Skip to main content

जग घूमेया थारे जैसा ना कोई |

लेखक संजय क्षीरसागर यांनी बुधवार, 23/11/2016 12:22 या दिवशी प्रकाशित केले.
रोजच्या रुटीन आणि आपाधापीच्या या जागालगतच एक दुसरं जग आहे, इष्काचं जग. ते जग तर्काच्या पलिकडे आहे. ती का आवडते, सांगता येत नाही. तिच्या सहवासाची जादू शब्दांच्या पलिकडे आहे. आणि तो एक न संपणारा सिलसिला आहे. कधीकधी तर दोघात इतकी खोल दरी येते की आता सगळं संपलं असं वाटतं. पण तो किंवा ती कधी आस सोडत नाहीत. हा एकतर्फी जोश तसाच कायम राहातो. दुसर्‍याचा प्रश्नच नाही ! तुमची लगनच तुमचं सर्वस्व असतं. आणि इतरांना अशक्य वाटणार्‍या पुनर्मिलनाच्या आशेवर मात करत, तुमच्या इष्काची नशा तुम्हाला जीवनाशी लढत राहाण्याची ताकद देते. ___________________ आरफा आणि सुल्तानची बेताब प्रेमाकहाणी एका न सुटणार्‍या प्रश्नापाशी येऊन संपली आहे. तू माझ्या आयुष्यात परत कधीही येऊ नकोस असं तीनी त्याला सांगितलंय. सुल्तानचं उध्वस्त झालेलं आयुष्य तो परत नव्यानं सावरायचा प्रयत्न करतोयं. सुल्तान पुन्हा एकदा ज़िंदगीला मात देण्याचा प्रयत्न करतोयं. आणि तो पहिली प्रो-टेक-डाउन फाईट जिंकलायं! खरं तर या विजयोत्सवाची पार्टी आहे पण निमित्त आहे त्याच्या स्पॉन्सरर मित्राच्या, आकाशच्या वाढदिवसाचं. पार्टी सुरु होते, आकाश त्याला दारू ऑफर करतो. आणि सुल्तान म्हणतो, नको, राहूं दे. माझी फक्त एकच नशा आहे... इष्क ! त्यावर तिथल्या मुली त्याला म्हणतात, इतकी वर्ष झाली तुझ्या पत्नीनं तुला सोडून, हर एक चिज़का एक्सपायरी डेट होता है. आणि सुल्तान म्हणतो, मॅडम, हमरे यहां इष्ककी कोई एक्सपायरी डेट नही होती ! मुली विचारतात की तिच्यात अशी काय खास बात आहे जी आमच्यात नाही ? सुल्तान म्हणतो, तसं नाही. तुम्ही सगळ्या सुरेख आहात पण तिच्यात एक फिल आहे...आणि तो फक्त अनुभवता येतो! हे गाणं पाहतांना, ऐकतांना आणि खरं तर अनुभवतांना वाटतं, की काय बेताब आलम असेल इष्काचा या प्रत्येक कलाकराच्या दुनियेत? इर्शाद क़ामिल इतकी उत्कट शायरी, स्वत: ती जगल्याशिवाय लिहू शकणार नाही. राहत फतेह अली खान स्वरातून जादू निर्माण करतो आणि स्वत:च्या, अत्यंत नज़ाकतीच्या इश्काच्या दुनियेत, ऐकणार्‍याला घेऊन जातो. विशाल-शेखरनी गाण्याला जो स्वरसाज़ चढवलायं तो इतका हलका आहे की क़ामिलच्या शायरीला जरा सुद्धा धक्का लागत नाही आणि तरीही भावनांची उत्कटता पराकोटीला नेतो. सलमाननी अदाकारीत तर केवळ कहर केलायं ! सगळ्यांची इश्काची दुनिया वेगवेगळी पण इश्काचा आलम मात्र एक, जग घूमेया थारे जैसा ना कोई | _________________ राहत फतेह अलीच्या पुरनूर आवाजात हा आलाप सुरु होतो. अक्षरश: एका क्षणात, राहत इश्काचा सगळा महौल जमवतो ... ओ..ओ...ओ..ओ आणि इर्शाद क़ामिलची ही अत्यंत साधी पण कमालीची जिवघेणी शायरी, विशाल-शेखरच्या अप्रतिम म्युझिकमधनं... सुल्तानसाठी, अरफाच्या सहवासाचा तो `फिल' काय आहे ते सांगते ! ना वो अखियाँ रूहानी कहीं ना वो चेहरा नूरानी कहीं कहीं दिलवाली बातें भी ना ना वो सजरी जवानी कहीं जग घूमेया थारे जैसा ना कोई जग घूमेया थारे जैसा ना कोई

