ब्लॉग दुवा
आज एका अंध माणसाचा हात धरून त्याला बस स्टॉपपर्यंत जायला मदत केली, बसमधे बसवून दिलं.
हे सांगणं खरंच आवडलं नाही
पण सांगितल्याशिवाय राहवलं नाही
तोच तो प्रवाह तोच तो जमाव
आयुष्य नावाचा धावता बनाव
त्यात एक काठी माझ्या बाजूने वाट शोधत चालत होती
वाटेवरची अवघी गर्दी काठीला त्या टाळत होती
'टक टक' काठीच्या त्या आवाजाची राखण होती
'काय मंदासारखे चालतात लोक' ही अनेकांची अडचण होती
'कुठे जायचंय काका?' आपसुक प्रश्न केला मी
'प्लाझा' म्हणाले आणि त्यांचा लगेच हात धरला मी
गेलेही असते आपले आपण, त्यांना नव्हती भीड त्याची
वाटही साधी कुणी न द्यावी, मला आली चीड त्याची
मी केलेल्या मदतीचं, कौतुक खरंच वाटलं नाही
इतर कुणीच हे न करावं, हे खरं तर पटलं नाही
प्रत्येकाच्या संवेदना वाटल्या झाल्या बंद तिथे
गर्दीमधली अडचण झालो, मीही ठरलो मंद तिथे
'शिकले सवरले असे वागतात, उसंत नसते क्षणाचीही'
ते काका म्हणती हतबलतेने, 'पर्वा नसते कुणाचीही'
'आपण काळजी घेतली नाही तर व्हायचं जे, ते टळत नाही'
'अपंगत्वाचं दु:ख काय ते, धडधाकटांना कळत नाही'
'दोन मिनिटांनी बिघडतं काय, ट्रेन सुटली तर अडतं काय'
'बातम्या वाचून हैराण होतो, कुणी लोटतं काय, कुणी पडतं काय'
'कमीच मिळते मदत अशी, बहुतेक कुणाला जाणही नसते'
'अंगावरती पायही देतील, माणुसकीचे भानही नसते'
थँक यू म्हणत, बसमधल्या गर्दीत काठी ती लपली
समाधान माझे, माणुसकी माझ्यापुरती मी जपली
काव्यरस
वाचने
2643
प्रतिक्रिया
15
मिसळपाव
प्रतिक्रिया
छान !
धन्यवाद शार्दुल
In reply to छान ! by शार्दुल_हातोळकर
परवा तलावपाळीला एक कप
हे अनुभव मलाही आलेत. तिथे
In reply to परवा तलावपाळीला एक कप by किसन शिंदे
हे अनुभव मलाही आले आहेत.
In reply to हे अनुभव मलाही आलेत. तिथे by वेल्लाभट
बुवा
In reply to हे अनुभव मलाही आले आहेत. by ज्ञानोबाचे पैजार
छान....
कुणीतरी अजूनही असा विचार करत
सर्वांना धन्यवाद देतो.
+१
In reply to सर्वांना धन्यवाद देतो. by वेल्लाभट
+१०००
छान
वा!
In reply to छान by मंजूताई
अतिशय स्तुत्य काम! :) कौतुक
In reply to छान by मंजूताई
शिकलेले अडाणी लै झालेत आजकाल.........