मंटोच्या लघु कथा १ : घाटे का सौदा

महासंग्राम जनातलं, मनातलं
सआदत हसन मंटो साहित्यातलं असं एक वादळ होतं, ज्याने तत्कालीन समाजाला मुळापासून हादरवून सोडलं. त्याने ५० वर्षांपूर्वी जे लिखाण केलंय ते आजही लागू होतं यातच त्याच्या लिखाणाची प्रगल्भता दिसून येते. आपल्या उण्यापुऱ्या ४२ वर्ष, आठ महिने आणि ७ दिवसांच्या आयुष्यात त्याला लिहायला फक्त १९ वर्षे मिळाली आणि या एकोणवीस वर्षात त्याने २३० कथा, ६७ रेडियो नाटकं, २२ शब्दचित्र आणि ७० लेख लिहलेत. साम्यवादी विचारांचा प्रभाव असणाऱ्या मंटोला आपल्या लिखाणामुळे कित्येकदा कोर्टाची पायरी सुद्धा चढावी लागली. इथे मी मंटोच्या लघुकथांचं अनुवाद करणार आहे. आजची कथा आहे, घाटे का सौदा मूळ लेखक : स़आदत हसन मन्टो. १९१२-१९५५ _______________________________________________ त्या दोन मित्रांनी मिळून दहा-वीस मुलींमधून एक निवडली आणि बेचाळीस रुपये देवून तिला विकत घेतलं. तिच्यासोबत रात्र घालवल्यावर एका मित्राने त्या मुलीला विचारलं, " नाव काय आहे तुझं ? " त्या मुलीने आपलं नाव सांगितलं तर तो गोंधळून गेला आणि म्हणाला, "आम्हाला तर सांगितलं होतं कि तू दुसऱ्या धर्माची आहेस..... !" मुलीने निर्विकारपणे उत्तर दिलं, " ते खोटं बोलले होते !" हे ऐकून तो धावतच आपल्या मित्राकडे गेला आणि म्हणाला, " त्या हरामखोरांनी आपल्याला धोका दिला आहे..... आपल्याच धर्माची मुलगी दिली होती... चल, परत करून येवू ..... !"
वर्गीकरण
लेखनप्रकार

15 टिप्पण्या 9,411 दृश्ये

Comments

नाखु नवीन

पचायला जडंच जाणार असं दिसतय एकूण? अनुवाद अर्थात टोकदार

गामा पैलवान नवीन

लोकहो, मंतोस द्रष्टा म्हणावं का? की लव्ह जिहाद तेव्हाही चालू होता? आ.न., -गा.पै.

प्रा.डॉ.दिलीप बिरुटे नवीन

मंटो आवडतोच. अनुवादही आवडला. वाचतोय, अजून येऊ द्या. -दिलीप बिरुटे