ना तो हंसना रूमानी कहीं ना तो खुशबू सुहानी कहीं ना वो रंगली अदाएं देखीं ना वो प्यारीसी नादानी कहीं आणि प्रेमाची खरी खुमारी इर्शादच्या या एका ओळीत एकवटली आहे! जैसी तू है वैसी रहेणा... इतका दुरावा आहे. ती पुन्हा कधीही भेटू नकोस म्हणालीये. त्यांच्या पहिल्या-वहिल्या मुलाच्या मृत्यूला सुल्तान जवाबदार आहे. तो ऑलिंपिक्स जिंकूनही आपलं इष्क हरवून बसलायं. आणि जिंदगीच्या घटनाक्रमाला तर मागे न फिरण्याचा शाप आहे. नात्याचा संपूर्ण कडेलोट झालायं तरी सुल्तान म्हणतो, जैसी तू है वैसी रहेणा...तू कदापिही बदलू नकोस. तू आहेस तशीच मला प्रिय आहेस. जग घूमेया थारे जैसा ना कोई । ______________ बारिशों के मौसमोंकी भीगी हरियाली तू सर्दियोंमें गालोंपे जो आती है वो लाली तू रातों का सुकून भी है सुबह की अज़ान है चाहतों की चादरोंमें मैंने है संभाली तू... खरं तर इतकी उत्तम शायरी, कुठेही विशद करायला जागा नाही. `रातों का सुकून भी है' या ओळी, तिच्या सहवासात तो रात्रीचा सुकून अनुभवणाराच जाणू शकतो. एक तर रात्रीचा आपला स्वत:चाच एक सुकून असतो आणि त्यात तिच्याशी संग म्हणजे निव्वळ कमाल. दोन देह आणि अंगोपांगात भिनत जाणारा तो निवांतपणा म्हणजे इहलोकीची जन्नत! मग `सुबह की अज़ान है' हा फिल... अजिबात आहट न होऊ देता, तिच्या निवांत पहुडलेल्या देहाकडे बघत, दोघांसाठी कॉफी करुन, तिला अवेळी उठवून, निवांतपणे कॉफी घेतल्यावर, उजाडण्यापूर्वीच, एकमेकांच्या उबेत, न संपणार्‍या निवांत रस्त्यावर, निर्वेध भटकायला जाण्याची अफलातून मजा. ती, तुम्ही, पहाटेचा अल्हाद, देह जणू हवेत तरंगत असल्याचा आनंद....सुबह की अज़ान | कहीं आग जैसी जलती है बने बरखा का पाणीं कहीं कभी मान जाणा चुपके से यूँ ही अपनी चलाणी कहीं तिच्या रागाची दाहकता आणि तिचं सर्वस्व आर्पण करणार्‍या प्रेमाचा सुखद वर्षाव. कधी आलेला तिचा अनपेक्षित होकार आणि कधी तिनं धरलेला अतर्क्य हट्ट. किती साध्या, सोप्या ओळीतून इर्शाद आपल्या जीवनाला स्पर्शून जातो! आणि म्हणतो ... जैसी तू है वैसी रहेणा.... जग घूमेया थारे जैसा ना कोई । _________________________ अपणे नसीबोंमें या हौसले की बातोंमें सुखों और दुखोंवाली सारी सौगातों में संग तुझे रखणा है संग तुझे रखणा है, तूने संग रहेणा मेरी दुनियामें भी मेरी जज़बातों में तेरी मिलती निशानी कहीं जो है सबको दिखानी कहीं तू तो जाणती है मरके भी मुझे आती है निभाणी कहीं माझं नशिब असेल किंवा मग केवळ हौसला असेल, सुखात काय की दु:खात काय, तू साथीला आहेस आणि तूच संगतीला राहाशिल. माझ्या जगात, माझ्या भावना विश्वात तुझ्याच खुणा आहेत. आणि मी त्या जगाला बिनदिक्कत दाखवतो. तू तर जाणतेस की मृत्यूत सुद्धा मी तुझ्यातच सामावायची जिद्द करीन. आणि शेवटी तर इर्शाद कमाल करतो. वो ही करना है जो है कहेणा तू माझी फिकीर करु नकोस. जे तुझं अंतरंग तुला सांगतंय तेच तू कर! आज तुझ्या दुर्दैवाला मीच जवाबदार आहे असं तुला वाटतंय. तू सहन होण्यापलिकडचा जुलूम करतेयंस. काही हरकत नाही. माझ्या इश्काची नशा अजून तशीच आहे, कारण ..... जग घूमेया थारे जैसा ना कोई |

