Skip to main content

कधी थांबणार हा क्रूरपणा???????

लेखक श्रीगुरुजी यांनी शुक्रवार, 20/01/2017 00:09 या दिवशी प्रकाशित केले.
काय वेडेपणा चाललाय! सर्वोच्च न्यायालयाने बंदी घातलेली जालिकट्टू नावाची क्रूर प्रथा पुन्हा एकदा सुरू करावी यासाठी तामिळींचा जीव चाललाय. काही ठिकाणी बंदी झुगारून जालिकट्टू आयोजित करण्याचे प्रयत्न झाले. पण पोलिसांनी ते हाणून पाडले. तामिळनाडूचे मुख्यमंत्री ओ पनीरसेल्वम् यांनी तर केंद्र सरकारने सर्वोच्च न्यायालयाचा निर्णय झुगारून जालिकट्टू पुन्हा सुरू करण्याचा अध्यादेश काढावा अशी विनंती करण्यासाठी थेट दिल्ली गाठून पंतप्रधान मोदींची भेट घेतली. सर्वात वाईट भाग म्हणजे संगीतकार रहमान, माजी जागतिक बुद्धीबळ विश्वविजेता विश्वनाथन् आनंद याने सुद्धा जालिकट्टू पुन्हा सुरु करण्यासाठी पाठिंबा दिलाय. ही आमची अत्यंत जुनी परंपरा आहे, आम्ही ती चालू ठेवणारच, आमच्या परंपरेवर बंदी घालण्याचा अधिकार सर्वोच्च न्यायालयाला कोणी दिला अश्या आविर्भावात निदर्शने सुरू आहेत. जालिकट्टू तामिळींच्या जीवनमरणाचा प्रश्न झाला आहे. जुनी परंपरा, प्रथा इ. गोष्टी खर्‍या असल्या तरी असल्या प्रथेत मुक्या प्राण्याचा छळ होतोय त्याचं काय? ते बैल काय स्वतः यातना सहन करून तुमची करमणू़क करण्याकरता या जगात आलेत का? एका वाहिनीवर दाखवित होते. एका बैलाभोवती सातआठ लुंगीधारी उभे होते. त्यातला एकजण बैलाची शेपटी ओढून जोरात पिरगाळत होता. दुसरा एकजण शेपटी दाताखाली धरून चावत होता. अरे कशासाठी त्या बैलाला यातना देता? परंपरा आणि प्रथा म्हणून? ही कसली क्रूर परंपरा? मुक्या प्राण्याला यातना देऊन कसली आलीय करमणू़क आणि प्रथा? अंगात एवढी मस्ती असेल तर एकमेकांशी फ्रीस्टाईल कुस्त्या खेळा की. प्राण्यांचा छळ का करता? स्वतःच्या जिव्हालौल्यासाठी व करमणुकीसाठी मुक्या प्राण्यांना यातना देऊन त्यांचा छळ करण्याची प्रथा व परंपरा खूप जुनी आहे व जगात अनेक देशात ती अजून जिवंत आहे. स्पेनमध्ये बुलफाईट प्रकारात एका बैलाला गल्लीबोळातून पळविले जाते. अनेक जण बैलाच्या मागे पळून त्याला जखमी करायचा प्रयत्न करीत असतात. बैल पळताना बाजूला उभे असलेले बघ्ये बैलाला छोटे बाणाच्या आकाराचे लोखंडी भाले फेकून मारतात. अंगात ठिकठिकाणी भाले घुसलेला तो बैल शेवटी बुलफाईटच्या मैदानात येतो. तिथे तलवारी घेऊन तीनचार जण त्याला तलवारीने जखमी करतात. शेवटी मुख्य मॅटॅडोर येतो व जीवाच्या भीतिने आकांताने धावून थकलेल्या, तलवारीच्या वारांमुळे व अंगात घुसलेल्या भाल्यांच्या जखमांच्या यातनांनी कळवळणार्‍या बैलाचे मस्तक तो तलवारीच्या एका घावात घडावेगळे करतो. जमलेले हजारो प्रेक्षक या मुक्या प्राण्याच्या यातनामय कत्तलीचा आनंद लुटत असतात. मुक्या प्राण्याला इतक्या यातना देताना आनंद कसा मिळू शकतो? वेदनांनी कळवणार्‍या बैलाच्या वेदनांनी करमणूक कशी होऊ शकते? भारत देखील या घॄणास्पद प्रकारापासून दूर नाही. शेतीसाठी बैल वापरण्याआधी मोठ्या दांडक्याने बैलाचे वृषण चेचून भुगा करून टाकतात जेणेकरून तो गायीबरोबर आपले नैसर्गिक कृत्य करू शकणार नाही. माणूस त्याची नैसर्गिक उर्मीसुद्धा स्वतःच्या स्वार्थासाठी नष्ट करतो व तीसुद्धा अत्यंत वेदनादायक पद्धतीने. उर्मिला पवार यांच्या 'आयदान' पुस्तकात बैलाच्या खच्चीकरणाचे वर्णन दिले आहे. दांडक्याने वृषण चेचले जात असताना बैलाला किती यातना होत असतील. माणूस त्याला एवढ्या यातना का देतो? बैलाचे वृषण खच्ची करण्याचे काम करणार्‍या नराधमाचे वृषणही असेच चेचून काढले पाहिजेत म्हणजे त्याला त्या यातना कशा असतील ते कळेल. बैलगाडीला जोडण्यासाठी बैलांच्या तळपायात खिळे ठोकून नाल बसवितात. नाल बसविण्यासाठी आधी बैलाला खाली बसवून आडवे पाडतात व त्याचे चारही पाय बांधून मग खिळे ठोकून नाल बसवितात. नाल बसविताना बैलाच्या डोळ्यातून वेदनांनी पाणी वाहत असते. कशासाठी हा क्रूरपणा? मला कधी कधी वाटते की बैलांच्या तळतळाटामुळेच कदाचित शेतकर्‍यांची हलाखीची परिस्थिती असावी. आपल्याला यातना देणार्‍याला बैलांचे शिव्याशाप भोवत असतील. काही दिवसांपूर्वी कोल्हापूरमध्ये झालेली'पारंपारिक' मेंढ्यांची टक्कर दाखवित होते. जमलेले प्रेक्षक दोन मेंढ्यांच्या आपापसातील टकरीचा आनंद लुटत होते. दोन्ही मेंढे आपल्या पूर्ण ताकदीनिशी दुसर्‍याच्या कपाळावर जोरदार धडक मारत होते. दोघांनाही वेदना होत असणारच. कदाचित कपाळाची हाडेही मोडत असतील. आणि असल्या क्रूर प्रकाराचा प्रेक्षक आनंद लुटत होते. काही ठिकाणी कोंबड्यांची झुंज सुद्द्धा लावतात. या झुंजीत कोंबड्याच्या एका पायाला ब्लेडचा अर्धा तुकडा बांधलेला असतो जेणेकरून समोरच्या कोंबड्याचे रक्त निघेल. दोन्ही कोंबडे मूर्खासारखे एकमेकांशी लढाई करून जखमी होतात व माणसे आपली करमणूक करून घेतात. बैलगाडी शर्यत हा असाच एक क्रूर प्रकार. सुदैवाने सर्वोच्च न्यायालयाने या प्रकाराला सुद्धा बंदी घातली आहे. तरीसुद्धा बैलगाडी शर्यत पुन्हा सुरू करावी यासाठी महाराष्ट्रात जोरदार प्रयत्न सुरू आहेत. या शर्यतीतही बैलांना जोरात पळविण्यासाठी शेपटी पिरगाळणे, खिळा लावलेल्या चाबकाचे फटकारे लावणे असे क्रूर प्रकार केले जातात आणि वेदना होत असताना भीतिने बैल जोरात गाडी पळवितात कारण आपली उच्च प्रथा आणि परंपरा! नवसासाठी व धार्मिक परंपरेसाठी कोंबड्या, बकर्‍या कापणे हा प्राण्यांना यातना देण्याचाच एक प्रकार. हे बळी थांबावेत म्हणून संत गाडगेबाबांनी प्रबोधन करण्याचा खूप प्रयत्न केला. परंतु अजूनही हा प्रकार सुरूच आहे. मांग जातीत एखाद्याचे लग्न ठरताना किंवा त्याआधी काही वर्षे लग्नासाठी नवर्‍यामुलाच्या नावाने एक डुक्कर सोडले जाते. ऐन लग्नाच्या वेळी हे डुक्कर पकडून त्याला जिवंत जाळून त्याचे मांस खाल्ले जाते. जिवंत जळताना त्या डुकराला किती भयानक वेदना होत असतील. प्रथा व परंपरा या नावाखाली हे क्रूर प्रकार कायमच सुरू राहणार का? जिव्हालौल्यासाठी जिवंत प्राणी क्रूर पद्धतीने मारणे हे जगभर सर्वत्र केले जाते. कासव, शिंपले, बेडूक, खेकडे इ. प्राण्यांना जिवंतपणीच उकळत्या पाण्यात टाकणे, बदक/हंस इ. प्राण्यांची आत असलेली मान बाहेर काढण्यासाठी त्याच्या तोंडासमोर खाणे धरणे व खाणे खाण्यासाठी त्याने मान सरळ केल्यावर मानेवर घाव घालून त्यांना मारणे अशा क्रूर पद्धतीने हे प्राणी जिभेचे चोचले पुरविण्यासाठी मारले जातात. अरे प्राणी मारायचा असेल तर निदान त्या प्राण्याला भूल देऊन वीजेचा शॉक देऊन वेदनारहीत मरण तरी द्या. हालहाल कशाला करता? मुक्या प्राण्यांना प्रथा व परंपरेच्या नावाखाली आपल्या करमणुकीसाठी व जिव्हालौल्यासाठी वेदना, यातना देऊन त्यांचा छळ करणे व नंतर मारून टाकणे हे अत्यंत क्रूरकर्म आहे व या प्रकाराचा मला अतिशय संताप येतो. हे सर्व प्रकार तातडीने कायमस्वरूपी बंद व्हायला हवेत. सुदैवाने सर्वोच्च न्यायालय याविषयी सक्रीय असून या प्रकाराला कायद्याने बंदी घालण्यात येत आहे ही समाधानाची गोष्ट आहे.

