भारतातल्या दोन क्रांतीकारक आर्थिक कारवाया : एक विश्लेषण
१९९१ ची कारवाई
१९९१ च्या कारवाईची पार्श्वभूमी १. सन १९८५ पासून भारताला परकीय चलनाची चणचण जाणवू लागली होती. १९९१ मध्ये भारताकडे केवळ तीनेक आठवडे पुरेल इतकेच परकीय चलन होते. आयएमएफने केवळ $२.२ बिलियन इतके कर्जही (आज भारताकडे $३५० बिलियन पेक्षा जास्त परकीय चलनाची गंगाजळी आहे) ६७ टन सोने तारण ठेवल्याशिवाय देण्याला नकार दिला. आरबीआयने विमानाने ४७ टन सोने बँक ऑफ इंग्लंडमध्ये आणि २० टन सोने युनियन बँक ऑफ स्वित्झर्लंडमध्ये पोहोचवल्यावरच $६०० मिलियनचा पहिला हप्ता मिळाला. २. त्यानंतर, पंतप्रधान पी व्ही नरसिंह राव आणि अर्थमंत्री मनमोहन सिंग या जोडगोळीने, भारताची अर्थव्यवस्था इन्स्पेक्टरराज मधून मुक्त करून उदार बनविण्याचा एक धाडसी प्रकल्प अमलात आणला. यामुळे भारताच्या अर्थव्यवस्थेची जी भरभराट झाली तो नजिकचा इतिहास सर्वांना माहीत आहेच. १९९१ च्या कारवाईच्या वेळेच्या परिस्थितीचे विश्लेषण १. भारताची अर्थव्यवस्था वाचविण्यासाठी काहीतरी करणे आवश्यक होते. नाहीतर देशाला अत्यावश्यक वस्तूंची (उदा. खनिज तेल, उद्योगधंद्यांसाठी कच्चा माल, जीवनावश्यक औषधे, इ) आयात करणे तर सोडाच पण आपल्या कर्जांवरचे व्याजही देणे शक्य नव्हते. २. सोने गहाण ठेवून पैसे जुळवणे ही केवळ काही महिन्यांपुरते तगून राहण्यासाठीची तरतूद होती. ती आणीबाणीची परिस्थिती ताब्यात आल्यावर, देशाची खालावलेली आर्थिक स्थिती सुधारण्यासाठी क्रांतिकारी बदल करण्याशिवाय दुसरा पर्याय नव्हता. ते न केल्यास देशाचे दिवाळे वाजणे अपरिहार्य होते. ३. अश्या परिस्थितीत, "राव यांची राजकीय इच्छाशक्ती व प्रशाकिय निर्णय घेण्याची धमक" आणि "सिंग यांचा अर्थशास्त्रातील अनुभव व कसब" यांच्या संगमाने बनविलेल्या कारवायांमुळे देशाची अर्थव्यवस्था रुळावर आणून तिची वाटचाल योग्य दिशेने चालू केली. ती इतकी की, काँग्रेस पुढची निवडणूक हरल्यानंतर सत्तेत आलेल्या नवीन सरकारला त्या वाटचालीचा वेग आणि दिशा चालू ठेवणेच भाग पडले. ३. तेव्हाचे पंतप्रधान त्यांच्या राजकीय कारकीर्दीच्या शेवटच्या पायरीवर होते. वयोमानामुळे आणि वैद्यकीय कारणांमुळे त्यांना पुढच्या निवडणूकीतल्या विजय/पराजयाची तितकीशी फिकीर ठेवण्याची गरज नव्हती. त्याविरुद्ध, क्रांतीकारी कारवाई करून देशाची अर्थव्यवस्था सुधारल्यास इतिहासात आपले नाव कोरण्याची त्यांना संधी होती. ४. तेव्हाचे अर्थमंत्री मनमोहन सिंग यांची पार्श्वभूमी सरकारी बाबू व अर्थतज्ज्ञ म्हणून होती, म्हणजेच राजकारणी नव्हती. त्यामुळे, त्यांना तर पुढच्या निवडणूकीची चिंता करण्याचे कारणच नव्हते. कारवाई यशस्वी झाले तर जगात नाव होईल, नाही झाली तर आपले अर्थशास्त्रातले सल्लागाराचे अथवा