Skip to main content
मिसळपाव

Main navigation

  • मुख्य पान
  • पाककृती
  • कविता
  • भटकंती
  • नवीन लेखन
Submitted by अॅस्ट्रोनाट विनय on Mon, 01/09/2017 - 16:38
लेखनविषय (Tags)
कथा
लेखनप्रकार (Writing Type)
विरंगुळा
३ ते १० शब्द एवढ्या लांबीच्या सुक्ष्मकथा लिहण्याचा मी प्रयत्न केला आहे. इंग्रजीमध्ये हा प्रकार ten words story,nanofiction वगैरे नावांनी मिरवतो. मराठीमध्ये एवढ्या छोट्या कथा लिहण्याचा प्रयत्न फार क्वचित झाला असावा कारण माझ्या अल्प वाचनात अजूनतरी मराठी सुक्ष्मकथा आल्या नाहीत. पारंपारिक कथेचा जो ढाचा असतो (सुरुवात, गाभा, शेवट) त्यापेक्षा या कथांचं स्वरूप वेगळं असतं. वरवर पाहता ती कथा वाटणार नाही. ते एखादं वाक्य असेल, बातमी असेल, संभाषणामधला एक तुकडा असेल किंवा अजून काही. पण त्या मोजक्या शब्दांमध्ये एक किंवा त्यापेक्षा जास्त कथा दडलेल्या असतात. आपण थोडा विचार केल्यास शब्दांमागे दडलेल्या कथा समोर येऊ लागतात. शिवाय सुक्ष्मकथांमध्ये अनेक लघु किंवा दिर्घ कथांना जन्म देण्याची क्षमता असते. खालील उदाहरणांवरून मला काय म्हणायचंय ते अधिक स्पष्ट होईल. उदा I)"मोदीजी, तुम्ही या सुभाषला विमान दुर्घटनेची भीती दाखवताय??!” - सुभाषचंद्र बोसांचा विमान दुर्घटनेत मृत्यू झाला होता हे आपल्याला माहीत आहे. मोदी त्यांना भेटून तो अपघात टाळण्याचा प्रयत्न करत आहेत असं दिसतं. याचा अर्थ टाईम मशीनचा शोध लागला असेल आणि मोदी भूतकाळात गेले असतील अशी कथा समोर येते. पण या प्रकाराची मजा एवढ्यावरच संपत नाही. चला अजून खोलवर विचार करू - जर टाईम मशीनचा शोध लागलाच तर सहाजिकच त्याचा वापर भूतकाळात किंवा भविष्यात फेरफार करण्यासाठी केला जाणार नाही, कमीत कमी सरकार तरी तसं करू देणार नाही अन्यथा मानवजातीचा विनाश संभवतो. असं असूनही मोदीजी हा नियम मोडायला का निघालेत? अन त्यांनी सुभाषचंद्र बोसांनाच का निवडल? की तो मोदींचा तोतया आहे?? प्रत्येक शक्यतेवर एक कथा बनू शकेल.( हा वाचकांच्या मेँदुला अन कल्पनाशक्तीला खुराक आहे.) अशा पद्धतीची एखादी सुक्ष्मकथा दिल्यास दहा लेखक त्यावर दहा वेगवेगळ्या प्रकारच्या लघु किंवा दिर्घ कथा लिहू शकतील!! उदा २: दुसरा प्रकार असा आहे की एकाच कथेतून वेगवेगळ्या वाचकांना वेगवेगळे अर्थ लागतील. जसं की ही सुक्ष्मकथा पहा: मार्केट सर्वेक्षण: सफेद साड्यांचा खप वाढला, बांगड्यांचा घटला - का बरं असं झालं असेल? कुणी म्हणेल अशाप्रकारची फॅशन आलीये म्हणून बायका पांढऱ्या साड्या नेसून बिना बांगड्यांचं फिरताहेत(अशी विचित्र फॅशन का आली याचं उत्तर शोधताना बऱ्याच विनोदी शक्यता डोक्यात येतील). कुणाला असा अर्थ लागेल की सीमेवर युद्ध सुरु आहे अन त्यात आपले हजारो सैनिक मारले जाताहेत म्हणून विधवा बायकांची संख्या वाढली (युद्ध का सुरु झालं हा गहन प्रश्न अनेक कथांना जन्म द्यायला पुरेसा आहे) कुणाला अजून वेगळा अर्थ लागेल. अशा पद्धतीने प्रत्येक सुक्ष्मकथा आपल्याला एक छोटीशी कथा सांगून जाते अन अधिक विचार केल्यास अनेक कथांच्या शक्यता देऊन जाते. एक मात्र खरं की कथा जेवढी छोटी तेवढी लिहायला कठीण. माझ्या अल्पमतीप्रमाणे काही सुक्ष्मकथा लिहण्याचा प्रयत्न केलाय. आपण प्रत्येक पायरीवर थोडं थांबून विचार करावा…कथा नक्की भेटतील. (टिप: कथा शब्दसंख्येच्या उतरत्या क्रमाने मांडल्या आहेत.) १) हळदीचा बिझनेस एवढा वाढलाय की...काल अश्वत्थामा आला होता. २) एक बातमी: शक्तिमान ब्रम्हचारी, गीता विश्वासचं तमराज किलविशसोबत लग्न. ३) मी पिसारा फुलवला तेव्हा माझा बॉस तळवे चाटत होता. ४) "मोदीजी, तुम्ही या सुभाषला विमान दुर्घटनेची भीती दाखवताय??!" ५) आजची ताजा खबर: राष्ट्रीय संग्रहालयातून हजारची नोट गायब. ६) मार्केट सर्वेक्षण: सफेद साड्यांचा खप वाढला, बांगड्यांचा घटला. ७) ३०१७: सर्वोत्कृष्ट पर्यटनस्थळ पुरस्कार: सल्फर व्हॅली, शनी. ८) बाळा, ही पृथ्वी; आपले पूर्वज इथे रहायचे. ९) मी माझ्यासोबत रस्त्याने जातांना आम्हाला मी भेटलो ( वेगवेगळ्या समांतर विश्वातले तिघेजण एकत्र आले अशी कल्पना आहे.) १०) झाडांनी ऑक्सिजन बनवणं बंद केलंय...अरे वाS. ११) नापिकी, मेलेलं ढोर, गळ्यातलं चऱ्हाट, झाड. १२) आज ईद....बघा पृथ्वी उगवलीये का. १३) एलीयन्सची विजयी घोषणा: हर हर महादेव. १४) IPL सीजन ५१७ विजेते: मंगळ रेडबुल्स. १५) २१३५: यंत्रमानवांचा संसदेवर मोर्चा: आरक्षण आरक्षण १६) कब्रस्थान, शॉपिंग कॉंप्लेक्स...बिचारी भूतं. १७) स्वप्न, मी उडतोय...धपाकS...अॅम्बुलन्स. १८) सर, कालच मेलोय, अॅडमिशन मिळेल? १९) मी... पृथ्वीवरचा शेवटचा एलीयन. २०) शाळा सुटली...Logout. -------------------------------------------------
  • Log in or register to post comments
  • 5670 views