वाचने 74908
प्रतिक्रिया 282

प्रतिक्रिया

गुरूजी.. धाग्याचा नक्की उद्देश / संदेश काय आहे..? तुम्ही सुरूवातीला प्रश्न विचारून शेवटी "सुदैवाने सर्वोच्च न्यायालय याविषयी सक्रीय असून या प्रकाराला कायद्याने बंदी घालण्यात येत आहे ही समाधानाची गोष्ट आहे. " असे विधान केले आहे म्हणून विचारत आहे.

जरी वेदनादायक असले तरी नाल बसवणे बैलांसाठी हिताचेच आहे. नांगरट आणि इतर मशागत करताना खुरांना इजा होऊ नये आणि डांबरी रस्त्यावर चालताना पाय घसरू नये म्हणून नाल बसवतात. चाप देणे सुद्धा बैलाच्या आरोग्यासाठी चांगलेच आहे. चाप दिल्यामुळे बैले व्यवस्थित खातात पितात. खिलारी बैले जर अशीच मोकाट ठेवली तर कासरे (दोर खंड) तोडून गाईचं नाही तर माणसांवरती पण उडतील (समर्पक शब्द नाही मिळाला. गैर वाटत असेल तर संपादक मंडळ संपादन करू शकता). म्हणून शेतीसाठी बैल वापरूच नका असे कृपया कोणी फुकटचे सल्ले देऊ नये कारण शेतातले कडे कोपऱ्यांची चांगली मशागत फक्त बैलच करू शकतात. तिथे ट्रॅक्टरचे काम नाही. बाकी बैल मालक (शर्यतीचे आणि शेतात काम करणाऱ्या) बैलाची काय लाड पुरवतात आणि त्यांचे एकमेकांबद्दल काय प्रेम असते ते सांगतो नंतर कधीतरी. मला कधी कधी वाटते की बैलांच्या तळतळाटामुळेच कदाचित शेतकर्‍यांची हलाखीची परिस्थिती असावी. आपल्याला यातना देणार्‍याला बैलांचे शिव्याशाप भोवत असतील.>>> -- शेतकऱ्यांच्या हलाकीचे हे एक कारण असू शकते असे म्हणणे तुमच्या सारख्या अभ्यासू मिपाकराकडून अपेक्षित नव्हते. असो... (अवांतर: एक तर आजकाल देशी गाईंचे वाण कोणी पाळत नाही जर त्यावर असे आणखी बंधने कोणी टाकली तर गोवंशाचे संवर्धन होणे मुश्किल होऊन बसेल.

