✍ मराठी साहित्य, संस्कृती आणि लेखनाचे व्यासपीठ
प्रवेश करा | सदस्य व्हा
मिसळपाव
मिसळपाव मराठी साहित्य

Main navigation

  • मुख्य पान
  • नवे लेखन
  • पाककृती
  • कविता
  • भटकंती

मी आज केलेला व्यायाम - जानेवारी २०१७

ग
गवि यांनी
Mon, 01/02/2017 - 13:03  ·  लेख
लेख
. नमस्कार मंडळी. "मी आज केलेला व्यायाम" या धाग्यांना उदंड प्रतिसाद मिळत आहे आणि अनेकांनी यातून प्रेरणा घेऊन व्यायाम सुरू केला आहे. व्यायाम सुरू केलेल्या आणि व्यायामात सातत्य ठेवलेल्या सर्वांचे अभिनंदन. आपण सर्वांनी केलेला व्यायाम पुढीलप्रमाणे - नोव्हेंबर २०१६ - सायकलिंग - ८०१० किमी आणि रनिंग / वॉकिंग - २४८ किमी. डिसेंबर २०१६ - सायकलिंग - ९६१३ किमी आणि रनिंग / वॉकिंग - २९१ किमी. ************************************************** मी आज केलेला व्यायाम - डिसेंबर २०१६ या धाग्यावर अनेकांनी घामटा काढला, धापा टाकल्या आणि एकमेकांचा हुरुप वाढवत एक नवीन "मिशन" लाँच केलं. अगदी आमच्यासारखे लठ्ठंभारतीदेखील पोट सावरत धावायला नाही तरी किमान चालायला तरी लागले. "सिम्पली वॉकिंग" या साध्यासरळ अ‍ॅपमुळे कोणत्याही सोशल मीडियाशिवाय आणि संपूर्ण डेटा आपल्याच डिव्हाईसवर ठेवून शेअरिंगचा कंट्रोल आपल्या हातात ठेवणं सोपं झालं. बाकी मॅप, स्टॅटिस्टिक्स वगैरे सगळं यात उत्तमपैकी आहे. तर पहिला धागा भरुन वाहू लागल्याने जानेवारी २०१७ साठी नवा भाग काढतो आहे. यावेळी सर्वांना सहज जमणारा आणि तुलनेत सुरक्षित असा "चालणे" हा जो व्यायाम आहे त्यावर भर द्यावा आणि अगदी बिगिनरपासून रेग्युलर फिटनेस फ्रीकांना "चालणारा" चालणं हा व्यायाम अधिकाधिक लोकांनी सुरु करावा आणि त्याबाबत चर्चा करावी अशी विनंती. मी स्वतः शून्य किलोमीटर चालत चालत बरीच वर्षं काढली. आता दीड महिना झाला, सातत्य बर्यापैकी आहे. भराभर चाललं की भरपूर दमतो पण तसंच न थांबता चाललं की एक प्रकारची सुखद "हाय" नशासदृश जाणीव होते. असा अनुभव आणखी कोणाला आहे का? लठ्ठ व्यक्ती वेगाने चालली असता गुडघे भरपूर दणकतात. यावर काय करावं? शिवाय मांड्या एकमेकांवर घासून वेदनादायक स्किन इरिटेशन होतं, ऑफिसच्या मधल्या वेळात चालणं साधता येतं पण इतका घाम येतो की फॉर्मल कपडे भिजून जातात आणि जवळजवळ ओल्या अंगाने एसीत परत यावं लागतं. कोणाला अशाच इतर अडचणी येतात का? चला ...लिटरली चला... चाला..... कीप वॉकिंग... चियर्स... A
वर्गीकरण
लेखनविषय (Tags)
वावर
आरोग्य
लेखनप्रकार (Writing Type)
प्रकटन
आरोग्य

प्रतिक्रिया द्या
45682 वाचन

💬 प्रतिसाद (135)

प्रतिक्रिया

चला...! तुमच्यासारख्या समस्या

खेडूत
Mon, 01/02/2017 - 13:44 नवीन
चला...! तुमच्यासारख्या समस्या जाणवल्या नाहीत. मी सकाळी घराजवळ १-२ किमी, तसेच दुपारी ऑफिसच्या -१ नावाच्या पार्किंगमधे ४ किमी चालतो. इतर एखादा किमी होतेच. प्रॉजेक्ट बदलला की सहप्रवासी बदलतात. कंपनीच्या न दिसणार्‍या बाजूची माहिती मिळते हा एक जास्तीचा फायदा. शनिवार-रविवारी कमी चालणे होते. एकूण ५ किमी किमान चालणे चार वर्षे चालू आहे. वजन सुरुवातीस तीन किलो दोन महिन्यात कमी झाले (७० वरून ६७) नंतर प्रत्येक १०० ग्रामही अंत पहातात. पण आता वजन पहात नाही. निव्वळ चालण्यातच आनंद मिळतो..

