखे व्यायाम ) ३. पाळण्यापूर्वी वॉर्म अप जरूर करावा ४. ट्रेडमिल वर पाळताना एकाच वेगाने फार वेळ पाळण्यापेक्षा वेग कमीजास्त करावा / एलेवेशन बदलावे ५. ट्रेडमिल झिरो एलेवेशनवर न ठेवता ०.५ इन्क्लीनशनवर ठेवावी ६. ट्रेडमिल वर ६ KM /Hrs व झिरो एलेवेशन हे ब्रिस्क वॉलकिंग समजावे ६ ते ८ KM /Hrs हे जॉगिंग व ८ KM /Hrs च्या पुढे रनिंग समजावे पळण्याचा स्टॅमिना वाढवण्यासाठी काही गोष्टी : १. हाय इंटेन्सिटी इंटर्वल ट्रैनिंग चा वापर करावा २. ३० मिनिटे पाळण्याचे टार्गेट ठेवून जास्तीतजास्त अंतर पाळण्याचा प्रयत्न करावा (रेकॉर्ड ठेवावे) सुरवातीला ३० मिनिटे जास्त वाटत असतील तर वीस मिनटे किंवा १५ मिनिटांचे दोन सेट करावे ३. एका आठवड्यात ४ वेळा पळत असाल तर एकदा हाय इंटेन्सिटी इंटर्वल ट्रैनिंग, दोन वेळा ३० मिनिटे पाळण्याचे टार्गेट व एकदा लॉन्ग डिस्टन्स रनिंग / ब्रिस्क वॉकिंग करावे परत एकदा .. वॉर्म अप आणि कुलडाऊन विसरू नये हॅपी रनिंग

Submitted by प्रा.डॉ.दिलीप बिरुटे on Sun, 01/08/2017 - 11:29

Permalink

अभिनंदन.

गविशेठ अभिनंदन. लव यू यार... चालायला सुरुवात केली बरं वाटलं. हळुहळु स्पीड नाय वाढवलं तरी चालेल पण चलते रहो. :) गेली दोन महिन्यांपासून माझं चालणं बंद आहे, अर्थात कामाचा व्याप होता आणि जरा पडलेली थंडीही कारणीभूत होती. पण, गविसेठ तुम्हाला शब्द देतो या आठवड्यात माझं चालणं नियमित असेल. कुछ अजीब सा रिश्ता हो गया है मेरे और उसके दरमियान ना नफरत हो रही है और ना मोहब्बत....! -दिलीप बिरुटे

Submitted by मोदक on Mon, 01/09/2017 - 07:36

Permalink

विकांताला प्रशांत मालकांसोबत

विकांताला प्रशांत मालकांसोबत सायकलने तिकोना पायथा गाठला एकूण सायकलिंग - 135 किमी

Submitted by वेल्लाभट on Tue, 01/10/2017 - 10:49

Permalink

२५+२५ पुश अप्स

२५+२५ पुश अप्स २५ ट्रायसेप डिप्स ५२ सेकंद प्लँक हे वॉर्म अप नंतर सध्या वेळेअभावी असं तुटपुंजंच काहीतरी केलं जातंय, पण काहीच नाहीपेक्षा हे बरं या विश्वासाने करतोय.

Submitted by गवि on Tue, 01/10/2017 - 20:39

Permalink

.

दुपारी दोन तास शवासन केले. पाठदुखीने. रात्री आठ तास करणार.

Submitted by कुंदन on Tue, 01/10/2017 - 23:23

In reply to . by गवि

Permalink

लढ बाप्पु

लढ बाप्पु

Submitted by मोदक on Wed, 01/11/2017 - 00:02

In reply to . by गवि

Permalink

कॅलरीज किती जळाल्या म्हणे..?

