✍ मराठी साहित्य, संस्कृती आणि लेखनाचे व्यासपीठ
प्रवेश करा | सदस्य व्हा
मिसळपाव
मिसळपाव मराठी साहित्य

Main navigation

  • मुख्य पान
  • पाककृती
  • कविता
  • भटकंती
  • नवीन लेखन

चला, शिकू या ओरिगामी – भाग ३ – कप, ट्रे, पेंग्विन

स
सुधांशुनूलकर यांनी
गुरुवार, 12/08/2016 - 17:12  ·  लेख
लेख

|| श्री गुरवे नम: ||

चला, शिकू या ओरिगामी – भाग ३ – कप, ट्रे, पेंग्विन

व्हिडिओ लेखमाला

चला, शिकू या ओरिगामी भाग १ - कागदपुराण, भाग २ - डोंगर-दरी, मूलभूत आकार या मूलभूत घड्या आणि मूलभूत आकार वापरून पुढील भागांत काही सोप्या ओरि-कलाकृती बनवू या. डिस्क्लेमर : या आणि यापुढील सर्व भागांमधल्या व्हिडिओंमध्ये दाखवल्या जाणाऱ्या सर्व ओरि-कलाकृती अनेक शतकांपासून प्रचलित असलेल्या पारंपरिक (Traditional) कलाकृती असून त्यांचे अभिकल्पक (Designers) अज्ञात आहेत. या सर्व ओरि-कलाकृतींचे अभिकल्प (Design), त्या तयार करण्याचं आरेखन (Line Diagramming) आणि ते बनवण्याचे व्हिडिओ बनवून ते कोणत्याही माध्यमातून प्रसिद्ध करणं संपूर्ण जगभर पूर्णत: स्वामित्व हक्कविहीन (प्रताधिकारमुक्त) आहेत. ज्या कलाकृती तयार करण्याचे व्हिडिओ बनवून ते मिपावर वा महाजालावर वा अन्यत्र प्रकाशित केल्यामुळे कोणाचेही कसल्याही प्रकारचे स्वामित्व हक्क भंग होणार नाहीत, अशाच कलाकृती व्हिडिओ बनवण्यासाठी निवडल्या आहेत. अर्थातच, या लेखमालेसाठी मी बनवलेले सर्व व्हिडिओसुद्धा प्रताधिकारमुक्त आहेत. (माझेच व्हिडिओ अन्यत्र वापरून माझ्यावरच वाङमयचौर्याचा आरोप होऊ शकतो, म्हणून माझ्या बाजूने हे स्पष्टीकरण.) या भागात अगदी सोप्या तीन कलाकृती करू या. तीन-चार घड्या घालून तयार होणार्‍या या कलाकृती आहेत. कप आणि ट्रे तर कमीत कमी एकदा तरी उपयोगातही आणता येतील. ओरिगामीच्या या प्रकाराला ‘युटिलिटी ओरिगामी’ असं म्हणतात. कप - फक्त दोन-तीन घड्या घालून हा कप तयार होतो. ड्युओ किंवा बायकलर कागद वापरूनही हा तयार करता येईल.

https://youtu.be/INkXQ0wmf20 ट्रे - आयताकार कागद वापरून चौरसाकार ट्रे तयार होतो. मग चौरसाकार कागद वापरून आयताकार ट्रे तयार होईल... करून पाहा. कबर्ड फोल्डपासून सुरुवात करून हा ट्रे तयार होतो.

https://youtu.be/nlag9emJqWw पेंग्विन – मी काळ्या रंगाचा कामी वापरला आहे, पण तुम्ही कोणत्याही रंगाचा कागद वापरा. आपला पेंग्विन आपल्याला हव्या त्या कोणत्याही रंगाचा असू शकतो! काइट बेसपासून सुरुवात करून हा सोपा पेंग्विन तयार होतो.