प्रतिक्रिया

Submitted by चिनार on Mon, 01/09/2017 - 16:42

Permalink

छान कल्पना !!

छान कल्पना !!
  • Log in or register to post comments

Submitted by अत्रन्गि पाउस on Mon, 01/09/2017 - 16:43

Permalink

.

..
  • Log in or register to post comments

Submitted by अॅस्ट्रोनाट विनय on Mon, 01/09/2017 - 17:33

In reply to . by अत्रन्गि पाउस

Permalink

??

??
  • Log in or register to post comments

Submitted by खेडूत on Mon, 01/09/2017 - 16:50

Permalink

चांगलंय..

चांगलंय.. कारण माझ्या अल्प वाचनात अजूनतरी मराठी सुक्ष्मकथा आल्या नाहीत. ह्या घ्या मिपावरच्या:
  • Log in or register to post comments

Submitted by अॅस्ट्रोनाट विनय on Mon, 01/09/2017 - 17:30

In reply to चांगलंय.. by खेडूत

Permalink

छान आहेत कथा. माझ्या वाचनात

छान आहेत कथा. माझ्या वाचनात नव्हत्या आल्या. कारण मिपा वर मी नुकताच प्रवेश केलाय. माझं आतापर्यंतच मराठी वाचन फक्त पुस्तकं आणि दिवाळी अंक..तिकडे दिसला नव्हता हा प्रकार.
  • Log in or register to post comments

Submitted by अजया on Mon, 01/09/2017 - 17:08

Permalink

इंटरेस्टिंग!

