Skip to main content
मिसळपाव

Main navigation

  • मुख्य पान
  • पाककृती
  • कविता
  • भटकंती
  • नवीन लेखन
Submitted by निओ१ on Sat, 11/19/2016 - 01:32
लेखनविषय (Tags)
समाज
लेखनप्रकार (Writing Type)
विचार
नोटबंदी जाहीर झाली व ९ ला सकाळी सगळीकडे आहाकार माजला की काय असे वातावरण निर्माण झाले होते. माझ्याकडे रोख रक्कम फक्त ३४० रु होती. तर.. घरी आम्ही चार लोक आहोत. १. महिण्याचा किराणा - कार्ड पेमेंट २. गाडीसाठी पेट्रोल - कार्ड पेमेंट ३. औषधे - कार्ड पेमेंट ४. नेट बील - कार्ड पेमेंट ५. फोन बील - कार्ड पेमेंट ६. लाईट बील - कार्ड पेमेंट ७. सिलेण्डर - कार्ड पेमेंट ८. टिव्ही रिचार्ज - कार्ड पेमेंट ९. ड्रिक्स - कार्ड पेमेंट * यातील कित्येक लोकांना कार्ड मशीन घेण्यास मी गेल्या दोन वर्षापासून सांगत होतो व सकारण, उदाहरण देऊन पटवून दिले होते. त्यांनी ती घेतली होती. आम्ही हॉटेल व इतर जागी जात नाही, पण तेथे पण आता सरास कार्ड पेमेंट घेतात. प्रश्न होता रोजच्या खर्चाचा, म्हणजे भाजी, फळे इत्यादी. नियमित असलेली २-३ दुकाने निवडली त्यांना माझे काम व माझे पैसे कसे रोख नसतात हे समजवले व त्यांना नेट बॅन्कीग शिकवले, त्यांच्या खात्यात त्यांच्यासमोर पैसे मोबाईलद्वारे (IMPS payment) कसे येतात व तुम्हाला लगेच कसे मिळतात हे शिकवले. अगदी पान टपरीवाल्याला देखील व त्यांनी ते मान्य देखील केले कारण नवीन पध्दतीने खात्यात पैसे जमा झाल्याचा मोबाईल मासेज लगेच येतो व त्यांना कळते की ह्या व्यक्तीने पैसे दिले. दुसर्‍याला पैसे कसे द्यावे हे शिकवले, आपले पैसे, आपला पासर्वड आपला OTP कसा जपावा व का हे समजवले. हे झाले आमचे रामायण! पण गल्लीमध्ये अनेक असे होते की त्यांना हे समजणे अवघड होते. १. गेली अनेक महिने मी एक रु. देखील जास्त न घेता सर्वांची लाईट बील्स ऑनलाईन भरत होतो. त्यांना त्याचा फायदा आता पण झाला या १० दिवसामध्ये व इतर काही गोष्टीमध्ये देखील. २. गॅस बुकिंग देखील करत होतो. पण आता रक्क्म जमा करताना अडचण येत होती, कारण माझा व्यवसाय, माझे उत्त्पन व मी भरत असलेली रक्क्म यात ताळमेळ करणे अवघड गेले असते. ९ तारखे पासून मी किमान माझ्या जवळपास असलेल्या व ऑनलाईन व्यवहार करत नसलेल्या अनेकांना नेट बॅकिंग व कार्ड वापरण्याचे फायदे शिकवले, काही शिकले काही धडपडत आहेत, पण शिकत आहेत. माझ्या माहितीमध्ये असलेला एकही व्यक्ती एक ही दिवस एटीमच्या बाहेर उभा राहिला नाही गेल्या दहा दिवसात, मला वाटते हे माझे यश असावे. माझ्या हाती एवढे होते, तर एवढीच समाजसेवा करु शकलो. पुढील काही दिवस ही असेच निघून जातील. काही तासापुर्वीच एके ठिकाणी वाचले होते, तिरुपतीला १ मिनिटच्या दर्शनासाठी २४ तासाची किम्वा कधी कधी त्यापेक्शा मोठी रांग असते....! माझ्याकडे अजून ही ३४० रु आहेत. दिनांक १९-११-१६
  • Log in or register to post comments
  • 17092 views

प्रतिक्रिया

Submitted by रॉजरमूर on Wed, 12/07/2016 - 11:51

In reply to इतर कुठल्या मशीनवरुन लॉग इन by असंका

Permalink

मोबाईलवरून होतंय लॉगिन पण

मोबाईलवरून होतंय लॉगिन पण पीसी वरून नाही सॉफ्टवेअर issue असावा .
  • Log in or register to post comments

Submitted by संजय क्षीरसागर on Mon, 12/05/2016 - 18:49

In reply to तुम्ही BOI चं नेट बँकिंग by रॉजरमूर

Permalink

पुण्यात असता का ?

व्य नि करा तुम्हाला राइट पर्सनचा नंबर देतो
  • Log in or register to post comments

Submitted by रॉजरमूर on Wed, 12/07/2016 - 11:01

In reply to पुण्यात असता का ? by संजय क्षीरसागर

Permalink

व्य नि करा तुम्हाला राइट

व्य नि करा तुम्हाला राइट पर्सनचा नंबर देतो
केलाय व्यनि ....... धन्यवाद.
  • Log in or register to post comments

Submitted by संजय क्षीरसागर on Wed, 12/07/2016 - 11:08

In reply to व्य नि करा तुम्हाला राइट by रॉजरमूर

Permalink

कुठेय व्यनि ?