In reply to by विशुमित

बैलांच्या पायात खिळे ठोकून नाल बसविणे आणि दांडक्याने त्याचे वृषण चेचून भुगा करणे हे कोणाच्या हिताचे आहे? बैलाच्या का त्याच्या मालकाच्या? किंवा त्याच्या नाकात वेसण घालून त्याला बैलगाडीला किंवा नांगराला जुंपून वजन ओढायला लावणे हे काय बैलाच्या हिताचे आहे का? त्या प्राण्याची नैसर्गिक कामप्रेरणा सुद्धा क्रूर पद्धतीने नष्ट करून त्याला नैसर्गिक आनंदापासून वंचित ठेवणे हे बैलाचा हिताचे आहे का? बैलाचा मालक आपल्या स्वार्थासाठी बैलाचा छळ करतो. हे करताना त्या मुक्या प्राण्याला मरणांतिक यातना झाल्या तरी मालकाला काय फरक पडतो? एवढ्या यातना व कष्ट देऊन नंतर त्याचे लाड पुरविणे किंवा लाड करणे म्हणजे एखाद्याला वारंवार मरेस्तोवर चोप देऊन नंतर त्याला सॉरी म्हणण्यासारखं आहे.

In reply to by श्रीगुरुजी

म्हणजे बैल शेतीसाठी नाही वापरले पाहिजे असे सूचित करायचे आहे का तुम्हाला ? तसं असेल तर आपला पास... शक्य असेल तर उडणाऱ्या बैलांचे काय करायचे त्याचा उपाय पण सांगा. (बाकी औदयोगिक क्षेत्रात काम करणाऱ्या बैलांचे काय हित होऊ शकतं याचे पण पृथक्करण केला तर बरे होईल.)

In reply to by विशुमित

म्हणजे बैल शेतीसाठी नाही वापरले पाहिजे असे सूचित करायचे आहे का तुम्हाला ?
हेच सांगायचं आहे. ट्रॅक्टर वापरा, इतर कोणतीही यंत्रे वापरा, माणसे वापरा परंतु स्वतःच्या स्वार्थासाठी मुक्या प्राण्यांना यातना देऊन व त्यांचा छळ करून त्यांचा वापर करू नका.
शक्य असेल तर उडणाऱ्या बैलांचे काय करायचे त्याचा उपाय पण सांगा.
हास्यास्पद प्रश्न

In reply to by श्रीगुरुजी

हास्यास्पद प्रश्न>>> -- का हास्यापद ? माझ्या कडे २ खोंडे आहेत. दुशी... काय करू त्यांचे ? बांधून ठेवू का सोडून देऊ?

In reply to by विशुमित

औदयोगिक क्षेत्रात काम करणाऱ्या बैलांचे काय हित होऊ शकतं
औदयोगिक क्षेत्रात काम करणारे बैल म्हणजे नक्की कोण..?

In reply to by मोदक

औदयोगिक क्षेत्रात काम करणारे बैल म्हणजे नक्की कोण..? काही नाही. शेत कसता येत नाही म्हणून बळच उद्योग क्षेत्रात काम करणार्‍या कर्मचार्‍यांवर दुगाण्या झाडायच्या हा भारतात बर्‍याच शेतकर्यांचा जुनाच धंदा आहे.

In reply to by अप्पा जोगळेकर

तुमचा काही तरी गैरसमज होतोय अप्पा जी. ह्या दुगाण्या शेती न कसणाऱ्यांना साठी नव्हत्या. नोकरी मध्ये बैला सारखे राबवून घेणाऱ्या प्रवृत्तीला होत्या. तुम्ही लगेच शेतकऱ्यांवर बिल फाडून मोकळे झालात. असो तसे ही भारतात बऱ्याच शहरी लोकांचा शेतकऱ्यांची अक्कल काढण्याचा जुनाच धंदा आहे.

In reply to by विशुमित

औद्योगिक बैलांना राबवून जाउन न देण्याचा हक्क/पर्याय असतो. आपली कामप्रेरणा नष्ट होउन न देण्याचा, चाप वावून न देण्याचा, पायात नाल ठोकून न घ्यायचा, नाकात वेसण न घालून घ्यायचा, बैलगाडी / नांगर ओढायला नकार द्यायचा हक्क/पर्याय बैलाकडे असतो का?

In reply to by विशुमित

औद्योगिक बैलांना राबवून जाउन न देण्याचा हक्क/पर्याय असतो. आपली कामप्रेरणा नष्ट होउन न देण्याचा, चाप वावून न देण्याचा, पायात नाल ठोकून न घ्यायचा, नाकात वेसण न घालून घ्यायचा, बैलगाडी / नांगर ओढायला नकार द्यायचा हक्क/पर्याय बैलाकडे असतो का?

In reply to by श्रीगुरुजी

दांडक्याने त्याचे वृषण चेचून भुगा करणे हे कोणाच्या हिताचे आहे>>> -- दगडाने चेचण्याची पद्धत मी तरी नाही पाहिली. जुनी असावी बहुतेक. आता नवीन पद्धतीचे पकड सदृश चाप असतात. आमच्या कडे तरी प्रशिक्षित पशु वैदिक अधिकारी ते काम करतात. तुमचा प्राणीमात्रा बद्दलचा कळवळा स्तुत्य आहे पण शेवटी माणूस हा माणूस च असतो आणि बैल हा बैलच. (रच्यक तुम्ही तुमच्या घरात पेस्ट कंट्रोल करता का हो?)

In reply to by विशुमित

उर्मिला पवार यांच्या 'आयदान' या पुस्तकात दांडक्याने वॄषण चेचून भुगा करण्याच्या प्रकाराचे वर्णन आहे. अगदी बैलाला भूल देऊन वेदनारहीत त्याचे वृषण काढून टाकतात असे समजले तरी त्या प्राण्याचे हे अवयव काढून टाकण्याचा हक्क बैलांच्या मालकांना कोणी दिला? माणूस हा माणूस असतो व बैल हा बैलच असतो हे खरे असले तरी त्यांच्यात बुद्धीचा फरक असतो. वेदना, यातना, क्षुधा, कामप्रेरणा या भावना दोघांनाही असतात. माणसांना जशा वेदना होतात तशा प्राण्यांनाही होतात.

In reply to by श्रीगुरुजी

उर्मिला पवार डॉक्टर आहेत का ? पुस्तकात लिहिलेला मजकूर आता चालू घडीचा आहे की काही वर्ष पूर्वीचा? अवयव काढून टाकण्याचा हक्क बैलांच्या मालकांना कोणी दिला?>> -- ज्याचा बैल आहे त्याला हक्क असणारच. गोवंश हत्या सोडली तर तो हक्क अबाधित असावा नाहीतर पशु वैद्यकीय अधिकाऱ्यांनी ते काम केले नसते. माणसांना जशा वेदना होतात तशा प्राण्यांनाही होतात.>> -- ठीक आहे माझी 2 खिलारी खोंडे आहेत देऊ का तुमच्या साम्भाळाय ला? माझ्या पेक्षा जास्त लळा लावू शकाल त्यांना तुम्ही.

