Skip to main content

नवीन थीमबाबत चर्चा

लेखक नीलकांत यांनी रविवार, 01/01/2017 01:40 या दिवशी प्रकाशित केले.
नमस्कार, आज मिपाला एक नवीन रूप आहे. याला नवीन थीम असं म्हणू या. या नवीन थीमबाबत तुमचं मत काय? यातील काय आवडलं? काय नाही आवडलं? ते नक्की लिहा. या रंगरूपासोबत आपण मिपाची ठेवण बदलायला सुरुवात केलीये. एखादं नवीन लेखन करताना जोडायचे संबंधित टॅग आता सहज जोडता येतील. नवीनसुद्धा जोडता येतील. आजपासून प्रत्येक सदस्याला आपला फोटो लावता येईल. सर्वांना विनंती आहे की त्यांनी 'माझे खाते'मध्ये जाऊन आपला फोटो लावून घ्यावा. याशिवाय यापुढे काही काळ हे बदल होत राहतील, त्या बदलांबाबतसुद्धा येथेच चर्चा व्हावी. आपल्या प्रतिक्रिया, सूचना, मत हे मिपाच्या जडणघडणीत खूप मोलाचं आहे. त्यामुळे आवर्जून आपलं मत मांडा. - नीलकांत

वाचने 42590
प्रतिक्रिया 182

प्रतिक्रिया

In reply to by संदीप डांगे

मला आधीचा आणि ह्या फॉन्टमध्ये मोबाईलवर फार काही विशेष फरक जाणवला नाही. डेस्कटॉप + IE11 वर मात्र खूप छान वाटला नवीन फॉन्ट. मोबाईलवर मोबाईल व्हर्जनपेक्षा डेस्कटॉप व्हर्जन वापरायला जास्त सोपे वाटले.

In reply to by पैसा

प्रतिक्रिया देताना वरचा बार मोठा दिसतो ही एक अडचण येते आहे.
हे दुरुस्त झालेलं दिसतंय. चार सहा दिवसात मोबाईलवरून प्रतिक्रिया लिहायचा कंटाळा केला होता, त्यामुळे दुरुस्त झालेलं लक्षात आलं नव्हतं.

In reply to by पैसा

वेगळं वाटणारच, पण डाटा जास्त जातोय असं मला वाटतं. शिवाय पेज लोड व्हायला खूप वेळ लागतोय. ही थीम काहीशी हेवी असावी. मोबाईल वरून मिपा वाचण्याच्या बाबतीत मला जुनंच रुपडं साधं, सोपे ,सुटसुटीत वाटतं. नव्या थीम मध्ये स्क्रोलिंग जास्त करावं लागतंय. क्लिक्सचं प्रमाण तुलनेनं वाढलंय. शिफारस दर २/३ दिवसांनी अद्ययावत व्ह्यायला हवी. होतं काय, कित्येक दिवस तेच ते लेख पहिल्या पानावर दिसत आहेत. शिफारशीमध्ये काही गाजलेले जुने लेखही वर आणायला हवेत अधूनमधून. वपु/पुलं ह्यांचे सुविचार तर अगदी दवणिय वाटत आहेत. अर्थात थीम आवडणे, न आवडणे हे व्यक्तिसापेक्ष आहेच. मला अजूनतरी हि थीम रुचली नाहीये.

In reply to by प्रचेतस

>>>>> मोबाईल वरून मिपा वाचण्याच्या बाबतीत मला जुनंच रुपडं साधं, सोपे ,सुटसुटीत वाटतं. खरंय रे वल्ली. फक्त दीर्घ लेखनासाठी डेस्कटॉपवर यायचो. गेले ते दिवस उरल्या त्या आठवणी. (मिपाच्या रे भो) नीलकांतसाठी सहन करा भो. ;) >>>>> थीम आवडणे, न आवडणे हे व्यक्तिसापेक्ष आहेच. मला अजूनतरी हि थीम रुचली नाहीये. थीम बदल होणारच आहेत. डोंटवरी आत्ताच माहिती कळली. बाकी. दोनपाच लोकांना थीम आवडणे आणि पाचपन्नास लोकांना थीम आवडणे ही गोष्ट वेगळीच असते.