.
  • Log in or register to post comments

Submitted by निओ१ on Mon, 12/05/2016 - 22:22

In reply to पोस्टमधे बरीच फेकाफेकी आहे by संजय क्षीरसागर

Permalink

तुम्ही स्वतः सीए आहात असे

तुम्ही स्वतः सीए आहात असे तुमच्या प्रोफाईल मध्ये लिहले आहे, ते पाहूनच विचारतो आहे. >म्हणजे दहा दिवस घरच्यांनी काही खाल्लंच नाही ? आम्ही जेवण करतो ते पण अन्न असलेले, पैसे, रोख रक्क्म खात नाही. >यातल्या एकाही व्यावहारात कार्ड चार्जेस लागत नाहीत ? का कार्ड चार्जेस हा प्रकारच तुम्हाला माहिती नाही ? >NEFT तुमच्याकडे फ्री आहे ? का NEFT ला बँक चार्जेस पडतात याची तुम्हाला कल्पनाच नाही? तुम्ही खरच सीए आहात? >गॅस बुकींगला, ऑन लाईन पेमंट चार्जेस न लावणारी ही कंपनी कोणती आहे ? माहिती नसेल तर कसे करता हे विचारा तुम्हाला ही सांगेन. >याचा अर्थ, दहा दिवस तुमच्या ओळखीत कुणी एक रुपया सुद्धा रोखीत दिला नाही ? भ्रमात तुम्ही आहात. की रोख रक्कमे शिवाय व्यवहार होऊच शकत नाही आहे असे समजत आहे. किंवा तुमचे वय खूप जास्त झाले आहे, थोडी मदत हवी असेल तर स्प्श्ट लिहा. मी नक्की मदत करेन.
  • Log in or register to post comments

Submitted by संजय क्षीरसागर on Mon, 12/05/2016 - 23:16

In reply to तुम्ही स्वतः सीए आहात असे by निओ१

Permalink

तुमचा प्रतिसाद तुम्हाला तरी कळतो आहे का?

आम्ही जेवण करतो ते पण अन्न असलेले, पैसे, रोख रक्क्म खात नाही. बँकांच्या रांगेत उभे राहिलेले लोक, काढलेली रक्कम खातात का? दहा दिवसात भाजीपला वगैरेवर एकही रुपया रोखीनं खर्च न करायला संथारा धरली होती का? यातल्या एकाही व्यावहारात कार्ड चार्जेस लागत नाहीत ? का कार्ड चार्जेस हा प्रकारच तुम्हाला माहिती नाही ? NEFT तुमच्याकडे फ्री आहे ? का NEFT ला बँक चार्जेस पडतात याची तुम्हाला कल्पनाच नाही? याचं तुमच्याकडे उत्तर नाही. >गॅस बुकींगला, ऑन लाईन पेमंट चार्जेस न लावणारी ही कंपनी कोणती आहे ? माहिती नसेल तर कसे करता हे विचारा तुम्हाला ही सांगेन. तेच विचारतोयं. लक्षात नाही आलं का? याचा अर्थ, दहा दिवस तुमच्या ओळखीत कुणी एक रुपया सुद्धा रोखीत दिला नाही ? याचं ही उत्तर तुमच्याकडे नाही. भ्रमात तुम्ही आहात. की रोख रक्कमे शिवाय व्यवहार होऊच शकत नाही आहे असे समजत आहे. किंवा तुमचे वय खूप जास्त झाले आहे, थोडी मदत हवी असेल तर स्प्श्ट लिहा. मी नक्की मदत करेन. तुमच्या प्रतिसादावरुन तुमची विचारशक्ती लयाला गेलेली दिसतेय. असंच विचित्र आणि असंबद्ध लिहीणारा एक आयडी पूर्वी इथे होता. अशीच चमत्कारिक टोपण नांव घेऊन तो इथे वावरत असे. कंप्लीट हुकलेली केस होती. तोच प्रकट झाला असावा. यावर घालवायला माझ्याकडे वेळ नाही. इथून पुढे तुम्ही काहीही लिहा. अर्थात, संपूर्ण पोस्टच बोगस आहे हे प्रतिसादातून दाखवून दिल्याबद्दल आभार.
  • Log in or register to post comments
Profile picture for user मराठी कथालेखक

Submitted by मराठी कथालेखक on Mon, 12/05/2016 - 13:29

Permalink

आडमुठ्या दुकानदारांचे काय करणार ?

कालच पिंपरीच्या मोठ्या बाजारात एका मोठ्या दुकानात नविन मोबाईल साठी कव्हर, स्क्रीन गार्ड खरेदी केले. पण दुकानदार कार्डने वा पेटीएम ने पैसे स्वीकारण्यास तयार नव्हता. कार रस्त्यातच उभी केली असल्याने चार दुकाने फिरण्याचा वेळ नव्ह्ता. तसेही पिंपरी बाजारातील सर्व दुकानदारांची कार्यपद्धती (आणि आडमुठेपणाही) सहसा सारखाच असतो. त्यामुळे नाईलाजाने ३५० रुपये रोख खर्च करावे लागलेत. आता कुणी म्हणेल की ह्य वस्तू ऑनलाईन का नाही घेतल्या तर १) मला कव्हर हाताळून बघायचे होते, जे आवाडेल ते घ्यायचे होते. तसेही कव्हर ऑनलाईनपेक्षा निदान ५० रुपयांनी तरी स्वस्त मिळाले आहे असे मला वाटते २) मोबाईल कालच घेतला होता , स्क्रीनगार्ड लगेच लावायचा होता (म्हणजे वापरायला सुरु करण्या आधी). जिथे मोबाईल घेतला तिथे स्क्रीनगार्ड मिळाला नाही. ऑनलाईन मागवला तरी दोन-तीन दिवसानी येणार, शिवाय मला तो नीट लावता येईल याची खात्री नाही.
  • Log in or register to post comments
Profile picture for user मराठी कथालेखक

