✍ मराठी साहित्य, संस्कृती आणि लेखनाचे व्यासपीठ
प्रवेश करा | सदस्य व्हा
मिसळपाव
मिसळपाव मराठी साहित्य

Main navigation

  • मुख्य पान
  • पाककृती
  • कविता
  • भटकंती
  • नवीन लेखन

मी आज केलेला व्यायाम - जानेवारी २०१७

ग
गवि यांनी
Mon, 01/02/2017 - 13:03  ·  लेख
लेख
. नमस्कार मंडळी. "मी आज केलेला व्यायाम" या धाग्यांना उदंड प्रतिसाद मिळत आहे आणि अनेकांनी यातून प्रेरणा घेऊन व्यायाम सुरू केला आहे. व्यायाम सुरू केलेल्या आणि व्यायामात सातत्य ठेवलेल्या सर्वांचे अभिनंदन. आपण सर्वांनी केलेला व्यायाम पुढीलप्रमाणे - नोव्हेंबर २०१६ - सायकलिंग - ८०१० किमी आणि रनिंग / वॉकिंग - २४८ किमी. डिसेंबर २०१६ - सायकलिंग - ९६१३ किमी आणि रनिंग / वॉकिंग - २९१ किमी. ************************************************** मी आज केलेला व्यायाम - डिसेंबर २०१६ या धाग्यावर अनेकांनी घामटा काढला, धापा टाकल्या आणि एकमेकांचा हुरुप वाढवत एक नवीन "मिशन" लाँच केलं. अगदी आमच्यासारखे लठ्ठंभारतीदेखील पोट सावरत धावायला नाही तरी किमान चालायला तरी लागले. "सिम्पली वॉकिंग" या साध्यासरळ अ‍ॅपमुळे कोणत्याही सोशल मीडियाशिवाय आणि संपूर्ण डेटा आपल्याच डिव्हाईसवर ठेवून शेअरिंगचा कंट्रोल आपल्या हातात ठेवणं सोपं झालं. बाकी मॅप, स्टॅटिस्टिक्स वगैरे सगळं यात उत्तमपैकी आहे. तर पहिला धागा भरुन वाहू लागल्याने जानेवारी २०१७ साठी नवा भाग काढतो आहे. यावेळी सर्वांना सहज जमणारा आणि तुलनेत सुरक्षित असा "चालणे" हा जो व्यायाम आहे त्यावर भर द्यावा आणि अगदी बिगिनरपासून रेग्युलर फिटनेस फ्रीकांना "चालणारा" चालणं हा व्यायाम अधिकाधिक लोकांनी सुरु करावा आणि त्याबाबत चर्चा करावी अशी विनंती. मी स्वतः शून्य किलोमीटर चालत चालत बरीच वर्षं काढली. आता दीड महिना झाला, सातत्य बर्यापैकी आहे. भराभर चाललं की भरपूर दमतो पण तसंच न थांबता चाललं की एक प्रकारची सुखद "हाय" नशासदृश जाणीव होते. असा अनुभव आणखी कोणाला आहे का? लठ्ठ व्यक्ती वेगाने चालली असता गुडघे भरपूर दणकतात. यावर काय करावं? शिवाय मांड्या एकमेकांवर घासून वेदनादायक स्किन इरिटेशन होतं, ऑफिसच्या मधल्या वेळात चालणं साधता येतं पण इतका घाम येतो की फॉर्मल कपडे भिजून जातात आणि जवळजवळ ओल्या अंगाने एसीत परत यावं लागतं. कोणाला अशाच इतर अडचणी येतात का? चला ...लिटरली चला... चाला..... कीप वॉकिंग... चियर्स... A
वर्गीकरण
लेखनविषय (Tags)
वावर
आरोग्य
लेखनप्रकार (Writing Type)
प्रकटन
आरोग्य

प्रतिक्रिया द्या
45682 वाचन

💬 प्रतिसाद (135)

प्रतिक्रिया

इथे थंडी आहे हो खुप. बाहेर

पिलीयन रायडर
Sat, 01/07/2017 - 00:23 नवीन
इथे थंडी आहे हो खुप. बाहेर पडुन पळणं सध्या शक्य नाहीये.
↩ प्रतिसाद: सूड

