✍ मराठी साहित्य, संस्कृती आणि लेखनाचे व्यासपीठ
प्रवेश करा | सदस्य व्हा
मिसळपाव
मिसळपाव मराठी साहित्य

Main navigation

  • मुख्य पान
  • पाककृती
  • कविता
  • भटकंती

नवीन थीमबाबत चर्चा

न
नीलकांत यांनी
Sun, 01/01/2017 - 01:40  ·  लेख
लेख
नमस्कार, आज मिपाला एक नवीन रूप आहे. याला नवीन थीम असं म्हणू या. या नवीन थीमबाबत तुमचं मत काय? यातील काय आवडलं? काय नाही आवडलं? ते नक्की लिहा. या रंगरूपासोबत आपण मिपाची ठेवण बदलायला सुरुवात केलीये. एखादं नवीन लेखन करताना जोडायचे संबंधित टॅग आता सहज जोडता येतील. नवीनसुद्धा जोडता येतील. आजपासून प्रत्येक सदस्याला आपला फोटो लावता येईल. सर्वांना विनंती आहे की त्यांनी 'माझे खाते'मध्ये जाऊन आपला फोटो लावून घ्यावा. याशिवाय यापुढे काही काळ हे बदल होत राहतील, त्या बदलांबाबतसुद्धा येथेच चर्चा व्हावी. आपल्या प्रतिक्रिया, सूचना, मत हे मिपाच्या जडणघडणीत खूप मोलाचं आहे. त्यामुळे आवर्जून आपलं मत मांडा. - नीलकांत
वर्गीकरण

प्रतिक्रिया द्या
42493 वाचन

💬 प्रतिसाद (182)

प्रतिक्रिया

+१ नावाच्या फाँटचा आकार आतापेक्षा मोठा हवा

शार्दुल_हातोळकर
Tue, 01/10/2017 - 00:27 नवीन
प्रतिसादकर्त्याच्या नावाचा आकार हा प्रतिसादाच्या शीर्षकाच्या आकाराचा हवा, तिरका नको. शिवाय लॉगीन केले नसेल तर नाव गडद काळ्या रंगात दाखवले तर उत्तम. आणि महत्त्वाचे म्हणजे वरच्या काळ्या पट्टीच्या जागी मिपाचा पुर्वीचा जगप्रसिद्ध लोगो टाकाच, ती मिपाची जान आहे.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: पिलीयन रायडर

सगळ्या मुद्द्यांना +११

पिलीयन रायडर
Tue, 01/10/2017 - 00:32 नवीन
सगळ्या मुद्द्यांना +११ लोगो हवाय...
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: शार्दुल_हातोळकर

मिपाचा पुर्वीचा जगप्रसिद्ध

यशोधरा
Tue, 01/10/2017 - 13:16 नवीन
मिपाचा पुर्वीचा जगप्रसिद्ध लोगो टाकाच, ती मिपाची जान आहे
अगदी, अगदी! मिपाचं मिपापण हरवलेलं आहे तो लोगो नसल्याने.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: शार्दुल_हातोळकर

+१

सस्नेह
Tue, 01/10/2017 - 17:23 नवीन
आधी प्रतिसादकर्त्याचे नाव, मग वेळ असे सोयीस्कर आहे.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: पिलीयन रायडर

आमचे चार-आणे..

चिगो
Tue, 01/10/2017 - 13:03 नवीन
१. लोगो आणा मालक परत.. २. माझा सहभाग (लेख व प्रतिसाद)वाला टॅब परत आणावा.. काही अत्यंत आवडलेल्या धाग्यांना पुन्हा भेट द्यायची आहे. ३. वाचनखुण साठवण्याची सोय पुनश्च द्यावी. ४. 'सुविचार' काढता येतील का? उगाच शाळेत गेल्यासारखं वाटतंय.. बाकी सांगतो झोकं-झोकं..
  • Log in or register to post comments

वाचनखुणा

सावत्या
Tue, 01/10/2017 - 16:50 नवीन
वाचनखुणा सापडत नाहित
  • Log in or register to post comments

User friendly

urenamashi
Wed, 01/11/2017 - 22:18 नवीन
User friendly नाही. आमच्यासारख्या वाचक वेड्यांना फारच अवघड जाते हो...
  • Log in or register to post comments