Submitted by मराठी कथालेखक on Mon, 12/05/2016 - 15:08

Permalink

मी एका IT कंपनीत काम करतो

मी एका IT कंपनीत काम करतो (स्थळ हिंजवडी) , इथे कॅन्टीनमध्ये ३ विक्रेते (vendors) आहेत. ते रोख वा सोडेक्सो कुपनांद्वारेच पैसे स्वीकारतात (त्यातही काही बाहेरील सिलबंद पदार्थांकरिता -जसे वेफर्स ई. सोडेक्सो कुपनही स्वीकारत नाहीत). सोडेक्सो कुपनची पुस्तके बाळगण्याची कटकट वाटते म्हणून मी सोडेक्सोचा पर्याय स्वीकारला नव्ह्ता (आता एप्रिलपर्यंत त्यात बदल करता येणार नाही). त्यामुळे केन्टीनमध्ये नाष्टा, किंवा ऑफिसबाहेरील टपरीवर वडापाव, चहा, सिगारेट ई साठी रोख रक्कम द्यावी लागते. दिवसाचा सुमारे ३०-४० रुपये तरी खर्च होतो.
  • Log in or register to post comments
Profile picture for user मराठी कथालेखक

Submitted by मराठी कथालेखक on Tue, 12/06/2016 - 11:50

In reply to मी एका IT कंपनीत काम करतो by मराठी कथालेखक

Permalink

इथे कुणी 'उपाय' सांगितला नाही

इथे कुणी 'उपाय' सांगितला नाही अजून !! बाकी कंपनीत अ‍ॅडमिन ग्रुपला मागच्या आठवड्यात मी याबद्दल लिहिले. त्यांनी "पेटीएम साठी विक्रेत्यांसोबत प्रयत्न करु" असे उत्तर दिलेय. पण अजून तरी या विक्रेत्यांनी काही सकारात्मक प्रतिसाद दिलाय असं दिसत नाही !!
  • Log in or register to post comments

Submitted by हतोळकरांचा प्रसाद on Tue, 12/06/2016 - 22:05

In reply to इथे कुणी 'उपाय' सांगितला नाही by मराठी कथालेखक

Permalink

आमच्या इथेही सेम प्रॉब्लेम

आमच्या इथेही सेम प्रॉब्लेम होता. फॅसिलिटी मॅनेजमेंटशी लोकांनी फॉलोअप करून सगळ्या वेंडरकडे स्वाईप मशीन आणि पेटीएम QR कोड लावून घेतले. खूप सोपं झालंय, कॅश लागतच नाही ऑफिसमध्ये, चहालासुद्धा! मी पेटीएमने करतो सहसा, एकूण 5 सेकंद लागतात :)
  • Log in or register to post comments
Profile picture for user मराठी कथालेखक

Submitted by मराठी कथालेखक on Wed, 12/07/2016 - 13:22

In reply to आमच्या इथेही सेम प्रॉब्लेम by हतोळकरांचा प्रसाद

Permalink

सोपं आहे हे मला माहितीये हो..

सोपं आहे हे मला माहितीये हो.. पण काही विक्रेत्यांना कॅशच हवी असते त्याला काय करणार. याबाबत मला काही शक्यता वाटतात त्या अशा १) सगळ्यांनीच पेटीएम ने पैसे दिलेत तर विक्रेत्यांकडे इतरांना (मुख्यतः त्यांच्या पुरवठादारांना) द्यायला रोख रक्कम मिळणार नाही अशी भिती वाटत असावी. (काही पुरवठादार पेटीएम ने पैसे स्वीकारत नसतील कदाचित) २) पेटीएम मध्ये मिळालेले पैसे बँक खात्यात ट्रान्सफर करायला पेटीएम कडून १% चार्ज आकारला जातो. नफ्याचे प्रमाण आधीच कमी असेल तर हा १% चा भुर्दंड नको वाटू शकतो. ३) हे विक्रेते कदाचित जमा झालेल्या रोख रकमेतून रोख रकमेचा काळा बाजार करत असण्याची शक्यता आहे. म्हणजे एखाद्याला दहा हजार रुपये रोख तातडीने हवे असल्यास त्याला ते द्यायचे आणि बदल्यात थोड्या अधिक रकमेचा चेक घ्यायचा. बाकी तांत्रिक अडचणी किंवा कौशल्याचा अभाव हे कारण या विक्रेत्यांच्या बाबतीत वाटत नाही...सगळे स्मार्टफोन वापरणारे आणि बर्‍यापैकी तंत्रकुशल आहेत
  • Log in or register to post comments

Submitted by संजय क्षीरसागर on Wed, 12/07/2016 - 14:16

In reply to सोपं आहे हे मला माहितीये हो.. by मराठी कथालेखक

Permalink

अर्थात , १ % कशासाठी हा प्रश्न नाही का ?