ट्रेडमिल

आनंदयात्री
Sat, 01/07/2017 - 01:34 नवीन
मी शिकाऊ आहे, मागच्या ४-5 महिन्यात केलेली हि प्रगती. १. पहिला महिना - सलग ४० मिनिटे चालणे जमवले. सुरुवात २० मिनिटांपासून केली होती. रोज हळूहळू २-३ मिनिटे वाढवली. या महिन्यात चालण्याचा जास्तीत जास्त वेग ३.६ एलेव्हेशन ०. पायात दुखणे वैगेरे साध्य साध्य अडचणी आल्या. अगदी पहिल्या दिवसामध्ये दार दहा मिनिटांनी ३० सेकंदाचा ब्रेकही घेतला. काय शिकलो?- मध्ये मध्ये पाण्याचा घोट घेतला कि स्टॅमिना टिकून राहतो. २. दुसरा महिना - सलग ४० मिनिटे चालणे. एलेव्हेशन ०.५, ३.७ ते ३.८ ने चालता यायला लागले. काय शिकलो?- चालणे मोनोटोनस. वर्कआउटला साजेशी गाणे ४० मिनिटे ऐकणे म्हणजे कानांवर अन मेंदूवर अत्याचार व्हायला लागले. बातम्या किंवा आवडीच्या विषयांचे व्हिडीओ, लेक्चर्स पाहायला सुरुवात केली. ३. नंतर आजवर- २-३ आठवडे सलग गॅप पडला, भीती वाटली कि 'ये रे माझ्या मागल्या' .. पुन्हा चालणे बंद होतेय. पण सुरु करता आले. दर वीस मिनिटांच्या सेक्शन मध्ये २ मिनिटे असे पळायला सुरुवात केली. आता मागच्या दोन आठवड्यात सलग ४-५ मिनिटे जमायला लागले आहे. काय शिकलो?- पळणे आवडीच्या गाण्याला सुरु करावे. कमी स्पीडने पळाले तर जास्त काळ पळता येते. स्टॅमिना नुसार स्पीड आपोआप वाढेल. सध्या - चालणे ३.७-३.८ ने, पळणे ४.१ - ४.५ ने. एलेव्हेशन १.५. वीकडेज मध्ये ४० मिनिटे (२.५-३.० माईल) आणि विकेंडला ६० मिनिटे पूर्ण (3.५-4.० माईल). कॆलरीज? - यंत्रावर करेक्ट कॆलरीज मोजायला रोज वजन एंटर करावे लागते, त्यामुळे कॆलरीजचा ट्रॅक ठेवला नाहीये. फिटनेस गॅजेटहि घेतलेले नाही. गुगल फिट मध्ये नोंद मात्र ठेवतो. टार्गेट- बरोबर व्यायाम करणारा मित्र ६.५ च्या स्पीडने एक तास पळतो. साताठशे कॆलरी सहज उडवतो. त्याच्यासारखे पळणे जमवायचा मानस आहे .. त्यामुळे दिल्ली दूरही नाही बहोत दूर है .. हे जाणून आहे :) थोडक्यात काय पॅरामीटर्सचे आदर्श प्रमाण हे तुमच्या स्टॅमिनाशी डायरेक्ट्ली प्रपोर्शनल आहे, अशी माझी सध्याची धारणा आहे.
↩ प्रतिसाद: पिलीयन रायडर

ओके!