चालणं नाही पण बंद बॅडमिंटन

अजया
Mon, 01/02/2017 - 14:02 नवीन
चालणं नाही पण बंद बॅडमिंटन सुरु केलंय आजच. बाकी २५ सु नमस्कार रोजचे सुरुच आहेत. Thighs irritation टाळण्याचे काही उपाय १ सायकलीस्ट घालतात तसे कपडे वापरणे.आतून किंवा तेच वापरले तरी चालतील. २ काॅटन शाॅर्ट्स अजिबात वापरु नये.सिंथेटीक कपडे वापरावेत चालायला जाताना. ३ घर्षण होणाऱ्या भागावर निघताना बेबी पावडर लावावी भरपूर ४ हल्ली शेपवेअर मिळतात.ती थाइज पर्यंत असतात. तो प्रकार वापरता येईल ड्रेसच्या आतून ५ लहान मुलांचं डायपर रॅश क्रिम किंवा खोबरेल तेल लावून बघता येईल. ६ वजन कमी होईल तसा त्रास कमी होत जाईल. ७ Anti chafing gel / balm पण मिळू शकतील.

माहितीपूर्ण प्रतिसाद. धन्यवाद

सानझरी
Mon, 01/02/2017 - 14:39 नवीन
माहितीपूर्ण प्रतिसाद. धन्यवाद.
↩ प्रतिसाद: अजया

थँक्स. उपयोगी माहितीबद्दल.

गवि
Mon, 01/02/2017 - 20:14 नवीन
थँक्स. उपयोगी माहितीबद्दल.
↩ प्रतिसाद: अजया

३ घर्षण होणाऱ्या भागावर

माझीही शॅम्पेन
Mon, 01/09/2017 - 13:08 नवीन
३ घर्षण होणाऱ्या भागावर निघताना बेबी पावडर लावावी भरपूर
↩ प्रतिसाद: अजया

माझे चालणे .........

नितीन पाठक
Mon, 01/02/2017 - 14:21 नवीन
मी दररोज नियमित पणे सकाळी ६.५ किमी चालतो.

काल आणि आज काय्येक केलेलं

सूड
Mon, 01/02/2017 - 14:44 नवीन
काल आणि आज काय्येक केलेलं नाही.

आज सकाळपर्यंत कोकणांतच

मोदक
Mon, 01/02/2017 - 14:58 नवीन
आज सकाळपर्यंत कोकणांतच असल्याने गविंना धागा काढण्याची विनंती केली, धागा काढल्याबद्दल गविंचे अनेक आभार्स..!! मिपाकरांचे मागच्या महिन्यातील व्यायामाचे आकडे लवकरच अपडेट करतो.

गेल्या वीकांताला लोणावळा

अप्पा जोगळेकर
Mon, 01/02/2017 - 15:34 नवीन
गेल्या वीकांताला लोणावळा-खोपोली-पेण-पाली-खोपोली-लोणावळा अशी १२० किमी सायकल चालवली. बोर घाटात आणि एक्ष्प्रेसवे ला सायकल चालवणे फारच थरारक. बोगद्यात तर इतर वाहनांसमोर अगदी फट्टू झाली.

No Safety, Know Pain. Know Safety, No Pain.

लीना कनाटा
Sun, 01/08/2017 - 21:57 नवीन
आप्पा, एक्स्प्रेस वे वर सायकल किंवा दुचाकीला परवानगी आहे का? हे कितीही चित्त थरारक असले तरी सुरक्षितता महत्वाची आहे. काळजी घ्या. No Safety, Know Pain. Know Safety, No Pain.
↩ प्रतिसाद: अप्पा जोगळेकर

घाटामधे

कपिलमुनी
Mon, 01/09/2017 - 12:59 नवीन
घाटामधे काही कीमी एक्स्प्रेस वे वर सायकल किंवा दुचाकीला परवानगी आहे.
↩ प्रतिसाद: लीना कनाटा

छान

दादा कोंडके
Mon, 01/02/2017 - 20:02 नवीन
किलोमिटर वगैरेचे हिशेब ठेवत नाही पण गेले दहा वर्षे ऑफिसमधली लिफ्ट वापरत नाही. त्यामुळे रोज किमान १००० पायर्‍या चढाव्या आणि उतराव्या लागतात.

