३ ते १० शब्द एवढ्या लांबीच्या सुक्ष्मकथा लिहण्याचा मी प्रयत्न केला आहे. इंग्रजीमध्ये हा प्रकार ten words story,nanofiction वगैरे नावांनी मिरवतो. मराठीमध्ये एवढ्या छोट्या कथा लिहण्याचा प्रयत्न फार क्वचित झाला असावा कारण माझ्या अल्प वाचनात अजूनतरी मराठी सुक्ष्मकथा आल्या नाहीत.
पारंपारिक कथेचा जो ढाचा असतो (सुरुवात, गाभा, शेवट) त्यापेक्षा या कथांचं स्वरूप वेगळं असतं. वरवर पाहता ती कथा वाटणार नाही. ते एखादं वाक्य असेल, बातमी असेल, संभाषणामधला एक तुकडा असेल किंवा अजून काही. पण त्या मोजक्या शब्दांमध्ये एक किंवा त्यापेक्षा जास्त कथा दडलेल्या असतात. आपण थोडा विचार केल्यास शब्दांमागे दडलेल्या कथा समोर येऊ लागतात. शिवाय सुक्ष्मकथांमध्ये अनेक लघु किंवा दिर्घ कथांना जन्म देण्याची क्षमता असते. खालील उदाहरणांवरून मला काय म्हणायचंय ते अधिक स्पष्ट होईल.
उदा I)"मोदीजी, तुम्ही या सुभाषला विमान दुर्घटनेची भीती दाखवताय??!”
- सुभाषचंद्र बोसांचा विमान दुर्घटनेत मृत्यू झाला होता हे आपल्याला माहीत आहे. मोदी त्यांना भेटून तो अपघात टाळण्याचा प्रयत्न करत आहेत असं दिसतं. याचा अर्थ टाईम मशीनचा शोध लागला असेल आणि मोदी भूतकाळात गेले असतील अशी कथा समोर येते. पण या प्रकाराची मजा एवढ्यावरच संपत नाही.
चला अजून खोलवर विचार करू - जर टाईम मशीनचा शोध लागलाच तर सहाजिकच त्याचा वापर भूतकाळात किंवा भविष्यात फेरफार करण्यासाठी केला जाणार नाही, कमीत कमी सरकार तरी तसं करू देणार नाही अन्यथा मानवजातीचा विनाश संभवतो. असं असूनही मोदीजी हा नियम मोडायला का निघालेत? अन त्यांनी सुभाषचंद्र बोसांनाच का निवडल? की तो मोदींचा तोतया आहे?? प्रत्येक शक्यतेवर एक कथा बनू शकेल.( हा वाचकांच्या मेँदुला अन कल्पनाशक्तीला खुराक आहे.)
अशा पद्धतीची एखादी सुक्ष्मकथा दिल्यास दहा लेखक त्यावर दहा वेगवेगळ्या प्रकारच्या लघु किंवा दिर्घ कथा लिहू शकतील!!
उदा २: दुसरा प्रकार असा आहे की एकाच कथेतून वेगवेगळ्या वाचकांना वेगवेगळे अर्थ लागतील. जसं की ही सुक्ष्मकथा पहा:
मार्केट सर्वेक्षण: सफेद साड्यांचा खप वाढला, बांगड्यांचा घटला
- का बरं असं झालं असेल? कुणी म्हणेल अशाप्रकारची फॅशन आलीये म्हणून बायका पांढऱ्या साड्या नेसून बिना बांगड्यांचं फिरताहेत(अशी विचित्र फॅशन का आली याचं उत्तर शोधताना बऱ्याच विनोदी शक्यता डोक्यात येतील). कुणाला असा अर्थ लागेल की सीमेवर युद्ध सुरु आहे अन त्यात आपले हजारो सैनिक मारले जाताहेत म्हणून विधवा बायकांची संख्या वाढली (युद्ध का सुरु झालं हा गहन प्रश्न अनेक कथांना जन्म द्यायला पुरेसा आहे) कुणाला अजून वेगळा अर्थ लागेल.
अशा पद्धतीने प्रत्येक सुक्ष्मकथा आपल्याला एक छोटीशी कथा सांगून जाते अन अधिक विचार केल्यास अनेक कथांच्या शक्यता देऊन जाते. एक मात्र खरं की कथा जेवढी छोटी तेवढी लिहायला कठीण.