शिक्षणाचे काम चालू करता येईल, अशी त्यांची स्थिती होती. ५. थोडक्यात, क्रांतीकारी पावले उचलणे भारताला खूप फायद्याचे ठरले हे नि:संशय. मात्र, ते करण्यापेक्षा इतर काही चांगला पर्याय तेव्हा आस्तित्वात नव्हता. तसेच, भविष्याची काळजी करण्याची गरज नसल्याने, कारवाईच्या परिणामाला सामोरे जाणे राव व सिंग यांना सोपे होते. ६. असे असले तरी, या कारवाईच्या वेळेसही सरकारवर अनेक अर्थतज्ज्ञांनी टीकेची झोड उठवली होती ! ७. राव यांच्याप्रमाणे स्वतःच्या भविष्याची फिकीर नसलेल्या पंतप्रधानांऐवजी वय वा आरोग्य स्वतःच्या बाजूला असलेले आणि भविष्यात सत्तेची थोडीशी तरी आशा ठेवणारे पंतप्रधान असते; तर क्रांतीकारक कारवाई न करता वेळ तरून नेणार्या निर्धोक कारवाया करत राहण्याकडे त्यांचा कल असता. एखाद्या वेळी जमून आलेल्या अनेक वस्तूंस्थितींच्या सामुहीक परिणामाने कलाटणी घेत अनेक आश्चर्यकारक क्रांतीकारी व अनपेक्षित बदल घडून येतात, हे इतिहासात अनेकदा दिसून येते.२०१६ ची कारवाई
२०१६ ची कारवाईची पार्श्वभूमी १. कारवाईच्या अगोदरच्या १० ते १२ वर्षांपासून रु १००० (३९%) आणि रु ५०० च्या (४५%) नोटांमधील चलनाचे प्रमाण वाढत राहून एकूण चलनाच्या ८४% इतके धोकादायक स्तरापर्यंत वाढले होते. ही परिस्थिती तशीच चिघळत राहिली असती तर भविष्यात भारताच्या अर्थव्यवस्थेत घसरण (क्रॅश) झाली असती. २. "भ्रष्टाचारमुक्त भारत" या घोषणेवर विश्वास ठेवून २०१४ मध्ये जनतेने भाजपा आणि विशेषतः मोदींना बहुमत मिळवून दिले होते. विरोधी पक्ष त्यासंबंधात मोदींना सतत टोमणे मारत होते. अर्थातच, विरोधी पक्षांचे टोमणे हे क्रांतीकारी कारवाईचे कारण होऊ शकत नाही. तरीही, पत कायम ठेवण्यासाठी आपली घोषणा खरी करणारी काहीतरी कारवाई करणे मोदींना भाग होते. ३. १२८ कोटी लोकसंख्या असलेल्या आणि जगात सर्वात जास्त वेगाने वाढणारी अर्थव्यवस्था असलेल्या भारतात केवळ १% लोक कर भरतात. करचुकवेगिरी अभिमानाची गोष्ट समजणार्या ग्रीक लोकांनाही शरम वाटायला लावेल अशीच ही वस्तुस्थिती आहे. २०१६ च्या कारवाईच्या वेळेच्या परिस्थितीचे विश्लेषण १. विरोधी पक्षांच्या मोदीविरोधी कारवाया चालू असूनही व बिहारमधील भाजपाच्या पराभवानंतरही, मोदींच्या व्यक्तीगत राजकीय भांडवलाला फारसा धक्का लागलेला नव्हता. किंबहुना, पाकिस्तानविरुद्ध केलेल्या सर्जिकल स्ट्राईक्सनंतर त्यात लक्षणीय वाढच झाली होती. २. भारताच्या राजकारणाचा इतिहास पाहता, कोणतेही क्रांतीकारी पाऊल न उचलता एखादी सावध लोकाभिमुख कारवाई केली तरीही चालण्यासारखे होते. त्यामुळे, कोणताही मोठा धोका पत्करण्याची मोदींना तत्वतः आवश्यकता नव्हती. ३. या कारवाईमुळे जनक्षोभ होऊन जनता रस्त्यावर आली असती तर मोदी आणि भाजपला मोठा राजकीय धोका झाला