काय वेडेपणा चाललाय! सर्वोच्च न्यायालयाने बंदी घातलेली जालिकट्टू नावाची क्रूर प्रथा पुन्हा एकदा सुरू करावी यासाठी तामिळींचा जीव चाललाय. काही ठिकाणी बंदी झुगारून जालिकट्टू आयोजित करण्याचे प्रयत्न झाले. पण पोलिसांनी ते हाणून पाडले. तामिळनाडूचे मुख्यमंत्री ओ पनीरसेल्वम् यांनी तर केंद्र सरकारने सर्वोच्च न्यायालयाचा निर्णय झुगारून जालिकट्टू पुन्हा सुरू करण्याचा अध्यादेश काढावा अशी विनंती करण्यासाठी थेट दिल्ली गाठून पंतप्रधान मोदींची भेट घेतली. सर्वात वाईट भाग म्हणजे संगीतकार रहमान, माजी जागतिक बुद्धीबळ विश्वविजेता विश्वनाथन् आनंद याने सुद्धा जालिकट्टू पुन्हा सुरु करण्यासाठी पाठिंबा दिलाय. ही आमची अत्यंत जुनी परंपरा आहे, आम्ही ती चालू ठेवणारच, आमच्या परंपरेवर बंदी घालण्याचा अधिकार सर्वोच्च न्यायालयाला कोणी दिला अश्या आविर्भावात निदर्शने सुरू आहेत. जालिकट्टू तामिळींच्या जीवनमरणाचा प्रश्न झाला आहे.
जुनी परंपरा, प्रथा इ. गोष्टी खर्या असल्या तरी असल्या प्रथेत मुक्या प्राण्याचा छळ होतोय त्याचं काय? ते बैल काय स्वतः यातना सहन करून तुमची करमणू़क करण्याकरता या जगात आलेत का? एका वाहिनीवर दाखवित होते. एका बैलाभोवती सातआठ लुंगीधारी उभे होते. त्यातला एकजण बैलाची शेपटी ओढून जोरात पिरगाळत होता. दुसरा एकजण शेपटी दाताखाली धरून चावत होता. अरे कशासाठी त्या बैलाला यातना देता? परंपरा आणि प्रथा म्हणून? ही कसली क्रूर परंपरा? मुक्या प्राण्याला यातना देऊन कसली आलीय करमणू़क आणि प्रथा? अंगात एवढी मस्ती असेल तर एकमेकांशी फ्रीस्टाईल कुस्त्या खेळा की. प्राण्यांचा छळ का करता?
स्वतःच्या जिव्हालौल्यासाठी व करमणुकीसाठी मुक्या प्राण्यांना यातना देऊन त्यांचा छळ करण्याची प्रथा व परंपरा खूप जुनी आहे व जगात अनेक देशात ती अजून जिवंत आहे. स्पेनमध्ये बुलफाईट प्रकारात एका बैलाला गल्लीबोळातून पळविले जाते. अनेक जण बैलाच्या मागे पळून त्याला जखमी करायचा प्रयत्न करीत असतात. बैल पळताना बाजूला उभे असलेले बघ्ये बैलाला छोटे बाणाच्या आकाराचे लोखंडी भाले फेकून मारतात. अंगात ठिकठिकाणी भाले घुसलेला तो बैल शेवटी बुलफाईटच्या मैदानात येतो. तिथे तलवारी घेऊन तीनचार जण त्याला तलवारीने जखमी करतात. शेवटी मुख्य मॅटॅडोर येतो व जीवाच्या भीतिने आकांताने धावून थकलेल्या, तलवारीच्या वारांमुळे व अंगात घुसलेल्या भाल्यांच्या जखमांच्या यातनांनी कळवळणार्या बैलाचे मस्तक तो तलवारीच्या एका घावात घडावेगळे करतो. जमलेले हजारो प्रेक्षक या मुक्या प्राण्याच्या यातनामय कत्तलीचा आनंद लुटत असतात. मुक्या प्राण्याला इतक्या यातना देताना आनंद कसा मिळू शकतो? वेदनांनी कळवणार्या बैलाच्या वेदनांनी करमणूक कशी होऊ शकते?