इंटरेस्टिंग!
  • Log in or register to post comments

Submitted by अॅस्ट्रोनाट विनय on Mon, 01/09/2017 - 17:36

Permalink

कथा आवडल्याबद्दल सर्व मित्र

कथा आवडल्याबद्दल सर्व मित्र मैत्रीणींचे आभार. प्रोत्साहन मिळाल्याने नवीन लिखाण करायचा हुरुप येतो.
  • Log in or register to post comments

Submitted by ज्योति अळवणी on Mon, 01/09/2017 - 17:58

Permalink

कल्पना छान आहे. पण कथा म्हंटल

कल्पना छान आहे. पण कथा म्हंटल की विस्ताराने लिहिलेले असते अशी मानसिकता असल्याने अशा संक्षिप्त कथा समजून घ्यायला अवघड जाईल बहुतेक
  • Log in or register to post comments

Submitted by अॅस्ट्रोनाट विनय on Mon, 01/09/2017 - 18:38

In reply to कल्पना छान आहे. पण कथा म्हंटल by ज्योति अळवणी

Permalink

प्रयत्न करा

सहसा माझा लेखनप्रवास विज्ञानरंजन आणि अदभुतिका या दोन मित्रांच्या संगतीनेच होत असल्याने काही तांत्रिक गोष्टी समजायला अडचण जाऊ शकते. तरीसुद्धा प्रयत्न करा. एखाद्या गोष्टीच्या आकलनात काही अडचण आल्यास जरूर सांगावे.
  • Log in or register to post comments

Submitted by अॅस्ट्रोनाट विनय on Mon, 01/09/2017 - 18:38

In reply to कल्पना छान आहे. पण कथा म्हंटल by ज्योति अळवणी

Permalink

प्रयत्न करा

सहसा माझा लेखनप्रवास विज्ञानरंजन आणि अदभुतिका या दोन मित्रांच्या संगतीनेच होत असल्याने काही तांत्रिक गोष्टी समजायला अडचण जाऊ शकते. तरीसुद्धा प्रयत्न करा. एखाद्या गोष्टीच्या आकलनात काही अडचण आल्यास जरूर सांगावे.
  • Log in or register to post comments

Submitted by आदूबाळ on Mon, 01/09/2017 - 19:02

In reply to कल्पना छान आहे. पण कथा म्हंटल by ज्योति अळवणी

Permalink

वाचकांची मानसिकता आणि अपेक्षा

वाचकांची मानसिकता आणि अपेक्षा गेली खड्ड्यात. लेखकाने वाचकांना नेहेमी चॅलेंज केलं पाहिजे.
  • Log in or register to post comments

Submitted by अॅस्ट्रोनाट विनय on Mon, 01/09/2017 - 19:08

In reply to वाचकांची मानसिकता आणि अपेक्षा by आदूबाळ

Permalink

लेखकाने वाचकांना नेहेमी

लेखकाने वाचकांना नेहेमी चॅलेंज केलं पाहिजे. हे मात्र अगदी खरं आहे. मराठीमध्ये हे होतांना दिसतं नाही म्हणून आपल्या वाचकांना डोकं गहाण ठेवून वाचनाची सवय लागलीये(सन्माननीय अपवाद आहेत) याला दोषी लेखकच
  • Log in or register to post comments

Submitted by हतोळकरांचा प्रसाद on Mon, 01/09/2017 - 18:05

Permalink

छान आहेत, ह्या आणि मन यांनी

छान आहेत, ह्या आणि मन यांनी लिहिलेल्या पण! फॅमिली गेटटुगेदर वगैरेला फनगेम्स म्हणून खेळायला पण छान वाटेल!
  • Log in or register to post comments

Submitted by अॅस्ट्रोनाट विनय on Mon, 01/09/2017 - 19:19

In reply to छान आहेत, ह्या आणि मन यांनी by हतोळकरांचा प्रसाद

Permalink

सुक्ष्मकथांचा एक भन्नाट अन

सुक्ष्मकथांचा एक भन्नाट अन मजेशीर उपप्रकार मी लवकरच मिपावर आणतोय. एक गंमत म्हणून आम्ही तो शोधला होता. तो प्रकार फन गेम म्हणून खेळायला अगदी योग्य ठरेल :)
  • Log in or register to post comments

Submitted by Ranapratap on Mon, 01/09/2017 - 20:16

Permalink

कल्पनाशक्ती वाढेल

छान प्रकार आहे. यामुळे वाचकांची कल्पनाशक्ती वाढेल.
  • Log in or register to post comments

Submitted by पद्मावति on Mon, 01/09/2017 - 20:27

Permalink

खुप मस्त.