असता. हा धोका, मोदींचे पंतप्रधानपद जाण्यात आणि/किंवा पुढच्या स्थानिक संस्थास्तरीय, राज्यस्तरीय व राष्ट्रीय स्तरावरच्या निवडणुकांत भाजपाचा धुव्वा उडण्यात झाला असता. म्हणजेच, निश्चलनीकरण्याच्या कारवाईमागे मोदींचा स्वतःचा किंवा त्यांच्या पक्षाचा, भाजपाचा, स्वार्थ साधणार नव्हता. किंबहुना, तसा धोका घ्यावा अशी जबरदस्तीही त्यांच्यावर नव्हती. ४. आपले हितसंबंध राखण्यासाठी विरोधक काही म्हणत/म्हणणार असले तरी, वरची परिस्थिती पाहता, देशाच्या अर्थव्यवस्थेत क्रांतीकारी बदल घडवून आणण्यासाठी केलेली निश्चलनीकरणाची धाडसी कारवाई करताना मोदींनी देशहित समोर ठेवून स्वतःसाठी आणि त्यांच्या पक्षासाठी पत्करलेला धोका आहे. थोडक्यात, हा निर्णय राजकीय नसून देशहितासाठी उचललेले पाऊल होते. ५. जनतेने या कारवाईचे स्वागत करून, त्यामुळे होणार्या त्रासाला कोणतेही अकांडतांडव न करता सहन केले आहे. त्यासंबंधातले विरोधकांचे अंदाज आणि चिथावण्या त्यांच्या पुरत्याच सीमित राहिलेल्या आहेत. ही गोष्ट कारवाईच्या समर्थकांएवढीच तिच्या विरोधकांनाही गोंधळून टाकणारी होती ! याबाबतीत, भारतीय जनतेने सुजाणतेचे जे प्रदर्शन केले आहे ते वादातीतरीत्या स्पृहणीय ठरले आहे.निष्कर्ष
मी कोणत्याही भारतीय राजकीय पक्षाचा फार मोठा चाहता नाही. "हमाम मे सांब नंगे है" अशीच सर्व पक्षांची अवस्था आहे. लोकशाहीतही खंबीर नेतृत्वाचा सिंहाचा वाटा असतो हे सत्य बर्याचदा विसरले जाते. म्हणूनच, लोकशाही देशाच्या मोठ्या यशासाठी एखाद्या नेत्याचेच नाव घेतले जाते आणि एखाद्या मोठ्या निर्णयामुळे मिळालेल्या अपयशाचा स्वीकार करून त्या नेत्याला राजिनामा द्यावा लागतो. अमुक देशाच्या शंभर-दोनशे निर्वाचित नेत्यांनी एकत्रितपणे अमुक एक क्रांतीकारी गोष्ट केली असे होत नाही; पण त्यांची मोट बांधून, त्यांना देशाच्या फायद्याच्या दिशेने यशस्वीपणे ओढून नेणार्या नेत्यालाच ते श्रेय सकारणरीत्या दिले जाते. तसे श्रेय मोदींना द्यायला हरकत नाही असे मला वाटते. तसे नसते तर, भारताचा पूर्वानुभव पाहता, मोदींच्या खंबीर नेतृत्वाविना, "इतना साल उन्होने खाया, अब हम खायेंगे तो क्या बुरा है।" या मानसिकतेने भाजप वागला नसताच, असे म्हणणे कठीण आहे. सद्याची खुर्ची राखणे आणि पुढच्या निवडणूकीत विजय मिळवणे हे जगभरच्या राजकारण्यांच्या दृष्टीने सर्वोच्च मुद्दे असतात. त्यामुळे, स्वतःचा व पक्षाचा स्वार्थ बाजूला सारून देशाला पुढे नेणारा खंबीर नेता मिळणे ही दुर्मिळ गोष्ट आहे. त्यातही, कोणत्याही प्रकारचा दबाव नसताना स्वतःचा स्वार्थ बाजूला ठेवणारा नेता मिळणे ही तर एक अशक्यरित्या दुर्मिळ गोष्ट आहे. मोदीच्या रूपात ही अशक्य दुर्मिळ गोष्ट भारताला लाभली आहे. त्यात अजून भर म्हणून, आपला तत्कालिक स्वार्थ बाजूला करून, किंबहुना तोशीस सोसूनही, अश्या नेत्याच्या पाठीशी उभे राहण्याचे सुजाणपण भारतीय जनतेने दाखविले आहे. ०८ नोव्हेंबरपूर्वी भारतीय जनता अशी वागेल असे कोणी सांगितले असते तर त्याबाबत माझ्या मनात संशय असता. निश्चलनीकरणाच्या कारवाईमुळे उघड झालेली ही भारतीय जनतेची प्रगल्भ मानसिकता एक भारतीय म्हणून मला नक्कीच अभिमानास्पद वाटते. तत्कालिक स्वार्थी हितसंबंधांच्या मागे लागून, या अत्यंत दुर्मिळ घटनांच्या संगमाचा नकार, अव्हेर किंवा विरोध करून, मोदींचे विरोधक आपल्याच पायावर धोंडा मारून घेत आहेत. याची समज प्रत्येक भारतीय नागरिकात जेवढी लवकर येईल तेवढे देशाच्या दृष्टीने आणि पर्यायाने प्रत्येक नागरिकाच्या दृष्टीने चांगले होईल.In reply to सारांश. by प्रा.डॉ.दिलीप बिरुटे
In reply to सारांश. by प्रा.डॉ.दिलीप बिरुटे
In reply to सारांश. by प्रा.डॉ.दिलीप बिरुटे
In reply to नोटबंदी कारवाईसंबंधी मला by डॉ सुहास म्हात्रे
In reply to मुद्दे आणि तर्क यांच्या by फेदरवेट साहेब
In reply to नोटबंदी कारवाईसंबंधी मला by डॉ सुहास म्हात्रे
नोटबंदी कारवाईसंबंधी मला पटलेले विचार मी कारणांसह इथे लिहिले आहेत. उद्या मोदींची दुसरी एखादी कारवाई योग्य वाटली नाही तर तसे लिहायला मला अडचण वाटणार नाही.छ्या. एकदा तरी तुम्ही मोदींच्या बाजूने लिहिलेत ना तर तुमच्या नावावर मोदीभक्त हे बिरूद चिकटले. मग तुम्ही काहीही करा ते जाणे नाही. रच्याकने, एक गोष्ट लिहितो. इथली आणि तिथली काही आजीमाजी मंडळी लई डेंजर आहेत. अशी मंडळी फेसबुकवरील एका बंदिस्त ग्रुपवर मिसळपाव आणि इतर ठिकाणच्या 'मोदीभक्तांवर' भरपूर गॉसिप करतात. काही लोकांचा इथे दिसणारा सोज्वळ चेहरा किती खोटा आणि ढोंगी आहे हे समजले की खरोखरच धक्का बसेल. असो. (बोकोबांच्या प्रतिसादात लिहिल्याप्रमाणे एक हत्ती असलेला) ट्रुमन
In reply to मोदीभक्त by गॅरी ट्रुमन
In reply to मोदीभक्त by गॅरी ट्रुमन
In reply to सारांश. by प्रा.डॉ.दिलीप बिरुटे
In reply to परम पूजनीय राजयोगी श्री by साहना
In reply to सोने by आनंदयात्री
In reply to हो. मागील काही वर्षां पासून by साहना
In reply to लेखनप्रकार by आजानुकर्ण
In reply to म्हात्रेसर, या लेखावर उपरोधिक by हतोळकरांचा प्रसाद
In reply to हे समदे विकटीम गेम कशापायी by फेदरवेट साहेब
In reply to असं का? अच्छा याला विकटिम गेम by हतोळकरांचा प्रसाद
In reply to सन, किटी व्हेळा लेखक कवा by फेदरवेट साहेब
In reply to म्हात्रेसर, या लेखावर उपरोधिक by हतोळकरांचा प्रसाद
...नोटबंदी कारवाईसंबंधी मला पटलेले विचार मी कारणांसह इथे लिहिले आहेत. उद्या मोदींची दुसरी एखादी कारवाई योग्य वाटली नाही तर तसे लिहायला मला अडचण वाटणार नाही.