दहा हजाराचा धंदा करून एखादा पाचशे मिळवत असेल तर त्याला १०० रुपये जड नाहीत का ? शिवाय इंटरनेट चार्जसचा खर्च ही वाढतो . सरकार आपली नामुष्की , लोकांना व्यावहार लपवता येणार नाही या सबबीवर दामटतेयं, ते गैर आहे .
  • Log in or register to post comments
Profile picture for user मराठी कथालेखक

Submitted by मराठी कथालेखक on Wed, 12/07/2016 - 14:45

In reply to अर्थात , १ % कशासाठी हा प्रश्न नाही का ? by संजय क्षीरसागर

Permalink

बरोबर आहे. UPI based payment

बरोबर आहे. UPI based payment system चा प्रचार आणि प्रसार फारसा झालाच नाही , त्यामुळे पेटीएम कंपनी पैसे कमवत आहे..
  • Log in or register to post comments

Submitted by असंका on Mon, 12/05/2016 - 15:32

Permalink

लेखक कुठे असतात? कुठली गोष्ट

लेखक कुठे असतात? कुठली गोष्ट आहे ही? औषधांचं पेमेंट कार्डने?
  • Log in or register to post comments

Submitted by संजय क्षीरसागर on Mon, 12/05/2016 - 15:38

In reply to लेखक कुठे असतात? कुठली गोष्ट by असंका

Permalink

ते एखादे वेळी ओके आहे,

पण हा ज्योक भारीये! त्यांच्यासमोर पैसे मोबाईलद्वारे (IMPS payment) कसे येतात व तुम्हाला लगेच कसे मिळतात हे शिकवले. अगदी पान टपरीवाल्याला देखील व त्यांनी ते मान्य देखील केले
  • Log in or register to post comments

Submitted by असंका on Mon, 12/05/2016 - 16:01

In reply to ते एखादे वेळी ओके आहे, by संजय क्षीरसागर

Permalink

आय एम पी एस फुकट नाही. छोट्या

आय एम पी एस फुकट नाही. छोट्या पेमेंटसाठी तर चांगलाच दणका देणारं आहे.
  • Log in or register to post comments

Submitted by असंका on Mon, 12/05/2016 - 16:04

In reply to आय एम पी एस फुकट नाही. छोट्या by असंका

Permalink

पानवाल्याला आय एम पी एस मधली

पानवाल्याला आय एम पी एस मधली पुर्ण कॉमेडी मिसली हो सर...!!! पान खाउन झालं तरी पेमेंट प्रोसेस चालुच!! आणि दहा रुपयाचं पान आणि पाच रुपये अधिक सर्विस टॅक्स असे आय एम पी एस चार्जेस!!!
  • Log in or register to post comments

Submitted by पैसा on Mon, 12/05/2016 - 16:12

In reply to पानवाल्याला आय एम पी एस मधली by असंका

Permalink

बँक बदला!

आमच्या सिंडिकेट बँकेत imps पण फुकट आहे! =))
  • Log in or register to post comments

Submitted by असंका on Mon, 12/05/2016 - 16:20

In reply to बँक बदला! by पैसा

Permalink

ह्म्म..बघतो. आहे माझं अकाउंट.

ह्म्म..बघतो. आहे माझं अकाउंट. ऑनलाइन साठी रीक्वेस्ट केलेली एक नोवेंबरच्या सुमाराला. पण बहुतेक व्हायचंय अजून चालू- फॉर ओब्व्ह्युअस रीझन्स...
  • Log in or register to post comments

Submitted by पैसा on Mon, 12/05/2016 - 16:28

In reply to ह्म्म..बघतो. आहे माझं अकाउंट. by असंका

Permalink

seriously विचारा पुन्हा

२४ तासांवर वेळ लागत नाही. आता सगळेच online आहे. गाईडलाईन्स इथे बघा.
  • Log in or register to post comments

Submitted by निओ१ on Mon, 12/05/2016 - 22:24

In reply to लेखक कुठे असतात? कुठली गोष्ट by असंका

Permalink

लोकेशन महत्त्वाचे आहे, की

लोकेशन महत्त्वाचे आहे, की उगाच ? विचारावे म्हनून विचारावे म्हनून विचारात आहात ?
  • Log in or register to post comments

Submitted by असंका on Tue, 12/06/2016 - 10:07

In reply to लोकेशन महत्त्वाचे आहे, की by निओ१

Permalink

मी कोल्हापुरात रहातो. भर पेठ

मी कोल्हापुरात रहातो. भर पेठ वस्तीत. माझ्या घराजवळ कमीत कमी दहा औषध दुकाने आहेत. या दहापैकी कुणीही कार्ड स्वाइप मशीन बाळगत नाही. कोल्हापुर हे महाराष्ट्रातील एक प्रमुख शहर आहे. इथे ही परीस्थिती आहे. म्हणुन मग तुम्ही जे वर्णन करत आहात तशी परीस्थिती नक्की कुठे आहे हे मला कळत नव्हते. बहुतेक आपण सांगु शकाल असे वाटले म्हणुन विचारले. जर तुम्हाला उत्तर माहित नसेल तर नका सांगु.
  • Log in or register to post comments

Submitted by पैसा on Tue, 12/06/2016 - 10:14

In reply to मी कोल्हापुरात रहातो. भर पेठ by असंका

Permalink

त्यांचे माहीत नाही

गोव्यात अनेक ठिकाणी मिळतात. शिवाय काही ऑनलाईन साईट्स आहेत तिथे प्रिस्क्रिप्शन अपलोड करून औषधे मागवता येतात.
  • Log in or register to post comments

Submitted by असंका on Wed, 12/07/2016 - 11:26

In reply to त्यांचे माहीत नाही by पैसा

Permalink

त्यांचे माहीत नाही

त्यांचे माहीत नाही
अहो तै, तुम्हालाच काय, त्यांचं त्यांना पण माहित नाही असं दिसतंय. चोवीस तास होउन गेले तरी सांगेनात बघा.
  • Log in or register to post comments

