ना तो हंसना रूमानी कहीं ना तो खुशबू सुहानी कहीं ना वो रंगली अदाएं देखीं ना वो प्यारीसी नादानी कहीं आणि प्रेमाची खरी खुमारी इर्शादच्या या एका ओळीत एकवटली आहे! जैसी तू है वैसी रहेणा... इतका दुरावा आहे. ती पुन्हा कधीही भेटू नकोस म्हणालीये. त्यांच्या पहिल्या-वहिल्या मुलाच्या मृत्यूला सुल्तान जवाबदार आहे. तो ऑलिंपिक्स जिंकूनही आपलं इष्क हरवून बसलायं. आणि जिंदगीच्या घटनाक्रमाला तर मागे न फिरण्याचा शाप आहे. नात्याचा संपूर्ण कडेलोट झालायं तरी सुल्तान म्हणतो, जैसी तू है वैसी रहेणा...तू कदापिही बदलू नकोस. तू आहेस तशीच मला प्रिय आहेस. जग घूमेया थारे जैसा ना कोई । ______________ बारिशों के मौसमोंकी भीगी हरियाली तू सर्दियोंमें गालोंपे जो आती है वो लाली तू रातों का सुकून भी है सुबह की अज़ान है चाहतों की चादरोंमें मैंने है संभाली तू... खरं तर इतकी उत्तम शायरी, कुठेही विशद करायला जागा नाही. `रातों का सुकून भी है' या ओळी, तिच्या सहवासात तो रात्रीचा सुकून अनुभवणाराच जाणू शकतो. एक तर रात्रीचा आपला स्वत:चाच एक सुकून असतो आणि त्यात तिच्याशी संग म्हणजे निव्वळ कमाल. दोन देह आणि अंगोपांगात भिनत जाणारा तो निवांतपणा म्हणजे इहलोकीची जन्नत! मग `सुबह की अज़ान है' हा फिल... अजिबात आहट न होऊ देता, तिच्या निवांत पहुडलेल्या देहाकडे बघत, दोघांसाठी कॉफी करुन, तिला अवेळी उठवून, निवांतपणे कॉफी घेतल्यावर, उजाडण्यापूर्वीच, एकमेकांच्या उबेत, न संपणार्या निवांत रस्त्यावर, निर्वेध भटकायला जाण्याची अफलातून मजा. ती, तुम्ही, पहाटेचा अल्हाद, देह जणू हवेत तरंगत असल्याचा आनंद....सुबह की अज़ान | कहीं आग जैसी जलती है बने बरखा का पाणीं कहीं कभी मान जाणा चुपके से यूँ ही अपनी चलाणी कहीं तिच्या रागाची दाहकता आणि तिचं सर्वस्व आर्पण करणार्या प्रेमाचा सुखद वर्षाव. कधी आलेला तिचा अनपेक्षित होकार आणि कधी तिनं धरलेला अतर्क्य हट्ट. किती साध्या, सोप्या ओळीतून इर्शाद आपल्या जीवनाला स्पर्शून जातो! आणि म्हणतो ... जैसी तू है वैसी रहेणा.... जग घूमेया थारे जैसा ना कोई । _________________________ अपणे नसीबोंमें या हौसले की बातोंमें सुखों और दुखोंवाली सारी सौगातों में संग तुझे रखणा है संग तुझे रखणा है, तूने संग रहेणा मेरी दुनियामें भी मेरी जज़बातों में तेरी मिलती निशानी कहीं जो है सबको दिखानी कहीं तू तो जाणती है मरके भी मुझे आती है निभाणी कहीं माझं नशिब असेल किंवा मग केवळ हौसला असेल, सुखात काय की दु:खात काय, तू साथीला आहेस आणि तूच संगतीला राहाशिल. माझ्या जगात, माझ्या भावना विश्वात तुझ्याच खुणा आहेत. आणि मी त्या जगाला बिनदिक्कत दाखवतो. तू तर जाणतेस की मृत्यूत सुद्धा मी तुझ्यातच सामावायची जिद्द करीन. आणि शेवटी तर इर्शाद कमाल करतो. वो ही करना है जो है कहेणा तू माझी फिकीर करु नकोस. जे तुझं अंतरंग तुला सांगतंय तेच तू कर! आज तुझ्या दुर्दैवाला मीच जवाबदार आहे असं तुला वाटतंय. तू सहन होण्यापलिकडचा जुलूम करतेयंस. काही हरकत नाही. माझ्या इश्काची नशा अजून तशीच आहे, कारण ..... जग घूमेया थारे जैसा ना कोई |
लेखनविषय (Tags)
लेखनप्रकार (Writing Type)
रोजच्या रुटीन आणि आपाधापीच्या या जागालगतच एक दुसरं जग आहे, इष्काचं जग. ते जग तर्काच्या पलिकडे आहे. ती का आवडते, सांगता येत नाही. तिच्या सहवासाची जादू शब्दांच्या पलिकडे आहे. आणि तो एक न संपणारा सिलसिला आहे. कधीकधी तर दोघात इतकी खोल दरी येते की आता सगळं संपलं असं वाटतं. पण तो किंवा ती कधी आस सोडत नाहीत. हा एकतर्फी जोश तसाच कायम राहातो. दुसर्याचा प्रश्नच नाही ! तुमची लगनच तुमचं सर्वस्व असतं. आणि इतरांना अशक्य वाटणार्या पुनर्मिलनाच्या आशेवर मात करत, तुमच्या इष्काची नशा तुम्हाला जीवनाशी लढत राहाण्याची ताकद देते.
