आधार कुणाचा?
चांगल्या नोकरीच्या, गलेलठ्ठ पगाराच्या आशेने मुलं परदेशी जातात ते परतीचे दोर कापूनच. दोन वर्षांनी येऊ, चार वर्षांनी येऊ, असं म्हणत ग्रीन कार्ड कधी घेतात आणि कायमचे अमेरिकावासी कधी होतात, ते कळतही नाही. एकदा तिथल्या जीवनशैलीची सवय झाली, की इथे परत यायला नको वाटतं. आईवडिलांनाही मुलांच्या नसण्याची सवय होते आणि शेजारी, मित्र किंवा नातेवाईकांच्या आधाराने ते आयुष्य घालवतात.
'इथे सगळं ठीक आहे,' असं सांगितलं जातं तब्येत बरी नसली तरी. मुलं तिथे दूर अमेरिकेत, आपली दुखणी त्यांना काय सांगणार? भारतात यायचं, तर खर्च ! रजा पाहिजे? नातवांच्या आठवणीन व्याकूळ होनं आहेच. अशीच अवस्था बहुतेक आईवडिलांची असते. आज मुंबई-पुण्यासारख्या शहरात अक्षरश: घरटी एक मुलगा किंवा मुलगी अमेरिकेत असतात. चांगल्या नोकरीच्या, गलेलठ्ठ पगाराच्या आशेने ही मुलं परदेशी जातात, तेव्हा बहुतेकांनी परतीचे दोर कापलेले असतात. दोन वर्षांनी येऊ, चार वर्षांनी येऊ, असं म्हणत ग्रीन कार्ड कधी घेतात आणि कायमचे अमेरिकावासी कधी होतात, ते कळत नाही. एकदा का तिथल्या जीवनशैलीची सवय झाली, की इथे परत यायला नको वाटतं. मग कधी ४-५ वर्षांनी एखादी ट्रिप भारतात करायची, आईवडिलांची भेट घ्यायची आणि पुन्हा तिथल्या सेवेत हजर व्हायचं, असं सुरू होतं. आईवडिलांनाही मुलांच्या नसण्याची सवय होते आणि शेजारी ,मित्र किंवा नातेवाईकांच्या आधाराने ते आयुष्य घालवतात. दर रविवारी येणाऱ्या फोनवर समाधान मानतात. खूपदा हे बोलणं वरवरचं असतं. मुलांना तिकडे आपली काळजी कशाला, असं म्हणून आईवडील त्यांचे प्रॉब्लेम्स मुलांना सांगत नाहीत. मुलंही खरे प्रॉब्लेम्स आईवडिलांना सांगत नाहीत. नुसती खुशाली विचारली जाते.
अनेक पालक मध्येच एखादी अमेरिकावारी करून येतात. विशेषत: मुलीच्या किंवा सुनेच्या बाळंतपणाच्या निमित्ताने. एकदा बाळंतपण झालं, थोडी अमेरिका फिरून आलं, की परत तोच एकटेपणा खायला उठतो.
खूपदा मुलांना विशेषत: मुलींना खूप अपराधी वाटतं. आई-वडिलांना मुलांची गरज असते, तेव्हा आपण तिथे नाही, ही भावना मनात खात असते. त्यांच्याबरोबर डॉक्टरकडे जायला आपली गरज आहे, हे कळत असतं, पण ते काही करू शकत नाहीत, फक्त फोनवरून सल्ला देऊ शकतात. हजारो मैलांचं अंतर पार करणं खूप कठीण असतं. कधी कधी वाटतं मुलांनी येथे यावं, आता इथेही चांगल्या, मोठ्या पगाराच्या नोकऱ्या मिळतात. आता परत या. मुंबईत किंवा पुणे येथे राहू शकता.' पण तिथे एवढी आरामाची जीवनशैली सोडून येणं सगळ्यांच्याच जिवावर येतं. आईवडिलांचा आक्रोश हृदयापर्यंत पोहोचतच नाही, त्याला कोण काय करणार?
| लेखनविषय: | |
|---|---|
| लेखनप्रकार |
वाचने
11684
प्रतिक्रिया
29
मिसळपाव
प्रतिक्रिया
वास्तववादी प्रकटन!
बापरे..
छान विषय!
सहमत
In reply to छान विषय! by पिवळा डांबिस
हे मात्र..
ही व्यथा जुनीच आहे.
व्रुद्धा सहनिवास.....
वृद्धाश्रम?
In reply to व्रुद्धा सहनिवास..... by केशवराव
व्रुद्धाश्रम....... !
In reply to वृद्धाश्रम? by विसोबा खेचर
व्रुद्धाश
In reply to व्रुद्धाश्रम....... ! by केशवराव
त्यात्या, म
In reply to वृद्धाश्रम? by विसोबा खेचर
असहमत
In reply to व्रुद्धा सहनिवास..... by केशवराव
घरच्यांना
In reply to असहमत by ऋषिकेश
दर आठवड्याला?
In reply to घरच्यांना by अघळ पघळ
विस्तारीत रूप
सहमत
In reply to विस्तारीत रूप by सुनील
प्रकाटाआ
In reply to विस्तारीत रूप by सुनील
हा विषय तसा जुनाच आहे.
माझा अनुभव
In reply to हा विषय तसा जुनाच आहे. by चतुरंग
वा रं माज्या वाघांनु!!!
स्वःतच्या
In reply to वा रं माज्या वाघांनु!!! by पिवळा डांबिस
अवांतर
अहो..
:)))
In reply to अहो.. by प्राजु
मान्य
१००%
चांगला
डांबिसकाक
हा विषय संपला ?