Submitted by आनंदी गोपाळ on Mon, 12/05/2016 - 15:33

Permalink

अहो संक्षी,

कशाला जिवाला घोर लावून घेताहात? इथल्या कार्ड-घासू लोकांना फुटकळ पेमेंटसाठी १०-५-७ रुपये कापून घेतले गेलेत तर काही त्रास होत नाही. बक्कळ पैकं आहेत लोकांकडे. मोठ्या ट्रँजॅक्शनवर काय होइल त्याची यांना अजूनही कल्पना आलेली नाही. खरे साहेब रिसिविंग एण्ड ला आहेत, (कॅशलेस पैसे स्वीकारण्याच्या) पण त्यांनीही कार्ड स्वाईप मशीन अजून घेतलेले नाही. पेटीएमचा बांबू अजून त्यांना लागलेला दिसत नाही. "सेल" वाढेल तसे पेटीएम यांचे पैसे कसे कापेल ते यांच्या लक्षात येईलच. मुळात, करन्सी तयार करणे व ती चालवणे या बेसिक जबाबदारीतून सरकार पळ काढत आहे व त्याचा भुर्द़ंड दररोज प्रत्येक भारतीयास १ रुपया प्रमाणे जरी आला तरी किमान रुपये सव्वाशे कोटी रोजाचा हा घोटाळा या सरकारने केलेला आहे, हे मान्यच करायला बरेच लोक तयार नाहीत. असो. या देशाचे रूपांतर अशाच लोकांच्या नंदनवनात होण्यास थोडाच काळावधी बाकी आहे, असे म्हणतो.
  • Log in or register to post comments

Submitted by संजय क्षीरसागर on Mon, 12/05/2016 - 15:42

In reply to अहो संक्षी, by आनंदी गोपाळ

Permalink

.

पेटीएमचा बांबू अजून त्यांना लागलेला दिसत नाही. "सेल" वाढेल तसे पेटीएम यांचे पैसे कसे कापेल ते यांच्या लक्षात येईलच. हे बरोबरे!
  • Log in or register to post comments

Submitted by प्रसाद गोडबोले on Mon, 12/05/2016 - 17:01

In reply to . by संजय क्षीरसागर

Permalink

+१

+१ हे तर आहेच , शिवाय सगळे व्यवहार ऑनलाईन व्हावेत अशी अपेक्षा करताना बँका अगदी धुतल्या तांडळा सारख्या स्वच्छ असतात हे कोठे तरी हायपॉथेसीस आहेच , ह्या सगळ्या कॅशलेस देशभक्तगीरी मध्ये मधल्या मध्ये बँण्का कचकुन प्रॉफिट कमवताहेत त्याकडॅ कोणाचेच लक्श नाही. सेव्हिंग्स चे व्याजदर अगदी ७ % वर आणले पण लोन चे दर काही कमी करायला तयार नाहीत . लोन चे दर कमी करायची चौकशी केली तर रीस्ट्रकरिंग चार्जेस भरा म्हणाले. म्हणजे येन केन प्रकारेण ब्ञंकावाले पैसे छापणारच . ह्यावर्षी ब्यंकांचे अ‍ॅन्न्युअल रीपोर्ट आवरुन अभ्यासावे लागणार , कॉर्पोरेट बोनसेस आणि काँपेन्सेशन मधे दणदणीत वाढ होईल असा अंदाज आहे ! हॅ दिमोनोटायझेशन मुळे बँकांवर सरकारचे आणि सामान्य माणासाचे किती परावलंबित्व येणार आहे याचा कोणी विचार केला आहे की नाही देव जाणे. आता ह्या नंतर ह्या मेजर ब्यँकातील कोणी लेहमनचा भाऊ निघाला नाही म्हणजे मिळवली ! एकुणच हा सगळा कॅशलेस इनिशियेटीव्ह सावळा गोंधळ देशभक्तीची नशा उतरल्याशिवाय लोकांच्या लक्षात येणे कठीणच दिसते. अवांतर : मी नमोरुग्ण नाही , रादर भक्तच आहे , पण मोदीसरांचा हा निर्णय मात्र ठाम चुकला आहे असे मला वाटते!
  • Log in or register to post comments

Submitted by संजय क्षीरसागर on Mon, 12/05/2016 - 17:07

In reply to +१ by प्रसाद गोडबोले

Permalink

सेविंग्जचा व्याज दर ४ % आहे हो !

.
  • Log in or register to post comments
Profile picture for user मराठी कथालेखक

Submitted by मराठी कथालेखक on Mon, 12/05/2016 - 17:10

In reply to +१ by प्रसाद गोडबोले

Permalink

सेव्हिंग्स चे व्याजदर अगदी ७

सेव्हिंग्स चे व्याजदर अगदी ७ % वर आणले
एफ डि म्हणायचं आहे बहूधा तुम्हाला
  • Log in or register to post comments

Submitted by प्रसाद गोडबोले on Mon, 12/05/2016 - 17:42

In reply to सेव्हिंग्स चे व्याजदर अगदी ७ by मराठी कथालेखक

Permalink

हो . FD च म्हणायचे होते मला.

हो . FD च म्हणायचे होते मला. FD दर जवळपास स्र्वच्या सर्व बँकानी ८ - ८.५० वरुन ७ - ७.२५ वर आणले आहेत . एव्हन आमच्या फेवरिट पोस्टाचा मिस ने देखील हा अपडेट दिलाय From 1.10.2016, interest rates are as follows:-7.70% per annum payable monthly.
  • Log in or register to post comments