" ए जिंदगी काश तू ही रुठ जाती मुझ से:
ये रुठे हुये लोग मुझ से मनाये नही जाते. "

-दिलीप बिरुटे

In reply to by प्रचेतस

पण डाटा जास्त जातोय असं मला वाटतं.
इतर धागे आणि नवे लेखन टेस्ट करताना पानाचा २५-३०% साईझ कमी आला होता. तेव्हा टेस्ट करताना स्वगृह पान जे आता आहे ते नव्हते त्यामुळे त्यात काय फरक पडला सांगता येणार नाही.

embed video टाकता येऊ नये अशी सोय करता येईल का? मोबाईलवर लेख लवकर लोड होत नाही आणि scroll ही बरंच करावं लागतं.

अपग्रेडेशनमुळे जुन्या व्हर्जनवर जाता येणार नाही, हे इथे येर्‍यागबाळ्यालाही कळलं आहे. नव्या व्हर्जनवर जुनं रुपडं आणताही येईल हेही मला माहिती आहे. मिपाला नव्या बदलावर जायचंय आहे. काळ मोबाईलचा आहे, तेव्हा व्यवस्थापन मिपा मोबाईल सदस्यांसाठी तशी सोय करु पाहात आहे. पण सध्याची थीम अजिबात युजरफ्रेंडली नाही, थीम बदलणे आणि त्यावर काम करणे आवश्यक आहे. मीपा मालकांना सध्या काम येऊन पडले आहे त्यामुले जरा रंगकाम, यंत्रकाम लांबणीवर पडलं आहे, हेही आम्हाला माहिती आहे. आम्हाला उगाच बळजबरी कशालाही चांगलं म्हणायची सवय नाही. नै लागत जीव, तर नैच लागत म्हणतो. बाकी, नीलकांतसाठी हे सर्व सहन करतो. मिपावर आम्ही एवढी नावडती माणसं सहन केली थीम क्या चीज है. आवश्यक कामं अशी - १) वरची काळी बॉर्डर [चौकट रंग] बदलणे आवश्यक. २) प्रतिसादातील हीडरवर काम करणे आवश्यक. ३) प्रतिसादातील बॉक्स बॅकग्राउंड कलर बदलणे आवश्यक. ४) मोबाईल व्ह्यू अजूनही व्यवस्थित झालेला नाही. ५) डेस्क्टॉप व्हर्जन आणि मोबाईल व्हर्जन यावर काही उदाहरणे पाहून तसे बदल आवश्यक आहेत. ६) मोबाईल व्ह्य मधे मेनूला क्लीक केलं की स्वगृह वैगरे उघडतं. तिथे एक एक गुणीलेचं चिन्ह असलं पाहिजे. म्हणजे विंडो जाग्यावर येईल. ( मोबाईलवरुन लोकसत्ता पाहा) ७) मोबाईल व्ह्य वरुन साइट कशी चालली पाहिजे. सॅम मोबाईल साइट पाहा. ८) फाँटवरही काम आवश्य्क आहे. अजून बर्‍याच गोष्टी सांगतो. मदतनीस म्हणून काम करायची तयारी आहे. वार आणि वेळ कळवावा. कामधामं सोडून हजर होईन. हाय काय अन नाय काय. मिपाची रंगसंगती मिपाची जान आहे. एवढं विसरु नका भो. सध्या जड अंत:करणाने मिपावर वावरतोय. सदस्य म्हणून आमच्या भावना समजून घ्या भो. -दिलीप बिरुटे (जुनं काहीच सोडायची तयारी नसलेला)

In reply to by प्रा.डॉ.दिलीप बिरुटे

+१११ मोबाईल वरुन वापरताना ही थीम गंडलेली आहे असं दिसतय. अजीबात युजर फ्रेंडली नाही....

प्रतिसादात रचना बदलली आहे. सवय नसल्याने पटकन प्रतिसादकर्त्याचे नाव लगेच लक्षात येत नाहीये. वेळ - लेखक असं करण्यापेक्षा लेखक - वेळ असं करता येईल का? हे उर्दु सारखं उलटं वाचल्याप्रमाणे वाटतंय. वेळेत इतका इंटरेस्ट नाहीये. प्रतिसाद कुणी दिलाय ह्यात आहे..!

