Skip to main content

यकु

लेखक इनिगोय यांनी सोमवार, 19/11/2012 21:07 या दिवशी प्रकाशित केले.
यकु गेला. इथल्या अनेकांशी बोलून, भांडून, मनात येईल ते येईल तेव्हा बेधडक सांगून. मैत्री करून. पंगे घेऊन. शाब्दिक हाणामार्‍या करून. म्हणतात तसं, एक तर आपण त्याचे मित्र झालो, किंवा शत्रू; पण त्याच्याकडे दुर्लक्ष करणं शक्य नव्हतं. यकु गेला. अनेक अर्धवट गोष्टी मागे ठेवून. अनेक प्रश्न घालून. एका अत्यंत बुद्धीमान माणसाचं हे असं का व्हावं हे त्यातलं सगळ्यात मोठा प्रश्न. अखेरीस त्याच्या मनात काय होत होतं हे आता नीटसं कधीच कळायचं नाही. त्याचे अलीकडचे विचार ऐकून, त्याच्याशी बोलताना नेहमीच याचा हा असा काहीतरी शेवट असेल हेच वाटत राहायचं. ते तसं होऊ नये, यासाठी कोणालाही काही करायलाही वाव न ठेवता, प्रचंड अस्वस्थ करून यकु गेला. गेलाच. काय केलंस यकु? राग येतो आहे तुझा. खूप राग येतो आहे.
लेखनविषय:
लेखनप्रकार

वाचने 42469
प्रतिक्रिया 157

प्रतिक्रिया

अतिशय धक्कादायक बातमी.. एकदोनदा इथेच त्याच्याशी एकास एक बोलन झालेल, त्याने इंदोरला आलो की भेटायच आग्रहाच आमंत्रणही दिलेल.. पुढच्या सगळ्याच घडामोडी फार वीचित्र होत्या.. काय बोलावं.. खरच फार वाइट वाटतय..

मन सुन्न झालंय ही बातमी ऐकून. मृतात्म्यास सद्गती लाभो.

कालच मला ही बातमी समजली, सध्या मा़झ्या मिस्टरांना बरे नाहीये, त्यामुळे इथे येणे जमत नाहीये.... खूप वाईट वाटले, धक्काच बसला.......

विश्वासच बसत नाहीये. काय लिहावं हे ही कळत नाहिये धड

बातमी वाईट आहे पण अनपेक्षित नाही. यावेळी अ‍ॅज अ ग्रूप कमी पडलो आपण. निदान यापुढे कुणी असं टोकाचं लिहू लागलं तर हा रेफरंस लक्षात घेऊन आपापसात त्याचं बरोबर असेलही असे वाद घालण्यापेक्षा त्या व्यक्तीला समजावता येईल. कितीदातरी यकु चुकीच्या वाटेवर चाललाय हे ओळखलेल्या आयड्यानि त्याला समजावयाचा प्रयत्न केलाय. प्रत्येक वेळी काही विशिष्ट लोकानी त्याच्या सो कॉल्ड अध्यत्मिकतेचे दावे करत उलट समजावणार्याना खडसावलंय. त्याच्या आईवडिलांपेक्षा आपण त्याला जवळ होतो असं निदान त्याच्या लिखाणावरून वाटतं.त्याची मानसिक आंदोलने आपण जास्त जवळुन अनुभवलियत. तरिही आपण आपले कर्तव्य योग्य रीतीने पार पाडू शकलो नाही हेच खरे.

फारच धक्कादायक बातमी आज मला एका मिपाकराकडून मिळाली. मी ह्या परवाच्या ४ डिसेंबरपासुनच अनपेक्षितपणे यकुंचे साहित्य वाचायला लागले होते. लिखाणातुन त्यांच्या लेखनसामर्थ्याची कल्पना येवु लागली म्हणून त्यांनी आणखी लेखन करत रहावे म्हणून शुभेच्छाही दिल्या होत्या. मिपाने यकुंचे साहित्य वाचणासाठी ठेवावे अशी विनंती करते.एक मिपाकर ह्या नात्याने यकुंना मनःपुर्वक श्रध्दांजली.

यकुंना श्रद्धांजली! मला आजच कळले. मध्ये मिपावर यायला सवडच नाही मिळाली. एक तुफानी व्यक्तिमत्व हरवले. खूप दु:खद... --समीर

.

आज यकु ची खूप आठवण येत आहे .. तो जायच्या आधी १ / २ महीन्यापूर्वीच भेट झाली होती .. प्रचंड अस्वस्थ होता.. आठवण येत आहे ..

हे असले धागे पुन्हा वरती काढत जाऊ नका रे! खुप त्रास होतो हा धागा वाचल्यावर. संपादक मंडळ, साहित्य संपादक मंडळ, हा धागा त्वरित आणि कायमचा वाचनमात्र करा.

In reply to by इनिगोय

कोणीही गेलं की दुःख तर होणारच, भले भले मिपाकर काळाच्या पडद्याआड गेले, पण अफलातून व्यक्तिमत्व या बिरुदाला पात्र मिपाकराची अशोभनिय एगझिट ही खरी दुर्मिळात दुर्मिळ म्हणूनच अत्यन्त ठळक बाब. एक जाणता मिपाकर म्हणून कोणी कसे असू नये याचे उदाहरण म्हणून तरी त्याची आठवण कोणी का विसरावी ?