यकु
यकु गेला.
इथल्या अनेकांशी बोलून, भांडून, मनात येईल ते येईल तेव्हा बेधडक सांगून.
मैत्री करून. पंगे घेऊन. शाब्दिक हाणामार्या करून. म्हणतात तसं, एक तर आपण त्याचे मित्र झालो, किंवा शत्रू; पण त्याच्याकडे दुर्लक्ष करणं शक्य नव्हतं.
यकु गेला.
अनेक अर्धवट गोष्टी मागे ठेवून. अनेक प्रश्न घालून. एका अत्यंत बुद्धीमान माणसाचं हे असं का व्हावं हे त्यातलं सगळ्यात मोठा प्रश्न.
अखेरीस त्याच्या मनात काय होत होतं हे आता नीटसं कधीच कळायचं नाही. त्याचे अलीकडचे विचार ऐकून, त्याच्याशी बोलताना नेहमीच याचा हा असा काहीतरी शेवट असेल हेच वाटत राहायचं. ते तसं होऊ नये, यासाठी कोणालाही काही करायलाही वाव न ठेवता, प्रचंड अस्वस्थ करून यकु गेला.
गेलाच.
काय केलंस यकु? राग येतो आहे तुझा. खूप राग येतो आहे.
वर्गीकरण
प्रतिक्रिया
.
आज यकु ची खूप आठवण येत आहे ..
:(
नम्र विनंती
दिवाळीत हा कसा न कसा आठवतोच.
कोणीही गेलं की दुःख तर होणारच
कोणीही गेलं की दुःख तर होणारच, भले भले मिपाकर काळाच्या पडद्याआड गेले, पण अफलातून व्यक्तिमत्व या बिरुदाला पात्र मिपाकराची अशोभनिय एगझिट ही खरी दुर्मिळात दुर्मिळ म्हणूनच अत्यन्त ठळक बाब. एक जाणता मिपाकर म्हणून कोणी कसे असू नये याचे उदाहरण म्हणून तरी त्याची आठवण कोणी का विसरावी ?यकु म्हटलं कि मिपाचे जुने