पिलीयन रायडर
Sun, 01/08/2017 - 07:52 नवीन
ओके! तुमच्या प्रतिसादतुन मी काय शिकले? १५ मिनटं चालणं अगदीच बाळबोध आहे. अजुन फार म्हणजे फार जास्त चालायला हवंय. आणि ते ही रोज. साधारण तुमच्या सारखीच स्ट्रॅटर्जी ठेवते. आणि हळुहळु वाढवत नेते.
↩ प्रतिसाद: आनंदयात्री

एरवी ट्रेडमिलवर नीट पळणार्‍या

अमर विश्वास
Sun, 01/08/2017 - 11:03 नवीन
एरवी ट्रेडमिलवर नीट पळणार्‍या आम्हा लोकांना सणस ग्राऊंडचे दोन राउंड मारताना धापा टाकायला व्हायचं.... हे फारसे पटत नाही. मी स्वात: गेले ५+ वर्षे ट्रेडमिलवर पाळतो आहे . पण १० किमी रनिंग रेस कम्प्लिट करताना किंवा हिमालयात ट्रेकिंग करताना मला अजिबात धापा टाकाव्या लागत नाहीत. ट्रेडमिलवर पाळण्याची (अर्थात प्रत्येक व्यायामाची) एक पद्धत असते व योग्य पद्धतीने व्यायाम केल्यास योग्य फायदे मिळतात ट्रेडमिलवर पळताना मला जाणवलेल्या काही गोष्टी : १. ट्रेडमिल वर रोज पळू नये. आठवड्यात जास्तीतजास्त ३ ते ४ वेळा ट्रेडमिल वापरावी. उरलेले दिवस सायकलिंग / क्रॉस जॉगर वापरावा २. पळण्यात प्रगती होण्यासाठी पायाचे स्नायु तयार होणे फार म्हत्वाचे असते. आठवड्यातून किमान २ वेळा पायांचा व्यायाम करावा (Squats / lunges / calf Raises यासारखे व्यायाम ) ३. पाळण्यापूर्वी वॉर्म अप जरूर करावा ४. ट्रेडमिल वर पाळताना एकाच वेगाने फार वेळ पाळण्यापेक्षा वेग कमीजास्त करावा / एलेवेशन बदलावे ५. ट्रेडमिल झिरो एलेवेशनवर न ठेवता ०.५ इन्क्लीनशनवर ठेवावी ६. ट्रेडमिल वर ६ KM /Hrs व झिरो एलेवेशन हे ब्रिस्क वॉलकिंग समजावे ६ ते ८ KM /Hrs हे जॉगिंग व ८ KM /Hrs च्या पुढे रनिंग समजावे पळण्याचा स्टॅमिना वाढवण्यासाठी काही गोष्टी : १. हाय इंटेन्सिटी इंटर्वल ट्रैनिंग चा वापर करावा २. ३० मिनिटे पाळण्याचे टार्गेट ठेवून जास्तीतजास्त अंतर पाळण्याचा प्रयत्न करावा (रेकॉर्ड ठेवावे) सुरवातीला ३० मिनिटे जास्त वाटत असतील तर वीस मिनटे किंवा १५ मिनिटांचे दोन सेट करावे ३. एका आठवड्यात ४ वेळा पळत असाल तर एकदा हाय इंटेन्सिटी इंटर्वल ट्रैनिंग, दोन वेळा ३० मिनिटे पाळण्याचे टार्गेट व एकदा लॉन्ग डिस्टन्स रनिंग / ब्रिस्क वॉकिंग करावे परत एकदा .. वॉर्म अप आणि कुलडाऊन विसरू नये हॅपी रनिंग

अभिनंदन.

प्रा.डॉ.दिलीप बिरुटे
Sun, 01/08/2017 - 11:29 नवीन
गविशेठ अभिनंदन. लव यू यार... चालायला सुरुवात केली बरं वाटलं. हळुहळु स्पीड नाय वाढवलं तरी चालेल पण चलते रहो. :) गेली दोन महिन्यांपासून माझं चालणं बंद आहे, अर्थात कामाचा व्याप होता आणि जरा पडलेली थंडीही कारणीभूत होती. पण, गविसेठ तुम्हाला शब्द देतो या आठवड्यात माझं चालणं नियमित असेल. कुछ अजीब सा रिश्ता हो गया है मेरे और उसके दरमियान ना नफरत हो रही है और ना मोहब्बत....! -दिलीप बिरुटे

विकांताला प्रशांत मालकांसोबत

मोदक
Mon, 01/09/2017 - 07:36 नवीन
विकांताला प्रशांत मालकांसोबत सायकलने तिकोना पायथा गाठला एकूण सायकलिंग - 135 किमी

२५+२५ पुश अप्स

वेल्लाभट
Tue, 01/10/2017 - 10:49 नवीन
२५+२५ पुश अप्स २५ ट्रायसेप डिप्स ५२ सेकंद प्लँक हे वॉर्म अप नंतर सध्या वेळेअभावी असं तुटपुंजंच काहीतरी केलं जातंय, पण काहीच नाहीपेक्षा हे बरं या विश्वासाने करतोय.

