✍ मराठी साहित्य, संस्कृती आणि लेखनाचे व्यासपीठ
प्रवेश करा | सदस्य व्हा
मिसळपाव
मिसळपाव मराठी साहित्य

Main navigation

  • मुख्य पान
  • पाककृती
  • कविता
  • भटकंती
  • नवीन लेखन

जाणता राजा

म
महासंग्राम यांनी
Mon, 12/26/2016 - 12:55  ·  लेख
लेख
गाव : विदर्भातलं एक खेड वेळ : सकाळची , स्थळ : गावाची चावडी पात्र : रामराव आणि शामराव, वय : ५५-६० च्या आसपास. रामराव : "राम राम ओ शामभौ कुटी चालले इतक्या घाई मदी." शामराव : "राम राम, ते शेतात गेल्तो जरा सोयाबीन ले पानी द्याचं व्हतं, तुमाले मालूम नाई का रातीची इज देतात ना ते MSEB वाले." "न आता जरा उमरावातीले जाऊन येतो, ते मावा पडलाय सोआयबीन वर त्यासाठी कीटकनाशक घेऊन येतो जरा. लौकर जा लागते सकायची बस गेली का त वडाप नायतर कोणाच्या तरी गाडीवर जा लगीन मले शहरात." रारा : "जाशीन ना बे, पण हे बातमी पायली का त्वा, आताच लाईट आली अन टिव्ही लावला तर ते बातमी सुरु होती." " पाह्यलं का किती जंगी उदघाटन झालं स्मारकाचं, आता आपल्या राजाची किर्ती जग भर पोहोचणार पायतच जाय बाबू तू" !!! शारा : "अबे हो, तुय सारं बरोबर पन त्या साठी तर लैच पैका खर्च झाला म्हने ?" रारा : "हो मग ३६०० करोड रुपये खर्च होणारे, असं तसं स्मारक नाही जागतिक दर्जाचं स्मारक व्हनार आहे ते तेवढा खर्च किरकोळ आहे बे." शारा : "त्याले तिथल्या मच्छीमारांचा पन विरोध आहे असं ऐकलं बे म्या खरं व्हय का ते ?" रारा : "व्हय हुईन त्यायले थोडा प्रॉब्लेम, थोडा त्रास सहन करावाच लागन त्यायले. पण त्यामुळे पर्यटनाले किती हातभार लागीन बाबू याचा इचार कर न तू . जगभरातले लोकं येतीन ते पाहाले." शारा : " पण मले एक सांग शिवाजी राजाच सारं आयुष्य गडकिल्ल्यावर गेलं. मग हे स्मारक कायले ते गडकिल्ले ते काऊन दुरुस्त नाई करत सरकार त्या पैशातून ? " अन स्मारक शिवाजी राजाने तर जलदुर्ग बांधेल हायेत ना मंग तटी काऊन नाही केल स्मारक. रारा : "सरकार कुटी-कुटी लक्ष दिन बे. लोकाईन त थोडं काम कराले पाइजे कि नाई ?" शारा : "तुयी गोस्ट बरोबर हाये, तू म्हणत तसं काई संस्था काम करतात बी जीव वतुन किल्ले बांधाच, पण त्यायले पैका कसा पूरन. सरकार न जर त्या लोकयाले मदत केली किती भारी हुईन ते, स्वतःच्या खिशातून पैसे खर्च करून काम करणाऱ्या लोकाईले किती हुरूप येईन याचा बी इचार करन तू जरा." रारा : " हम्म, तुया बोलन्यात पॉईंट हाय थोडा. " शारा: "आता मले सांग आपल्या अटीच लाईट नसते, यस्टी वेळेवर येत नाई. सकायी सकायी अर्धे लोकं त्या कमानीपाशी रस्त्यावर बसत्यात. गावात नवीन कोणी पावना आला कि त्याले सलामी देत उबे रायतात." "आता माया शेतात म्या जलयुक्त शिवार अंतर्गत शेततळं करून घेतलं त्यामुळे माया न बाजूच्या सुदाम्या अन सुभानरावाच्या शेतात पाण्याची सोय झाली. पण गावात असे बी कास्तकार हायेत त्यायच्या कडे या साठी पैसा नाई, त्यामुळे त्यायले रब्बीत काय करावं,कास्तकारी सोडून द्यावी का ?" "हे झाली आपल्या गावाची कंडिशन, तू जरा खाली मेळघाटात जाय बरं तिकडं प्याले पानी नाई, रस्ते नाई, लाईट नाई. त्याहिनं काय करावं ?" आता तू सांग कोणत्या राजाळे आपल्या प्रजेले असा त्रास झालेला आवडीन. रारा : "अबे पन !!!" शारा : "पन गिन काई नाई मी काय बोलतो ते बघ आदी. हा स्मारकावर खर्च होणारा पैका थोडा किल्ले दुरुस्त कराले. थोडा जिकडे रस्ते, पानी, लाईट नैत अशा म्हणजे मेळघाट, चंद्रपूर मदल्या दूरच्या खेड्यात थोड्याफार त सोई देता येतीन. " "अन शिवाजी राजाले 'रयतेचा राजा' म्हटलं जायचं, मग तो पैसा त्याच्या रयतेसाठी वापरला तर त्यायचं कल्याण हुईन ना." रारा : "लैच चाबऱ्या तोंडाचा होयेस बे तू . देवाले असं एकेरी नावानं बोलतेत का ?" शारा : "बरं मी निगतो आता, पण त्या आदी व्हॉटसऍप वर माया पोरानं एक 'नरहर कुरुंदकर' म्हणून मोठा माणूस हुन गेला त्याचा म्यासेज पाटवला तो ऐक अन तुया डोक्शात काय प्रकाश पडते का बग." कुरुंदकर म्हन्तेत, " माणसाचा देव ज्या वेळेला केला जातो त्या वेळेला त्याच्या अभ्यासाची गरज संपते, अनुकरणाचीही गरज संपते. हा श्रद्धेने निर्माण होणारा फार मोठा पायगुंता आहे. तो टाळण्याचा आपण यथाशक्ती प्रयत्न केला पाहिजे.""समाजाला नाट्यमय आणि रोमांचकारी घटनांची जास्त आवड असते. अशा नाट्यमय घटनांवर लक्ष खिळून राहिले म्हणजे मग खरे कर्तृत्त्व दृष्टीआड होण्याचा धोका असतो."
वर्गीकरण
लेखनविषय (Tags)
इतिहास
मुक्तक
समाज
जीवनमान
लेखनप्रकार (Writing Type)
विचार
माध्यमवेध
मत