खुप मस्त.
  • Log in or register to post comments

Submitted by जव्हेरगंज on Tue, 01/10/2017 - 09:26

Permalink

(No subject)

Image removed.
  • Log in or register to post comments

Submitted by ज्ञानोबाचे पैजार on Tue, 01/10/2017 - 09:40

Permalink

हा प्रकार इंटरेस्टींग आहे- माझी अर्ध्या शब्दातली गोष्ट....

आईXX पैजारबुवा,
  • Log in or register to post comments

Submitted by अॅस्ट्रोनाट विनय on Tue, 01/10/2017 - 10:13

Permalink

??

पैजारबुवा, कथा समजावून सांगाल काय
  • Log in or register to post comments

Submitted by ज्ञानोबाचे पैजार on Tue, 01/10/2017 - 12:13

In reply to ?? by अॅस्ट्रोनाट विनय

Permalink

थोडक्यात...

आईXX यातला अर्धा शब्द आई बद्दलचा एक उद्गार दर्शवतो. तो स्वतःच्या आई बद्दल असु शकतो किंवा दुसर्‍या कोणाच्याही आई बद्दल. या शब्दा मधे आपुलकी माया प्रेम दडलेले असू शकते किंवा एखाद्या बद्दल दडलेला रागही असु शकतो. या व्यक्त होणार्‍या भावनांच्या पाठी काही कारणे असू शकतात. आणि या भावना अशा प्रकारे व्यक्त होण्या मागे काही घटनाही घडलेली असू शकते. उदाहरणार्थः- रस्त्यावर चालत असताना अचानक समोरुन आमिरखान चालत आला तर त्या वेळी तोंडातुन सहज उद्गार निघू शकतो "आईशॉट आमिरखान" पैजारबुवा,
  • Log in or register to post comments

Submitted by अॅस्ट्रोनाट विनय on Tue, 01/10/2017 - 12:38

In reply to थोडक्यात... by ज्ञानोबाचे पैजार

Permalink

-^-

हम्म...बरोबर
  • Log in or register to post comments

Submitted by हतोळकरांचा प्रसाद on Tue, 01/10/2017 - 13:06

In reply to थोडक्यात... by ज्ञानोबाचे पैजार

Permalink

हहपुवा!! पैजारबुवा, हि

हहपुवा!! पैजारबुवा, हि शॉर्टेस्ट सूक्ष्मकथा लैच भारी! :):)
  • Log in or register to post comments
Profile picture for user मराठी कथालेखक

Submitted by मराठी कथालेखक on Tue, 01/10/2017 - 16:05

Permalink

#honorkilling

मी तेव्हा वचन मोडले पण म्हणूनच आज तुझ्या पंचाहत्तरीला येवू शकले रे
  • Log in or register to post comments

Submitted by महासंग्राम on Tue, 01/10/2017 - 16:06

Permalink

माझी पण सूक्ष्म कथा

.
  • Log in or register to post comments

Submitted by अॅस्ट्रोनाट विनय on Tue, 01/10/2017 - 18:38

Permalink

अजून दोन सुक्ष्मकथा

छान कथा मंदार. अजून दोन सुक्ष्मकथा ? !
  • Log in or register to post comments

Submitted by पक्षी on Mon, 01/16/2017 - 15:06

Permalink

संगणकाचा मुक्तहस्ताने वापर

संगणकाचा मुक्तहस्ताने वापर केला, उजवा हात खूप दुखतं आहे.
  • Log in or register to post comments

Submitted by अॅस्ट्रोनाट विनय on Tue, 01/17/2017 - 00:20

Permalink

हा प्रकार आवडला असल्यास

हा प्रकार आवडला असल्यास सुक्ष्मकथांचा दुसरा भन्नाट प्रकारसुद्धा आपल्याला नक्कीच आवडेल. http://www.misalpav.com/node/38554
  • Log in or register to post comments

प्रवेश करा

  • नवीन खाते बनवा
  • Reset your password

© 2026 Misalpav.com