'प्रधानसेवकांची मोठी घोषणा. काळ्यांविरुध्द सर्जिकल स्ट्राईक.'
(आता सगळे काळे हद्दपार होणार.. आपले तर १००% पांढरे.) गुलाम बेहद खुष झाला.
"अगं ऐकलंस का? १०० चे किती आहेत तुझ्याकडे?"
"४ फक्त. तुमच्याकडे?"
"२. आणि पेपरचं बिल पण द्यायचं आहे अजुन. सकाळीच येउन गेला तो."
"अहो मग त्याला ५०० ची नोट देउन टाका ना. आत्ताच आलीय बातमी. त्याला अजुन कळलं सुध्दा नसेल."
"अगं पण तो बिचारा..."
"लवकर जा. एकदा कळलं की घेणार नाही तो."
.
.
.
"हे काय बिनकांद्याचे पोहे?"
"अहो तिकडे आपले सैनिक रोज शत्रुच्या गोळ्या खातात. तुम्ही एक दिवस बिनकांद्याचे पोहे नाही खाउ शकत?"
" "
"आणि आज जर का पैसे नाही मिळाले तर चहा पण बिनदुधाचा प्यावा लागेल. आज टिव्हीवर सांगत होते की आता पेट्रोल पम्पावर पण पैसे मिळणार आहेत. तिथंच बघा आज."
.
.
.
१. "ओ भाउ. कार्ड स्वाइप करुन कॅश मिळेल का?"
"कितीचं पेट्रोल टाकायचंय?"
"अहो पेट्रोल नको फक्त कॅश पाहिजे."
"कुठुन येरवड्यावरुन आलात का?"
"नाही. चिंचवडवरुन"
"खी:.. खी:.. खी:.."
""
२. "ओ भाउ. कार्ड स्वाइप करुन कॅश मिळेल का?"
"आमाला पावर नाय"
"म्हणजे? हा पेट्रोल पम्प नाही?"
"पेट्रोल पम्प नाहीतर काय देशी दारुचा गुत्ता आहे? ते फक्त एसबाय च्या मशिन असेल तर मिळतंय."
३. "भैय्या. स्वाइप करके कॅश मिलेगा क्या?"
"कितना चाहिये?"
"२०००"
"गाडी साइड मे लगाओ और कार्ड लेके इधर आओ."
(आज मै उपर, आसमां निचे...)
"चार्जेस लगेगा"
"कितना"
"२००"
"अहो पण माझे तर १००% पांढरे..."
.
.
.
शेवटी मनाचा हिय्या करुन गुलामानी रणांगणावर जायची तयारी सुरु केली. कानात हेडफोन, खिशात किंडल, कमरेला आयपॅड, कपाळाला गंध, हातात भवानी आपलं.. पाण्याची बाटली..
गनिमाचं बळ बरंच दिसत होतं. हरकत नाही. शक्ती दे जगदंबे. हर हर महादेव!!!
"च्यायला... २ तास झाले. रांग अजुन तिथंच आहे. काळे लोक तिकडे मस्त मजेत आहेत. ५०० कोटी नुसत्या लग्नावर उडवतायेत आणि गरिबाला स्वतःचेच ५०० सुध्दा मिळत नाहीत."
"अहो थोडे दिवस त्रास सहन करा. मग बघा. राजकारण्यांची तर चांगलीच जिरणार आहे. सगळे काळे बाहेर येणार आहेत"- पाठीमागुन एक गोरा म्हणाला
"पण मी तर ऐकलं की त्यांच्याकडे कॅश फारशी नसतेच. सगळे शेअर्स, जमिनी आणि सोनं वगैरे.."- गुलाम
"सगळंच निघणारे आता. बघाच तुम्ही. या भ्रष्टाचारी राजकारण्यांनी सगळा देश पोखरलाय. ही कीड एकदाची काढून टाकायलाच पाहिजे. आता अख्खा देश बदलायचा म्हणजे आपण पण थोडा त्रास सहन करायला नको का? ३० डिसेंबर पर्यंत कळ काढा फक्त." - पुन्हा तोच गोरा माणूस
शरीराचं ओझं या पायावरुन त्या पायावर करत गुलामानी निमुटपणे मान हलवली.
"अरे दार उघडलं. दार उघडलं."
"शांतपणे रांगेत या सगळ्यांनी."
"अरे ढकलु नका रे"
"अहो पण मी सिनीअर सिटीझन आहे..."
"सोबत लहान मुल आहे हो..."
"अरे देवा!!! दार पुन्हा बंद झालं. म्हणजे गेला अजुन एक तास..."
"अहो दार उघडा ना प्लीज.. माझा भाउ आत गेलाय आणि डॉक्युमेंट्स माझ्याकडेच राहिलीत..."
"तो आत्ताचा गोरा माणूस कुठे गेला? आत्तातर माझ्या मागे उभा होता" - गुलाम
करड्या रंगाच्या काचेतुन तो गोरा माणूस मात्र शांतपणे कॅश काउंटरवर उभा असलेला दिसत होता...
वाचने
9387
प्रतिक्रिया
20
मिसळपाव
प्रतिक्रिया
त्याच चिंचवडमध्ये माझे आईबाबा
असं मला वाटत नाही...