प्रतिक्रिया द्या
17303 वाचन

💬 प्रतिसाद (62)

प्रतिक्रिया

स्मारके ही तरी सरकारची प्राथमिकता नसावी.

mayu4u
Wed, 12/28/2016 - 11:12 नवीन
सहमत! आणि गांधी, नेहरू, आंबेडकर, पटेल या सर्वांच्या स्मारकांनाही माझा विरोध.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: संदीप डांगे

<<<<ज्यांना 'स्मारकाचे श्रेय

विशुमित
Tue, 12/27/2016 - 15:04 नवीन
<<<<ज्यांना 'स्मारकाचे श्रेय भाजप/कॉन्ग्रेसला मिळावे' असे वाटत असेल किंवा 'श्रेय भाजप/कॉन्ग्रेसला मिळेल म्हणूनच विरोध होतोय' किंवा 'भाजप/कॉन्ग्रेस राजकारण करतात म्हणून यांच्या पोटात दुखतंय' असे वाटत असेल त्यांचं प्रेम महाराजांपेक्षा राजकिय पक्षांवर जास्त आहे असे समजूयात. अशांशी चर्चा करणे म्हणजे चिखलात उतरणे आहे.>>>> -- एक्साक्टली. या विचारला प्रचंड अनुमोदन. पण महाराजांचे नाव घेऊन जगणाऱ्या बांडगुळांना त्याचे काहीच सोयरेसुतक नाही.
  • Log in or register to post comments