Submitted by प्रसाद गोडबोले on Wed, 12/07/2016 - 20:14

In reply to +१ by प्रसाद गोडबोले

Permalink

हा सगळा कॅशलेस इनिशियेटीव्ह

हा सगळा कॅशलेस इनिशियेटीव्ह सावळा गोंधळ देशभक्तीची नशा उतरल्याशिवाय लोकांच्या लक्षात येणे कठीणच दिसते.
हे पहा दस्तुरखुद्द आर बी आय काय म्हणत आहे ते ! कर्ज स्वस्त होणार नाही ; उलट महागाई वाढणार - आर. बी. आय. http://maharashtratimes.indiatimes.com/business/business-news/rbi-keeps-repo-rate-unchanged-at-6-25/articleshow/55853583.cms एकदा का महागाईचा दणका बसला की लोकांना भान येईल अशी आशा आहे , आणि तसे झाले तर हिंदु महासभेने म्हणल्याप्रमाणे नोटा बंदी ही मोदींच्या राजकीय कारकिर्दीच्या शेवटाची सुरुवात ठरेल !
  • Log in or register to post comments

Submitted by अभिजित - १ on Wed, 12/07/2016 - 20:23

In reply to हा सगळा कॅशलेस इनिशियेटीव्ह by प्रसाद गोडबोले

Permalink

नोटबंदी नाही पण कॅशलेस जबरदस्ती मात्र शेवटा ची सुरवात ठरेल !!

अहो किती तरी भक्त मंडळी हे पण मानत नाहीत. आज तूर डाळ घोटाळा किती महिने चालू आहे, तुम्हाला माहित असेलच. पेपर मध्ये मुंबई ग्राहक पंचायत चे लेख छापून आलेत ४ वेळा. राज्य आणि केन्द्र सरकार कशी टोलवाटोलवी करतेय याच्यावर. मी स्वतः हे काही भक्तांना दाखवले तर ते म्हणतात - जाऊ द्या हो , सरकार कुठे कुठे बघणार ? पण हाच प्रकार काँग्रेस ने केला कि मग ते मात्र एकदम करप्ट !! त्या मुळे भक्त काही जागे होणार नाहीत.
  • Log in or register to post comments

Submitted by संजय क्षीरसागर on Mon, 12/05/2016 - 17:04

In reply to . by संजय क्षीरसागर

Permalink

आणि रिसिवींग एंड हे सुध्दा बरोबरे

त्यांनी सेलर्स पेटीएम डाऊनलोड केलं आहे म्हणजे आलेले पैसे पेटीएमच्या ताब्यात आहेत.
  • Log in or register to post comments

Submitted by रॉजरमूर on Mon, 12/05/2016 - 17:57

In reply to अहो संक्षी, by आनंदी गोपाळ

Permalink

वाचलं नाहीत का ?

वाचलं नाहीत का ?
पेटीएमचा बांबू अजून त्यांना लागलेला दिसत नाही. "
बसलाय त्यांना बांबू ५०० रुपयांचा
  • Log in or register to post comments

Submitted by अभिजित - १ on Mon, 12/05/2016 - 19:54

In reply to वाचलं नाहीत का ? by रॉजरमूर

Permalink

२०१४ मध्ये वृषाली ला पेटिम ने कसे फसवले ४३ हजार रु फक्त .

याची स्टोरी - http://www.misalpav.com/node/28680 बहुतेक सगळे वेल सेटल्ड (!!) लोक "आपल्या " पक्ष करता / "आपल्या" मानस करता कोणताही त्याग करायच्या तयारीत आहे. समजा २०१९ मध्ये दुसरे कोणी आले सत्तेवर , तर ते लोक हा incentive सोडणार नाहीत. त्याचा विचार काहीच नाही करत हे अंधभक्त . आत्ता सरकार जो कर जमा करते त्याचे काय रिटर्न्स जनतेला मिळत आहेत ? ते आधी सुधारा , मग नवीन कर लावा ..
  • Log in or register to post comments
Profile picture for user महेन्द्र ढवाण

Submitted by महेन्द्र ढवाण on Mon, 12/05/2016 - 17:54

Permalink

चांगले काम केलेत! धन्यवाद!

चांगले काम केलेत! धन्यवाद!
  • Log in or register to post comments
Profile picture for user मराठी कथालेखक

Submitted by मराठी कथालेखक on Mon, 12/05/2016 - 18:47

Permalink

मी ही paytm वापरतोच, तरी

मी ही paytm वापरतोच, तरी म्हणेन paytm हे योग्य solution नाहीच. paytm ची monopoly होणं घातकच ठरेल. UPI based ewallet चा प्रचार आणि प्रसार नीट न झाल्याने सध्या paytm ला शरण जाण्यावाचून पर्याय नाही.
  • Log in or register to post comments

Submitted by अभिजित - १ on Mon, 12/05/2016 - 20:29

Permalink

घ्या डॉक्टर खरे

काँग्रेस ने लोकांना सगळे फुकट खायची सवय लावली आहे हा तुमचा नेहमीचा / अतिशय आवडीचा प्रतिसाद असतो ... भाजप पण आता तेच करत आहे गोवा मध्ये . http://www.loksatta.com/desh-videsh-news/free-internet-data-talktime-for-goa-youth-from-bjp-government-1354711/ अर्थात तुम्ही कितपत मान्य कराल शंकाच आहे. कारण काँग्रेस ने केले कि चूक पण तेच भाजप ने केले कि बरोबर, असा तुमचा दृष्टिकोन आहे. बाकी पेटीम वरून पण इथे कल्लोळ उठला आहे. वाचला का तुम्ही ? अजून सुपात आहात तुम्ही. म्हणून पेटीम चे समर्थन करत असता ..
  • Log in or register to post comments

Submitted by आनंदी गोपाळ on Mon, 12/05/2016 - 21:23

Permalink

घ्या!