In reply to by पिलीयन रायडर

प्रतिसादकर्त्याच्या नावाचा आकार हा प्रतिसादाच्या शीर्षकाच्या आकाराचा हवा, तिरका नको. शिवाय लॉगीन केले नसेल तर नाव गडद काळ्या रंगात दाखवले तर उत्तम. आणि महत्त्वाचे म्हणजे वरच्या काळ्या पट्टीच्या जागी मिपाचा पुर्वीचा जगप्रसिद्ध लोगो टाकाच, ती मिपाची जान आहे.

In reply to by शार्दुल_हातोळकर

मिपाचा पुर्वीचा जगप्रसिद्ध लोगो टाकाच, ती मिपाची जान आहे
अगदी, अगदी! मिपाचं मिपापण हरवलेलं आहे तो लोगो नसल्याने.

१. लोगो आणा मालक परत.. २. माझा सहभाग (लेख व प्रतिसाद)वाला टॅब परत आणावा.. काही अत्यंत आवडलेल्या धाग्यांना पुन्हा भेट द्यायची आहे. ३. वाचनखुण साठवण्याची सोय पुनश्च द्यावी. ४. 'सुविचार' काढता येतील का? उगाच शाळेत गेल्यासारखं वाटतंय.. बाकी सांगतो झोकं-झोकं..

User friendly नाही. आमच्यासारख्या वाचक वेड्यांना फारच अवघड जाते हो...

काहीतरी हुकलंय. मी माझ्या सदस्यनामावर टिचकी मारून आतील 'ट्रॅक' या टॅबवर टिचकी मारली की कोणतेतरी २०१४ चे जुने धागेच दिसताहेत आणि त्यावर शेवटचे अद्यतन याखाली १४ तासांपूर्वीची वेळ दिसतेय.

थीम मधील बदल नक्कीच स्वागतार्ह!

एखाद्या लेखकाचे सर्व लेखन शोधण्याचा पर्याय मिपावर नाही असे वाटते. मग माझे लेखन याची लिंक देता यायची. ज्यात सभासद क्र. असायचा. मला वाटते आता तोही पर्याय नाही. का माझे काही चुकत आहे ? मी पूर्वी ही लिंक दिली की सर्व लेखनांची लिंक समोरच्याला मिळायची. आता काय करावे लागेल ? कोणी सुचवेल का ?

In reply to by जयंत कुलकर्णी

http://www.misalpav.com/user/9199/authored या लिंकवर सगळे लेख व्यवस्थित मिळतील असे प्रशांत म्हणाला. माझे लेखन लिंकवर लेखमाला विभागातले लेखन दिसत नाहीये. पण आपला बिल्ला नंबर टाकून authored लेख पाहिले तर आपले इतर लेखन दिसते.

In reply to by पैसा

बरोबर आहे पण पूर्वी माझे लेखन उघडले की ब्राउजरच्या खिडकीत ही लिंक दिसायची. आता तेथे एचटीएमल् ची लिंक दिसते. आता ही लक्षात ठेवावी लागेल....

खेदपूर्वक म्हणावं लागतंय कि नवीन थीम चांगली नाही. १. मोबाईल वर स्क्रोल करून करून बोट दुखायला लागली. ठराविक चौकानातच सगळी मांडणी दिसतीये आधी असे नव्हते. २. मुखपृष्ठावर कलादालन विभागातील नवे लेख दिसायला हवेत पण प्रतिसाद संख्येनुसार दिसत आहेत बहुतेक. ३. मुखपृष्ठावरची बरीच जागा वाया गेली आहे असे वाटत राहते, शिफारस जास्तच मोठी वाटते खासकरून मोबाईलवरती! ४. काकू करणे महाकठीण झालाय मोबाईल वरून. "पानाच्या शेवटी" जाण्याचे सुद्धा एखादे बटण केले पाहिजे! ५. काळा, राखाडी आणि पांढरा हि रंगसंगती उगाच ऑफिस चा फील देतेय (हा माझा वैयक्तिक अनुभव असू शकतो!) ६. सुविचार उगीच जागा खातोय असे वाटतंय! ;)

आज लॅागिन असताना/नसताना , ब्राउजर सेटिंग्ज बदलून वेगवेगळ्या पद्धतीने अनुक्रमणिका दिसते आहे. लेखकाचे नाव, प्रतिसादांची संख्या नवे/जुने ,लेख प्रथम लिहिल्याची तारीख असे बघायची पुर्वीची सवय होती आता काहीही बोध होत नाही एका दृष्यात.