स्मारक + गड किल्ल्यांचे

लालगरूड
Tue, 12/27/2016 - 19:52 नवीन
स्मारक + गड किल्ल्यांचे संवर्धन दोन्ही होणार
  • Log in or register to post comments

स्मारकाचा निर्णय आवडलेला नाही

पिलीयन रायडर
Tue, 12/27/2016 - 20:09 नवीन
स्मारकाचा निर्णय आवडलेला नाही. स्मारक व्हावं, त्याला पर्यटक मिळतील वगैरे सगळं खरं असलं तरी गड किल्ल्यांची अवस्था इतकी वाईट असताना येड्यासारखा पैसा स्मारकात ओतणं हेच गाढवपणाचे लक्षण आहे. म्हणजे तिकडे वर्डक्लास स्मारक आणि इकडे अत्यंत बेक्कार अवस्थेतले गड-किल्ले.. काहीही अर्थ नाही. दोन्ही गोष्टी सुद्धा होऊ शकतातच.. तसं होणार असेल तर "आधी" गड-किल्ल्यांचं पहा.. नंतर काय स्मारकं उभी करायची ती करा..
  • Log in or register to post comments

हे स्मारक व्हायला पाहिजे असं मनापासून वाटतं पण

ट्रेड मार्क
Wed, 12/28/2016 - 01:52 नवीन
हे स्मारक व्हायला पाहिजे असं मनापासून वाटतं पण आपले भारतीय लोक किती काळ हे स्मारक सुस्थितीत राहू देतील? सगळीकडे थुंकणे, कचरा टाकणे, आपली नावे लिहिणे ह्यात धन्यता मानणारे आपले लोकच त्याची वाट लावतील. एवढ्या एकांतातल्या जागी असल्याने, कुठला ना कुठला मार्ग शोधून, रात्रीच्या वेळेला जाऊन नसते उद्योग करणारे कमी नसतील. पक्षी स्मारकांवर/ पुतळ्यावर घाण करतात हे आहेच. त्यांना कळत नाही, पण माणसांचं काय? प्रत्यक्ष महाराजांनी बांधलेले आणि वास्तव्य केलेले किल्ले व महाल यांची काय दयनीय अवस्था करून ठेवली आहे. यात फक्त सरकारच दोषी नसून जनताही तेवढीच दोषी आहे. आपला कुठलाही वारसा आपल्याला जपता येत नाही हेच खरं.
  • Log in or register to post comments

Which Indian city do foreign

लालगरूड
Wed, 12/28/2016 - 02:13 नवीन
Which Indian city do foreign tourists visit the most? Where do they spend the most? The answer to both the questions is Mumbai, according to a study by card payment services provider, MasterCard. In 2016, the city had 4.86 million overnight visitors who spent a collective $3.6 billion, or Rs 24,120 crore, said the study.
  • Log in or register to post comments