In reply to by विशुमित

प्राण्यांवर होणार्‍या अत्याचाराचे वर्णन करण्यासाठी डॉक्टरकीची पदवी आवश्यक आहे हे सांगितल्याबद्दल धन्यवाद! एखाद्याच्या मालकीचा बैल आहे याचा अर्थ बैलाचा छळ करून यातना देण्याचा त्याला हक्क मिळतो हे सांगितल्याबद्दल धन्यवाद! तुमच्या खिलारी खोंडांचे हाल करून त्यांना यातना देऊ नका एवढीच विनंती आहे.

In reply to by श्रीगुरुजी

प्राण्यांवर होणार्‍या अत्याचाराचे वर्णन करण्यासाठी डॉक्टरकीची पदवी आवश्यक आहे हे सांगितल्याबद्दल धन्यवाद!>>> -- चाप देणे यात अत्याचार काय आहे हे नाही समजलं. काम उतेजीत झालेली खोंडे काय उच्छाद मांडतात याची कदाचित तुम्हाला कल्पना नसावी. अशा बैलांनी जर कासरे तोडले तर स्वतःबरोबर इतर प्राण्यांना पण इजा करतील. मनुष्य हानी पण होऊ शकते. (साहेब आमची लहान लेकरं खेळतात ओ गोठ्याजवळ) एखाद्याच्या मालकीचा बैल आहे याचा अर्थ बैलाचा छळ करून यातना देण्याचा त्याला हक्क मिळतो हे सांगितल्याबद्दल धन्यवाद!>>> -- चाप देणे छळ कसा? बैलांना बिलकुल काम क्रीडा करूनच देत नाहीत असा तुमचा गैरसमज झालेला दिसतोय. ज्या वेळेस बैल जास्त त्रास देतो त्याच वेळेस त्याला चाप दिला जातो. त्याने बैलांचे आरोग्य चांगले राहते. बाल ब्रह्मचारी करून नाही ठेवत त्यांना कोणी. तसे असते तर गोवंश वाढलंच नसता. तुमच्या खिलारी खोंडांचे हाल करून त्यांना यातना देऊ नका एवढीच विनंती आहे.>>> -- बरोबर आहे तुम्ही माझ्या खोंडाची जवाबदारी कशी घ्याल? वसू बारसेला नैवेद्य चारण्या पुरती गोभक्ती (प्राणी भक्ती म्हणा) असणारे उपदेशाचे डॉस पाजणारच. तशी मी माझी खोंडे माझ्याच दावणीत ठेवणार. लाड पण करणार आणि जास्त ताप दिला तर चाप पण देणार. मोठी झाल्यावर औताला पण झुंपणार. शेवटी ती बैलच, नांगरायचाच कामाची. (पेस्ट कंट्रोल करता का त्याचे उत्तर नाही दिले अजून. तशी सक्ती नाही आपलं असंच)

In reply to by सांगकाम्या राक्षस (verified= न पडताळणी केलेला)

का विकू नये? बैलं माझी आहेत म्हंटल्यावर विकायचा कि ठेवायची हा अधिकार माझा असणार आहे ना. (भ्रामक कल्पनेतून कृपया बाहेर या)

In reply to by विशुमित

घरची सगळी जनावरे दावणीवरच मरण पावली आहेत - म्हातारी होऊन किंवा आजारीपणाने. आम्ही गाईबैलांची किंमत पैशांनी करत नाही. बाकी जैसी जिसकी सोच.

In reply to by सांगकाम्या राक्षस (verified= न पडताळणी केलेला)

घरची सगळी जनावरे दावणीवरच मरण पावली आहेत - म्हातारी होऊन किंवा आजारीपणाने>> -- आमची पण.. कुठलंच जनावर निवर्तल्यावर उघड्यावर कधी नाही टाकलं. रीतसर खड्डा खणून मीठ टाकून मूठमाती दिली आहे. बाकी जैसी जिसकी सोच.>>> "म्हातारी झाल्यावर विकू नका म्हणजे मिळवल." हा आगाऊ सल्ला दिल्या मुळे म्हणावं लागलं माझी खोंडे आहेत निर्णय मीच घेणार. तसा शर्यतीला माझा विरोधच आहे पण धागा लेखकाने पाप पुण्याच्या फेऱ्यांमध्ये शेतकऱ्याला विनाकारण ओढलं म्ह्णून हा लेख प्रपंच.

In reply to by सांगकाम्या राक्षस (verified= न पडताळणी केलेला)

म्हातारे बैल न विकणे परवडेल का कोणाला ? बैल, कोंबड्या, डुक्कर, मेंक्कर्,व्यावसायिक उपयोगासाठीच पाळतात. कोंबडी या प्राण्याला तर भारताची राष्ट्रीय भाजी म्हणून घोषित करावे इतके त्यांचे मरण कॉमन झाले आहे. त्यांना पण मारायचे नाही असे म्हटले तर अवघडच आहे.

In reply to by श्रीगुरुजी

हा चाप.कसा देतात ते सांगता का?>>> -- डिटेलवार उद्या सांगण्याचा प्रयत्न करतो.. घरात पेस्ट कंट्रोल आजतागायत केलेले नाही. -- चांगली गोष्ट आहे. डास मारलाय कधी?

