✍ मराठी साहित्य, संस्कृती आणि लेखनाचे व्यासपीठ
प्रवेश करा | सदस्य व्हा
मिसळपाव
मिसळपाव मराठी साहित्य

Main navigation

  • मुख्य पान
  • पाककृती
  • कविता
  • नवीन लेखन
  • भटकंती

मंटोच्या लघुकथा ४ : मुनासिब कार्रवाई

म
महासंग्राम यांनी
Tue, 11/22/2016 - 09:42  ·  लेख
लेख
 मंटोच्या लघुकथा ४ : मुनासिब कार्रवाई मूळ लेखक : स़आदत हसन मन्टो. १९१२-१९५५ ___________________________________________________________________ जेव्हा हल्ला झाला, तेव्हा गल्लीतल्या अल्पसंख्यांक माणसांचा खून झाला, जे बाकी होते, ते जीव वाचवून पळाले. एक माणूस आणि त्याची बायको त्यांच्या घराच्या तळघरात लपले. दोन दिवस-दोन रात्री त्या नवरा-बायकोने मारेकरी कधीही मारायला येतील या भीतीत घालवले, पण कोणीही आलं नाही. असेच दोन दिवस गेले. आता मरणाची भीती कमी झाली आणि तहान-भूक जाणवायला सुरवात झाली. अजून चार दिवस असेच गेले. आता नवरा-बायकोला जगणं काय नि मरण काय यात काहीही स्वारस्य राहिलं नाही. दोघेही लपलेल्या जागेतून बाहेर आले. नवऱ्याने मोठ्या आवाजात बोलायला सुरवात केली, लोक तिकडे आकर्षित झाले, तो म्हणाला " आम्ही दोघंही स्वतःला तुमच्या हवाली करत आहोत, आम्हाला मारून टाका." जे आवाजाने आकर्षित झाले होते, ते विचारात पडले, "आपल्या धर्मात तर जीव हत्या पाप आहे." ते सगळे जैनी होते, पण त्यांनी आपापसात चर्चा केली आणि नवरा-बायकोला योग्य कारवाई साठी दुसऱ्या गल्लीतल्या माणसांच्या हवाली केलं.

Book traversal links for मंटोच्या लघुकथा ४ : मुनासिब कार्रवाई

  • ‹ मंटो च्या लघुकथा ३ : बेखबरी का फायदा
  • Up
वर्गीकरण
लेखनविषय (Tags)
हे ठिकाण
लेखनप्रकार (Writing Type)
आस्वाद
भाषांतर

प्रतिक्रिया द्या
10063 वाचन

💬 प्रतिसाद (24)

प्रतिक्रिया

वाईट!

चांदणे संदीप
Tue, 11/22/2016 - 23:02 नवीन
आजच्या ब्रेकींग न्यूज मिडीयाच्या एखाद्या रक्तरंजित लाईव स्ट्रीमींगप्रमाणे भासली, जसं काही प्रत्यक्षात समोर घडत होतं आणि मी हतबल पाहत होतो! वाईट! Sandy
  • Log in or register to post comments

......

पिलीयन रायडर
Tue, 11/22/2016 - 23:21 नवीन
......
  • Log in or register to post comments

तुम्ही शब्द्शः मराठीकरण केले,

निओ१
Wed, 11/23/2016 - 00:08 नवीन
तुम्ही शब्द्शः मराठीकरण केले, मुळकथा - मुनासिब कार्रवाई -सआदत हसन मंटो
  • Log in or register to post comments

आपल्याला काय अपेक्षित आहे ते

महासंग्राम
Wed, 11/23/2016 - 09:08 नवीन
आपल्याला काय अपेक्षित आहे ते सांगा, मी तसा प्रयत्नहि करून पाहीन. शेवटी प्रयोगशीलता महत्वाची.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: निओ१

आणि मंटो बद्दल म्हणाल, तर

महासंग्राम
Wed, 11/23/2016 - 09:11 नवीन
आणि मंटो बद्दल म्हणाल, तर मंटो त्याची कथा एवढी घट्ट बांधली असते कि, त्याच्या कथेत थोडासा हि बदल केला तर त्याचा अर्थ पूर्णपणे बदलतो.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: निओ१

