✍ मराठी साहित्य, संस्कृती आणि लेखनाचे व्यासपीठ
प्रवेश करा | सदस्य व्हा
मिसळपाव
मिसळपाव मराठी साहित्य

Main navigation

  • मुख्य पान
  • नवे लेखन
  • पाककृती
  • कविता
  • भटकंती

मंटो च्या लघुकथा ३ : बेखबरी का फायदा

म
महासंग्राम यांनी
Mon, 11/21/2016 - 17:18  ·  लेख
लेख
 बेखबरी का फायदा मूळ लेखक : स़आदत हसन मन्टो. १९१२-१९५५ ------------------------------------------------------------------------------------------- खटका दबला : बंदुकीतून गोळी बाहेर पडली. खिडकीतून बाहेर पाहणारा माणूस जागेवरच आडवा झाला. थोड्या वेळाने खटका पुन्हा दबला : बंदुकीतून दुसरी गोळी बाहेर पडली. तो रस्त्यावर पडला, आणि त्याचं रक्त रस्त्यावर वहायला लागलं. तिसऱ्यांदा खटका दबला. नेम चुकला, गोळी एका ओल्या भिंतीत मिसळून गेली. चौथी गोळी एका म्हाताऱ्या स्त्रीच्या पाठीत लागली, ती ओरडू सुद्धा शकली नाही आणि तिथेच मरून पडली. पाचवी आणि सहावी गोळी बेकार गेली, कोणी मेलं नाही आणि जखमी सुद्धा. गोळ्या चालवणारा गोंधळून गेला. मोकळ्या रस्त्यावर एक लहान मुलगा धावतांना दिसला. गोळ्या चालवणार्याने बंदुकीच तोंड त्याच्याकडे वळवलं. त्याचा साथीदार म्हणाला, " हे काय करतो आहे ?" गोळी चालवण्यार्याने विचारलं " का ?" "बंदुकीच्या गोळ्या तर संपलेल्या आहेत !" "तू चूप रहा... एवढयाश्या मुलाला काय माहित पडणार?"

Book traversal links for मंटो च्या लघुकथा ३ : बेखबरी का फायदा

  • ‹ मंटो च्या लघुकथा २ : कम्युनिजम
  • Up
  • मंटोच्या लघुकथा ४ : मुनासिब कार्रवाई ›
वर्गीकरण
लेखनविषय (Tags)
हे ठिकाण
लेखनप्रकार (Writing Type)
आस्वाद
भाषांतर

प्रतिक्रिया द्या
7307 वाचन

💬 प्रतिसाद (14)

प्रतिक्रिया

मंटोच्या कथा पटकन समजत नाहीत.

एस
Mon, 11/21/2016 - 17:22 नवीन
मंटोच्या कथा पटकन समजत नाहीत.
  • Log in or register to post comments

जबरदस्त आणि आवडत्या लेखकांपैकी एक मंटो

वरुण मोहिते
Mon, 11/21/2016 - 18:35 नवीन
लिहीत राहा . सध्या नवीन बॉम्बे स्टोरीज म्हणून पण मंटो च पुस्तक पुन्हा प्रकाशित झालंय.चांगला आहे जरूर वाचा .
  • Log in or register to post comments

मलाही समजली नाहीये पुर्ण.. पण

पिलीयन रायडर
Mon, 11/21/2016 - 19:46 नवीन
मलाही समजली नाहीये पुर्ण.. पण तुम्ही मांडलय अगदी ओघवतं! कुठेही अडखळायला झालं नाही..
  • Log in or register to post comments

मंटोच्या कथा पटकन समजत नाहीत.

महासंग्राम
Mon, 11/21/2016 - 20:05 नवीन
मंटोच्या कथा पटकन समजत नाहीत.
मला जसं समजलं तसं मंटोने जे काही लिहिलं आहे, त्याला बराच काळ होवून गेला आहे. तेव्हाचे आणि आताचे प्रश्न जरी सारखे असले तरी थोडा फरक पडू शकतो. पण, त्याकाळाशी जुळवून घेऊन विचार केला तर कथेचा आशय लगेच लक्षात येतो. आणि दुसरं म्हणजे त्याला काय म्हणायचं आहे, ते तो कथेच्या शेवटी मांडतो. इथे या कथेला फाळणीची पार्श्वभूमी आहे. यावर जयंत काका जास्त अधिकारवाणीने बोलू शकतील असे वाटते.
  • Log in or register to post comments

जबरदस्त कथा!