जुनी थीम उत्तम होती. ही थीम

अभिजीत अवलिया
गुरुवार, 01/12/2017 - 11:10 नवीन
जुनी थीम उत्तम होती. ही थीम अजिबात आवडलेली नाही.
  • Log in or register to post comments

काहीतरी हुकलंय. मी माझ्या

श्रीगुरुजी
Sat, 01/14/2017 - 14:55 नवीन
काहीतरी हुकलंय. मी माझ्या सदस्यनामावर टिचकी मारून आतील 'ट्रॅक' या टॅबवर टिचकी मारली की कोणतेतरी २०१४ चे जुने धागेच दिसताहेत आणि त्यावर शेवटचे अद्यतन याखाली १४ तासांपूर्वीची वेळ दिसतेय.
  • Log in or register to post comments

छान थीम

Nitin Palkar
Sat, 01/14/2017 - 21:24 नवीन
थीम मधील बदल नक्कीच स्वागतार्ह!
  • Log in or register to post comments

एखाद्या लेखकाचे सर्व लेखन

जयंत कुलकर्णी
Sun, 01/15/2017 - 14:23 नवीन
एखाद्या लेखकाचे सर्व लेखन शोधण्याचा पर्याय मिपावर नाही असे वाटते. मग माझे लेखन याची लिंक देता यायची. ज्यात सभासद क्र. असायचा. मला वाटते आता तोही पर्याय नाही. का माझे काही चुकत आहे ? मी पूर्वी ही लिंक दिली की सर्व लेखनांची लिंक समोरच्याला मिळायची. आता काय करावे लागेल ? कोणी सुचवेल का ?
  • Log in or register to post comments

आहे ना!

पैसा
Sun, 01/15/2017 - 14:30 नवीन
http://www.misalpav.com/user/9199/authored या लिंकवर सगळे लेख व्यवस्थित मिळतील असे प्रशांत म्हणाला. माझे लेखन लिंकवर लेखमाला विभागातले लेखन दिसत नाहीये. पण आपला बिल्ला नंबर टाकून authored लेख पाहिले तर आपले इतर लेखन दिसते.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: जयंत कुलकर्णी

बरोबर आहे पण पूर्वी माझे लेखन

जयंत कुलकर्णी
Sun, 01/15/2017 - 14:39 नवीन
बरोबर आहे पण पूर्वी माझे लेखन उघडले की ब्राउजरच्या खिडकीत ही लिंक दिसायची. आता तेथे एचटीएमल् ची लिंक दिसते. आता ही लक्षात ठेवावी लागेल....
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: पैसा

मोबाईलवर लेखाच्या नावातले

एस
Sun, 01/15/2017 - 16:26 नवीन
मोबाईलवर लेखाच्या नावातले फक्त चार-पाच शब्द दिसतात. उरलेले शीर्षक दिसत नाही. लेखकाचे नावही दिसत नाही.
  • Log in or register to post comments

खेदपूर्वक म्हणावं लागतंय कि

शब्दबम्बाळ
Sun, 01/15/2017 - 19:06 नवीन
खेदपूर्वक म्हणावं लागतंय कि नवीन थीम चांगली नाही. १. मोबाईल वर स्क्रोल करून करून बोट दुखायला लागली. ठराविक चौकानातच सगळी मांडणी दिसतीये आधी असे नव्हते. २. मुखपृष्ठावर कलादालन विभागातील नवे लेख दिसायला हवेत पण प्रतिसाद संख्येनुसार दिसत आहेत बहुतेक. ३. मुखपृष्ठावरची बरीच जागा वाया गेली आहे असे वाटत राहते, शिफारस जास्तच मोठी वाटते खासकरून मोबाईलवरती! ४. काकू करणे महाकठीण झालाय मोबाईल वरून. "पानाच्या शेवटी" जाण्याचे सुद्धा एखादे बटण केले पाहिजे! ५. काळा, राखाडी आणि पांढरा हि रंगसंगती उगाच ऑफिस चा फील देतेय (हा माझा वैयक्तिक अनुभव असू शकतो!) ६. सुविचार उगीच जागा खातोय असे वाटतंय! ;)
  • Log in or register to post comments