मुद्दे आणि तर्क यांच्या सहाय्याने लिहीलेले लिखाण आपल्या पसंतीचे अथवा सोईचे नसल्यास त्याचा विनामुद्दा व विनातर्क उपरोधिक विरोध करणारे काही लोक असतात, मिपावरही आहेत...
मला जे पटले त्याची मी इथे कारणपरंपरेसह लेखी नोंद केली आहे. ते बरोबर ठरते की चूक हे येता काळ ठरवेलच. ते बरोबर ठरेल असा माझा विश्वास आहे आणि तसे होण्याने मला आनंदच होईल, ते चूक ठरले तर माझ्या तर्कात चूक झाली हे मान्य करायला मला अजिबात कुचमुचल्यासारखे होणार नाही. कारण, या दोन्ही बाबींना माझ्या ज्ञानसंपादनातला एक धडा समजून मी पुढे जात राहीन.
ज्यांना माझी मते पटत नाहीत त्यांना आपली तथ्ये व तर्क समोर ठेवून माझे तर्क व मते खोडायची आणि स्वतःचे तर्क व मते नोंदवायची पुरेपूर मुक्त संधी आहे. तसे करणे सभ्यता आणि समतोल विचारांना धरून केलेला प्रतिवाद होईल व तो नेहमीच स्वागतार्ह असेल.
कोणत्याही कारणाने (स्वतःजवळ सबळ मुद्दे/तर्क नसल्याने, केवळ खोडसाळ स्वभाव किंवा इतर कोणत्या ज्ञात/अज्ञात कारणाने) असे न करता, केवळ मुद्दा भरकटवणे किंवा उपरोधिक प्रतिसाद टाकण्याने माझ्या लेखातल्या मजकूराचा अर्थ बदलणार नाही, तो तसाच राहणार आहे.
किंबहुना माझे लेखन आणि त्यावरचे प्रतिसाद, इथेच या खुल्या संस्थळावर सर्वांना वाचायला उपलब्ध राहणार आहे. माझी पत माझे लिखाण ठरवेल, इतरांची पत त्यांचे लिखाण ठरवेल. पूर्णविराम.In reply to सहमत ! by डॉ सुहास म्हात्रे
In reply to एक्काकाका - by बोका-ए-आझम
In reply to देशभक्ती चा डोस दिला by वरुण मोहिते
In reply to भारतीय.... by चौकटराजा
In reply to ह्या आधीही भाजप सत्तेत होता by वरुण मोहिते
In reply to स्पिकिंग ऑफ ड सो कॉल्ड कंपेरिझन बेस्ड बायस्ड रायटप by फेदरवेट साहेब
In reply to गुड ! ह्येच्यामुळे एक by डॉ सुहास म्हात्रे
In reply to राव यांच्याप्रमाणे स्वतःच्या by फेदरवेट साहेब
In reply to जनतेचा पाठिंबा, सुजाणतेचे by संदीप डांगे
In reply to जनतेचा पाठिंबा, सुजाणतेचे by संदीप डांगे
In reply to तुमच्या वरच्या संपूर्ण by हतोळकरांचा प्रसाद
In reply to कोणाला खेद वाटतो की आनंद याची by संदीप डांगे
In reply to ते खेद, आनंद, न्यायाधीश वगैरे by हतोळकरांचा प्रसाद
In reply to समर्थकांनी कितपत धीर धरलाय ते by संदीप डांगे
In reply to काय बोलणार?:):) by हतोळकरांचा प्रसाद
In reply to काहीतरी चर्चेबद्दल बोलत होते by संदीप डांगे
In reply to अपयश सिद्ध करायला धिर धरायला by हतोळकरांचा प्रसाद
In reply to इन अदर सेन्स, विरोधकांनी गप्प by संदीप डांगे
In reply to काहीतरी चर्चेबद्दल बोलत होते by संदीप डांगे
In reply to फुलप्रूफ प्लॅन by ट्रेड मार्क
In reply to नोटबंदीची सरकारमान्य गरज, by संदीप डांगे
In reply to ते खेद, आनंद, न्यायाधीश वगैरे by हतोळकरांचा प्रसाद
In reply to =)) =)) by डॉ सुहास म्हात्रे
In reply to =)) =)) by संदीप डांगे
In reply to ७० वर्षान्नी जन्ता जागी झालि by गब्रिएल
In reply to जनतेचा पाठिंबा, सुजाणतेचे by संदीप डांगे
उद्या हे सगळं फेल गेलं तरी "हेतू तर प्रामाणिक होता ना?" असे म्हणायला मोकळे.मग, हेतु नक्की काय आहे ?