लेखनविषय:
लेखनप्रकार

वाचने 4688
प्रतिक्रिया 16

प्रतिक्रिया

पहिला परिच्छेद समजला. बाकी हे कुठच्या चित्रपटाचं गाणं आहे? गाणं बाकी ऐकल्यागत वाटतंय. हा सुलतान आणि आरफा कोणेत?

वाह! क्या बात है! म्हणजे हे गाणं खरं तर इतकं 'फील' सकट ऐकलं नव्हतं. पण तुमचं रसग्रहण वाचून पुनःप्रत्यय आला त्यातील 'फ्रील' चा. बाकी, तुम्ही त्यातल्या भावनेशी इतकं जवळ जाऊ शकलात यावरून उघड आहे की तुम्हीही या सगळ्या गोष्टी 'फील' केल्या असतीलच. तेंव्हाच इतकं मनापासून लिहू शकलात. मस्त वाटलं वाचून. सुरेख. लिहीत रहा.

आवडते गाणे ! नावडता कलाकार ! अगोदर आवडणारा पण आता ब्लॅक मनी मागताना पकडला गेल्यामुळे नावडता झालेला गायक असा सगळा झोल झालाय या गाण्याच्या बाबतीत. मात्र राहत फतेह अली खानपेक्षा नेहा भसीन ने गायलेले गाणे कैकपटीने सुरेख ! आणि हो, मी पयला !

उगाचं काहीही कारण नसताना हे गाणे डोक्यात गेलंय. अजिबात ऐकवत नाही, नुसती चाहूल लागली तरी स्टेशन बदलतो.

रागावू नका पण नाही आवडला लेख. प्लॅटिटुड म्हणावीत अशा वाक्यांनी भरलेला. विशेषतः हा पॅरा. हे गाणं पाहतांना, ऐकतांना आणि खरं तर अनुभवतांना वाटतं, की काय बेताब आलम असे
ल इष्काचा या प्रत्येक कलाकराच्या दुनियेत? इर्शाद क़ामिल इतकी उत्कट शायरी, स्वत: ती जगल्याशिवाय लिहू शकणार नाही. राहत फतेह अली खान स्वरातून जादू निर्माण करतो आणि स्वत:च्या, अत्यंत नज़ाकतीच्या इश्काच्या दुनियेत, ऐकणार्‍याला घेऊन जातो. विशाल-शेखरनी गाण्याला जो स्वरसाज़ चढवलायं तो इतका हलका आहे की क़ामिलच्या शायरीला जरा सुद्धा धक्का लागत नाही आणि तरीही भावनांची उत्कटता पराकोटीला नेतो. सलमाननी अदाकारीत तर केवळ कहर केलायं ! सगळ्यांची इश्काची दुनिया वेगवेगळी पण इश्काचा आलम मात्र एक, जग घूमेया थारे जैसा ना कोई |

In reply to by अनुप ढेरे

कलाकाराचं व्यक्तिगत जीवन बाजूला ठेवून, त्यानं गाण्याचा माहौल कसा उभा केलायं याचा आस्वाद घेतला तर आपण गाण्याशी रिलेट होऊ शकतो. अर्थात, गाण्यात व्यक्त झालेला अनुभव रसिकाला नसेल तर रिलेट होता येणार नाही. गाण्यानं मला भावविभोर केलं कारण तो माझा अनुभव आहे.