स्मारक होतय हे उत्तमच आहे

अर्धवटराव
Wed, 12/28/2016 - 04:54 नवीन
छत्रपतींच्या कर्तुत्वाचा आलेख मांडणारे संग्रहालय सदृष ऑडीटोरीअम, मराठा साम्राज्याची शक्य तेव्हढी माहिती रंजक पद्धतीने देणार्‍या चित्रफिती, गड-किल्ल्यांच्या ऐतिहासीक माहितीसह सफारी आयोजन करणारी पथकं, शिवाय बाकी पर्यटन सोयींनी युक्त असं भव्य स्मारक झालं तर काय बहार येईल. स्मारक असं व्हावं कि छत्रपतींबद्दल अगदी जुजबी/शुण्य माहिती असणार्‍या व्यक्तीने आत पाऊल टाकावं व शिव-कर्तुत्वाने भारावुन जावुनच बाहेर पडावं. छत्रपतींच्या पुतळ्याची भव्यता त्यांच्या व्यक्तीमत्वाला साजेशी असल्याची खात्री पटावी. मराठी/मराठा वगैरे कुंपणांत बदीस्त शिवबा आजवर आपल्याला अखील भारतीय गौरवाच्या पातळीवर स्थापन करता आला नाहि. हे स्मारक त्या दृष्टीने दमदार पाऊल पडावं. भारतीय पराक्रमाचा, शहाण्या राजसत्तेचा मानबींदु म्हणुन छत्रपतींचं नाव जगभर गाजावं. आधी गड-किल्ल्यांच्या अवस्थेचं बघा वगैरे म्हणण्यात काहि अर्थ नाहि. स्मारकाच्या टार्गेट ऑडीयन्सपैकी १०% सुद्धा गड-किल्ल्यांकडे भटकणार नाहि. गड-किल्ल्यांची व्य्ववस्था वेगळ्या पातळीवर करायला लागेल. किंबहुना स्मारकाने प्रभावीत होऊन गड-किल्ल्यांकडे पाऊले वळायला लागली तर किल्ल्यांची अवस्था नीट लावण्याची अवष्यकता तीव्रतेने जाणवायला लागेल.
  • Log in or register to post comments

+१११११११११११११११११११११११११११

शलभ
Wed, 12/28/2016 - 17:56 नवीन
+१११११११११११११११११११११११११११
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: अर्धवटराव

+११११११११११११

NiluMP
Wed, 12/28/2016 - 18:40 नवीन
+११११११११११
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: अर्धवटराव

स्मारकाच्या टार्गेट

महासंग्राम
गुरुवार, 12/29/2016 - 10:19 नवीन
स्मारकाच्या टार्गेट ऑडीयन्सपैकी १०% सुद्धा गड-किल्ल्यांकडे भटकणार नाहि.
तसं झालं तर सरकारच्या मार्केटिंगच पराभव ठरेल.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: अर्धवटराव

अजीबात नाहि.

अर्धवटराव
Fri, 12/30/2016 - 02:08 नवीन
वय वर्षे १० ते ७० हा स्मारकाचा टार्गेट ऑडीयन्स धरला, त्यात मराठी/अमराठी/परदेशी सगळे आले, तर त्यापैकी १०% लोकांकडुन सुद्धा गड-किल्ल्यांकडे भटकायची अपेक्षा नाहि. शिवाजीला लोकांपर्यंत पोचवायला प्रस्तावीत स्मारक जास्त प्रभावी आहे गड-किल्ल्यांपेक्षा.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: महासंग्राम

गाव वालं बरुबर बोलल्यात

अनिरुद्ध.वैद्य
Fri, 12/30/2016 - 20:48 नवीन
आडोसा मारामारी आन तिकडं दर्यात आजून येक. महाराजांसारखं वागून दाखवा, त्यांनी तयार केलेली व्यवस्था परत तयार करा ... हर गाव हर शहर, पुतले, नगर, रस्ते महाराजजीके नामपे है. मग अजून एक बांधून काय फायदा?
  • Log in or register to post comments
  • «
  • ‹
  • 1
  • 2

लेखन करा

लेखन करा

मिसळपाव वर स्वागत आहे.

प्रवेश करा

  • नवीन खाते बनवा
  • Reset your password
मिसळपाव.कॉम बद्दल
  • 1आम्ही कोण?
  • 2Disclaimer
  • 3Privacy Policy
नवीन सदस्यांकरीता
  • 1सदस्य व्हा
  • 2नेहमीचे प्रश्न व उत्तरे
लेखकांसाठी
  • 1लेखकांसाठी मार्गदर्शन उपलब्ध
  • 2लेखन मार्गदर्शन
संपर्क
  • 1सर्व मराठीप्रेमींचे मनापासून स्वागत!
  • 2अभिप्राय द्या
  • 3संपर्क साधा
© 2026 Misalpav.com  ·  Disclaimer  ·  Privacy Policy मराठी साहित्य व संस्कृतीसाठी  ·  प्रवेश  |  सदस्य व्हा