तत्कालिक स्वार्थी हितसंबंधांच्या मागे लागून, या अत्यंत दुर्मिळ घटनांच्या संगमाचा नकार, अव्हेर किंवा विरोध करून, मोदींचे विरोधक आपल्याच पायावर धोंडा मारून घेत आहेत.असं आहे होय!
स्वतःचा व पक्षाचा स्वार्थ बाजूला सारून देशाला पुढे नेणारा खंबीरपणा दाखविणे जगभरच्या भल्या भल्या नेत्यांना जमलेले नाहीहे तुम्ही दोन वेळा का टाईपले? खाली परत ठळक फाँटात?
याची समज प्रत्येक भारतीय नागरिकात जेवढी लवकर येईल तेवढे देशाच्या दृष्टीने आणि पर्यायाने प्रत्येक नागरिकाच्या दृष्टीने चांगले होईलओके
मी कोणत्याही भारतीय राजकीय पक्षाचा फार मोठा चाहता नाही.हे का बरे सांगावे लागते सतत? (हो जय जय शिवशंकर काटा लागे ........)
आपल्या हालअपेष्टांना कारणीभूत असलेला 'कोणीतरी' आहे, त्याच्याविरुद्ध आपल्याला युद्ध पुकारणे आवश्यक आहे हे जनतेच्या गळी उतरवले की जनता सारासार विचार करण्याच्या भानगडीत न पडता अशा नेत्याच्या मागे उभी राहते.भारतीय जनता खरंच इतकी मूर्ख वाटते का हो तुम्हाला? तशी वाटंत असल्यास तिला शहाणं करायचं मनावर घ्याच म्हणतो मी. तर मग कुठे सुरुवात करणार आहात? आ.न., -गा.पै.
In reply to भारतीय जनतेचा मूर्खपणा by गामा पैलवान
In reply to 70 वर्ष घाण साचत राहिली by संदीप डांगे
In reply to दिसत्येय की जनतेची हुशारी. by गामा पैलवान
In reply to एकसंध असणे आणि हुशार असणे by संदीप डांगे
In reply to डांगेंजी, ते जनता मूर्ख आहे by हतोळकरांचा प्रसाद
In reply to "हेतु काय आहे?" हेच तर by संदीप डांगे
In reply to म्हणजे अजून गाडी तिथेच आहे तर by हतोळकरांचा प्रसाद
In reply to त्याचं काय आहे ना, आतापावेतो by संदीप डांगे
In reply to त्याचं काय आहे ना, आतापावेतो by संदीप डांगे
विरोधकांनी काहीही मांडलं तरी ते कसं द्वेषातूनच लिहिलंय हे सिद्ध करायची स्पर्धा लागते.
विरोध करण्याच्या नादात कै च्या कै लॉजिक मांडता त्यावेळी तुम्ही आत्ता ज्या आदर्शवादाच्या गफ्फा हाणत आहात तो आदर्शवाद कुठे जातो..?
एकदा विरोधकांना 'मूल्यहिन' ठरवले की मग त्यांनी मांडलेली तथ्ये, आकडेवारी, घटना, अनुभव सगळे अविश्वसनीय, बनावट, द्वेषमूलक व खोटेच समजले गेले पाहिजेत असा इथे अट्टाहास दिसला.