भारत देखील या घॄणास्पद प्रकारापासून दूर नाही. शेतीसाठी बैल वापरण्याआधी मोठ्या दांडक्याने बैलाचे वृषण चेचून भुगा करून टाकतात जेणेकरून तो गायीबरोबर आपले नैसर्गिक कृत्य करू शकणार नाही. माणूस त्याची नैसर्गिक उर्मीसुद्धा स्वतःच्या स्वार्थासाठी नष्ट करतो व तीसुद्धा अत्यंत वेदनादायक पद्धतीने. उर्मिला पवार यांच्या 'आयदान' पुस्तकात बैलाच्या खच्चीकरणाचे वर्णन दिले आहे. दांडक्याने वृषण चेचले जात असताना बैलाला किती यातना होत असतील. माणूस त्याला एवढ्या यातना का देतो? बैलाचे वृषण खच्ची करण्याचे काम करणार्या नराधमाचे वृषणही असेच चेचून काढले पाहिजेत म्हणजे त्याला त्या यातना कशा असतील ते कळेल. बैलगाडीला जोडण्यासाठी बैलांच्या तळपायात खिळे ठोकून नाल बसवितात. नाल बसविण्यासाठी आधी बैलाला खाली बसवून आडवे पाडतात व त्याचे चारही पाय बांधून मग खिळे ठोकून नाल बसवितात. नाल बसविताना बैलाच्या डोळ्यातून वेदनांनी पाणी वाहत असते. कशासाठी हा क्रूरपणा? मला कधी कधी वाटते की बैलांच्या तळतळाटामुळेच कदाचित शेतकर्यांची हलाखीची परिस्थिती असावी. आपल्याला यातना देणार्याला बैलांचे शिव्याशाप भोवत असतील.
काही दिवसांपूर्वी कोल्हापूरमध्ये झालेली'पारंपारिक' मेंढ्यांची टक्कर दाखवित होते. जमलेले प्रेक्षक दोन मेंढ्यांच्या आपापसातील टकरीचा आनंद लुटत होते. दोन्ही मेंढे आपल्या पूर्ण ताकदीनिशी दुसर्याच्या कपाळावर जोरदार धडक मारत होते. दोघांनाही वेदना होत असणारच. कदाचित कपाळाची हाडेही मोडत असतील. आणि असल्या क्रूर प्रकाराचा प्रेक्षक आनंद लुटत होते.
काही ठिकाणी कोंबड्यांची झुंज सुद्द्धा लावतात. या झुंजीत कोंबड्याच्या एका पायाला ब्लेडचा अर्धा तुकडा बांधलेला असतो जेणेकरून समोरच्या कोंबड्याचे रक्त निघेल. दोन्ही कोंबडे मूर्खासारखे एकमेकांशी लढाई करून जखमी होतात व माणसे आपली करमणूक करून घेतात.
बैलगाडी शर्यत हा असाच एक क्रूर प्रकार. सुदैवाने सर्वोच्च न्यायालयाने या प्रकाराला सुद्धा बंदी घातली आहे. तरीसुद्धा बैलगाडी शर्यत पुन्हा सुरू करावी यासाठी महाराष्ट्रात जोरदार प्रयत्न सुरू आहेत. या शर्यतीतही बैलांना जोरात पळविण्यासाठी शेपटी पिरगाळणे, खिळा लावलेल्या चाबकाचे फटकारे लावणे असे क्रूर प्रकार केले जातात आणि वेदना होत असताना भीतिने बैल जोरात गाडी पळवितात कारण आपली उच्च प्रथा आणि परंपरा!
नवसासाठी व धार्मिक परंपरेसाठी कोंबड्या, बकर्या कापणे हा प्राण्यांना यातना देण्याचाच एक प्रकार. हे बळी थांबावेत म्हणून संत गाडगेबाबांनी प्रबोधन करण्याचा खूप प्रयत्न केला. परंतु अजूनही हा प्रकार सुरूच आहे. मांग जातीत एखाद्याचे लग्न ठरताना किंवा त्याआधी काही वर्षे लग्नासाठी नवर्यामुलाच्या नावाने एक डुक्कर सोडले जाते. ऐन लग्नाच्या वेळी हे डुक्कर पकडून त्याला जिवंत जाळून त्याचे मांस खाल्ले जाते. जिवंत जळताना त्या डुकराला किती भयानक वेदना होत असतील. प्रथा व परंपरा या नावाखाली हे क्रूर प्रकार कायमच सुरू राहणार का?
