ब्लॉग दुवा
नव्वदीच्या दशकात जी व्यक्ती इंग्रजी गाणी ऐकत असेल तिला जॉर्ज मायकल हे नाव अपरिचित असणं शक्य नाही. काहीसा पॉप, डान्स किंवा डिस्कोचा बाज असलेली या गायकाची गाणी अतिशय प्रसिद्ध झाली.
१९८७ ला आलेला त्याचा पहिला म्यूझिक अल्बम फेथ. याच्या २ अब्जाहून अधिक प्रती विकल्या गेल्या. तिथपासून अनेकवेळा आपल्या गाण्यांमुळे किंवा इतर वैयक्तिक गोष्टींमुळे चर्चेत राहिला. २५ जून १९६३ रोजी लंडनमधे जन्मलेला, ३० वर्षाची सांगितिक वाटचाल केलेला हा कलाकार काल म्हणजेच २५ डिसेंबर २०१६ रोजी काळाच्या पडद्याआड गेला.
त्यानिमित्ताने त्याच्या काही अप्रतिम गाण्यांचे दुवे इथे द्यावेसे वाटतात.
केअरलेस व्हिस्पर - गाण्याच्या सुरुवातीच्या सॅक्सॉफोन पीसवरून कुणीही कुठूनही हे गाणं ओळखेल. प्रेमभंगाच्या भावनेची प्रभावी मांडणी.
फेथ - जॉर्ज मायकलचं अस्तित्व बॉलिवूडमधे प्रत्यक्षपणे नसलं, तरी 'पायल मेरी, जादू जगाती है' या गाण्याच्या रुपात फेथ हे त्याचं गाणं बॉलिवूडमधे आहे आणि पर्यायाने जॉर्ज मायकलही.
लास्ट ख्रिसमस - अतिशय उत्कृष्ट मेलडी. अगदी परवाच आर्चीज च्या दुकानात लास्ट ख्रिसमस ऐकलं. अजरामर गाणं. हे गाणं इतरही लोकांनी गायलं. जसं की व्हिगफील्ड या बँडने. पण लक्षात राहिलं ते जॉर्ज चंच. याचीही नक्कल झाली. अकेले हम अकेले तुम मधलं, 'दिल मेरा चुराया क्यूं'. हुबेहूब.
वेक मी अप बिफोर यू गो गो - व्हॅम या त्याच्या अँड्र्यू रिजली सोबतच्या बँडमधलं गे गाणं. अँड्र्यू ने त्याच्या पालकांसाठी एक चिठ्ठी लिहून ठेवताना वेक मी अप बिफोर यू गो या वाक्यात चुकून 'अप' दोन वेळा लिहिलं होतं. पुढे हे गाणं झालं आणि त्यात मुद्दाम 'गो' हा शब्दही दोनवेळा केला गेला.
याव्यतिरिक्त काही निवडक गाणी:
फ्रीडम ९०
वन मोअर ट्राय
मंकी
आय वाँट युअर सेक्स
प्रेइंग फॉर टाईम
जॉर्ज मायकल उत्तम गायक होता, रिबेल होता, त्याच्या बायसेक्शुअल असण्यामुळे बरीच चर्चा झाली, कॉन्ट्रोव्हर्सी झाली. अॅन्सेल्मो फेलेपा या ब्राझिलियन ड्रेस डिझायनर बरोबर त्याचे संबंध होते, पण पुढे फेलेपाला एचाअयव्ही आहे हे जॉर्जला कळल्यावर ते संपले. फेलेपा एड्स रिलेटेड ब्रेन हॅमरेजने गेला. जॉर्जचं 'जीसस टू अ चाइल्ड' हे गाणं हे त्याला समर्पित होतं. हे आणि असं बरंच काही त्याच्या वैयक्तिक आयुष्यात जरी घडलेलं असलं, तरी एक गायक म्हणून तो नक्कीच विशेष होता. हा ख्रिसमस जरी त्याचा लास्ट ख्रिसमस ठरला असला, तरी पूर्ण फेथ निशी म्हणता येईल की त्याचं केअरलेस व्हिस्पर नेहमीच त्याच्या फ्रीडमची ग्वाही देत राहील.
वाचने
3898
प्रतिक्रिया
7
मिसळपाव
प्रतिक्रिया
आज अतिशय दुःख झालं सकाळी
हो गविकाका, जोडतो लिंका जरा
In reply to आज अतिशय दुःख झालं सकाळी by गवि
आज अतिशय दुःख झालं सकाळी
In reply to आज अतिशय दुःख झालं सकाळी by गवि
सो
ह्म्म्म्म्म्म
In reply to सो by अनिरुद्ध.वैद्य
:(
फार वाईट वाटलं... :(
मदनबाण.....
आजची स्वाक्षरी :- twenty one pilots: Heathens (from Suicide Squad: The Album) [OFFICIAL VIDEO]