आजकाल...
सकाळी उठल्यावर आवराआवर ही सगळ्यांची नित्याची सवय. मग office, collage, शाळा, काम, इत्यादी गोष्टींसाठी धावणे सुरु होते. ह्या सगळ्या व्यापात दिवस कसा जातो हे काळतच नाही. थकुन भागुन घरी आल्यावर घरची कामे, कर्त्तव्य हयात वेळ जातो. मग तोपर्यंत रात्रीच्या जेवाणाची वेळ होते. उरला सुरला वेळ हा tv पाहण्यात जातो. मग तोपर्यंत उद्याची तयारी bag अवरुन ठेवणे, कपड़े इस्त्री करून ठेवणे, इत्यादि... तोपर्यंत झोपायाचि वेळ येतेच् मग काय झोपा. सकाळ झाली की परत तेच चालू... असे दिवसा मागे दिवस निघुन जातात. ह्या सगळ्यात आपण स्वतःसाठी जगायाच विसरुनच जातो.
आजकाल स्वतःसाठी जगण सगळे विसरलेत बहुतेक. कारण आता timepass करायला नविन खेळण आलय प्रत्येकाकडे.... smartphone... social network, mobile games, whats app.. सगळ्याच गोष्टी त्यात... आजकाल आपल्या आयुष्यात काय चालले आहे हे सगळ्यांना social network वरच कळते. भेटी गाठी तश्या कमी झाल्यात. कारण सगळेच आजकाल फार busy.
प्रत्येकजण जर आजकाल शोधतो ती म्हणजे शांतता.... खरच आहेका आपल्या आयुष्यात शांतता..??? आयुष्य आणि त्यातला आनंद हा पाण्यात मीठ जस वीरघळाव तसा हरवून गेलाय. आपण लहानपणी फार छोट्या छोट्या गोष्टींमधुन आनंद मिळवयचो नाहीका? जस जस मोठ होत जातो तश्या जवाबदारयाचं ओझ वाढतच जात. ते ओझ कधी कालांतराने बोझ होत हे काळतहि नाही.
प्रत्येकजण आपल्या स्वतःच्या विश्वात हरवलेला असतो. स्वतःला काय हवय आणि नाको. जस जस दिवस जात आहेत तस तस प्रत्येक गोष्टींमधली स्पर्धा वाढतच चलली आहे. आणि ती वाढतच राहील. आपल्याला ह्या fast local ची सवय नाही. त्यामुळे आपण यात कुठेतरी माग पडतोय, असा प्रत्येकाचा समज त्यामुळे रोज प्रत्येक जण अजुन जोरात धावायचा प्रयत्न करतो. कधी पडतो, अड़खळतो, सावरतो आणि परत तेच करतो.
हे सगळ करण्यात दिवस पटापट जातात... ह्या सगळ्यात स्वतःला एक प्रश्न विचारुंन बाघा आपण स्वतःसाठी किती जगलो.??? पैसा कमवला prestige मिळवला... पण ह्या सगळ्यात आपण जगणच विसरलोकि...
आपल्याला काय हव काय नाको
ह्यासाठी पैसा कमवयला गेलो
ह्या सगळ्यात शांतता गेली आस्था गेली
ह्या दुन्यदारीने माझ्या जगण्यातलि मजाच ओढून नेली....
प्रतिक्रिया
अगदी बरोबर आहे,
खरंय
मार्गदर्शक बोधवाक्य
>>>आपण लहानपणी फार छोट्या
घर ते ऑफिस यातला वेळ कमी झाला
खरंय..
'आजकाल' असा कोणताही मराठी
बाकी लेख उगाच सरसकटी करण
किती धावायचं आणि कुठे
आजकाल...