आज लॅागिन असताना/नसताना ,

कंजूस
Mon, 01/16/2017 - 06:40 नवीन
आज लॅागिन असताना/नसताना , ब्राउजर सेटिंग्ज बदलून वेगवेगळ्या पद्धतीने अनुक्रमणिका दिसते आहे. लेखकाचे नाव, प्रतिसादांची संख्या नवे/जुने ,लेख प्रथम लिहिल्याची तारीख असे बघायची पुर्वीची सवय होती आता काहीही बोध होत नाही एका दृष्यात.
  • Log in or register to post comments

खुपच छान थिम आहे

प्रसाद_कुलकर्णी
Wed, 01/18/2017 - 11:29 नवीन
एकदम साधी, सरळ, सोप्पी, आणि सूट-सुटीत थीम आहे... खरे तर हा मिपा मध्ये एक आमूलाग्र बदल आहे, आणि तो नेहमीच आवश्यक असतो... आत्ताच्या थीम कडे पहिले कि खूपच समाधान वाटतेय..रंगाचे मिश्रण अति-उत्तम.. सर्व डेव्हलपर्स चे मनापासून कौतुक !!!
  • Log in or register to post comments

पहिली थीम यापेक्षा चांगली होती.

सुचिकांत
Wed, 01/18/2017 - 18:04 नवीन
थीम बदलल्यानंतर संकेतस्थळाला रोज किती लोक भेटी देत आहेत, ती संख्या पाहून ठरवा.
  • Log in or register to post comments

"काथ्याकूट" मुख्य पानावर दिसत

अभिजित - १
Sat, 01/21/2017 - 21:38 नवीन
"काथ्याकूट" मुख्य पानावर दिसत नाहीए. आत्ता बुलेट ट्रेन विषयावर एक पोस्ट टाकली. मेंन पेज वर ती आलीच नाही. असे अजून काय काय दिसत नाही , माहित नाही ..
  • Log in or register to post comments

http://www.misalpav.com

अभिजित - १
Sat, 01/21/2017 - 21:50 नवीन
http://www.misalpav.com/comment/784262 नक्की कुठे गेले कि हा धागा दिसेल ? आत्ता तो बेपत्ता आहे !! पण माझी पोस्ट तर आत्ताची आहे. हा धागा वर का येत नाहीए मग ?
  • Log in or register to post comments

मिपाचे नवीन रूप आवडले. पुढील

पर्णिका
Tue, 01/24/2017 - 08:48 नवीन
मिपाचे नवीन रूप आवडले. पुढील वाटचालीसाठी मिपास शुभेच्छा !
  • Log in or register to post comments

जर एकापेक्षा जास्त पाने

मराठी_माणूस
Tue, 01/24/2017 - 10:25 नवीन
जर एकापेक्षा जास्त पाने असतील तर पहील्या पानाच्या पुढील पानावरच्या नवीन प्रतिसादांना "नवीन" असे शिर्षक येत नाही .
  • Log in or register to post comments

दुपारी धागा काढता आला नाही.

आनंदी गोपाळ
Wed, 01/25/2017 - 22:59 नवीन
प्रकाशित करताना काहीतरी लोचा होत होता. फक्त ब्लँक पाण दिसत होते
  • Log in or register to post comments

वरच्या मेनु मधे मिपा विशेषांक

सही रे सई
गुरुवार, 01/26/2017 - 20:23 नवीन
वरच्या मेनु मधे मिपा विशेषांक वर टिचकी मारली असता "वारंवार विचारले जाणारे प्रश्न." हे पान उघडत आहे. असच होण अपेक्शित आहे का?
  • Log in or register to post comments

मोबाईलवरुन... अजून नॉट गुड.

प्रा.डॉ.दिलीप बिरुटे
गुरुवार, 01/26/2017 - 20:36 नवीन
मोबाईलवरुन अजूनही फार युजर फ्रेंडली थीम नाही. मोबाईलवरुन मला तरी मिपावर यावं असं अजिबात वाटत नाही. डेस्क्टॉपवरुन मिपावर येत असतो. धन्यवाद आणि शुभेच्छा. चालु द्या....! -दिलीप बिरुटे
  • Log in or register to post comments

सहमत आहे.