जिव्हालौल्यासाठी जिवंत प्राणी क्रूर पद्धतीने मारणे हे जगभर सर्वत्र केले जाते. कासव, शिंपले, बेडूक, खेकडे इ. प्राण्यांना जिवंतपणीच उकळत्या पाण्यात टाकणे, बदक/हंस इ. प्राण्यांची आत असलेली मान बाहेर काढण्यासाठी त्याच्या तोंडासमोर खाणे धरणे व खाणे खाण्यासाठी त्याने मान सरळ केल्यावर मानेवर घाव घालून त्यांना मारणे अशा क्रूर पद्धतीने हे प्राणी जिभेचे चोचले पुरविण्यासाठी मारले जातात. अरे प्राणी मारायचा असेल तर निदान त्या प्राण्याला भूल देऊन वीजेचा शॉक देऊन वेदनारहीत मरण तरी द्या. हालहाल कशाला करता?
मुक्या प्राण्यांना प्रथा व परंपरेच्या नावाखाली आपल्या करमणुकीसाठी व जिव्हालौल्यासाठी वेदना, यातना देऊन त्यांचा छळ करणे व नंतर मारून टाकणे हे अत्यंत क्रूरकर्म आहे व या प्रकाराचा मला अतिशय संताप येतो. हे सर्व प्रकार तातडीने कायमस्वरूपी बंद व्हायला हवेत. सुदैवाने सर्वोच्च न्यायालय याविषयी सक्रीय असून या प्रकाराला कायद्याने बंदी घालण्यात येत आहे ही समाधानाची गोष्ट आहे.
वाचने
74908
प्रतिक्रिया
282
मिसळपाव
प्रतिक्रिया
गुरूजी.. धाग्याचा नक्की
प्राणीपक्षांचा छळ थांबवा हा
In reply to गुरूजी.. धाग्याचा नक्की by मोदक
विश्वनाथन् आनंद सुद्धा???
काय वेडेपणा आहे हा.
जरी वेदनादायक असले तरी नाल
बैलांच्या पायात खिळे ठोकून
In reply to जरी वेदनादायक असले तरी नाल by विशुमित
म्हणजे बैल शेतीसाठी नाही
In reply to बैलांच्या पायात खिळे ठोकून by श्रीगुरुजी
म्हणजे बैल शेतीसाठी नाही
In reply to म्हणजे बैल शेतीसाठी नाही by विशुमित
<<हास्यास्पद प्रश्न>>>
In reply to म्हणजे बैल शेतीसाठी नाही by श्रीगुरुजी
औदयोगिक क्षेत्रात काम
In reply to म्हणजे बैल शेतीसाठी नाही by विशुमित
सगळंच विस्कटवून सांगायचे का?
In reply to औदयोगिक क्षेत्रात काम by मोदक
कळाले नाही म्हणून विचारले.
In reply to सगळंच विस्कटवून सांगायचे का? by विशुमित
औदयोगिक क्षेत्रात काम करणारे
In reply to औदयोगिक क्षेत्रात काम by मोदक
तुमचा काही तरी गैरसमज होतोय
In reply to औदयोगिक क्षेत्रात काम करणारे by अप्पा जोगळेकर
औद्योगिक बैलांना राबवून जाउन
In reply to तुमचा काही तरी गैरसमज होतोय by विशुमित
औद्योगिक बैलांना राबवून जाउन
In reply to तुमचा काही तरी गैरसमज होतोय by विशुमित
नाय नाय. मी पण शेत न कसता
In reply to तुमचा काही तरी गैरसमज होतोय by विशुमित
अवांतर - शेतकर्यांना पण
In reply to नाय नाय. मी पण शेत न कसता by अप्पा जोगळेकर
<<<<दांडक्याने त्याचे वृषण
In reply to बैलांच्या पायात खिळे ठोकून by श्रीगुरुजी
उर्मिला पवार यांच्या 'आयदान'
In reply to <<<<दांडक्याने त्याचे वृषण by विशुमित
उर्मिला पवार डॉक्टर आहेत का ?
In reply to उर्मिला पवार यांच्या 'आयदान' by श्रीगुरुजी
प्राण्यांवर होणार्या
In reply to उर्मिला पवार डॉक्टर आहेत का ? by विशुमित
बैल हा पाळीव प्राणी आहे..!!
In reply to प्राण्यांवर होणार्या by श्रीगुरुजी
फक्त
In reply to बैल हा पाळीव प्राणी आहे..!! by विशुमित
का विकू नये?