https://youtu.be/2imcqVMW3RM अगदी सोपी कला आहे की नाही ही? कोणालाही सहज जोपासता येईल अशी! ना वयाचं बंधन, ना शिक्षणाचं.. ही कला जन्मजात, उपजत असायची पूर्वअट नाही. कोणीही अगदी सहज शिकू शकेल, फक्त थोडी चिकाटी (Perseverance) हवी. आता तुम्हाला आत्मविश्वास आला असेल, तीन-चार घड्यांपेक्षाही थोड्या जास्त घड्या घालून कलाकृती बनवायला तयार आणि उत्सुक असाल. मग पुढील भागात प्रिलिमिनरी आणि वॉटरबाँब या बेसपासून काही कलाकृती बनवू या. आणि हो! हा व्हिडिओ बघून तुम्ही बनवलेले कप, ट्रे आणि पेंग्विन याचे फोटो प्रतिसादामध्ये जरूर दाखवा. (म्हणजे मी हे व्हिडिओज बरोबर तयार केले आहेत की नाही, ते मला कळेल.) (क्रमश:)

Book traversal links for चला, शिकू या ओरिगामी – भाग ३ – कप, ट्रे, पेंग्विन

  • ‹ चला, शिकू या ओरिगामी – भाग २ – डोंगर-दरी, मूलभूत आकार
  • Up
  • चला, शिकू या ओरिगामी – भाग ४ – तिळगुळाची वाटी, फुलं इ. ›
वर्गीकरण

प्रतिक्रिया द्या
4707 वाचन

💬 प्रतिसाद (18)

प्रतिक्रिया

मनापासून धन्यवाद....

मुक्त विहारि
Fri, 12/09/2016 - 12:02 नवीन
खूप दिवसांनी मिपावर आल्याचे सार्थक झाले...
  • Log in or register to post comments

आत्ता क्लिनिकला मधेच मोकळा

अजया
Fri, 12/09/2016 - 12:17 नवीन
आत्ता क्लिनिकला मधेच मोकळा वेळ मिळाला पेशंट कृपेने. ट्रे करुन बघतेय! पुभाप्र
  • Log in or register to post comments

मस्त.

पद्मावति
Fri, 12/09/2016 - 12:26 नवीन
मस्त.
  • Log in or register to post comments

रच्याकने- इतके दिवस औषध

अजया
Fri, 12/09/2016 - 12:30 नवीन
रच्याकने- इतके दिवस औषध कंपन्यांचे कागद वाया जातात म्हणून ठेवुन घेत नव्हते. आता तुमची सिरिज सुरु झाली तसे मागून घेते ;) दुसरं तुमच्या सिरिजचा चांगला उपयोग होणार आहे लवकरच.आमचा एका आदिवासी वाडीवर कँप आहे.तिथे मुलांना शिकवणार सोप्या वस्तू!
  • Log in or register to post comments

अरे वा!

सुधांशुनूलकर
Fri, 12/09/2016 - 18:48 नवीन
एका आदिवासी वाडीवर कँप आहे.तिथे मुलांना शिकवणार सोप्या वस्तू! - मग मलाही सांगा की. शक्य असेल तर कँपला यायला मलाही आवडेल.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: अजया

सांगते नक्की.साधारण दर

अजया
Fri, 12/09/2016 - 20:18 नवीन
सांगते नक्की.साधारण दर महिन्यातला एक शुक्रवार असतो.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: सुधांशुनूलकर

वाचतो आहेच.

सूड
Fri, 12/09/2016 - 18:55 नवीन
वाचतो आहेच.
  • Log in or register to post comments

अरे वाह!! मस्तच हाही भाग..