In reply to by श्रीगुरुजी

शनिवारी पशु वैद्यकीय अधिकाऱ्यांकडे गेलो होतो या माहिती साठी पण ते रजेवर होते २ दिवस त्या मुले माहिती नाही मिळू शकली. काही जुन्या जाणत्या बैलवाल्याना विचारलं त्या बाबत. बहुतेक सगळ्याच बैलांना चाप साठी सामोरे जावा लागतं. काही ना खूप लवकर तर काहींना उशिरा. काही खोंडांच्या वृषणाला लहानपणीच रुईचा चीक रोज थोडा थोडा चोळतात. त्यामुळे त्याला नंतर सहसा चाप देण्याची गरज भासत नाही. चाप म्हणजे एक अडकित्यासदृश हत्यार असते. बैलाला जनावरांच्या दवाखान्यातील खांबाला बांधतात. पशु वैद्यक वृषणाला साबण लावून स्वच्छ करतात, मग त्यावर जेली सारखी क्रिम लावून त्या चापाने वृषणाची नस तोडतात. त्या नंतर जास्त आग होऊ नये म्हणून त्यावर दुसरी क्रिम देतात. (त्या कोणत्या क्रिम आहेत त्याची डिटेल माझ्याकडे नाही). साधारण २-३ दिवस बैल कुचमतो. कधी कधी ताप पण येतो. पण ३-४ दिवसांनी व्यवस्थित होतो. चाप कधी देतात-- -- बैल जसा तरुण होत जातो त्याचे वृषण खाली लोम्बत जाते त्याने त्याला चालण्याला त्रास होतो. -- बैलाच्या अंगात ताकत वाढत गेली की खूप मस्तावल्या सारखे करतात. कोणाला ही पुढे येऊन देत नाहीत. मालकाला पण डाफरतात. -- शिंगांनी माती उकरतात. त्यामध्ये त्यांची शिंगे ही मोडू शकतात. -- काम उतेजीत झाले तर शेजारील इतर जनावरांवर उड्या मारतात आणि इजा ही पोहचवतात. गाई माजावर असली तरच त्याला चिटकवून घेते त्यामुळे बैलांचा नैसर्गिक काम दाबला जातो ह्या म्हणायला काही अर्थ नाही. माणसा सारखं नसतं जनावरांचं. -- बैल त्याचे लिंग बाहेर काढून जमिनीवर घासत राहतो त्यामुळे त्या भयंकर इजा होऊ शकते. चाप देण्याचे फायदे: -- बैलांची तब्येत चांगली राहते. (माणसाला नाही का आपण काम वरती संयम राखायला सांगतो) -- बैल मारायचं प्रमाण कमी होते. -- औताला चांगलं काम करतात. -- वृषण जास्त वाढत गेल्याने आरोग्याची समस्या निर्माण होते. (मला नाही समजला हा पॉईंट ) -- चाप देणं हे एक प्रकारची नस बंदीच असते त्याने बैलांच्या कामा क्रीडे वरती काही परिणाम नाही होतं. (यासाठी मी कन्फर्म नाही पशु वैदकांना भेटल्यावर सांगतो) एवढ नक्की की चाप देणे खरंच वेदना दायक आहे. गुरुजींनी या प्रकरणाला पाप पुण्याची झालर दिली म्हणून प्रायश्चित म्हणून जेव्हा वेळ येईल तेव्हा स्वतःची नसबंदी करून घेण्याची मनीषा आहे.

In reply to by विशुमित

खरच प्रायश्चित्त करायचं असेल तर नसबंदी करताना ॲनेस्थेशिया घ्यायचा नाही आणि बैलाला जितकं निर्जंतुकीकरण करतो तितकच स्वत:लाही करायच - हे ही मुद्दे ॲड करावे लागतील का हो? माणसाची आणि जनावराची काम प्रेरणा सारखी नाही रच्याकने. माणूस २४*३६५ तयार असतो. म्हणून त्याला संयम ठेवणे गरजेचे असते.

In reply to by विशुमित

-- चाप देणं हे एक प्रकारची नस बंदीच असते त्याने बैलांच्या कामा क्रीडे वरती काही परिणाम नाही होतं. (यासाठी मी कन्फर्म नाही पशु वैदकांना भेटल्यावर सांगतो)
चाप देणे म्हणजे फक्त नसबंदी असते का बैलाला कायमस्वरूपी नपुंसक बनविले जाते? फक्त नसबंदी असेल तर त्यामुळे कामक्रीडेवर परीणाम होणार नाही हे बरोबर आहे. परंतु चाप लावणे म्हणजे फक्त नसबंदी असेल तर त्यांची कामप्रेरणा आहे तेवढीच राहील (फक्त नवीन वासरांना जन्म देण्यास उपयोग होणार नाही) आणि त्याचबरोबर वृषण खाली लोंबणे, शिंगांनी माती उकरणे, मस्तवालपणा, कामोत्तेजित होऊन इतर जनावरांवर उड्या मारणे, लिंग बाहेर काढून जमिनीवर घासणे इ. प्रकार सुरूच राहतील. त्याचप्रमाणे बैलांची तब्येत चांगली राहणे, मारण्याचे प्रमाण कमी होणे, औताला चांगलं काम करणे, वृषण न वाढणे इ. वर सांगितलेले फायदे मिळणारच नाहीत. म्हणजेच चाप लावणे ही फक्त नसबंदी नसून त्याची कामप्रेरणा कायमस्वरूपी नष्ट करून त्याला नपुंसक बनवून टाकण्याची क्रिया असावी. चाप लावताना भूल देतात का तसाच जागतेपणी हा प्रकार करतात?

विश्वनाथन आनंदही??? तामिळींच्या एकूण बुद्धिमत्तेबद्दल शंका येण्यासारखे बरेच प्रकार घडत असतात. सगळंच अवघड आहे. माणूस हा सगळ्यात क्रूर प्राणी आहे हे वेगळेच.