___________________
आरफा आणि सुल्तानची बेताब प्रेमाकहाणी एका न सुटणार्या प्रश्नापाशी येऊन संपली आहे. तू माझ्या आयुष्यात परत कधीही येऊ नकोस असं तीनी त्याला सांगितलंय. सुल्तानचं उध्वस्त झालेलं आयुष्य तो परत नव्यानं सावरायचा प्रयत्न करतोयं. सुल्तान पुन्हा एकदा ज़िंदगीला मात देण्याचा प्रयत्न करतोयं. आणि तो पहिली प्रो-टेक-डाउन फाईट जिंकलायं! खरं तर या विजयोत्सवाची पार्टी आहे पण निमित्त आहे त्याच्या स्पॉन्सरर मित्राच्या, आकाशच्या वाढदिवसाचं.
पार्टी सुरु होते, आकाश त्याला दारू ऑफर करतो.
आणि सुल्तान म्हणतो, नको, राहूं दे. माझी फक्त एकच नशा आहे... इष्क !
त्यावर तिथल्या मुली त्याला म्हणतात, इतकी वर्ष झाली तुझ्या पत्नीनं तुला सोडून, हर एक चिज़का एक्सपायरी डेट होता है.
आणि सुल्तान म्हणतो, मॅडम, हमरे यहां इष्ककी कोई एक्सपायरी डेट नही होती !
मुली विचारतात की तिच्यात अशी काय खास बात आहे जी आमच्यात नाही ?
सुल्तान म्हणतो, तसं नाही. तुम्ही सगळ्या सुरेख आहात पण तिच्यात एक फिल आहे...आणि तो फक्त अनुभवता येतो!
हे गाणं पाहतांना, ऐकतांना आणि खरं तर अनुभवतांना वाटतं, की काय बेताब आलम असेल इष्काचा या प्रत्येक कलाकराच्या दुनियेत? इर्शाद क़ामिल इतकी उत्कट शायरी, स्वत: ती जगल्याशिवाय लिहू शकणार नाही. राहत फतेह अली खान स्वरातून जादू निर्माण करतो आणि स्वत:च्या, अत्यंत नज़ाकतीच्या इश्काच्या दुनियेत, ऐकणार्याला घेऊन जातो. विशाल-शेखरनी गाण्याला जो स्वरसाज़ चढवलायं तो इतका हलका आहे की क़ामिलच्या शायरीला जरा सुद्धा धक्का लागत नाही आणि तरीही भावनांची उत्कटता पराकोटीला नेतो. सलमाननी अदाकारीत तर केवळ कहर केलायं ! सगळ्यांची इश्काची दुनिया वेगवेगळी पण इश्काचा आलम मात्र एक, जग घूमेया थारे जैसा ना कोई |
_________________
राहत फतेह अलीच्या पुरनूर आवाजात हा आलाप सुरु होतो. अक्षरश: एका क्षणात, राहत इश्काचा सगळा महौल जमवतो ...
ओ..ओ...ओ..ओ
आणि इर्शाद क़ामिलची ही अत्यंत साधी पण कमालीची जिवघेणी शायरी, विशाल-शेखरच्या अप्रतिम म्युझिकमधनं... सुल्तानसाठी, अरफाच्या सहवासाचा तो `फिल' काय आहे ते सांगते !
ना वो अखियाँ रूहानी कहीं
ना वो चेहरा नूरानी कहीं
कहीं दिलवाली बातें भी ना
ना वो सजरी जवानी कहीं
जग घूमेया थारे जैसा ना कोई
जग घूमेया थारे जैसा ना कोई
प्रतिक्रिया
पहिला परिच्छेद समजला.
हे सुलतान चित्रपटातलं गाणं
वाह! क्या बात है! म्हणजे हे
आवडते गाणे !
उगाचं काहीही कारण नसताना हे
लेखात गाण्याची लिंक टाकायची विनंती केली आहे
रागावू नका पण नाही आवडला लेख.
प्लॅटिट्यूड नाही, अनुभव !
_/\_
गुन्हेगाराचा फोटो दिसला,
ओके.
गाणं अजिबात माहीत नसूनही
उत्कट अनुभव शब्दात व्यक्त करणं फार मुश्कील आहे,
अतिशय आवडतं गाणं.तुम्ही
गुड.
डिबी,