1000???

बाळ सप्रे
Mon, 01/02/2017 - 20:55 नवीन
1000??? कितव्या मजल्यावर आहे आॅॅफीस???
↩ प्रतिसाद: दादा कोंडके

आज २१ किमी सायकल चालवून

मोदक
Tue, 01/03/2017 - 12:07 नवीन
आज २१ किमी सायकल चालवून हाफिसात पोहोचलो.

जुजवी बॉर्म अप

वेल्लाभट
Tue, 01/03/2017 - 14:07 नवीन
जुजवी बॉर्म अप १५*३ पुश अप्स (हात जवळ ठेवून [ट्रायसेप साठी]) १५* २ काफ रेजेस १५ * २ वन लेग काफ रेजेस इतकाच. धाग्यातील 'चालणे' या च्यायामप्रकाराबद्दल असहमती नोंदवण्याचा मोह आवरत नाहीये. चालणं, हा 'व्यायाम' होत नाही.

चालणं, हा 'व्यायाम' होत नाही.

अप्पा जोगळेकर
Tue, 01/03/2017 - 15:07 नवीन
चालणं, हा 'व्यायाम' होत नाही. काहीच्या काहीच.
↩ प्रतिसाद: वेल्लाभट

काहीतरी करून

वेल्लाभट
Tue, 01/03/2017 - 15:34 नवीन
काहीतरीच अपेक्षा ठेवू नका म्हणजे झालं.
↩ प्रतिसाद: अप्पा जोगळेकर

बाकी...

वेल्लाभट
Tue, 01/03/2017 - 15:40 नवीन
यावर आधी चर्चा झाली असल्याने हा धागा भरकटत नाही याची खबरदारी घेतो.
↩ प्रतिसाद: अप्पा जोगळेकर

आमची नोंद -

प्रास
Tue, 01/03/2017 - 15:19 नवीन
आमची नोंद - नोव्हेंबर महिन्यापासून जॉगिंग सुरू केलंय. त्यापूर्वी साडे तीन वर्ष दिवसाला तीनेक किमीची चाल करत होतो. नूम कोच नावाचं अ‍ॅप वापरतोय सध्या पण हे मधून मधून गळपटतंय. असो. मोदकरावांना दिलेल्या आश्वासनानुसार माझी आजची धाव - ०९ किलोमीटर वेळ - १ तास १४ मिनिटे जाळलेल्या कॅलरीज - ११९६ (काही डीलिटलेले आणि काही न नोंदवलेले न धरता) गेल्या ३० दिवसात मी १ तास ११ मिनिटे चालून ८०० कॅलरीज् जाळल्यात आणि १८ तास ३९ मिनिटे पळून १९००० कॅलरीज् जाळल्यात. इत्यलम्म|

मला अंतर द्या हो प्रासदा...

मोदक
Tue, 01/03/2017 - 15:27 नवीन
मला अंतर द्या हो प्रासदा... गेल्या महिन्यात किती किमी अंतर चाललात..?
↩ प्रतिसाद: प्रास

अंतर

प्रास
Tue, 01/03/2017 - 15:43 नवीन
अ‍ॅपमधल्या नोंद झालेल्या माहितीनुसार (नोंद न केलेली आणि नोंद काढलेली माहिती वगळून) गेल्या महिन्याभरात (३० दिवसात) चालणे - ७.२८ किमी धावणे - १४९.८५ किमी इत्यलम्म|
↩ प्रतिसाद: मोदक

मी करत असलेला व्यायाम

वन्दना सपकाल
Tue, 01/03/2017 - 16:44 नवीन
मी रोज ५० सूर्यनमस्कार घालते.