बरोबर आहे. तुम्ही भाषांतर करत

जयंत कुलकर्णी
Wed, 11/23/2016 - 15:58 नवीन
बरोबर आहे. तुम्ही भाषांतर करत रहा. काहीतरी फालतू धागा करण्यापेक्षा हे बरं. एखादा प्रतिक्रिया खेचणारा धागा टाकायचा यासारखा तद्दन भिकार प्रकार तरी नाही हा... सध्या अशा धाग्यांचा सुळसुळाट झाला आहे आणि सदस्यही उगिचच त्यावर प्रतिसाद देत राहतात... एखाद्या भाषांतराच्या धाग्यावर मुळ कथा टाकू नये ह्या मताचा मी आहे... हे म्हणजे एखाद्याला उगिचच दोषी म्हणून न्यायालयात उभे केल्यासारखे वाटते..... :-)
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: महासंग्राम

भाषांतर

कपिलमुनी
Wed, 11/23/2016 - 16:13 नवीन
भाषांतर करताना ज्या भाषेत ती कथा भाषांतरीत होत आहे तिचा मूळ साचा तोच ठेवून नवीन भाषेचा योग्य वापर हवा उदा : आकर्षित करणे ऐवजी लक्ष वेधणे ( मूळ कथेच्या अनुषंगाने) असे शब्दप्रयोग वापरता येइल. लेखकाच्या प्रयोगशीलतेचे कौतुक आहेच.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: जयंत कुलकर्णी

बरोबर आहे हो पण त्यांना जरा

जयंत कुलकर्णी
Wed, 11/23/2016 - 17:37 नवीन
बरोबर आहे हो पण त्यांना जरा वेळ द्यायला हवा....
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: कपिलमुनी

मंटो त्याची कथा एवढी घट्ट बांधली असते कि, त्याच्या कथेत थोडासा ह

निओ१
गुरुवार, 11/24/2016 - 02:56 नवीन
मंटो त्याची कथा एवढी घट्ट बांधली असते कि, त्याच्या कथेत थोडासा हि बदल केला तर या बाबतीत मी सहमत आहे. पण अनुवाद करताना थोडे आपले शब्द त्यात आले की आपल्याच मातीत उपजलेली गोष्ट आहे, हे वाचकाला जाणवले तर, ही भावनात्मक,जुळवणूक वाचकाला लेखाच्या जवळ घेऊन येईल असे वाटते.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: महासंग्राम

खल्लास हो गाववाले!

कैलासवासी सोन्याबापु
Wed, 11/23/2016 - 07:45 नवीन
खल्लास हो गाववाले!
  • Log in or register to post comments

will socity accept me?

धोणी
Wed, 11/23/2016 - 09:46 नवीन
will society accept me if I said मंटो च्या सगळ्या कथा टुकार वाटल्या, म्हणजे एवढा डोक्यावर घेउन नाचण्यासारखे काही वाटले नाही
  • Log in or register to post comments

मंटो च्या सगळ्या कथा टुकार

महासंग्राम
Wed, 11/23/2016 - 11:33 नवीन
मंटो च्या सगळ्या कथा टुकार वाटल्या
हरकत नाही एखाद्याला तसं वाटूहि शकतं. प्रत्येकाची अभिरुची सारखीच असेल असं नाही ना. तुमच्या मताचा आदर आहेच, पण त्या का टुकार वाटतात ते सांगू शकाल का ???
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: धोणी

आवडली.

मितान
Wed, 11/23/2016 - 11:55 नवीन
आवडली.
  • Log in or register to post comments

वाचते आहे..