In reply to by पैसा

जालीकट्टू समर्थकांच्या मांदियाळीत आता कमल हासन, क्रिकेटपटू रविचंद्रन अश्विन आणि श्री श्री रविशंकर हे सुद्धा सामील झाले आहेत. श्री श्री रविशंकर हे आध्यात्म क्षेत्रातील असल्याने प्राण्यांना होणार्‍या यातनांना त्यांचा विरोध असेल असे वाटत होते. शेपटी पिरगाळताना बैलाला होणार्‍या वेदना त्यांना समजत असतील. श्री श्री रविशंकर यांची लांबलचक दाढी एखाद्याने जोरजोरात खेचली आणि उपटली तर त्यांना किती वेदना होतील? अशाच वेदना बैलालाही होत असणार. परंतु 'Thou too Brutus!' असेच आता खेदाने म्हणावे लागेल. माणसांचा क्रूरपणा फक्त बैल, कोंबड्या, बकर्‍या यांच्यापुरताच मर्यादीत नाही. अश्वशर्यतीत धावणारे अश्वसुद्धा माणसांच्या क्रूर करमणुकीचे बळी आहेत. या अश्वांच्या पाठीवर त्यांचा क्रमांकाचा लोखंडी डाग तापवून त्या क्रमांकाचा टॅटू त्यांच्या पाठीवर कायमस्वरूपी उमटविला जातो. तापविलेल्या लालभडक लोखंडी डागाचा चटका बसताना त्या मुक्या प्राण्याला किती वेदना होत असतील याची क्रूरकर्म्यांना फिकीर नसते. एवढ्या यातना मिळूनसुद्धा तो बिचारा मालकासाठी शर्यतीत जीव तोडून धावतो आणि मालकाला मालामाल करताना जमलेल्या प्रेक्षकांचीही करमणूक करतो व त्यातल्या काही जणांना सुद्धा तो मालामाल करतो. परंतु बिचार्‍याचे दुर्दैव इथेच संपत नाही. वॄद्धापकाळामुळे किंवा काही अपघाताने जायबंदी होऊन त्याचे शर्यतीत धावणे थांबल्यानंतर त्याला उर्वरीत आयुष्यात पोसायला नको म्हणून कृतघ्न मालक त्याला क्रूरपणे कपाळावर दोन डोळ्यांच्या मध्यभागी गोळी घालून मारून टाकतात. काही श्वानमालकही असेच क्रूर असतात. कुत्रा म्हणे घाबरला की दोन पायात शेपटी घालून पळतो. त्याची भीति जावी म्हणून काही मालक त्याची शेपटीच मुळासकट कापून टाकतात. इतका मूर्खपणा करणार्‍यांची धन्य आहे. मुळात भीति या भावनेचे प्रकटीकरण म्हणून कुत्रा शेपटी आत घालतो. शेपटी मुळासकट कापली तरी मनातून व वागणुकीतून भीतिची भावना कशी मुळापासून नष्ट होईल? बिचार्‍याला निसर्गाने एक अवयव दिला आहे त्याचा काहीतरी उपयोग असणारच. परंतु दुष्ट माणूस त्याचा हा अवयवही कापून मोकळा होतो. मासे पकडण्यासाठी गळाला टोचली जाणारी गांडुळे, नदीतून पकडलेले खेकडे पळून जाऊ नयेत म्हणून पकडल्यावर लगेच त्यांचे चारही पाय काकडी मोडल्यासारखे मोडून टाकणे, दसर्‍याच्या दिवशी अजूनही काही खेड्यातून रेड्याचे चारही पाय तोडून त्याला देवीसमोर बळी देणे ही अजून काही क्रूरतेची उदाहरणे. दुर्दैवाने प्राणीपक्षांचे हालहाल करून त्यांना यातना देणार्‍या या क्रूर प्रकारांचा व्हावा तितका निषेध होत नाही.

In reply to by श्रीगुरुजी

मासे पकडण्यासाठी गळाला टोचली जाणारी गांडुळे, नदीतून पकडलेले खेकडे पळून जाऊ नयेत म्हणून पकडल्यावर लगेच त्यांचे चारही पाय काकडी मोडल्यासारखे मोडून टाकणे, गुर्जी, अगदीच राजा अशोकाची राजवट आणायची आहे का ?

In reply to by श्रीगुरुजी

तशी वैयक्तिक पातळी वर उतरण्याची मला गरज नाही पण तुम्ही हा लेख आणि प्रतिक्रिया अत्यंत पोटतिडीकीने लिहिलेल्या जाणवल्या. म्हणून मी खालीलप्रमाणे अंदाज लावत आहे. तुम्ही गहू ज्वारी खात असतांना त्या त्या झाडांची न जन्मलेली मुलेच खात असता. पाले भाज्या खात असतांना झाडांची नाके तोडून खात असता. फळे झाडांनी त्यांच्या पुनरुत्पादनासाठी निर्माण केलेई असतात. मटकी तशी फार छान लागते पण तिचे मोड म्हणजे नक्की काय ? झाडांना दुःख होत नाही काय ? त्यासाठी तुम्ही स्वतःला काय शिक्षा दिलीत ? कि झाडे ओरडत नाहीत म्हणून ते माफ आहे ? झाडे एखादा अवयव तोडल्यावर गंध रूपाने अनेक डिस्ट्रेस सिग्नल्स सोडतात. तो गंध आपल्याला खमंग वाटतो. बैलांची गोष्ट कराल तर खच्चीकरण न झालेला बैल फार हिंसक असतो. शेतीची कामे तर सोडा, तो एखाद्याचा जीवही घेऊ शकतो. जर बैल केंद्रित शेतीच नष्ट करायची असेल तर तुम्हाला दुध तर प्यायलाच मिळणार नाही आणि जे काही अन्न मिळेल ते हि अत्यंत महाग मिळेल. ( tractor ची किंमत आणि त्याचे maintenance सर्वांना परवडते, किंवा ज्यांना परवडत नाही ते सर्व स्वतः कुदळ घेऊन नांगरणी करतात, शेणखत नसल्याने रासायनिक खते सर्व जण विकत घेतात, असे गृहीत धरू. पण तुम्ही शेती करत नसल्याने तुम्हाला दुध आणि जेवणाएवढाच फरक पडेल.) दुध पीत असतांना आपण कोणत्या वासराचा हक्क ओरबाडत आहोत याची जाणीव तुम्हाला असावी असे मला वाटते. अमेरिकेसारख्या देशात जेथे फक्त दूधच महत्वाचे आहे तेथे जन्मल्याबरोबर बैलांचे काय होते ते तुम्ही वाचले असेलच. घोड्यांची गोष्ट कराल तर जखमी झालेला किंवा पाय मोडलेला घोडा तसाही फारसा जगत नाही. बाकी मुद्द्यांना पास.. जलेईकत्तु बद्दल जास्त माहित नसल्याने पास.

In reply to by सांगकाम्या राक्षस (verified= न पडताळणी केलेला)

आणि खच्चीकरण न केलेला बैल काय उच्छाद मांडू शकतो ते पाहिलेय मी कित्येक वेळा. स्वतः बैलासाठीही ते चांगले असते.

In reply to by सांगकाम्या राक्षस (verified= न पडताळणी केलेला)

पोटाची गरज आणि गमती करताचे क्रौर्य ह्यातला फरक समजून घ्यावा ही नम्र विनंती

आय मस्ट से सॅडली, यु आर हायली अनइंफॉर्म अबाउट जलीकट्टू , तू काय बोलते तुझ्या लेख मंदी ते समदा झूट हाय. ऍटलिस्ट विकिपीडिया तरी वाचायचा असता बिफोर पब्लिशिंग युअर व्हेजीनाझी अजेंडा ऑन ओपन फोरम, १/३ लेख तू स्पॅनिश बुल फायटिंग वर लिवलानी, त्येंचा कल्चरल रिलेशन काय इंडियन जलीकट्टू सोबत त्ये लिव्हलाच नाय, बर लेट इट बी केप्त असाईड. जलीकट्टू मंदी तू कोन्या एका मॅड मॅनला बुलचा टेल चावताना पाहिला. तेच्यावरून तू बध्दा जलीकट्टू रॉन्ग असल्याचा सांगून टाकते, हाऊ अब्सर्ड, बिसाईड्स जलीकट्टू हे 'बुलफायटिंग' सारखा हाय का 'रोडीयो' टाईप हाय हा अभ्यास वापस एकडाव कर बरं तू. अँड येस, आय ऍग्री विथ सन विशुमित अल्सो.