लोकं "कॅशलेस" व्हायला लागलीत. http://m.hindustantimes.com/mumbai-news/rbi-needs-to-consider-issue-of-paying-salary-to-teachers-in-maharashtra-says-bombay-high-court/story-BhuhqUHP6CmyeMGHJJzDVO.html सहकारी बँकांना नोटाबंदीतून वगळल्याने शिक्षकांचे पगार थकले. कंपन्यांमधून नोकरकपात सुरू झाली. लोकंहो, आपापली कार्डे पेटीएमे सांभाळा. बिनाकार्ड/पेटीएम वाले कुणी संतापात ते हिसकावून पळून गेलं तर काय होईल? * बाकी टेररिस्ट लोकांची चांगली सोय झाली. डीजिटल व आयटी सॅव्ही भारताच्या सरकारी साईट्स हॅक करणे किती सोपे आहे, हे सर्वज्ञात आहेच. ३५ लाख वगैरे डेबिट कार्डं ऑक्टोबरात हॅकली होती ना? मज्जाय कार्डं घासणार्‍यांची..
  • Log in or register to post comments

Submitted by डोके.डी.डी. on Mon, 12/05/2016 - 22:42

Permalink

Anubhav

मी मागील 3 वर्षांपासून नेटबँकिंग paytm mobikwik वापरतोय नेट बँकिंग सुद्धा boi sbi maharashtra bank icici एवढ्या बँकांची आहे. महाराष्ट्र बँकेत सुद्धा imps neft कितीही वेळा केलं तरी फ्री आहे. Light bill sbi वरून भरतो ऑटो पे आहे त्यामुळे नो प्रॉब्लेम. बाकी mobikwik हे wallet पैसे ट्रँस्फर फ्री देत आहे सध्या. माझे बँक ऑफ इंडिया नेट बँकिंग व्यवस्थित चालत आहे
  • Log in or register to post comments

Submitted by पिलीयन रायडर on Tue, 12/06/2016 - 02:54

Permalink

मी एच.डी.एफ.सी मधुन नेट

मी एच.डी.एफ.सी मधुन नेट बॅंकिंग वापरते. वीजबील, दुसर्‍या खात्यात पैसे टाकणे, इतर ऑनलाईन पेमेंट्स असे बरेच. फ्री आहे. पेट्रोल सुद्धा कार्ड्ने भरते. सरचार्ज पडतो आणि २-३ दिवसात परत रिफंड होतो. कॅश नसती तर मी किराणा तसाही महिन्याच्या पेमेंटने आणते. तिथे भाजीही मिळते. पण बिग बास्केट आणि तत्सम अ‍ॅपचा माझा अनुभव उत्तम आहे. दुध सुद्धा किराणाच्या दुकानातुनच येते. मॉल्स मध्ये प्रश्न नाही, पण ९०% दुकानात मी कार्ड पेमेंट करते. फार क्वचित २% चार्ज पडला. तेव्हा तुम्ही म्हणताय ते शक्य आहे. रोज होणारे व्यवहार कॅशलेस होऊ शकतात. पण अचानाक काही बारिक सारिक खरेदी रस्त्यावर केली तर कसे ते माहित नाही. जे देश आधीच कॅशलेस आहेत, ते डेटा सिक्युरिटी कधी हॅण्डल करतात?
  • Log in or register to post comments

Submitted by पिजा on Tue, 12/06/2016 - 22:37

In reply to मी एच.डी.एफ.सी मधुन नेट by पिलीयन रायडर

Permalink

HDFC नेट बँकिंग

तुमचं अकाउंट प्रिव्हिलेज बँकिंग वगैरे मध्ये मोडतं का? कारण मला NEFT ला चार्जेस पडतात. http://www.hdfcbank.com/personal/making-payments/fund-transfer/emonies-national-electronic-funds-transfer
  • Log in or register to post comments
Profile picture for user मराठी कथालेखक

Submitted by मराठी कथालेखक on Wed, 12/07/2016 - 11:23

In reply to HDFC नेट बँकिंग by पिजा

Permalink

SBI मध्ये NEFT ला चार्जेस

SBI मध्ये NEFT ला चार्जेस पडतात
  • Log in or register to post comments

Submitted by विशुमित on Tue, 12/06/2016 - 13:04

Permalink

कॅशलेस...

दोन आखोदेखी उदाहरणं, कृपया लगेच देश द्रोही ठरवू नका. एक: पर्वा आत्याला सावडून (तिसरा) पंढरपूर वरून पुण्याला एस टी ने येत होतो. कंडक्टर कडे स्वॅप मशीन नव्हते (महामंडळाकडे स्वॅप मशीन नाहीच आहे). रोख पैसे देऊन तिकीट काढले. त्याच्या मागील सीटवर तोंडावर रुमाल टाकून हुश्श करून बसलो. गाडी चालू झाली, नातेपुतेला एक तरुण गाडीत चढला. कंडक्टरने तिकिटाचे पैसे मागितले तर म्हणाला रु.४० कमी आहेत, डेबिट कार्ड आहे, स्वॅप करा. साहजिकच कंडक्टर ने स्वॅप मशीन नाही म्हणून हात वर केले त्याला पुढच्या स्टोपवर उतरायला सांगितले. याने तो तरुण इतका बिथरला की त्याने मोदीजींना आयामायावरून २-४ शिव्या हासडल्या. हे पाहून एक मोदी समर्थक प्रवासी खवळून उठला आणि नोट बंदी, काळा पैसा, मागील ६० वर्षातील त्रास इतर ज्ञानामृत पाजू लागला. याने तो दुष्काळी गडी अजूनच खवळला. मोदी समर्थकाच्या बायकोने आपल्या नवऱ्याला हाताला धरून खाली बसवले आणि म्हणाली बास झाला तुमचं "मोदींपुराण". मला नाही राहवलं, कंडक्टरला १० च्या ४ नोटा दिल्या(मेहवण्याची पुण्याई) आणि तिकीट द्याला सांगितले. तरुण माझ्या जवळ येऊन बसला. तरुणाने त्याच्या आई ने त्याला दिलेली १ पपई मला देऊ केली. मनात आले अजूनही खऱ्याची दुनिया आहे. दोन: काल गावातील बडोदा बँकेत पत्नीचे नवीन पास बुक अपडेट करायला गेलो होतो. बँकेत अगोदरच भल्यामोठ्या ४ ओळी होत्या. मला बाहेरील पास बुक प्रिंटिंग मशीन मधून प्रिंट काढायला सांगितले. तांत्रिक कारणामुळे प्रिंट नाही निघाली. मी पुन्हा बँक कर्मचाऱ्याकडे गेलो, ते म्हणाले प्रिंट सारख्या शुल्लक कारणासाठी सारखे सारखे येऊ नका, पैश्यासाठी गर्दी दिसत नाही का? गर्दी पाहून मी पण मान खाली घालून निघालो. जाता जाता गर्दीतल्या एकाला विचारले किती पैसे मिळातातय खात्यातून? त्याचे उत्तर १ हजार. बँक कर्मचारी तिकडून-PDC वाले तर रु. ५०० च देतायतय. आमच्या मेहवण्याची पुण्याई पुन्हा आठवली.
  • Log in or register to post comments

