✍ मराठी साहित्य, संस्कृती आणि लेखनाचे व्यासपीठ
प्रवेश करा | सदस्य व्हा
मिसळपाव
मिसळपाव मराठी साहित्य

Main navigation

  • मुख्य पान
  • पाककृती
  • कविता
  • भटकंती
  • नवीन लेखन

घर

च — चाणक्य, Fri, 01/06/2017 - 18:13
मी ज्या घरात सध्या असतो त्या घरात आधी रहायचो माहित होती मला भिंत न् भिंत कोपरा अन् कोपरा त्या घराचा आणि सहज जाऊ शकत होतो मी एका खोलीतून दुस-या खोलीत . . . पण आजकाल, कुठल्याही खोलीत गेलो तरी हसते ती खोली माझ्याकडे बघून अनोळखी माणसाकडे बघून आपण हसतो तसं काही काही कोपरे तर दिसतच नाहीत मला भिंती दिसतात....पण त्यांना आता वेगळा रंग आहे दारंही वाढलीयेत घरात तशी दिसत नाहीत....पण आहेत...कळतं मला कधी कधी तर वाटतं बरीच घरं आहेत या एकाच घरात मग मी ये जा करतो या घरातून त्या घरात अगदी बेमालूम पणे...कुणालाही कळू न देता . . . याच घरात मी आशिर्वादही घेतले आणि शापही ईथे कधी पालवी फुटलेला मी अाताशा पाचोळा बनून उडत राहतो घरात त्याच माझ्या जुन्या घरात उडता उडता दिसत राहतं काहीबाही मला जुनं काहीतरी....गोधडीसारखं जुनं थोडा वेळ किंवा थोडे दिवस उडल्यावर कुठल्यातरी खोलीत पडतो मग आणि येतो उठून माझ्या माझ्या खोलीत . . . रोज सकाळी मी पडतो घराबाहेर आणि येतो संध्याकाळी दारातून आत घर शोधत... कधी सापडलंच चुकून तरी निसटतं हातातून मुठीतल्या वाळूसारखं मी आटापिटा करतो जीवाचा घर धरून ठेवण्याचा पण कदाचित घरालाच मान्य नाहीये माझ्या हातात राहणं . . . मी ज्या घरात सध्या असतो त्या घरात मी आधी रहायचो

प्रतिक्रिया द्या
1012 वाचन

💬 प्रतिसाद (3)

सुरेख! कविता आवडली!

रातराणी
Sat, 01/07/2017 - 01:18 नवीन
सुरेख! कविता आवडली!
  • Log in or register to post comments

आवडली कविता !

संजय क्षीरसागर
Sat, 01/07/2017 - 01:40 नवीन
.
  • Log in or register to post comments

सुरेख लिहीलेय,

नीलमोहर
Sat, 01/07/2017 - 14:12 नवीन
आवडली कविता
  • Log in or register to post comments

लेखन करा

लेखन करा

मिसळपाव वर स्वागत आहे.

प्रवेश करा

  • नवीन खाते बनवा
  • Reset your password
मिसळपाव.कॉम बद्दल
  • 1आम्ही कोण?
  • 2Disclaimer
  • 3Privacy Policy
नवीन सदस्यांकरीता
  • 1सदस्य व्हा
  • 2नेहमीचे प्रश्न व उत्तरे
लेखकांसाठी
  • 1लेखकांसाठी मार्गदर्शन उपलब्ध
  • 2लेखन मार्गदर्शन
संपर्क
  • 1सर्व मराठीप्रेमींचे मनापासून स्वागत!
  • 2अभिप्राय द्या
  • 3संपर्क साधा
© 2026 Misalpav.com  ·  Disclaimer  ·  Privacy Policy मराठी साहित्य व संस्कृतीसाठी  ·  प्रवेश  |  सदस्य व्हा