न थांबता चाललं की एक प्रकारची

अंतु बर्वा
Wed, 01/04/2017 - 02:19 नवीन
न थांबता चाललं की एक प्रकारची सुखद "हाय" नशासदृश जाणीव होते.
हो, आधी जाणवायचं नाही, पण आता दिड-एक मैल धावल्यावर एक प्रकारची लय जाणवायला लागते. पाय, ह्रद्याचे ठोके आणि श्वासाची गती एका ठेक्यात येतात आणि एक मस्त फिलिंग यायला लागतं... दुसरं म्हणजे एखादा जरी दिवस बुडाला की चुकल्याचुकल्या सारखं वाटु लागतं. बॅचलर असताना माझा रुममेट होता तो बाहेर पाच-सहा इंच बर्फ पडलेला असतानाही जिमला जायचा, उन असो पाउस असो, एखादी पार्टी कींवा काही कमिटमेंट असेल तर वेळेआधी जाउन अर्धा तास का होईना जायचाचं.. आम्ही तेव्हा खुप चिडवायचो त्याला पण आता कळतय याच फिलिंगसाठी तो एवढा जीव काढुन जात असणार... :-)

आज पण २१ किमी सायकल चालवून

मोदक
Wed, 01/04/2017 - 14:06 नवीन
आज पण २१ किमी सायकल चालवून हाफिसात पोहोचलो.

१ जाने. पासून फिरणे सुरू केलेय.

बबन ताम्बे
Wed, 01/04/2017 - 14:33 नवीन
तारकेश्वर मंदिर टेकडीवर (बंडगार्डन,येरवडा) १ जाने. पासून फिरणे सुरू केलेय. मी आणि पत्नी जातो. सकाळी छान हवा आणि कोवळे ऊन असते. टेकडी पण खुप उंच नाहीये. पाच राउंड (५ वेळा चढणे आणि ५ वेळा उतरणे) मारल्या तरी खूप फ्रेश वाटते.

हे व्यायामाचे धागे पहिले कि...

अनन्त अवधुत
Wed, 01/04/2017 - 14:52 नवीन
फक्त आपणच व्यायाम करत नाही असे वाटायला लागते. उद्यापासून मी पण करेन काहीतरी.

हल्ली दररोज १०००० पावले चालतो

खग्या
Wed, 01/04/2017 - 20:43 नवीन
हल्ली दररोज १०००० पावले चालतो.

सोमवारी जवळपास ३० मिनिट चालणे

सही रे सई
Wed, 01/04/2017 - 21:03 नवीन
सोमवारी जवळपास ३० मिनिट चालणे (अंदाजे ३ माईल्स) आणि अप्पर बॉडी वर्क आउट केला. आणि मंगळवारी २० मिनिट सायकलिंग (४.२ माईल्स) व लोअर बॉडी वर्क आउट केला. रोज असाच व्यायाम केला कि इथे टाकेन.

मागच्या आठवड्यात ४ दिवस

सही रे सई
Tue, 01/10/2017 - 20:27 नवीन
मागच्या आठवड्यात ४ दिवस व्यायाम झाला. सध्या २० मिनिट सायकलिंग (इंटर्वल प्रोग्राम) वर ५ लेवेल ला केलं. अंतर -८ किलोमीटर दर दिवशी. याशिवाय मशीन्स वर अप्पर बॉडी व लोअर बॉडी वर्क आउट एक दिवसा आड करत आहे. तसेच २ दिवस अ‍ॅब्स आणि झोपून करायचे व्यायाम केले. आता हळूहळू ३० मिनिट सायकलिंग करणार आहे. मशीन्स वरचा व्यायाम सेट्स आणि वजन हळू हळू वाढवत आहे. त्याने आता हात पाय दुखायला सुरुवात झाली आहे.
↩ प्रतिसाद: सही रे सई

आता पुनश्च हरिओम

अमर विश्वास
गुरुवार, 01/05/2017 - 12:22 नवीन
मागच्या आठवड्यात भारतात परत आलो. गेले महिनाभर व्यायाम बंदच होता. आता पुनश्च हरिओम काल ३ किलोमीटर पळालो नंतर १५*२ सेट जोर २५*२ सेट बैठका जिम चालू करायची आहे

झेपेल इतपत पोहणे चालू आहे.

सूड
गुरुवार, 01/05/2017 - 20:18 नवीन
झेपेल इतपत पोहणे चालू आहे.