.

गवि
Tue, 01/10/2017 - 20:39 नवीन
दुपारी दोन तास शवासन केले. पाठदुखीने. रात्री आठ तास करणार.

लढ बाप्पु

कुंदन
Tue, 01/10/2017 - 23:23 नवीन
लढ बाप्पु
↩ प्रतिसाद: गवि

कॅलरीज किती जळाल्या म्हणे..?

मोदक
Wed, 01/11/2017 - 00:02 नवीन
कॅलरीज किती जळाल्या म्हणे..? ;)
↩ प्रतिसाद: गवि

10 किमी धावलो

हकु
Wed, 01/11/2017 - 11:30 नवीन
10 किमी धावलो. स्टॅंडर्ड चार्टर्ड मुंबई मॅरेथॉन ची तयारी. माझ्यासाठी हाफ मॅरेथॉन.

मुंबई मॅरॅथॉनसाठी शुभेच्छा..

बाळ सप्रे
Wed, 01/11/2017 - 11:42 नवीन
मुंबई मॅरॅथॉनसाठी शुभेच्छा.. आणखी कोण कोण मिपाकर धावणार आहेत मुंबइत या रविवारी ??
↩ प्रतिसाद: हकु

मी पण!!!

अनिल मोरे
Wed, 01/11/2017 - 12:42 नवीन
मी पण!!!
↩ प्रतिसाद: बाळ सप्रे

ऑल द बेस्ट.. हाफ की फुल??

बाळ सप्रे
Wed, 01/11/2017 - 13:21 नवीन
ऑल द बेस्ट.. हाफ की फुल??
↩ प्रतिसाद: अनिल मोरे

फुल्ल

अनिल मोरे
गुरुवार, 01/12/2017 - 12:54 नवीन
फुल्ल. पहिलाच प्रयत्न आहे.
↩ प्रतिसाद: बाळ सप्रे

मी पण. फुल.

शलभ
Wed, 01/11/2017 - 13:39 नवीन
मी पण. फुल.
↩ प्रतिसाद: बाळ सप्रे

मी सुद्धा हाफ मॅरेथॉन धावतोय

माझीही शॅम्पेन
गुरुवार, 01/12/2017 - 12:58 नवीन
मी सुद्धा हाफ मॅरेथॉन धावतोय __/\__
↩ प्रतिसाद: बाळ सप्रे

अरे वा..

बाळ सप्रे
गुरुवार, 01/12/2017 - 13:31 नवीन
अरे वा.. ३ फुल २ हाफ मिपाकर्स @SCMM सोमवारी इथे नक्की अपडेट करा सगळ्यांनी..
↩ प्रतिसाद: माझीही शॅम्पेन

हा एक फॉरवर्ड मेसेज आला आहे..

मोदक
गुरुवार, 01/12/2017 - 18:26 नवीन
हा एक फॉरवर्ड मेसेज आला आहे.. खराखोटा माहिती नाही. ************************************** Central Railway has decided to run 2 suburban special trains o­ne each from Kalyan and Panvel Station o­n Sunday 17.01.2016 for the benefit of the participants of Standard Chartered Mumbai Marathon being held at CST, Mumbai o­n 17.01.2016. The details are as under- Kalyan – CST special will leave Kalyan at 03.00 hrs and will arrive Chatrapati Shivaji Terminus, Mumbai at 04.30 hrs stopping at all stations. Panvel – CST special will leave Panvel at 03.10 hrs and will arrive Chatrapati Shivaji Terminus at 04.30 hrs via Harbour line stopping at all stations. However, local trains towards Chatrapati Shivaji Terminus leaving Kalyan at 04.41 and leaving Vashi at 04.00 will remain cancelled. All concerned to please take note of this and avail the facility. **************************************
↩ प्रतिसाद: माझीही शॅम्पेन

मला पण आलाय. पण गेल्या

शलभ
गुरुवार, 01/12/2017 - 18:58 नवीन
मला पण आलाय. पण गेल्या वर्षीचा आहे. १७.०१.२०१६.
↩ प्रतिसाद: मोदक

डिसेंबर...