कॅलरीज किती जळाल्या म्हणे..? ;)

Submitted by हकु on Wed, 01/11/2017 - 11:30

Permalink

10 किमी धावलो

10 किमी धावलो. स्टॅंडर्ड चार्टर्ड मुंबई मॅरेथॉन ची तयारी. माझ्यासाठी हाफ मॅरेथॉन.

Submitted by बाळ सप्रे on Wed, 01/11/2017 - 11:42

In reply to 10 किमी धावलो by हकु

Permalink

मुंबई मॅरॅथॉनसाठी शुभेच्छा..

मुंबई मॅरॅथॉनसाठी शुभेच्छा.. आणखी कोण कोण मिपाकर धावणार आहेत मुंबइत या रविवारी ??

Submitted by अनिल मोरे on Wed, 01/11/2017 - 12:42

In reply to मुंबई मॅरॅथॉनसाठी शुभेच्छा.. by बाळ सप्रे

Permalink

मी पण!!!

मी पण!!!

Submitted by बाळ सप्रे on Wed, 01/11/2017 - 13:21

In reply to मी पण!!! by अनिल मोरे

Permalink

ऑल द बेस्ट.. हाफ की फुल??

ऑल द बेस्ट.. हाफ की फुल??

Submitted by अनिल मोरे on गुरुवार, 01/12/2017 - 12:54

In reply to ऑल द बेस्ट.. हाफ की फुल?? by बाळ सप्रे

Permalink

फुल्ल

फुल्ल. पहिलाच प्रयत्न आहे.

Submitted by शलभ on Wed, 01/11/2017 - 13:39

In reply to मुंबई मॅरॅथॉनसाठी शुभेच्छा.. by बाळ सप्रे

Permalink

मी पण. फुल.

मी पण. फुल.

Submitted by माझीही शॅम्पेन on गुरुवार, 01/12/2017 - 12:58

In reply to मुंबई मॅरॅथॉनसाठी शुभेच्छा.. by बाळ सप्रे

Permalink

मी सुद्धा हाफ मॅरेथॉन धावतोय

मी सुद्धा हाफ मॅरेथॉन धावतोय __/\__

Submitted by बाळ सप्रे on गुरुवार, 01/12/2017 - 13:31

In reply to मी सुद्धा हाफ मॅरेथॉन धावतोय by माझीही शॅम्पेन

Permalink

अरे वा..

अरे वा.. ३ फुल २ हाफ मिपाकर्स @SCMM सोमवारी इथे नक्की अपडेट करा सगळ्यांनी..

Submitted by मोदक on गुरुवार, 01/12/2017 - 18:26

In reply to मी सुद्धा हाफ मॅरेथॉन धावतोय by माझीही शॅम्पेन

Permalink

हा एक फॉरवर्ड मेसेज आला आहे..

हा एक फॉरवर्ड मेसेज आला आहे.. खराखोटा माहिती नाही. ************************************** Central Railway has decided to run 2 suburban special trains o­ne each from Kalyan and Panvel Station o­n Sunday 17.01.2016 for the benefit of the participants of Standard Chartered Mumbai Marathon being held at CST, Mumbai o­n 17.01.2016. The details are as under- Kalyan – CST special will leave Kalyan at 03.00 hrs and will arrive Chatrapati Shivaji Terminus, Mumbai at 04.30 hrs stopping at all stations. Panvel – CST special will leave Panvel at 03.10 hrs and will arrive Chatrapati Shivaji Terminus at 04.30 hrs via Harbour line stopping at all stations. However, local trains towards Chatrapati Shivaji Terminus leaving Kalyan at 04.41 and leaving Vashi at 04.00 will remain cancelled. All concerned to please take note of this and avail the facility. **************************************

Submitted by शलभ on गुरुवार, 01/12/2017 - 18:58

In reply to हा एक फॉरवर्ड मेसेज आला आहे.. by मोदक

Permalink

मला पण आलाय. पण गेल्या

मला पण आलाय. पण गेल्या वर्षीचा आहे. १७.०१.२०१६.
Profile picture for user नावातकायआहे

Submitted by नावातकायआहे on Wed, 01/11/2017 - 11:56

Permalink

डिसेंबर...