पोहण्याने का कोण जाणे पण फारच

गवि
गुरुवार, 01/05/2017 - 20:27 नवीन
पोहण्याने का कोण जाणे पण फारच भूक लागते. दुप्पट खाशी अशी स्थिती होते. इतर कोणाला असा अनुभव आहे का?
↩ प्रतिसाद: सूड

भूक लागते, पण दुप्पट वैगरे

सूड
गुरुवार, 01/05/2017 - 20:37 नवीन
भूक लागते, पण दुप्पट वैगरे नाही.
↩ प्रतिसाद: गवि

गणामास्तरने एका प्रतिसादात हे

मोदक
गुरुवार, 01/05/2017 - 20:56 नवीन
गणामास्तरने एका प्रतिसादात हे लिहिले होते.
↩ प्रतिसाद: गवि

पोहण्याने का कोण जाणे पण फारच

गणामास्तर
गुरुवार, 01/12/2017 - 10:53 नवीन
पोहण्याने का कोण जाणे पण फारच भूक लागते. दुप्पट खाशी अशी स्थिती होते. इतर कोणाला असा अनुभव आहे का?
दुप्पट खाशी असा अनुभव मला पण आलाय गवि. मध्यंतरी सकाळी लवकर पोहायला जात होतो तेव्हा अशी सपाटून भूक लागायची कि घरी आल्यावर नाश्ता करून निघायचो आणि हापिसात पोचल्यावर परत ऑम्लेट नाय तर उकडलेली अंडी हाणायचो. ४ दिवसात वजन ६८ वरून ७१ झाले. मग बंद केलं पोहायचं. :)
↩ प्रतिसाद: गवि

मग बंद केलं पोहायचं. :)

बाळ सप्रे
गुरुवार, 01/12/2017 - 12:20 नवीन
मग बंद केलं पोहायचं. :)
हे म्हणजे त्या जोकसारखं झालं.. खूप वाचलं 'दारूचे दुष्परीणाम' याच्यावर आणि ठरवलं .. आता बंद... . . अशी पुस्तकं वाचणं :-)
↩ प्रतिसाद: गणामास्तर

काय करणार. पोहणे थांबवू शकतो,

गणामास्तर
गुरुवार, 01/12/2017 - 12:30 नवीन
काय करणार. पोहणे थांबवू शकतो, खाणे नाही :( जन्म खायला झालाय ते व्यवस्थित चालूये. पुढच्या जन्मी मासा व्हावे कसे ;)
↩ प्रतिसाद: बाळ सप्रे

सहज गमतीत लिहिलं.. हलकेच घ्या

बाळ सप्रे
गुरुवार, 01/12/2017 - 12:50 नवीन
सहज गमतीत लिहिलं.. हलकेच घ्या. (हे लिहायच राहिलं :-) ) खाण्यावर पुढेमागे (आणि आत्तादेखिल) रिस्ट्रिक्शन्स येउ नयेत हा माझ्यादेखिल व्यायामामागचा एक हेतु आहे.. :-)
↩ प्रतिसाद: गणामास्तर

अहो मजेतचं घेतलं होतं. जस्ट

गणामास्तर
गुरुवार, 01/12/2017 - 12:56 नवीन
अहो मजेतचं घेतलं होतं. जस्ट चिल्ल. मी अजून खूप तरुण आणि फिट आहे, एवढी थंडी जरा कमी झाली कि चाललोचं परत पोहायला ;)
↩ प्रतिसाद: बाळ सप्रे

सकाळी लवकर पोहायला जात होतो

सूड
गुरुवार, 01/12/2017 - 15:35 नवीन
सकाळी लवकर पोहायला जात होतो तेव्हा अशी सपाटून भूक लागायची कि घरी आल्यावर नाश्ता करून निघायचो आणि हापिसात पोचल्यावर परत ऑम्लेट नाय तर उकडलेली अंडी हाणायचो.
माझ्या खाण्यात एक जास्तीची पोळी वगळता शष्प फरक पडला नाहीये राव.
↩ प्रतिसाद: गणामास्तर

पोहोताना श्वसनाचे तंत्र नीट न

बाळ सप्रे
गुरुवार, 01/12/2017 - 15:45 नवीन
पोहोताना श्वसनाचे तंत्र नीट न जमल्यास उगाच जास्त दमल्यासारखे वाटते .. त्यामुळे असेल का ??..
↩ प्रतिसाद: सूड

पोहोताना श्वसनाचे तंत्र नीट न

सूड
गुरुवार, 01/12/2017 - 15:58 नवीन
पोहोताना श्वसनाचे तंत्र नीट न जमल्यास उगाच जास्त दमल्यासारखे वाटते
तुम्हाला नीट घेणं जमत नसेल तर दमल्यासारखं वाटतं हे खरंच आहे!! पण गणामास्तरचा तो प्रकार असेल असं वाटत नाही. खायला बसल्यानंतर मुळातच रवंथ करत खायची माझी सवय भुकेच्या वरताण होत असावी. =))
↩ प्रतिसाद: बाळ सप्रे