नावातकायआहे
Wed, 01/11/2017 - 11:56 नवीन
९८.९ कि मी चालणे झाले सरासरी रोज ३.१९ एक दिवस हि खाडा नाही हि जमेची बाजु..

या महिन्यात काही अपरिहार्य

एस
Wed, 01/11/2017 - 22:29 नवीन
या महिन्यात काही अपरिहार्य कारणास्तव व्यायाम पूर्ण बंद झाला. पण आता सुरू करणार आहे. गुडघ्याची शस्त्रक्रिया झालेली असल्याने पळणे किंवा जिने चढणे इ. प्रकारांवर मर्यादा आली आहे. पण तरीही अधूनमधून डोंगरयात्रा सुरू असतात. आता सायकलिंग पुनःश्च सुरू करेन.

गुडघ्याची शस्त्रक्रिया झालेली

बाळ सप्रे
गुरुवार, 01/12/2017 - 10:34 नवीन
गुडघ्याची शस्त्रक्रिया झालेली असल्याने पळणे किंवा जिने चढणे इ. प्रकारांवर मर्यादा आली आहे
फिजिओथेरपी/ रीहॅब सातत्याने चालू ठेवा.. अजिबात दुर्लक्ष करू नका.. शस्त्रक्रीयेनंतरही पुन्हा धावता येतं ..
↩ प्रतिसाद: एस

पोट कमी कसे करावे ... याबद्दल

स्रिहेरि
Wed, 01/11/2017 - 22:40 नवीन
पोट कमी कसे करावे ... याबद्दल कोणी माहिती देईल काय

तीन किमी एका फेरीत चाललो.

गवि
गुरुवार, 01/12/2017 - 13:53 नवीन
तीन किमी एका फेरीत चाललो. माझ्यासाठी अचिव्हमेंटच. आता ध्येय चार किमी. मग पाच. सातत्य जास्त महत्वाचं. वजन पुढे फार नाही उतरलं तरी सलग "चालता येतंय", " दम कमी लागतोय", "पूर्ण श्वास येतोय" हेच आनंदाचं वाटतंय.

आभिनंदन हो गवि. तुमच्या

मोदक
गुरुवार, 01/12/2017 - 15:04 नवीन
आभिनंदन हो गवि. तुमच्या तुलनेत १०% जरी सातत्य मला मिळाले तरी महिन्याला हजार किमी सायकलिंग होईल.
↩ प्रतिसाद: गवि

...

गवि
गुरुवार, 01/12/2017 - 15:28 नवीन
तुम्हाला आमच्याकडून प्रेरणा मिळणं म्हणजे नळाच्या आशीर्वादाने पाऊस पडण्यापैकी आहे.
↩ प्रतिसाद: मोदक

गतवर्षी....

डॉ श्रीहास
गुरुवार, 01/12/2017 - 17:29 नवीन
गतवर्षी.... ५९४७ किमी सायकलींग,पळणं आणि चालणं असं झालंय; ह्या वर्षाची सुरवातच पायाच्या दुखावण्यानी झाली आहे पण बरं वाटलं (त्याहून महत्वाचं आळस झटकला की ) जोमात सायकलींग सुरू करणार आहे !

बापरे !!!

बाळ सप्रे
गुरुवार, 01/12/2017 - 18:30 नवीन
बापरे !!! एवढ अंतर माझं ३-४ वर्षात मिळून झालं असेल.. दंडवत _/\_
↩ प्रतिसाद: डॉ श्रीहास

आमचा पण नमस्कार...

