मान लो वो अब कागज के तुकडे है!! (खरंच??)
काल खुप विचार करत होतो कि नवीन धागा काढावा? कि नोटबंदीच्या इतर धाग्यात प्रतिसादात लिहावं? कि खरडफळ्यावर टंकावं?. शेवटी म्हटलं धागाच काढावा. इतक्या छत्र्या उगवल्यात त्यात माझी अजून एक. काय होईल जास्तीत जास्त? धागा उडवला जाईल किंवा शून्य प्रतिसाद येईल हरकत नाही. तर,
काल मिसेसचा भारतातून मेसेज आला "अहो टिंब टिंब भाऊ तुम्हाला आठ-साडे आठला कॉल करणार आहेत, प्रकरण गंभीर आहे. काय आहे म्हाईत नाही पण तुम्ही या भानगडीत पडू नका". (या सगळ्या बायकांना आपले नवरे भानगडी करू शकतात हा कॉन्फिडन्स का असतो?) एनीवे,
नोटबंदीच्या धामधुमीत नातेवाईक असलेल्या बिल्डरचा फोन येणार त्यात बायकोने दिलेली तंबी ऐकून काय प्रकरण असेल हे ऐकायला मीही उत्सुक होतो (जसे तुम्ही वाचायला). अपेक्षेप्रमाणे फोन आला. हाय-हॅलो झाल्यानंतर मी म्हणालो थांब जरा, फोनवरून नको मी तुला पीसीवरून VOIP ने कॉल करतो, हे फोन सहसा ट्रेस होत नाहीत. मग एक दोन मिनिटांत मी कॉल लावला.
इकडचं तिकडचं बोलणं, नोटबंदी आणि मोदींना शिव्या देऊन झाल्यावर अचानक स्वर बदलले. अरे कामगारांना ३ महिन्यांचा ऍडव्हान्स पगार देऊनही बरीच कॅश उरली आहे. तुझी मदत हवी आहे.
मी:- माझी? ती कशी?
तो:- कॅश मी डॉलरमधे कन्व्हर्ट करून घेतो.
मी:- अरे पण त्यात खूप नुकसान होईल.
तो:- हो ना! अर्धेच मिळताहेत. पण तेव्हढे तर तेव्हढे. नाईलाज आहे.
मी:- बरं.
तो:- डॉलर तुला पोहोचवायची व्यवस्था करतो. तुही आलास कि थोडे-थोडे घेऊन जात जा?
तो:- तुझ्या तिकडच्या बँकेत जमा कर आणि हळू हळू तुझ्या "NRI" अकाउंट ने पाठवत जा.
मी:- अरे डॉलर माझ्या बँकेत घेणार नाही. ते प्रथम लोकल करन्सीत बदलून मग अकाउंट मध्ये भरावे लागतील. आणि मी ट्रान्सफर केल्यानंतर परत कन्व्हर्जन फॅक्टर लागून परत नुकसान होईल?
तो:- किती?
मी:- इंटरनेटवर एका डॉलरचे ३५ थाई बाथ दाखवतोय इकडच्या बँका जनरली २ थाई बाथ कमी देते. आणि परत ट्रॅन्स्फर होतील ते एका बाथला १.९ रुपये हिशोबाने मिळतील.
मग आमचं बराचवेळ डिक्शन झालं. किती कॅश ते इथे डिस्क्लोज करत नाही पण मला आलेली ऑफर सांगतो आणि तुम्हीच अंदाज लावा किती असेल ती. ऑफर होती कल्याणमधे एक वन बीएचके तुझ्या नावावर करतो.
मला बालकवींच्या कवितेच्या ओळी आठवल्या,
चिमूताई चिमूताई, माझ्या पिंजऱ्यात येतेस, बाई?
पिंजरा किती छान माझा! सगळा शीण जाईल तुझा.
जळो तुझा पिंजरा मेला! त्याचे नाव नको मला!
राहीन मी घरट्याविना! चिमणी उडून गेली राना.
होय!! मी अगदी त्या चिमणीप्रमाणे वागलो. घरचं प्रकरण होतं. हडतूड करणं शक्य नव्हतं पण त्याचं “NRE” अकाऊंट बद्दल असलेल्या आज्ञानाचा फायदा घेत. डिप्लोमॅटिकली नकार देण्यात यशस्वी झालो.
मोदींनी अश्या लोकांची चांगलीच बूच मारली आहे हे पाहून खूप बरं वाटलं, हि मंडळी लाईनीत दिसत नाहीयेत पण आतल्या आत तडफडताहेत हे बघून एक आसुरी आनंद झाला. पण तो फार काळ टिकला नाही. मी थोड़ा हिशोब मांडल्यानंतर विचार आला खरंच काळ्या पैशांची रद्दी झाली कि तो विभागला जातोय?
आता हिशोब करूयात.
समजा "एक लाख" काळं धन आहे आणि एजंट फक्त ५०%च डॉलरमधे देणार. म्हणजे,
५०,००००/६८ (रुपये) => ७३५ डॉलर.
$७३५ x ३२(बाथ) => २३५२० थाई बाथ.
आता,
२३५२० - ११०० बँकेची फिज => २२,४२० थाई बाथ.(रेडी टू ट्रान्सफर)
२२,४२० x १.९ (रुपये) => ४२,५९८ रुपये.
म्हणजे जर फॉरेन रूट ने पैसे भारतात आले असते तर नातेवाईकाच्या एक लाखातले ४२,५९८ व्हाईट होऊन आले. "एक लाख" घेणारा एजंट सगळेच्या सगळे व्हाईट करणार पण त्याने डॉलर देण्यासाठी ५०,००० खर्च केले, बाकीचे ५०,००० त्याच्या खिशात. म्हणजे गोळाबेरीज केल्यास,
५०,०००-४२,५९८ => रु. ७,४०२(फक्त) नाहीसे झाले कन्व्हर्जन करण्यात.
म्हणजे,
माझ्या नातेवाईकाचा काळा पैसा जरी अर्धा झाला तरी तो अर्धा एजंटकडे गेला. एक लाख काळ्या पैशांतल्या फक्त ७,४०२ रुपयांची रद्दी झाली. काळा पैसा फक्त एका बदमाशाकडून दुसऱ्या बदमाशाकडे जातोय? तुम्हाला काय वाटतं? बरोबर आहे हे मत?
जाता जाता,
एक जागरूक नागरिक म्हणून माझ्या बँक मॅनेजरला फॉरेन रूटने पैसा भारतात आणण्याचे प्रयत्न चालले आहेत याबद्दल पत्र लिहिलं आहे. तो पुढे त्याचं काय करेल देव जाणे.
वर्गीकरण
प्रतिक्रिया
>>एक जागरूक नागरिक म्हणून
आधी,
ऑफर होती कल्याणमधे एक वन
=))
थोडावेळ मलाही गुदगुदल्या झाल्या पण,
याबाबतीत
हा प्रश्न.
+१
एजंट जुन्या नोटा घेऊन त्या
हम्म
+१११