सानझरी
Fri, 12/09/2016 - 19:37 नवीन
अरे वाह!! मस्तच हाही भाग.. पुढचे भाग असेच लवकर लवकर येऊ देत.. (ओरीगामी घुबड बनवण्याचं स्वप्न पाहतेय मी. :D)
  • Log in or register to post comments

आता स्वप्न प्रत्यक्षात

पिंगू
Sun, 12/11/2016 - 11:16 नवीन
आता स्वप्न प्रत्यक्षात उतरवायची वेळ आहे..
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: सानझरी

सुंदर ! हा भागही आवडला.

डॉ सुहास म्हात्रे
Fri, 12/09/2016 - 21:27 नवीन
सुंदर ! हा भागही आवडला. कलाकृती बनवणे चालू झाल्याने मालिका अधिक रोचक बनत चालली आहे.
  • Log in or register to post comments

खूप छान !!

खटपट्या
Sat, 12/10/2016 - 03:34 नवीन
खूप छान !! ट्रे लगेच बनवून पाहीला. कामाची कलाक्रुती आहे. :)
  • Log in or register to post comments

ट्रे लगेच बनवून पाहीला

कापूसकोन्ड्या
Sat, 12/10/2016 - 08:31 नवीन
फोटो टाका की ओ!
  • Log in or register to post comments

माझ्याकडे फोटो अपलोड

खटपट्या
Sun, 12/11/2016 - 08:01 नवीन
माझ्याकडे फोटो अपलोड करण्यासाठी चेपू हे एकच साधन आहे हो. दुसरीकडे आहे का बघावे लागेल
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: कापूसकोन्ड्या

अप्रतिम

कापूसकोन्ड्या
Sat, 12/10/2016 - 08:36 नवीन
क्रिएटिव्हिटि ला सलाम तुम्ही व्हिडिओ पण उत्तम बनवला आहे. रोजच्या सकाळ मध्ये येणार्‍या कागदाच्या जाहीराती आतापर्यन्त टाकून देत होतो. आता जपायला हव्यात.
  • Log in or register to post comments

केवळ सुरेख... :)

मदनबाण
Sun, 12/11/2016 - 08:56 नवीन
केवळ सुरेख... :)

मदनबाण.....

आजची स्वाक्षरी :- Kiiara - Gold (Official Video)
  • Log in or register to post comments

मस्त...

ज्ञानोबाचे पैजार
Sun, 12/11/2016 - 14:03 नवीन
मस्त... तिनही वस्तु बनवून पाहिल्या. बर्यापैकी जमल्या पैजारबुवा,
  • Log in or register to post comments

धन्यवाद, आभार.

सुधांशुनूलकर
Sun, 12/11/2016 - 20:17 नवीन
काही वैयक्तिक कारणांमुळे भाग ४ लवकर प्रकाशित करता आला नाही. आता करतो आहे.
  • Log in or register to post comments

मिपा युट्युब चॅनलवर इथवरचे

पिलीयन रायडर
Wed, 12/14/2016 - 23:29 नवीन
मिपा युट्युब चॅनलवर इथवरचे सर्व भाग अपलोड केले आहेत! चला, शिकू या ओरिगामी अशी प्ले लिस्ट तयार केलेली आहे.
  • Log in or register to post comments

मिसळपाव वर स्वागत आहे.

प्रवेश करा

  • नवीन खाते बनवा
  • Reset your password
मिसळपाव.कॉम बद्दल
  • 1आम्ही कोण?
  • 2Disclaimer
  • 3Privacy Policy
नवीन सदस्यांकरीता
  • 1सदस्य व्हा
  • 2नेहमीचे प्रश्न व उत्तरे
लेखकांसाठी
  • 1लेखकांसाठी मार्गदर्शन उपलब्ध
  • 2लेखन मार्गदर्शन
संपर्क
  • 1सर्व मराठीप्रेमींचे मनापासून स्वागत!
  • 2अभिप्राय द्या
  • 3संपर्क साधा
© 2026 Misalpav.com  ·  Disclaimer  ·  Privacy Policy मराठी साहित्य व संस्कृतीसाठी  ·  प्रवेश  |  सदस्य व्हा