गामा पैलवान
गुरुवार, 01/26/2017 - 21:24 नवीन
डॉक्टरांशी सहमत आहे. फिरस्त्यावरून मिपावर यावंसं वाटंत नाही. केवळ सत्रधारिका (= सेशन कुकी) जिवंत ठेवण्यासाठी तिथनं दररोज मिपा उघडतो. कायतरी करा राव. -गा.पै.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: प्रा.डॉ.दिलीप बिरुटे

मोबाईलवरून डेस्कटॉप व्हर्जन

हतोळकरांचा प्रसाद
गुरुवार, 01/26/2017 - 21:29 नवीन
मोबाईलवरून डेस्कटॉप व्हर्जन ओपन करून बघा एकदा. मला तरी मोबाईलवरून मोबाईल व्हर्जनपेक्षा मोबाईलवरून डेस्कटॉप व्हर्जन जास्त सुटसुटीत वाटतं वापरायला!
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: गामा पैलवान

फिरस्त्यावरून पटलयंत्रावृत्ती ....

गामा पैलवान
गुरुवार, 01/26/2017 - 21:46 नवीन
हाप्र, दोन्ही आवृत्त्या वापरून बघितल्या. काही जाणवण्याजोगा फरक नाही. :-( आ.न., -गा.पै.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: हतोळकरांचा प्रसाद

+१००

प्रा.डॉ.दिलीप बिरुटे
गुरुवार, 01/26/2017 - 21:57 नवीन
मोबाईलसाठी वेगवेगळे ब्राऊजर वापरुन पाहिले. पण काय फरक नाही. असो, लैच खाज आली की डेस्क्टॉप सुरु करायचं आणि मिपा इंजॉय करायचं. असो. विषय संपला. -दिलीप बिरुटे
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: गामा पैलवान

मोबाईलवरुन मला तरी मिपावर

आनंदी गोपाळ
गुरुवार, 01/26/2017 - 22:07 नवीन
मोबाईलवरुन मला तरी मिपावर यावं असं अजिबात वाटत नाही.
शमत. माझ्या ब्रावजरचा एस्सेस टाकूनही कुणी मदत करीना मला. ते तसलंच जंबल्ड दिसतंय बोंबल्यावरून. (अवांतरः काल मला धागा टाकता येईना. आज जमला.)
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: प्रा.डॉ.दिलीप बिरुटे

थीमच काहीतरी करा राव!

शब्दबम्बाळ
Wed, 02/08/2017 - 11:31 नवीन
थीमच काहीतरी करा राव! काही बरे वाटेना... स्वगृह तर अस्ताव्यस्त झाल्या सारखं वाटतंय आणि मोबाईल वरून महाकठीण झालंय!
  • Log in or register to post comments

नमस्कार,

नीलकांत
Wed, 02/08/2017 - 23:55 नवीन
नव्या थीम बाबत सर्वांच्या अडचणींची दखल घेतली आहे. त्यानुसार एक एक अडचण दूर करण्याचा प्रयत्न करतो. याशिवायही काही अडचणी असल्यास येथे कळवा.
  • Log in or register to post comments
  • «
  • ‹
  • 1
  • 2
  • 3
  • 4

लेखन करा

लेखन करा

मिसळपाव वर स्वागत आहे.

प्रवेश करा

  • नवीन खाते बनवा
  • Reset your password
मिसळपाव.कॉम बद्दल
  • 1आम्ही कोण?
  • 2Disclaimer
  • 3Privacy Policy
नवीन सदस्यांकरीता
  • 1सदस्य व्हा
  • 2नेहमीचे प्रश्न व उत्तरे
लेखकांसाठी
  • 1लेखकांसाठी मार्गदर्शन उपलब्ध
  • 2लेखन मार्गदर्शन
संपर्क
  • 1सर्व मराठीप्रेमींचे मनापासून स्वागत!
  • 2अभिप्राय द्या
  • 3संपर्क साधा
© 2026 Misalpav.com  ·  Disclaimer  ·  Privacy Policy मराठी साहित्य व संस्कृतीसाठी  ·  प्रवेश  |  सदस्य व्हा