एखाद्या प्रकाराला समर्थन आहे म्हणजे त्या व्यक्तीच्या किंवा व्यक्तीसमूहाच्या बुद्धीमत्तेवर संशय व्यक्त करणे पटत नाही. जलीकटूबद्दल मला व्यक्तिशः जास्त माहिती नाही, त्यामुळे कोणता पक्ष योग्य आहे हे सांगू शकत नाही. पण तमिळ लोक एवढ्या संख्येने त्याला समर्थन करत आहेत म्हणून त्यांची सामुहिक अक्कल काढण्याची गरज वाटत नाही. जगभरात कोणत्याही देशात काही ना काही विचित्र प्रथा असतातच, एका मनुष्यगटाला दुसर्‍या गटाच्या चालीरिती बुद्धिहीन वाटू शकतात ही शक्यता लक्षात असू द्यावी असे वाटते. मुक्या प्राण्यांवर अत्याचार वगैरे सर्व मान्य आहे. पण कधी कधी शंभर पैलूंपैकी एकच पैलू समोर आणून त्याबद्दल अतिरंजितपणा केला जातो का हेही बघायला हवे. प्रत्येक सणात काही ना काही मनुष्यहानी, प्राण्यांना त्रास होतोच होतो. कोणताही धर्म यास अपवाद नसावा. त्यामुळे सगळे धर्म, सगळ्याच चालीरीती, सगळेच सण बंद केले पाहिजेत, हो ना? अगदी कुळाचार-कुळधर्मातही घरच्या स्त्रीला बरेच कष्ट पडतात की. तेव्हा बुद्धिमान लोक काय पवित्रा घेतात हे बघायला पाहिजे. तसेच एखादी व्यक्ती एखाद्या खेळात, कलेत, क्षेत्रात हुशार-बुद्धिमान मानली जात असली म्हणजे ती बुद्धिप्रामाण्यवादीच असावी अशी अपेक्षा गैर आहे. सारासारविवेकबुद्धी, बुद्धिवादी असणे आणि एखाद्या कलेत-खेळात पारंगत असल्याने प्रसिद्ध असणे ह्याचा काही संबंध नाही.

In reply to by संदीप डांगे

प्रत्येक सणात काही ना काही मनुष्यहानी, प्राण्यांना त्रास होतोच होतो. कोणताही धर्म यास अपवाद नसावा. त्यामुळे सगळे धर्म, सगळ्याच चालीरीती, सगळेच सण बंद केले पाहिजेत, हो ना? अगदी कुळाचार-कुळधर्मातही घरच्या स्त्रीला बरेच कष्ट पडतात की. तेव्हा बुद्धिमान लोक काय पवित्रा घेतात हे बघायला पाहिजे.
ज्या प्रथांमुळे, परंपरांमुळे प्राणी, पक्षी किंवा माणसांचा छळ होतो, त्या सर्व प्रथा, परंपरा बंद केल्या पाहिजेत. घरच्या स्त्रियांना कष्ट पडत असतील तर कुळाचार, कुळधर्मही बंद व्हायला पाहिजेत. सती, केशवपन इ. घाणेरड्या प्रथा जश्या कायद्याने बंद केल्या तशाच छळाच्या इतर प्रथाही बंद व्हायला हव्यात.

माणसाच्या सुखासाठी जे प्राण्यान्चे हाल केले जातात ते आताच्या काळात तरी थाम्बले पाहिजेत. या शर्यती केवळ मनोरन्जनासाठी असतात, त्यान्ची काय आता आवश्यकता?

प्राण्यांच्या वेदना मांडल्याबद्दल लेखकांना बैलगाडा शर्यतीचे फ्री पासेस देण्यात येतील !

जल्लीकट्टू या प्रकाराचे नावही मला अगदी अलीकडल्या काळापर्यंत माहित नव्हते. पण एक गोष्ट नक्कीच सांगाविशी वाटते. जर शेतकरी या प्रकारात बैल वापरत असतील तर बैलांचा छळ करून आपण आपल्याच पायावर धोंडा पाडत आहोत हे त्यांच्या लक्षात येत नसेल असे वाटत नाही. शेवटी गाई-बैलांवर त्यांचे पोट अवलंबून असल्यामुळे त्यांचे प्राण्यांवर पोटच्या मुलांप्रमाणे प्रेम असते असे मला आतापर्यंत वाटत होते. तेच शेतकरी बैलांचा असा अमानुष छळ करत असतील हे अनाकलनीय आहे. त्यातूनच विविध पुरोगामी या प्रकाराविरूध्द एकजात उभे ठाकले आहेत त्यामुळे हा प्रकार इतका अमानुष आहे की तो भरपूर मीठमसाला टाकून सांगितला जात आहे ही शंका अजूनच बळावली आहे. शेवटी भारतीय (किंबहुना हिंदू) मूर्ख कसे हे सांगण्यात त्यांचा जन्म गेला असल्यामुळे अशा लोकांनी कुठल्याही प्रकारात उडी टाकली की ते चिमूटभर नव्हे तर मूठभर मीठासह घ्यावेसे वाटते. मिपावरील सगळ्यात कट्टर प्राणीप्रेमी असतील त्यात माझा नंबर बराच वरचा आहे हे नक्कीच.तेव्हा बैलांचा असा अमानुष छळ होत असेल तर त्याला माझाही प्रचंड विरोध आहे. पण सांगायचे इतकेच की ज्याच्यावर आपले पोट अवलंबून आहे त्याच बैलांचा असा छळ करण्याइतके शेतकरी मूर्ख असतील आणि आपल्याच पायावर धोंडा पाडणारी अशी परंपरा ग्रामीण भागातही इतकी शतके टिकू शकेल यावर विश्वास ठेवायला जड जाते इतकेच.

In reply to by गॅरी ट्रुमन

तुम्हाला ज्या प्रकारचे पुरोगामी अभिप्रेत आहेत त्यातला मी नाही. परंतु स्वतःच्या स्वार्थासाठी, चरितार्थासाठी व मनोरंजनासाठी मुक्या प्राणीपक्षांचा छळ करून त्यांना मरणांतिक यातना देणे या प्रकाराचा मला अत्यंत संताप येतो.