Submitted by संजय क्षीरसागर on Tue, 12/06/2016 - 13:09

In reply to कॅशलेस... by विशुमित

Permalink

कृपया लगेच देशद्रोही ठरवू नका !

हे आवडलं !
  • Log in or register to post comments

Submitted by धनावडे on Wed, 12/07/2016 - 11:40

In reply to कॅशलेस... by विशुमित

Permalink

अजूण एवढे कमी पैसे मिळतात

अजूण एवढे कमी पैसे मिळतात काहीही मला काल २०००० हजार मिळाले गर्दी असून तेही वाई सारख्या छोट्या शहरात.
  • Log in or register to post comments

Submitted by विशुमित on Wed, 12/07/2016 - 14:13

In reply to अजूण एवढे कमी पैसे मिळतात by धनावडे

Permalink

साहेब आमचे शहर नाही हो, गाव

साहेब आमचे शहर नाही हो, गाव आहे.... आजू बाजूच्या ६-७ गावं मिळून बडोदा आणि PDC अशा फक्त २ च बँका आहेत. त्यात PDC मध्ये सर्व ऊस सभासदांचे खाती आहेत. आणि वाई शहराला मी चांगले ओळखतो. नुसते चौका चौकात कट्टे करून बसलेल्या पोरांच्या घोळक्यांचे शहर बाकी तुमचा विश्वास फक्त पेटीएम करणाऱ्यांवरच आहे म्हंटल्यावर आमच्या सारख्यांवर तुम्ही कसे विश्वास ठेवणार म्हणा..!! जाऊ द्या
  • Log in or register to post comments

Submitted by धनावडे on Wed, 12/07/2016 - 15:53

In reply to साहेब आमचे शहर नाही हो, गाव by विशुमित

Permalink

साहेब पेटिऐम मीही वापरत नाही

साहेब पेटिऐम मीही वापरत नाही आणि वापरणार पण नाही कॅशलेशच्या चर्चेत मी पडत ही नाही पण अजून १००० च मिळतात अस फेकू तरी नका.
  • Log in or register to post comments

Submitted by विशुमित on Wed, 12/07/2016 - 16:37

In reply to साहेब पेटिऐम मीही वापरत नाही by धनावडे

Permalink

तुम्हाला रु.२०००० मिळाले यावर

तुम्हाला रु.२०००० मिळाले यावर मी अविश्वास दाखवला का? तुम्ही मला, माझ्या गावाला, माझ्या गावातील बँकेला न ओळखता, मला फेकू कसे काय म्हणू शकता? का फक्त नोट बंदीला विरोध दर्शिवला म्हणून? (माझा विरोध किंवा समर्थन नाहीच आहे नोट बंदीला, फक्त यामुळे निर्माण झालेल्या समस्या आणि त्याचा आऊटपुट काय असेल याबद्दल अजून ही साशंक आहे) साताऱ्यामध्ये आजच माझ्या मित्राला ऍक्सिस बँकेतून एकरकमी रु. १९,००० मिळाले, त्या पण २०००, १००, २०, आणि १० च्या नोटा. सगळी कडे सारखी च परिस्थिती नाहीय, कृपया एवढे ध्यानात घ्या.
  • Log in or register to post comments

Submitted by विशुमित on Wed, 12/07/2016 - 16:49

In reply to तुम्हाला रु.२०००० मिळाले यावर by विशुमित

Permalink

आणि हो बँकेतून किती पैसे

आणि हो बँकेतून किती पैसे मिळतात हा माझा मुद्दा नव्हताच, पासबुकचे प्रिंट काढणे याला नोटबंदी पुढे शुल्लक ठरवले म्हणून माझा रोष होता. मला माझ्या पत्नीचे पासपोर्ट काढण्यासाठी लागणारे रहिवासी दाखला म्ह्णून बँकेचे पासबुक सादर करायचे होते पण ती प्रिंट न मिळाल्यामुळे तूर्तास ते लांबणीवर पडले. असो नोटबंदी समोर माझा हा प्रश्न तसा शुल्लकच आहे.
  • Log in or register to post comments

Pagination

  • First page « First
  • Previous page ‹ Previous
  • पान 1
  • पान 2
  • पान 3
  • Next page Next ›
  • Last page Last »

प्रवेश करा

  • नवीन खाते बनवा
  • Reset your password

© 2026 Misalpav.com