एकदम साधी, सरळ, सोप्पी, आणि सूट-सुटीत थीम आहे... खरे तर हा मिपा मध्ये एक आमूलाग्र बदल आहे, आणि तो नेहमीच आवश्यक असतो... आत्ताच्या थीम कडे पहिले कि खूपच समाधान वाटतेय..रंगाचे मिश्रण अति-उत्तम.. सर्व डेव्हलपर्स चे मनापासून कौतुक !!!

"काथ्याकूट" मुख्य पानावर दिसत नाहीए. आत्ता बुलेट ट्रेन विषयावर एक पोस्ट टाकली. मेंन पेज वर ती आलीच नाही. असे अजून काय काय दिसत नाही , माहित नाही ..

http://www.misalpav.com/comment/784262 नक्की कुठे गेले कि हा धागा दिसेल ? आत्ता तो बेपत्ता आहे !! पण माझी पोस्ट तर आत्ताची आहे. हा धागा वर का येत नाहीए मग ?

जर एकापेक्षा जास्त पाने असतील तर पहील्या पानाच्या पुढील पानावरच्या नवीन प्रतिसादांना "नवीन" असे शिर्षक येत नाही .

वरच्या मेनु मधे मिपा विशेषांक वर टिचकी मारली असता "वारंवार विचारले जाणारे प्रश्न." हे पान उघडत आहे. असच होण अपेक्शित आहे का?

मोबाईलवरुन अजूनही फार युजर फ्रेंडली थीम नाही. मोबाईलवरुन मला तरी मिपावर यावं असं अजिबात वाटत नाही. डेस्क्टॉपवरुन मिपावर येत असतो. धन्यवाद आणि शुभेच्छा. चालु द्या....! -दिलीप बिरुटे

In reply to by प्रा.डॉ.दिलीप बिरुटे

डॉक्टरांशी सहमत आहे. फिरस्त्यावरून मिपावर यावंसं वाटंत नाही. केवळ सत्रधारिका (= सेशन कुकी) जिवंत ठेवण्यासाठी तिथनं दररोज मिपा उघडतो. कायतरी करा राव. -गा.पै.

In reply to by गामा पैलवान

मोबाईलवरून डेस्कटॉप व्हर्जन ओपन करून बघा एकदा. मला तरी मोबाईलवरून मोबाईल व्हर्जनपेक्षा मोबाईलवरून डेस्कटॉप व्हर्जन जास्त सुटसुटीत वाटतं वापरायला!

In reply to by हतोळकरांचा प्रसाद

हाप्र, दोन्ही आवृत्त्या वापरून बघितल्या. काही जाणवण्याजोगा फरक नाही. :-( आ.न., -गा.पै.

In reply to by गामा पैलवान

मोबाईलसाठी वेगवेगळे ब्राऊजर वापरुन पाहिले. पण काय फरक नाही. असो, लैच खाज आली की डेस्क्टॉप सुरु करायचं आणि मिपा इंजॉय करायचं. असो. विषय संपला. -दिलीप बिरुटे

In reply to by प्रा.डॉ.दिलीप बिरुटे

मोबाईलवरुन मला तरी मिपावर यावं असं अजिबात वाटत नाही.
शमत. माझ्या ब्रावजरचा एस्सेस टाकूनही कुणी मदत करीना मला. ते तसलंच जंबल्ड दिसतंय बोंबल्यावरून. (अवांतरः काल मला धागा टाकता येईना. आज जमला.)

थीमच काहीतरी करा राव! काही बरे वाटेना... स्वगृह तर अस्ताव्यस्त झाल्या सारखं वाटतंय आणि मोबाईल वरून महाकठीण झालंय!

नव्या थीम बाबत सर्वांच्या अडचणींची दखल घेतली आहे. त्यानुसार एक एक अडचण दूर करण्याचा प्रयत्न करतो. याशिवायही काही अडचणी असल्यास येथे कळवा.