९८.९ कि मी चालणे झाले सरासरी रोज ३.१९ एक दिवस हि खाडा नाही हि जमेची बाजु..

Submitted by एस on Wed, 01/11/2017 - 22:29

Permalink

या महिन्यात काही अपरिहार्य

या महिन्यात काही अपरिहार्य कारणास्तव व्यायाम पूर्ण बंद झाला. पण आता सुरू करणार आहे. गुडघ्याची शस्त्रक्रिया झालेली असल्याने पळणे किंवा जिने चढणे इ. प्रकारांवर मर्यादा आली आहे. पण तरीही अधूनमधून डोंगरयात्रा सुरू असतात. आता सायकलिंग पुनःश्च सुरू करेन.

Submitted by बाळ सप्रे on गुरुवार, 01/12/2017 - 10:34

In reply to या महिन्यात काही अपरिहार्य by एस

Permalink

गुडघ्याची शस्त्रक्रिया झालेली

गुडघ्याची शस्त्रक्रिया झालेली असल्याने पळणे किंवा जिने चढणे इ. प्रकारांवर मर्यादा आली आहे
फिजिओथेरपी/ रीहॅब सातत्याने चालू ठेवा.. अजिबात दुर्लक्ष करू नका.. शस्त्रक्रीयेनंतरही पुन्हा धावता येतं ..

Submitted by स्रिहेरि on Wed, 01/11/2017 - 22:40

Permalink

पोट कमी कसे करावे ... याबद्दल

पोट कमी कसे करावे ... याबद्दल कोणी माहिती देईल काय

Submitted by गवि on गुरुवार, 01/12/2017 - 13:53

Permalink

तीन किमी एका फेरीत चाललो.

तीन किमी एका फेरीत चाललो. माझ्यासाठी अचिव्हमेंटच. आता ध्येय चार किमी. मग पाच. सातत्य जास्त महत्वाचं. वजन पुढे फार नाही उतरलं तरी सलग "चालता येतंय", " दम कमी लागतोय", "पूर्ण श्वास येतोय" हेच आनंदाचं वाटतंय.

Submitted by मोदक on गुरुवार, 01/12/2017 - 15:04

In reply to तीन किमी एका फेरीत चाललो. by गवि

Permalink

आभिनंदन हो गवि. तुमच्या

आभिनंदन हो गवि. तुमच्या तुलनेत १०% जरी सातत्य मला मिळाले तरी महिन्याला हजार किमी सायकलिंग होईल.

Submitted by गवि on गुरुवार, 01/12/2017 - 15:28

In reply to आभिनंदन हो गवि. तुमच्या by मोदक

Permalink

...

तुम्हाला आमच्याकडून प्रेरणा मिळणं म्हणजे नळाच्या आशीर्वादाने पाऊस पडण्यापैकी आहे.

Submitted by डॉ श्रीहास on गुरुवार, 01/12/2017 - 17:29

Permalink

गतवर्षी....

गतवर्षी.... ५९४७ किमी सायकलींग,पळणं आणि चालणं असं झालंय; ह्या वर्षाची सुरवातच पायाच्या दुखावण्यानी झाली आहे पण बरं वाटलं (त्याहून महत्वाचं आळस झटकला की ) जोमात सायकलींग सुरू करणार आहे !

Submitted by बाळ सप्रे on गुरुवार, 01/12/2017 - 18:30

In reply to गतवर्षी.... by डॉ श्रीहास

Permalink

बापरे !!!

बापरे !!! एवढ अंतर माझं ३-४ वर्षात मिळून झालं असेल.. दंडवत _/\_

Submitted by डॉ श्रीहास on गुरुवार, 01/12/2017 - 22:12

In reply to बापरे !!! by बाळ सप्रे

Permalink

आमचा पण नमस्कार...