In reply to by श्रीगुरुजी

तुम्हाला ज्या प्रकारचे पुरोगामी अभिप्रेत आहेत त्यातला मी नाही.
नक्कीच :)
परंतु स्वतःच्या स्वार्थासाठी, चरितार्थासाठी व मनोरंजनासाठी मुक्या प्राणीपक्षांचा छळ करून त्यांना मरणांतिक यातना देणे या प्रकाराचा मला अत्यंत संताप येतो.
मलाही. फक्त मुद्दा इतकाच की शेतकरी बैलांवर किती अवलंबून असतात हे जगजाहिर असताना त्यांचाच असा छळ करण्याइतके ते मूर्ख असतात की हा सगळा प्रकार जितका आहे त्यापेक्षा बराच जास्त मीठमसाला लावून सांगितला जात आहे हे समजत नाही.

In reply to by गॅरी ट्रुमन

फक्त मुद्दा इतकाच की शेतकरी बैलांवर किती अवलंबून असतात हे जगजाहिर असताना त्यांचाच असा छळ करण्याइतके ते मूर्ख असतात की हा सगळा प्रकार जितका आहे त्यापेक्षा बराच जास्त मीठमसाला लावून सांगितला जात आहे हे समजत नाही.>>> -- माझे ना जल्लीकट्टू ला समर्थन आहे ना शर्यतींना, हे पहिले नमूद करू इच्छितो. फक्त विनंती आहे सारखे मूर्ख मूर्ख म्हणून शेतकऱ्यांबद्दल नाकाने कांदे सोलू नका. (ह्या वाक्याने झोंबेल बहुतेक ) राहिला प्रश्न जल्लिकट्टूचा किंवा शर्यतींचा सगळीच बैलं त्यासाठी वापरतात का हो?

Rules[11] 1.The Bull will be released on the the arena through the entry gate called ‘ Vadivasal’. 2.The bull tamer / contestant should try to ‘catch’ the bull by holding onto its hump only. 3.The bull-tamer should hold onto the bull till it crosses the ‘finish’ line. (Usually it is about 50 feet, marked by hanging overhead marker flags along the line.) 4.If the bull throws the tamer off before the line or if no-one manages to hold on to the bull, then the bull will be declared victorious. 5.If the bull-tamer manages to hold on to the hump till it crosses the ‘finish line’, then the bull tamer is declared the winner. 6.Only one bull tamer should hold on to the bull at one time. If more than one bull tamers hold on to the bull, then there is no winner. 7.The bull tamer should ONLY hold on to the hump. He should NOT hold on to the neck or horns or tails of the bull. Such tamers will be disqualifies. 8.No bull tamer will hit or hurt the bull in any manner. हे जल्लीकट्टूचे नियम विकीवर वाचले. जर असे नियमाप्रमाणे होत असेल तर आक्षेप घ्यावा असे काही नाही.

In reply to by अप्पा जोगळेकर

Controversy Animal activists, the Federation of Indian Animal Protection Organisations(FIAPO)[14] and PETA India have protested against the practice since 2004.[15] Protestors claims that Jallikattu is promoted as bull taming, but it exploits the bulls' natural nervousness as prey animals by deliberately placing them in a terrifying situation in which they are forced to run away from those they perceive as predators and the practice effectively involves catching a terrified animal.[16] Along with human injuries and fatalities, sometimes bulls themselves sustain injuries which people believe as a bad omen for the village. Other animal welfare concerns surround the handling before the bulls are released. Practices include prodding the bull with sticks or scythes, and extreme bending and biting of the bull's tail.

In reply to by अप्पा जोगळेकर

येस आपुनबी ह्येच वाच्यला विकीमंदी. अन हेच्यावरून बुल वर अत्याचार होत असल असे वाटत न्हाय.

असा छळ करण्याइतके शेतकरी मूर्ख असतील >>> -- गॉड गॉड भाषा वापरून शब्दाच्या गोफणी शेतकऱ्याच्या तोंडावर नका मारू.

इंटरनेटवर बघितलेले एक चित्र आठवले.. डाव्या बाजूने मासे, कोंबडी, बोकड, डुक्कर, गाय आणि सर्वात शेवटी माणूस असे प्राणी क्रमाने दाखवले होते व विचारले होते की "तुमची भूतदयेची रेषा नक्की कोणाच्या मध्ये आहे..?" ते चित्र कुणाला सापडले तर प्लीज द्या.

गुरुजी...तुमचा प्राणिमात्रांविषयी असलेला कळवळा दिसतो आहे. अत्यंत पोटतिडकीने तुम्ही लिहिले आहे. कोणत्याही प्राण्याने स्वतःच्या स्वार्थासाठी आणि मनोरंजनासाठी इतर प्राण्याला त्रास देऊन नये असे तुम्हाला म्हणायचे आहे. गुरुजी पण ह्या हिशोबानी तर पुनरुत्पादनाची प्रक्रिया बंदच करायला हवी. त्यातही प्रत्यक्ष क्रियेत,नंतरच्या गरोदरपणाच्या काळात आणि प्रत्यक्ष प्रसूतीमध्ये मादीला खूप त्रास होतो, प्रचंड वेदना होतात. हा उपरोध नाही. प्राण्यांचे खेळ बंद व्हायला हवे असे माझेही मत आहे. पण तुमचा 'सगळंच बंद करा' हा स्टॅन्ड मानवजातीला परवडणारा नाही.

In reply to by चिनार

बरं एकवेळ प्राण्यांचे खेळ करून मनोरंजन करणे गैर समजू पण शेतीसाठी बैल पण वापरायचे नाही ? म्हणून गुरुजींचा स्टॅन्ड चुकीचा वाटला. (त्यात अजून ते पेस्ट कंट्रोल करतात का हे समजलं नाही, मग चर्चा अजून रोचक होईल.)

In reply to by चिनार

>>> गुरुजी पण ह्या हिशोबानी तर पुनरुत्पादनाची प्रक्रिया बंदच करायला हवी. त्यातही प्रत्यक्ष क्रियेत,नंतरच्या गरोदरपणाच्या काळात आणि प्रत्यक्ष प्रसूतीमध्ये मादीला खूप त्रास होतो, प्रचंड वेदना होतात. सहमत आहे. हळूहळू संतती नको असणाऱ्या जोडप्यांची संख्या वाढत आहे. आपल्याला संतती हवी का नको हा दोघांचा निर्णय असायला हवा.

In reply to by श्रीगुरुजी

गुर्जींचा आय्डी हॅक झाला बहुतेक. दूध पिणार्‍या तान्ह्या बाळाचा बर्‍याच मातांना त्रास होतो. म्हणजे ओढाताण (शब्दशः) सहन होत नाही. (आणि नंतर नवर्‍यांना पण ताप होतो डोक्याला ) काय करायचे ? हे मी हॅकरला एक जोक म्हणून विचारत आहे. गुर्जींना नाही.