सायकलिंग

प्रशांत
Fri, 01/06/2017 - 11:53 नवीन
आज ऑफिस ला सायकल ने आलो, १० किमि २८ मिनिट मधे

माझे पण ६० किमि नोंदवा

सुकामेवा
Fri, 01/06/2017 - 12:59 नवीन
मी ३ जानेवारीला ३० किमि व आज १५ किमि सायकल हाफिसात येताना चालवली आहे. घरी जाताना १५ आजुन होइलच....

मस्त

प्रशांत
Fri, 01/06/2017 - 15:06 नवीन
strava app वापरता कास?
↩ प्रतिसाद: सुकामेवा

strava app हँगत आहे

सुकामेवा
Fri, 01/06/2017 - 16:37 नवीन
आता सेटअप मध्ये थोडेसे बदल केले आहेत बघू घर
↩ प्रतिसाद: प्रशांत

strava app हँग त आहे आता सेटअप मध्ये थोडेसे बदल केले आहेत बघू घर

सुकामेवा
Fri, 01/06/2017 - 17:04 नवीन
strava app हँग त आहे आता सेटअप मध्ये थोडेसे बदल केले आहेत बघू घरी जाताना वापरून बघतो
↩ प्रतिसाद: सुकामेवा

व्यायाम

गोपिनाथ राजाराम काले
Fri, 01/06/2017 - 20:33 नवीन
सकाळी ५की.मी. चालतो.

३ जानेवारी- १ तास योगासने

पिलीयन रायडर
Fri, 01/06/2017 - 20:52 नवीन
३ जानेवारी- १ तास योगासने ४ जानेवारी - १५ मिनिटं ट्रेडमिल आणि इतर बारिक सारिक गोष्टी करुन पाहिल्या जिममध्ये. अ‍ॅब्ससाठी वगैरे काय काय असतं ना.. ह्यात एक प्रश्न आहे. ट्रेडमिलवर किती चालायला हवं? किती स्पीडने? मी रॅण्डम प्रोग्राम घेतला होता ज्यात मध्येच इलावेशन वाढायचं.. मध्येच कमी व्हायचं.. स्पीड ४ ठेवुन पाहिला आणि टोटल १ माईल चालले. १०० कॅलरीज जळाल्या. तर ह्या सगळ्या पॅरामीट्र्सचे आदर्श प्रमाण हवे आहे. ह्यात ट्रेडमिलवर पळायचं सुद्धा असतं का? मी चालु कितीही शकते.. पळलं की लवकर दमते. ५ जानेवारी - १ तास बॉलीवुड डान्स ६ जानेवारी - विश्रांती!

ट्रेडमिलवर पळण्यापेक्षा,

सूड
Fri, 01/06/2017 - 22:25 नवीन
ट्रेडमिलवर पळण्यापेक्षा, एखादं मैदान असेल तर बघा. फन्कशन ट्रेनिंग लावलं होतं एक महिना, एरवी ट्रेडमिलवर नीट पळणार्‍या आम्हा लोकांना सणस ग्राऊंडचे दोन राउंड मारताना धापा टाकायला व्हायचं.
↩ प्रतिसाद: पिलीयन रायडर
  • 1
  • 2
  • 3
  • ›
  • »

लेखन करा

लेखन करा

मिसळपाव वर स्वागत आहे.

प्रवेश करा

  • नवीन खाते बनवा
  • Reset your password
मिसळपाव.कॉम बद्दल
  • 1आम्ही कोण?
  • 2Disclaimer
  • 3Privacy Policy
नवीन सदस्यांकरीता
  • 1सदस्य व्हा
  • 2नेहमीचे प्रश्न व उत्तरे
लेखकांसाठी
  • 1लेखकांसाठी मार्गदर्शन उपलब्ध
  • 2लेखन मार्गदर्शन
संपर्क
  • 1सर्व मराठीप्रेमींचे मनापासून स्वागत!
  • 2अभिप्राय द्या
  • 3संपर्क साधा
© 2026 Misalpav.com  ·  Disclaimer  ·  Privacy Policy मराठी साहित्य व संस्कृतीसाठी  ·  प्रवेश  |  सदस्य व्हा