आनंद
Mon, 11/21/2016 - 20:20 नवीन
जबरदस्त कथा! त्या लहान मुलावर बंदुक ताणली आहे त्यात गोळी असो व नसो. इतक्या कमी शब्दात वाचकला उद्धवस्त करण्याच मंटोच कसब भारीच!
  • Log in or register to post comments

सादत हसन मंटो

कैलासवासी सोन्याबापु
Tue, 11/22/2016 - 07:10 नवीन
सादत हसन मंटो ______/\_______ हा माणूस मनुष्य नामे प्राण्याला नागडं करून त्यातले जनावर उद्धृत करतो.
  • Log in or register to post comments

उत्तम रुपांतर

सुबक ठेंगणी
गुरुवार, 11/24/2016 - 15:33 नवीन
हा माणूस मनुष्य नामे प्राण्याला नागडं करून त्यातले जनावर उद्धृत करतो.
तितकंच उत्तम विश्लेषण. एका माणसाची आपल्याहून निर्बळ माणसावर दहशत निर्माण करण्याची, टाचेखाली ठेवण्याची (मग बंदूक रिकामी का असेना!) वृत्ती इथे दिसते आहे.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: कैलासवासी सोन्याबापु

___/\___जबरदस्त!

पद्मावति
गुरुवार, 11/24/2016 - 15:39 नवीन
___/\___जबरदस्त!
  • Log in or register to post comments

वाचतोय.

jp_pankaj
गुरुवार, 11/24/2016 - 15:55 नवीन
वाचतोय.
  • Log in or register to post comments

गोळी असती तरी त्याने तेच केले

मराठी_माणूस
गुरुवार, 11/24/2016 - 16:03 नवीन
गोळी असती तरी त्याने तेच केले असते हे गृहीतक आहे असे वाटते.
  • Log in or register to post comments

उत्तम अनुवाद.

प्रचेतस
गुरुवार, 11/24/2016 - 17:59 नवीन
उत्तम अनुवाद. मंटो जे काही वाचलं ते मिपावरच. आवडलं किंवा नाही आवडलं ते सांगता येणार नाही पण लिखाण वेगळं आहेच. अवांतर: ली चाईल्डच्या वन शॉटची सुरुवात काहीशी अशीच आहे.
  • Log in or register to post comments

उत्तम

प्रा.डॉ.दिलीप बिरुटे
Sat, 11/26/2016 - 11:52 नवीन
वाचतोय. -दिलीप बिरुटे
  • Log in or register to post comments

www.rekhta.org

इनू
Sun, 11/27/2016 - 11:20 नवीन
www.rekhta.org या संकेतस्थळावर मंटोच्या कथा आहेत.
  • Log in or register to post comments

देवा!

पैसा
Mon, 12/05/2016 - 12:18 नवीन
देवा!
  • Log in or register to post comments

लेखन करा

लेखन करा

मिसळपाव वर स्वागत आहे.

प्रवेश करा

  • नवीन खाते बनवा
  • Reset your password
मिसळपाव.कॉम बद्दल
  • 1आम्ही कोण?
  • 2Disclaimer
  • 3Privacy Policy
नवीन सदस्यांकरीता
  • 1सदस्य व्हा
  • 2नेहमीचे प्रश्न व उत्तरे
लेखकांसाठी
  • 1लेखकांसाठी मार्गदर्शन उपलब्ध
  • 2लेखन मार्गदर्शन
संपर्क
  • 1सर्व मराठीप्रेमींचे मनापासून स्वागत!
  • 2अभिप्राय द्या
  • 3संपर्क साधा
© 2026 Misalpav.com  ·  Disclaimer  ·  Privacy Policy मराठी साहित्य व संस्कृतीसाठी  ·  प्रवेश  |  सदस्य व्हा