In reply to त्याच चिंचवडमध्ये माझे आईबाबा by पिलीयन रायडर
Everything Is Not About
In reply to असं मला वाटत नाही... by अर्धवटराव
बेस्ट लींक
In reply to Everything Is Not About by गुलाम
अरेरे.. मला काय सांगायचंय ते
In reply to त्याच चिंचवडमध्ये माझे आईबाबा by पिलीयन रायडर
याला लेखनमर्यादाच म्हणावे
In reply to अरेरे.. मला काय सांगायचंय ते by गुलाम
उडदा माजी काळेगोरे ,काय
लेखातला आशय निट पोचला नाही हे
ये क्या बोलते मियां... भारीच!
In reply to लेखातला आशय निट पोचला नाही हे by गुलाम
२०१४ मध्ये रालोआ ला ९८% मते
In reply to ये क्या बोलते मियां... भारीच! by संदीप डांगे
ते काय माहीत नाही, आता मात्र
In reply to २०१४ मध्ये रालोआ ला ९८% मते by मराठी कथालेखक
हा हा. मग तर प्रश्नच मिटला.
In reply to ये क्या बोलते मियां... भारीच! by संदीप डांगे
आता कसं बोललात..! शंभर टक्के
In reply to हा हा. मग तर प्रश्नच मिटला. by गुलाम
+१११ सहमत..
In reply to आता कसं बोललात..! शंभर टक्के by संदीप डांगे
अती मार्मिक प्रतिसाद आहे तुमचा
In reply to हा हा. मग तर प्रश्नच मिटला. by गुलाम
त्यामुळे माझ्यासारख्या माणसाला जेंव्हा लोक विचारतात कि तु मोदी सपोर्टर आहेस कि विरोधक तेंव्हा माझी खुप पंचाइत होते. कारण त्यांना बायनरीमध्ये उत्तर अपेक्षित असतं आणि ते मला देता येत नाही.तुमचे प्रतिसाद कमीच असतात लेख तर त्याहुन दुर्मिळ पण वा वा वा क्या बात है ! अती मार्मिक लिहीता हो तुम्ही एकदम मास्टर स्ट्रोक खरचअती मार्मिक प्रतिसाद आहे तुमचा
In reply to हा हा. मग तर प्रश्नच मिटला. by गुलाम
त्यामुळे माझ्यासारख्या माणसाला जेंव्हा लोक विचारतात कि तु मोदी सपोर्टर आहेस कि विरोधक तेंव्हा माझी खुप पंचाइत होते. कारण त्यांना बायनरीमध्ये उत्तर अपेक्षित असतं आणि ते मला देता येत नाही.तुमचे प्रतिसाद कमीच असतात लेख तर त्याहुन दुर्मिळ पण वा वा वा क्या बात है ! अती मार्मिक लिहीता हो तुम्ही एकदम मास्टर स्ट्रोक खरचअसं दिलखुलास कौतुक कुणाला
In reply to अती मार्मिक प्रतिसाद आहे तुमचा by मारवा
काही अपवाद वगळता, माणसे अशी
In reply to हा हा. मग तर प्रश्नच मिटला. by गुलाम
काही अपवाद वगळता, माणसे अशी एका टोकाची नसतात. त्यांच्यात बर्याच छटा असतात आणि स्ठळ-कालपरत्वे त्यातली कोणती छटा समोर येईल ते सांगता येत नाही यावर माझा ठाम विश्वास आहे. त्यामुळे माझ्यासारख्या माणसाला जेंव्हा लोक विचारतात कि तु मोदी सपोर्टर आहेस कि विरोधक तेंव्हा माझी खुप पंचाइत होते. कारण त्यांना बायनरीमध्ये उत्तर अपेक्षित असतं आणि ते मला देता येत नाही."पाठिंबा माणसाला नाही तर चांगलेपणा आणि सत्य या तत्वांना द्यायचा आहे" असे ठरवले तर मनातले बरेच गोंधळ कमी होतात. माणसे बदलू शकतात, तत्वे तशीच राहतात. अर्थात, याचा एक गैरफायदा असा की; (अ) आज 'क्ष' चांगल्याच्या व सत्याच्या बाजूने बोलत आहे किंवा कृती करत आहे म्हणून त्याच्या बाजून बोलले की 'य' आणि त्याचे पाठीराखे नाराज होतात व बहुतेक तुम्हाला 'क्ष'चा पाठीराखा/भक्त वैगेरे विषेशणे लावतील; आणि... (आ) उद्या 'य' चांगल्याच्या व सत्याच्या बाजूने बोलत आहे किंवा कृती करत आहे म्हणून त्याच्या बाजून बोलले की 'क्ष' आणि त्याचे पाठीराखे नाराज होतात व बहुतेक तुम्हाला 'य'चा पाठीराखा/भक्त वैगेरे विषेशणे लावतील. हे सगळे त्यांच्या बायनरी मनाला न समजणारे आहे (देवा त्यांना माफ कर :) ), असे समजून सोडून देता आले पाहिजे. इतके जमले की सगळे गोंधळ दूर होतात !तसंही आजकाल आम्ही समतोल(
तिरकस प्रतिसादांना उत्तर देउन
In reply to तसंही आजकाल आम्ही समतोल( by सुबोध खरे