मूल्यहीन ठरल्यानंतर दिलेली गोष्ट १० वेळा पारखून घेतली जाते हा जगन्मान्य नियम आहे. वीस लाखाचे ट्रक, असंबद्ध लिंका, पळवाटा इतके सगळे झाल्यानंतरही जगाने आपल्यावर डोळे झाकून विश्वास ठेवावा ही फारच बाळबोध अपेक्षा आहे.
जिथे लोकांनी आपआपले खुंट घट्ट करुन घेतलेच आहेत त्याठिकाणी चर्चा होत नाही, कसलंही ज्ञान-प्रसार, कल्पनांची देवाण-घेवाण होत नाही. फक्त चिखलफेक व संगित मानअपमान चालतं.
अर्धवट, सोयिस्कर सत्य मांडणार्या तथाकथित निष्पक्षांना दुसर्यांच्या डोळ्यातले कुसळ दिसते पण आपल्या डोळ्यातले मुसळ दिसत नाही.
फायनली एखादा आरसा बघितला वाटतं..!! ;)
असो.. शुभेच्छा..!!
In reply to विरोधकांनी काहीही मांडलं तरी by मोदक
In reply to बरोबर, आता फक्त वीस लाखाचे by संदीप डांगे
In reply to असे दुसर्यावर बिनबुडाचे आरोप by मोदक
दुसर्यावर बिनबुडाचे आरोप करणे जुने झालेहोक्का! कधीपासून...? मी पैसे घेऊन प्रतिसाद लिहितो हे लिहिण्यापासून ना?
मी जाणीवपूर्वक दिशाभूल केलेले प्रतिसाद दाखवून द्या.दिशाभूल करण्याचा आरोप दुसर्यांवर करणे ह्यात तुमचं पेटंट आहे, तुमच्याकडेच असू देत.
तुम्ही भाजपविरोधी अजेंडा राबवत आहात आणि मिपाचा त्यासाठी उपयोग करून घेत आहात हे उघडे पडल्याने प्रतिवाद करू शकत नाही हे मान्य करा.तुम्हाला काय वाटते ह्याचा मी विचार करत नाही, किंवा इथे कोणालाही माझ्याबद्दल काय वाटते ह्याबद्दल मी पर्वा करत नाही. तुमचा माझ्याबद्दलचा विचार महत्त्वपूर्ण नाही. बाकी दादागीरी, दबंगगीरी करायची तुम्हाला खास खुमखुमी असल्यास एन्जॉय द पार्टी.
दुकाने उघडली असताना अवघड प्रश्न विचारणारे ग्राहक येणारच, मग आता "अन्याय होतो आहे" असा कांगावा करून गळे काढणे थांबवा.जैसी जिसकी सोच!
In reply to @मोदक, by संदीप डांगे
In reply to @मोदक, by संदीप डांगे
होक्का! कधीपासून...? मी पैसे घेऊन प्रतिसाद लिहितो हे लिहिण्यापासून ना?त्याच्या पूर्वीचे तुमचे बिनबुडाचे आरोप विसरलात का..?
दिशाभूल करण्याचा आरोप दुसर्यांवर करणे ह्यात तुमचं पेटंट आहे, तुमच्याकडेच असू देत.मी सरसकट सर्वांवर आरोप करत नाही. तुम्ही अजेंडा राबवण्यासाठी दिशाभूल केलेले प्रतिसाद मिपावरच आहेत. अनेकदा तुम्हाला लिंका दिल्या आहेत. तेथून तुम्ही नेहमीप्रमाणे पळ काढला आहेच. मी दिशाभूल केलेले प्रतिसाद सापडले का..? सापडले नसतील तर आरोप मान्य करताय असे समजावे का..?
तुम्हाला काय वाटते ह्याचा मी विचार करत नाही, किंवा इथे कोणालाही माझ्याबद्दल काय वाटते ह्याबद्दल मी पर्वा करत नाही. तुमचा माझ्याबद्दलचा विचार महत्त्वपूर्ण नाही.यात चुकीचे काहीच नाही. फक्त जे बोलायचे आहे ते खरे बोला आणि चष्मे घालून खोटेपणा, कांगावा केल्यास प्रत्युत्तर मिळणारच.