माझ्या अल्पमतीप्रमाणे काही सुक्ष्मकथा लिहण्याचा प्रयत्न केलाय. आपण प्रत्येक पायरीवर थोडं थांबून विचार करावा…कथा नक्की भेटतील.
(टिप: कथा शब्दसंख्येच्या उतरत्या क्रमाने मांडल्या आहेत.)
१) हळदीचा बिझनेस एवढा वाढलाय की...काल अश्वत्थामा आला होता.
२) एक बातमी: शक्तिमान ब्रम्हचारी, गीता विश्वासचं तमराज किलविशसोबत लग्न.
३) मी पिसारा फुलवला तेव्हा माझा बॉस तळवे चाटत होता.
४) "मोदीजी, तुम्ही या सुभाषला विमान दुर्घटनेची भीती दाखवताय??!"
५) आजची ताजा खबर: राष्ट्रीय संग्रहालयातून हजारची नोट गायब.
६) मार्केट सर्वेक्षण: सफेद साड्यांचा खप वाढला, बांगड्यांचा घटला.
७) ३०१७: सर्वोत्कृष्ट पर्यटनस्थळ पुरस्कार: सल्फर
व्हॅली, शनी.
८) बाळा, ही पृथ्वी; आपले पूर्वज इथे रहायचे.
९) मी माझ्यासोबत रस्त्याने जातांना आम्हाला मी भेटलो
( वेगवेगळ्या समांतर विश्वातले तिघेजण एकत्र आले अशी कल्पना आहे.)
१०) झाडांनी ऑक्सिजन बनवणं बंद केलंय...अरे वाS.
११) नापिकी, मेलेलं ढोर, गळ्यातलं चऱ्हाट, झाड.
१२) आज ईद....बघा पृथ्वी उगवलीये का.
१३) एलीयन्सची विजयी घोषणा: हर हर महादेव.
१४) IPL सीजन ५१७ विजेते: मंगळ रेडबुल्स.
१५) २१३५: यंत्रमानवांचा संसदेवर मोर्चा: आरक्षण आरक्षण
१६) कब्रस्थान, शॉपिंग कॉंप्लेक्स...बिचारी भूतं.
१७) स्वप्न, मी उडतोय...धपाकS...अॅम्बुलन्स.
१८) सर, कालच मेलोय, अॅडमिशन मिळेल?
१९) मी... पृथ्वीवरचा शेवटचा एलीयन.
२०) शाळा सुटली...Logout.
-------------------------------------------------
वाचने
5728
प्रतिक्रिया
27
मिसळपाव
प्रतिक्रिया
छान कल्पना !!
.
??
In reply to . by अत्रन्गि पाउस
चांगलंय..
छान आहेत कथा. माझ्या वाचनात
In reply to चांगलंय.. by खेडूत
इंटरेस्टिंग!
कथा आवडल्याबद्दल सर्व मित्र
कल्पना छान आहे. पण कथा म्हंटल
प्रयत्न करा
In reply to कल्पना छान आहे. पण कथा म्हंटल by ज्योति अळवणी
प्रयत्न करा
In reply to कल्पना छान आहे. पण कथा म्हंटल by ज्योति अळवणी
वाचकांची मानसिकता आणि अपेक्षा
In reply to कल्पना छान आहे. पण कथा म्हंटल by ज्योति अळवणी
लेखकाने वाचकांना नेहेमी
In reply to वाचकांची मानसिकता आणि अपेक्षा by आदूबाळ
छान आहेत, ह्या आणि मन यांनी
सुक्ष्मकथांचा एक भन्नाट अन
In reply to छान आहेत, ह्या आणि मन यांनी by हतोळकरांचा प्रसाद
कल्पनाशक्ती वाढेल
खुप मस्त.
(No subject)
हा प्रकार इंटरेस्टींग आहे- माझी अर्ध्या शब्दातली गोष्ट....
??
थोडक्यात...
In reply to ?? by अॅस्ट्रोनाट विनय
-^-
In reply to थोडक्यात... by ज्ञानोबाचे पैजार
हहपुवा!! पैजारबुवा, हि
In reply to थोडक्यात... by ज्ञानोबाचे पैजार
#honorkilling
माझी पण सूक्ष्म कथा
अजून दोन सुक्ष्मकथा
संगणकाचा मुक्तहस्ताने वापर
हा प्रकार आवडला असल्यास