यशोधरा
Wed, 11/23/2016 - 11:59 नवीन
वाचते आहे..
  • Log in or register to post comments

भाषांतर

कपिलमुनी
Wed, 11/23/2016 - 12:28 नवीन
भाषांतर केल्यासारखे वाटले ! मूळ बाज हरवला आहे
  • Log in or register to post comments

खरं सांगायचं तर

वरुण मोहिते
Wed, 11/23/2016 - 14:46 नवीन
मराठी आणि उर्दू बाजाची तुलना होऊ शकत नाही . दोन्ही भाषांना वेगळा लहेजा आहे आता पु लं च्या कथा तुम्ही हिंदी मधून लिहू शकाल का ??तसंच आहे ते . त्यामुळे भाषांतर होऊन काही लोकांपर्यंत पोचतं हे महत्वाचं. अजून काळजी घेतील पुढे ते भाषांतर करताना बाकी .
  • Log in or register to post comments

कथेचे मर्म समजले नाही, सांगु

मराठी_माणूस
Wed, 11/23/2016 - 16:40 नवीन
कथेचे मर्म समजले नाही, सांगु शकाल का ?
  • Log in or register to post comments

कथेचे मर्म

महासंग्राम
Wed, 11/23/2016 - 17:06 नवीन
मंटोच्या कथा वाचल्या तर आपल्याला लक्षात येईल कि काही सांगायच आहे ते अगदी शेवटच्या एक-दोन ओळीत सांगतो. या कथेचं मर्म म्हणाल तर मी इतकेच म्हणेन कि, मंटोने या कथेत धर्माच्या अनुषंगाने येणार्या दांभिकतेवर प्रहार केला आहे. अर्थात हे मला जसं समजलं तसं मी सांगितलं. दुसऱ्या कोणाला यातून काही दुसरा पैलू हि दिसू शकेल.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: मराठी_माणूस

मंटो असे मर्म वगैरे सांगतो का

कैलासवासी सोन्याबापु
Wed, 11/23/2016 - 21:53 नवीन
मंटो असे मर्म वगैरे सांगतो का ते माहिती नाही पण मला तसे जाणवत नाही. मंटो माणसाच्या काळजात खोलवर हात घालतो, ढवळून काढतो अन मग काही प्रश्न मांडतो, त्यांची व्यक्तिसापेक्ष उत्तरे असू शकतात म्हणून तो ते प्रश्न वाचकांवरच सोडतो, असे माझे वैयक्तिक मत आहे
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: मराठी_माणूस

मंटो असा समजला असता तर...

निओ१
गुरुवार, 11/24/2016 - 02:59 नवीन
मंटो असा समजला असता तर... *असा = कोणालाही सहज
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: मराठी_माणूस

हे बरय काहीतरी अगम्य लिहायचे

धोणी
Wed, 11/23/2016 - 18:47 नवीन
हे बरय काहीतरी अगम्य लिहायचे आणि , लोकाना लावायचे कामाला . . शोधा अर्थ लावत =))
  • Log in or register to post comments

बोचरी कथा. भावानुवाद आवडला.

पद्मावति
Wed, 11/23/2016 - 18:57 नवीन
बोचरी कथा. भावानुवाद आवडला.
  • Log in or register to post comments

ही कथाही आवडली.

प्रचेतस
गुरुवार, 11/24/2016 - 18:18 नवीन
ही कथाही आवडली. फाळणीची ही पण दुसरी बाजू जी आपल्यापर्यंत येत नाही फारशी.
  • Log in or register to post comments

मानसा, कधी व्हशील मानूस!

पैसा
Mon, 12/05/2016 - 12:21 नवीन
मानसा, कधी व्हशील मानूस!
  • Log in or register to post comments

लेखन करा

लेखन करा

मिसळपाव वर स्वागत आहे.

प्रवेश करा

  • नवीन खाते बनवा
  • Reset your password
मिसळपाव.कॉम बद्दल
  • 1आम्ही कोण?
  • 2Disclaimer
  • 3Privacy Policy
नवीन सदस्यांकरीता
  • 1सदस्य व्हा
  • 2नेहमीचे प्रश्न व उत्तरे
लेखकांसाठी
  • 1लेखकांसाठी मार्गदर्शन उपलब्ध
  • 2लेखन मार्गदर्शन
संपर्क
  • 1सर्व मराठीप्रेमींचे मनापासून स्वागत!
  • 2अभिप्राय द्या
  • 3संपर्क साधा
© 2026 Misalpav.com  ·  Disclaimer  ·  Privacy Policy मराठी साहित्य व संस्कृतीसाठी  ·  प्रवेश  |  सदस्य व्हा