डॉ श्रीहास
गुरुवार, 01/12/2017 - 22:12 नवीन
जमतय तेवढं केलं.... ह्या व्यायामाच्या धाग्याचा फार चांगला परिणाम दिसून येतो आहे !! तुम्ही मॅरेथाॅनर आहात ... पळणाऱ्या लोकांबद्दल फाऽऽऽर आदर आहे मला म्हणून तुम्हाला _/\_..... Keep going....Keep inspiring!!
↩ प्रतिसाद: बाळ सप्रे

सप्रे साहेब फक्त मॅरेथॉनर

अप्पा जोगळेकर
Fri, 01/13/2017 - 10:54 नवीन
सप्रे साहेब फक्त मॅरेथॉनर नाहीत. ते बीआरेम ला सायकल वगैरे पण चालवत असतात. त्यांच्या प्रतिसादात तसे लिहिले होते २-३ वेळा. आणि बहुधा एन्ड्युरो पण केली आहे.
↩ प्रतिसाद: डॉ श्रीहास

वा वा ....

डॉ श्रीहास
Sat, 01/14/2017 - 19:22 नवीन
सप्रेसाह्येबांबात हे माहिती नव्हतं... धन्यवाद अप्पा :)
↩ प्रतिसाद: अप्पा जोगळेकर

माझा अनुभव आणि कालची नोंद

अनरँडम
गुरुवार, 01/12/2017 - 19:13 नवीन
मी जवळ जवळ ७-८ महिन्यांपासून रोज किमान ३ ते ४ मैल (ट्रेडमिलवर) पळतो. या काळात माझे वजन वीसेक पाउंड्स कमी झाले आणि पोटाचा घेर लक्षणीय कमी झाला (पण पूर्णपणे सपाट झाले नाही). नोवेम्बर-डिसेंबर काळात पळणे एकदमच थांबले. मागच्या दोन आठवड्यांपासून पुन्हा सुरू झाले. एकदा सवय झाल्यानंतर पळणे हे एक उत्तम तणावमुक्तिचे औषध आहे. सुरूवातीला (सवय नसल्यास) पळणे २-३ मिनिटांपेक्षा अधिक करवत नसे. पण रोज थोडीफार प्रगती होते. मागच्या खेपेला एकदा मी सलग ८ मैल पळू शकलो होतो. मी कुठलेही अ‍ॅप वापरत नाही. काल २३ पुश-अप्स आणि साडेतीन मैल पळणे.

अरे व्वा.. अभिनंदन..!!

मोदक
Fri, 01/13/2017 - 18:15 नवीन
अरे व्वा.. अभिनंदन..!!
↩ प्रतिसाद: अनरँडम

धन्यवाद

अनरँडम
Fri, 01/13/2017 - 22:49 नवीन
कालचे पळणे : साडेतीन मैल पुशअप्स : २४ माझ्या फोननुसार पळणे सोडून इतरत्र चालणेणे: ६१११ पावले
↩ प्रतिसाद: मोदक

मदत

जावई
Sat, 01/14/2017 - 16:03 नवीन
कृपया समस्त जाणकार मिपाकरांनी मार्गदर्शन करावे .. मला माझा धावण्याचा (100m,1600m)स्टॕमिना वाढविण्यासाठी पूरक व्यायाम सुचवा...आणि आहार पण सुचवा.

सायकलींग

प्रशांत
Sat, 01/14/2017 - 22:50 नवीन
आज 41 किमी सायकल चालवली

काल 128 किमी सायकलिंग केले

मोदक
Sun, 01/15/2017 - 14:43 नवीन
काल 128 किमी सायकलिंग केले आज कर्नाळा ट्रेक केला

गेले दोन दिवस

वेल्लाभट
Sun, 01/15/2017 - 14:45 नवीन
गेले दोन दिवस ३ किमी ३ किमी धावलो. त्यात अर्धा किमी स्प्रिंट अंतर्भूत होती.

