सआदत हसन मंटो साहित्यातलं असं एक वादळ होतं, ज्याने तत्कालीन समाजाला मुळापासून हादरवून सोडलं. त्याने ५० वर्षांपूर्वी जे लिखाण केलंय ते आजही लागू होतं यातच त्याच्या लिखाणाची प्रगल्भता दिसून येते. आपल्या उण्यापुऱ्या ४२ वर्ष, आठ महिने आणि ७ दिवसांच्या आयुष्यात त्याला लिहायला फक्त १९ वर्षे मिळाली आणि या एकोणवीस वर्षात त्याने २३० कथा, ६७ रेडियो नाटकं, २२ शब्दचित्र आणि ७० लेख लिहलेत. साम्यवादी विचारांचा प्रभाव असणाऱ्या मंटोला आपल्या लिखाणामुळे कित्येकदा कोर्टाची पायरी सुद्धा चढावी लागली. इथे मी मंटोच्या लघुकथांचं अनुवाद करणार आहे. आजची कथा आहे,
घाटे का सौदा
मूळ लेखक : स़आदत हसन मन्टो.
१९१२-१९५५
_______________________________________________
त्या दोन मित्रांनी मिळून दहा-वीस मुलींमधून एक निवडली आणि बेचाळीस रुपये देवून तिला विकत घेतलं.
तिच्यासोबत रात्र घालवल्यावर एका मित्राने त्या मुलीला विचारलं, " नाव काय आहे तुझं ? "
त्या मुलीने आपलं नाव सांगितलं तर तो गोंधळून गेला आणि म्हणाला, "आम्हाला तर सांगितलं होतं कि तू दुसऱ्या धर्माची आहेस..... !"
मुलीने निर्विकारपणे उत्तर दिलं, " ते खोटं बोलले होते !"
हे ऐकून तो धावतच आपल्या मित्राकडे गेला
आणि म्हणाला, " त्या हरामखोरांनी आपल्याला धोका दिला आहे..... आपल्याच धर्माची मुलगी दिली होती...
चल, परत करून येवू ..... !"
वाचने
9419
प्रतिक्रिया
15
मिसळपाव
प्रतिक्रिया
poisonous..
जव्हेरभौ __/\__
In reply to poisonous.. by जव्हेरगंज
सगळ्याच कथा एकदम ....काय
सगळ्याच एकदम नै व जश्या जमतील
In reply to सगळ्याच कथा एकदम ....काय by नीळा
मंटो
हो नाखुण्णा मंटो कायमच पचायला
In reply to मंटो by नाखु
मंटो संवेदनशीलतेला कडक
In reply to हो नाखुण्णा मंटो कायमच पचायला by महासंग्राम
'चल, परत करून येऊ!'...
द्रष्टा लेखक .... ? .... !
छान...!
किमान शब्दात कमाल! अनुवाद
+१०००
मंटोच्या लघुकथा : कम्युनिजम
In reply to +१००० by अजया
!!!!
भारी