बाकी दादागीरी, दबंगगीरी करायची तुम्हाला खास खुमखुमी असल्यास एन्जॉय द पार्टी.तुम्हाला तसे वाटत असेल तर असो बापडे, मी तरी असे काही केलेले मला आठवत नाही आणि असे काही करायची वेळ आली तर ते स्वत:च्या जीवावर करेन. तुमच्यासारखे पडकी बाजू सावरायला दुसर्याच्या मागे लपणार नाही.
जैसी जिसकी सोच!जी आहे ती सोच क्लीयर आहे. त्यामुळे मला विशिष्ट पक्षाची भलामण करण्यासाठी कोलांट्याउड्या माराव्या लागत नाहीत - अर्थात हे तुम्हाला कळणार नाहीच.
In reply to होक्का! कधीपासून...? मी पैसे by मोदक
In reply to त्याच्या पूर्वीचे तुमचे by संदीप डांगे
In reply to बरोबर, आता फक्त वीस लाखाचे by संदीप डांगे
In reply to ही वीस लाखाच्या ट्रकची काय by अप्पा जोगळेकर
In reply to http://www.misalpav.com/node by मोदक
In reply to http://www.misalpav.com/node by मोदक
In reply to म्हणजे अजून गाडी तिथेच आहे तर by हतोळकरांचा प्रसाद
In reply to मग तुम्ही सुरुवातीला या by अप्पा जोगळेकर
In reply to डांगेंजी, ते जनता मूर्ख आहे by हतोळकरांचा प्रसाद
In reply to तीन मुद्दे by गॅरी ट्रुमन
जे मुळात मोदी समर्थक आहेत त्यापैकी बरेच आपल्या मुळातल्या मोदी समर्थनाला पाठबळ कसे देता येईल हे या निर्णयात शोधत आहेत तर मोदी विरोधक आहेत त्यापैकी बरेच आपल्या मुळातल्या मोदीविरोधाला पाठबळ कसे देता येईल हे या निर्णयात शोधत आहेत आणि आपापल्या परिने आपल्याला सोयीस्कर असा अर्थ लावत आहेत.आणि हे
भविष्यात नक्की काय होते हे समजायला काही महिने आणखी थांबावे लागेल.कूड नॉट ऍग्री मोअर!
In reply to तीन मुद्दे by गॅरी ट्रुमन
मोदींना याचा भूतकाळात फायदा मिळालेला आहे आणि तो ट्रेंड भविष्यातही चालू रहावा याची विरोधक पुरेपूर काळजी घेत आहेत !!! :)
एकसंध असणे आणि हुशार असणे ह्याचा काही संबंध असतो काय? उगाच उत्तर नाही म्हणून काहीही लिहू नका.हो आहे. नेव्हिल मॅक्सवेल म्हणून एका नामांकित पत्रकाराने भारतातली १९६७ सालची सार्वत्रिक निवडणूक शेवटची असेल म्हणून भाकीत केलं होतं. भारतीय जनता तुम्ही समजता त्यापेक्षा बरीच हुशार आहे. तुम्हाला जर बावळट वाटंत असेल तर तिला शहाणं बनवायचा मार्ग दखवावा, ही विनंती. २.
मोदींच्या आरत्या ओवाळायच्या तर ओवाळा स्पष्टपणे, उगाच देशाची जनता जागी झाली वगैरे पोकळ गफ्फा मारु नये.कर्रेक्ट ! जनता झोपलेलीच आहे. तिला कसं जागं करायचं? कृपया मार्ग दाखवावा ही विनंती. बरं, ते मोदींच्या आरत्या हे काय प्रकरण आहे? मला नीटसं कळलं नाही. जरा ओवाळून दाखवता का, म्हणजे कळेल मला. आ.न., -गा.पै.
In reply to (१) http://www by श्रीगुरुजी
In reply to (१) http://www by श्रीगुरुजी
सारांश.