अतिशय सुंदर रसग्रहण. पहिल्यांदा जेव्हा ऐकलं तेव्हा प्रचंड आवडलं होतं हे गाणं.

ओके.

In reply to by प्रचेतस

पण इर्शाद क़ामिलनं ते किती लीलया केलंय, त्याचं कौतुक वाटतं. या शब्दांची नज़ाकत बघ : अखियाँ रूहानी चेहरा नूरानी हंसना रूमानी खुशबू सुहानी अदाएं रंगीली आणि ... प्यारीसी नादानी ! तुझ्या नजरेतनं, तुझा निखळ प्रांजळपणा व्यक्त होतो आणि तुझ्या नजरेला नजर मिळते तेंव्हा, आपले आत्मे एकरुप होतात ...अखियाँ रूहानी. दिवसाच्या कोणत्याही प्रहरी तुझ्याकडे पाहिलं की सकाळ झाल्यासारखी वाटते.... चेहरा नूरानी. तुझ्या हास्यात एक सुरेख रोमँटिसिजम आहे... हंसना रूमानी. तुझ्या देहगंधात एक वेडावणारी जादू आहे ....खुशबू सुहानी. तुझी देहबोली, सारा माहौल रंगारंग करुन टाकते... अदाएं रंगीली आता असं वाटतं की इर्शाद कल्पनेच्या कडेलोटाला पोहोचला. इथून पुढे त्याच्या शायरीशी रिलेट होता येणार नाही. पण लगेच तो म्हणतो.... ना वो प्यारीसी नादानी कहीं तू कमालीची बालीश आहेस. केंव्हाही कशीही वागतेस.... आणि एका क्षणात पुन्हा समेवर येतो, तुझी ही नादानीच मला प्यारी आहे!

संक्षीसेठ, रसग्रहण आवडलं. काही सिनेमे लक्षात राहतात त्यातल्या गाण्यामुळे..आपण चांगलं गाणं निवडलं. धन्स. लिहित राहा. मला आवडतं हे गाणं. धन्स. दुनिया किसीके प्यारमे जन्नतसे कम नही एक दिलरुबा है दिलमें जो हूरोंसे कम नही । बरोबर ना ? -दिलीप बिरुटे

In reply to by प्रा.डॉ.दिलीप बिरुटे

काल लंडनमधे राहाणार्‍या एका ब्याऐंशी वर्षाच्या रसिकाशी, कमालीची मैफिल जमली. माझ्या एका स्नेह्याचे ते थोरले बंधू. तीनदा डिवोर्स झालेला, मस्त संसार केलेला, दोन मुली असलेला, एकदम पारदर्शी आणि मल्टीफॅसेटेड माणूस. सगळं आयुष्य समरसून जगून, सध्याच्या एकाकी आयुष्यात पुन्हा तितकीच उत्कटता! जीवनाचे वेगवेगळे पैलू, साहित्य, विनोद, शायरी, अध्यात्म, काळ, पैसा,.... रंगलेल्या गप्पात, दोघात एक टिचर्स संपत आली. (स्नेही त्यांचा रमचा कास्क घेऊन मैफिलीत रंगत आणत होते). मग मला राहावलं नाही. मी मनातला प्रश्न विचारला : इफ आय एम नॉट टू पर्सनल,... वॉट इज अ वूमन? त्यावर ते म्हणाले, अ वूमन इज, अ ट्रिमेंडस कपॅसिटी-टू-लव ! नो मॅन कॅन मॅच इट... तुम्हाला फक्त तिच्याशी कनेक्ट होता आलं पाहिजे. आणि ते झालं की योर लाईफ इज मेड! माय गॉड ! मी त्यांचा हात हातात घेतला. बहुदा त्या स्पर्शातून की त्यांच्या अवलोकनातून त्यांना कळलं, अशा तारा जुळवलेला माणूस आपल्याला दाद देतोयं. मी म्हणालो, बट वॉट इक्झॅक्टली इज दॅट कनेक्शन ? त्यावर ते शांतपणे म्हणाले.... इफ यू हॅव गॉट इट... जस्ट डोंट अ‍ॅनलाईज! सो `जग घूमेया थारे जैसा ना कोई' हा अनुभव आहे.