जमतय तेवढं केलं.... ह्या व्यायामाच्या धाग्याचा फार चांगला परिणाम दिसून येतो आहे !! तुम्ही मॅरेथाॅनर आहात ... पळणाऱ्या लोकांबद्दल फाऽऽऽर आदर आहे मला म्हणून तुम्हाला _/\_..... Keep going....Keep inspiring!!

Submitted by अप्पा जोगळेकर on Fri, 01/13/2017 - 10:54

In reply to आमचा पण नमस्कार... by डॉ श्रीहास

Permalink

सप्रे साहेब फक्त मॅरेथॉनर

सप्रे साहेब फक्त मॅरेथॉनर नाहीत. ते बीआरेम ला सायकल वगैरे पण चालवत असतात. त्यांच्या प्रतिसादात तसे लिहिले होते २-३ वेळा. आणि बहुधा एन्ड्युरो पण केली आहे.

Submitted by डॉ श्रीहास on Sat, 01/14/2017 - 19:22

In reply to सप्रे साहेब फक्त मॅरेथॉनर by अप्पा जोगळेकर

Permalink

वा वा ....

सप्रेसाह्येबांबात हे माहिती नव्हतं... धन्यवाद अप्पा :)

Submitted by अनरँडम on गुरुवार, 01/12/2017 - 19:13

Permalink

माझा अनुभव आणि कालची नोंद

मी जवळ जवळ ७-८ महिन्यांपासून रोज किमान ३ ते ४ मैल (ट्रेडमिलवर) पळतो. या काळात माझे वजन वीसेक पाउंड्स कमी झाले आणि पोटाचा घेर लक्षणीय कमी झाला (पण पूर्णपणे सपाट झाले नाही). नोवेम्बर-डिसेंबर काळात पळणे एकदमच थांबले. मागच्या दोन आठवड्यांपासून पुन्हा सुरू झाले. एकदा सवय झाल्यानंतर पळणे हे एक उत्तम तणावमुक्तिचे औषध आहे. सुरूवातीला (सवय नसल्यास) पळणे २-३ मिनिटांपेक्षा अधिक करवत नसे. पण रोज थोडीफार प्रगती होते. मागच्या खेपेला एकदा मी सलग ८ मैल पळू शकलो होतो. मी कुठलेही अ‍ॅप वापरत नाही. काल २३ पुश-अप्स आणि साडेतीन मैल पळणे.

Submitted by मोदक on Fri, 01/13/2017 - 18:15

In reply to माझा अनुभव आणि कालची नोंद by अनरँडम

Permalink

अरे व्वा.. अभिनंदन..!!

अरे व्वा.. अभिनंदन..!!

Submitted by अनरँडम on Fri, 01/13/2017 - 22:49

In reply to अरे व्वा.. अभिनंदन..!! by मोदक

Permalink

धन्यवाद

कालचे पळणे : साडेतीन मैल पुशअप्स : २४ माझ्या फोननुसार पळणे सोडून इतरत्र चालणेणे: ६१११ पावले

Submitted by जावई on Sat, 01/14/2017 - 16:03

Permalink

मदत

कृपया समस्त जाणकार मिपाकरांनी मार्गदर्शन करावे .. मला माझा धावण्याचा (100m,1600m)स्टॕमिना वाढविण्यासाठी पूरक व्यायाम सुचवा...आणि आहार पण सुचवा.

Submitted by प्रशांत on Sat, 01/14/2017 - 22:50

Permalink

सायकलींग

आज 41 किमी सायकल चालवली

Submitted by मोदक on Sun, 01/15/2017 - 14:43

Permalink

काल 128 किमी सायकलिंग केले

काल 128 किमी सायकलिंग केले आज कर्नाळा ट्रेक केला

Submitted by वेल्लाभट on Sun, 01/15/2017 - 14:45

Permalink

गेले दोन दिवस

गेले दोन दिवस ३ किमी ३ किमी धावलो. त्यात अर्धा किमी स्प्रिंट अंतर्भूत होती.