सर्व मॅरेथॉन धावकांचे अभिनंदन

एस
Sun, 01/15/2017 - 18:19 नवीन
सर्व मॅरेथॉन धावकांचे अभिनंदन. आज ११ किमी सायकल चालवली.

पायऱ्या चढणे

तेजस आठवले
Sun, 01/15/2017 - 20:00 नवीन
पायऱ्या चढणे हा कितपत चांगला व्यायाम आहे ? विशेष करून हृदयाची कार्यक्षमता वाढवण्यासाठी वगैरे ? घर सहावा मजला आणि कार्यालय दहाव्या मजल्यावर आहे. पूर्वी सोळा मजले चढत असे.(वेगवेगळ्या वेळी, एकत्र नाही). हा चांगल्या प्रतीचा व्यायाम म्हणावा का ?

फोटो कसा अपलोड करायचा?

अनिल मोरे
Sun, 01/15/2017 - 20:06 नवीन
फोटो कसा अपलोड करायचा?

चार किमी वाढीव वेगाने चाललो.

गवि
Sun, 01/15/2017 - 20:06 नवीन
चार किमी वाढीव वेगाने चाललो.

टाळ्या!!!

मोदक
Sun, 01/15/2017 - 21:51 नवीन
टाळ्या!!!
↩ प्रतिसाद: गवि

स्टॅंडर्ड चार्टर्ड मुंबई मॅरेथॉन

अनिल मोरे
Sun, 01/15/2017 - 20:23 नवीन
Image removed.

हि पोस्ट दिसत नाहिये पण http:

बाळ सप्रे
Mon, 01/16/2017 - 12:28 नवीन
हि पोस्ट दिसत नाहिये पण http://www.timingindia.com/result.html इथे तुम्ही ४:१० वेळेत मॅरॅथॉन पूर्ण केल्याच दिसतय !! जबरदस्त कामगिरीबद्दल अभिनंदन !!
↩ प्रतिसाद: अनिल मोरे

धन्यवाद!!!

अनिल मोरे
Mon, 01/16/2017 - 13:30 नवीन
result-details Split timings
↩ प्रतिसाद: बाळ सप्रे

अभिनंदन !!!

अनिल मोरे
Mon, 01/16/2017 - 13:32 नवीन
मॅरॅथॉन पूर्ण केल्याबद्दल अभिनंदन !!!
↩ प्रतिसाद: बाळ सप्रे

मुंबई मॅरॅथॉनसाठी जोरदार

बाळ सप्रे
Mon, 01/16/2017 - 12:31 नवीन
मुंबई मॅरॅथॉनसाठी जोरदार तयारी करुनही यावर्षी मनासारखी वेळ आली नाही.. ४:२९ गेल्यावर्षीपेक्षा ६ मिनिटं जास्ती लागली. पण कुठलाही त्रास न होता संपवल्याबद्दल समाधान मानतोय!!

सर्व मॅरेथॉन धावकांचे हार्दिक

मोदक
Mon, 01/16/2017 - 13:21 नवीन
सर्व मॅरेथॉन धावकांचे हार्दिक अभिनंदन..!!
↩ प्रतिसाद: बाळ सप्रे
  • «
  • ‹
  • 1
  • 2
  • 3
  • ›
  • »

लेखन करा

लेखन करा

मिसळपाव वर स्वागत आहे.

प्रवेश करा

  • नवीन खाते बनवा
  • Reset your password
मिसळपाव.कॉम बद्दल
  • 1आम्ही कोण?
  • 2Disclaimer
  • 3Privacy Policy
नवीन सदस्यांकरीता
  • 1सदस्य व्हा
  • 2नेहमीचे प्रश्न व उत्तरे
लेखकांसाठी
  • 1लेखकांसाठी मार्गदर्शन उपलब्ध
  • 2लेखन मार्गदर्शन
संपर्क
  • 1सर्व मराठीप्रेमींचे मनापासून स्वागत!
  • 2अभिप्राय द्या
  • 3संपर्क साधा
© 2026 Misalpav.com  ·  Disclaimer  ·  Privacy Policy मराठी साहित्य व संस्कृतीसाठी  ·  प्रवेश  |  सदस्य व्हा