In reply to फक्त by सांगकाम्या राक्षस (verified= न पडताळणी केलेला)
राक्षसांच्या
In reply to का विकू नये? by विशुमित
<<<घरची सगळी जनावरे दावणीवरच
In reply to राक्षसांच्या by सांगकाम्या राक्षस (verified= न पडताळणी केलेला)
म्हातारे बैल न विकणे परवडेल
In reply to फक्त by सांगकाम्या राक्षस (verified= न पडताळणी केलेला)
हा चाप.कसा देतात ते सांगता का
In reply to बैल हा पाळीव प्राणी आहे..!! by विशुमित
<<<हा चाप.कसा देतात ते सांगता
In reply to हा चाप.कसा देतात ते सांगता का by श्रीगुरुजी
डास? नाही बुवा. का?
In reply to <<<हा चाप.कसा देतात ते सांगता by विशुमित
डास ही मारला नसेल तर नक्कीच
In reply to डास? नाही बुवा. का? by श्रीगुरुजी
बैलांना लावण्यात येणार्या
In reply to <<<हा चाप.कसा देतात ते सांगता by विशुमित
शनिवारी पशु वैद्यकीय
In reply to बैलांना लावण्यात येणार्या by श्रीगुरुजी
बापरे!
In reply to शनिवारी पशु वैद्यकीय by विशुमित
खरच प्रायश्चित्त
In reply to शनिवारी पशु वैद्यकीय by विशुमित
मी प्रायश्चित घायचं की नाही
In reply to खरच प्रायश्चित्त by nanaba
-- चाप देणं हे एक प्रकारची नस
In reply to शनिवारी पशु वैद्यकीय by विशुमित
भयानक प्रकार आहेत
जालीकट्टू समर्थकांच्या
In reply to भयानक प्रकार आहेत by पैसा
मासे पकडण्यासाठी गळाला टोचली
In reply to जालीकट्टू समर्थकांच्या by श्रीगुरुजी
तुमच्या लेखावरून तुम्ही शाकाहारी असाल असे वाटते.
In reply to जालीकट्टू समर्थकांच्या by श्रीगुरुजी
हे पटलं राव आपल्याला.
In reply to तुमच्या लेखावरून तुम्ही शाकाहारी असाल असे वाटते. by सांगकाम्या राक्षस (verified= न पडताळणी केलेला)
गरज आणि गमती करताचे क्रौर्य
In reply to तुमच्या लेखावरून तुम्ही शाकाहारी असाल असे वाटते. by सांगकाम्या राक्षस (verified= न पडताळणी केलेला)
ए गुर्जी
घरात पेस्ट कंट्रोल कोण कोण
=)) ए सन पॉईंट हाय हा जबरदस्त
In reply to घरात पेस्ट कंट्रोल कोण कोण by विशुमित
एखाद्या प्रकाराला समर्थन आहे
प्रत्येक सणात काही ना काही
In reply to एखाद्या प्रकाराला समर्थन आहे by संदीप डांगे
ह्याच्याशी सहमत.
In reply to प्रत्येक सणात काही ना काही by श्रीगुरुजी
अण्णांची बुल फाईट अन वातावरण
मला माहित नव्हतं हे जालिकट्टु
समर्थन
अगदी पटले तुमचे विचार
प्राण्यांच्या वेदना
मुद्दा
तुम्हाला ज्या प्रकारचे
In reply to मुद्दा by गॅरी ट्रुमन
नक्कीच
In reply to तुम्हाला ज्या प्रकारचे by श्रीगुरुजी
<<<फक्त मुद्दा इतकाच की
In reply to नक्कीच by गॅरी ट्रुमन
Rules[11]
माझ्या ही वाचनात असेच आले आहे
In reply to Rules[11] by अप्पा जोगळेकर
Controversy
In reply to Rules[11] by अप्पा जोगळेकर
येस आपुनबी ह्येच वाच्यला
In reply to Rules[11] by अप्पा जोगळेकर
<<<असा छळ करण्याइतके शेतकरी
इंटरनेटवर बघितलेले एक चित्र
गुरुजी...तुमचा
बरं एकवेळ प्राण्यांचे खेळ
In reply to गुरुजी...तुमचा by चिनार
>>> गुरुजी पण ह्या हिशोबानी
In reply to गुरुजी...तुमचा by चिनार
गुरुजी...आदरयुक्त नमस्कार
In reply to >>> गुरुजी पण ह्या हिशोबानी by श्रीगुरुजी
गुर्जींचा आय्डी हॅक झाला
In reply to >>> गुरुजी पण ह्या हिशोबानी by श्रीगुरुजी