Submitted by एस on Sun, 01/15/2017 - 18:19

Permalink

सर्व मॅरेथॉन धावकांचे अभिनंदन

सर्व मॅरेथॉन धावकांचे अभिनंदन. आज ११ किमी सायकल चालवली.

Submitted by तेजस आठवले on Sun, 01/15/2017 - 20:00

Permalink

पायऱ्या चढणे

पायऱ्या चढणे हा कितपत चांगला व्यायाम आहे ? विशेष करून हृदयाची कार्यक्षमता वाढवण्यासाठी वगैरे ? घर सहावा मजला आणि कार्यालय दहाव्या मजल्यावर आहे. पूर्वी सोळा मजले चढत असे.(वेगवेगळ्या वेळी, एकत्र नाही). हा चांगल्या प्रतीचा व्यायाम म्हणावा का ?

Submitted by अनिल मोरे on Sun, 01/15/2017 - 20:06

Permalink

फोटो कसा अपलोड करायचा?

फोटो कसा अपलोड करायचा?

Submitted by गवि on Sun, 01/15/2017 - 20:06

Permalink

चार किमी वाढीव वेगाने चाललो.

चार किमी वाढीव वेगाने चाललो.

Submitted by मोदक on Sun, 01/15/2017 - 21:51

In reply to चार किमी वाढीव वेगाने चाललो. by गवि

Permalink

टाळ्या!!!

टाळ्या!!!

Submitted by अनिल मोरे on Sun, 01/15/2017 - 20:23

Permalink

स्टॅंडर्ड चार्टर्ड मुंबई मॅरेथॉन

Image removed.

Submitted by बाळ सप्रे on Mon, 01/16/2017 - 12:28

In reply to स्टॅंडर्ड चार्टर्ड मुंबई मॅरेथॉन by अनिल मोरे

Permalink

हि पोस्ट दिसत नाहिये पण http:

हि पोस्ट दिसत नाहिये पण http://www.timingindia.com/result.html इथे तुम्ही ४:१० वेळेत मॅरॅथॉन पूर्ण केल्याच दिसतय !! जबरदस्त कामगिरीबद्दल अभिनंदन !!

Submitted by अनिल मोरे on Mon, 01/16/2017 - 13:30

In reply to हि पोस्ट दिसत नाहिये पण http: by बाळ सप्रे

Permalink

धन्यवाद!!!

result-details Split timings

Submitted by अनिल मोरे on Mon, 01/16/2017 - 13:32

In reply to हि पोस्ट दिसत नाहिये पण http: by बाळ सप्रे

Permalink

अभिनंदन !!!

मॅरॅथॉन पूर्ण केल्याबद्दल अभिनंदन !!!

Submitted by बाळ सप्रे on Mon, 01/16/2017 - 12:31

Permalink

मुंबई मॅरॅथॉनसाठी जोरदार

मुंबई मॅरॅथॉनसाठी जोरदार तयारी करुनही यावर्षी मनासारखी वेळ आली नाही.. ४:२९ गेल्यावर्षीपेक्षा ६ मिनिटं जास्ती लागली. पण कुठलाही त्रास न होता संपवल्याबद्दल समाधान मानतोय!!

Submitted by मोदक on Mon, 01/16/2017 - 13:21

In reply to मुंबई मॅरॅथॉनसाठी जोरदार by बाळ सप्रे

Permalink

सर्व मॅरेथॉन धावकांचे हार्दिक

सर्व मॅरेथॉन धावकांचे हार्दिक अभिनंदन..!!

Pagination

  • First page « First
  • Previous page ‹ Previous
  • पान 1
  • पान 2
  • पान 3
  • Next page Next ›
  • Last page Last »

प्रवेश करा

  • नवीन खाते बनवा
  • Reset your password

© 2026 Misalpav.com