सळसळणारी हिरवळ देही, विस्तीर्णाचे पान
समांतराचा ध्यास उराशी, सममितीचे भान
हिरवट पिवळे, तांबूस लोलक, नाजुक इवली फुले
वार्यावरती सरसरणारे , गंधविभोरी झुले
हिरवाईवर तांबूस हळदी, केसर भरले तुरे
चेंडूवरती कशिदाकारी, रुणझुणती गोपुरे
कृष्णासखा की म्हणू कदंब, रूप तुझे भरजरी
पानोपानी जणू वाजते कान्हाची बासरी
अवतीभवती पिंगा घालत भ्रमरांची लीला
मोह वाटुनी सोडून येई आम्रतरु कोकिळा
रुंद–अरुंदशा हिरवाईची दाट तुझी सावली
शांत असा विश्रांत जीवाला, स्मरते मज माऊली
- प्राजु
सदर फोटो जालावरुन साभार.
| लेखनविषय: |
|---|
वाचने
20635
प्रतिक्रिया
36
मिसळपाव
प्रतिक्रिया
सुंदर कविता. झाडा-फुलांवरची
कविते खाली इमेज दिसणार नाही
त्या दुव्यात खुप इमेजेस आहेत.
In reply to कविते खाली इमेज दिसणार नाही by प्राजु
तुला त्यात आवडेल ती टाक.
In reply to त्या दुव्यात खुप इमेजेस आहेत. by स्रुजा
आणि कविता आवडली .. तुमच्या
सुंदर काव्य!
मस्तं. आवडली.
अरे वा !! मस्तच हो....
खूप छान कविता.
कविता आवडली.
अरे ! २ इमेजेस आल्या. अजुन पण
कविता आवडली. मला मिसळपाव.कॉम
हिरवट पिवळे, तांबूस लोलक,
मदनबाण.....
आजची स्वाक्षरी :- haye mera dil - alfaaz ft honey singh - official full videoक्या बात! मनात रुंजी घालणारी
छान कवीता
आवडली
प्राजुताई वेलकम बॅक!!
प्राजुताई वेलकम बॅक!!
कृष्णासखा की म्हणू कदंब, रूप
मस्तं!!
मस्त आहे कविता!!
सुंदर कविता.. वाह!!!
कविता आवडली.
मस्त, सुंदर! कदंब उभा राहिला
खुप
सुंदर कविता..
वाह!
छान नादमय !!
नादमय कविता
!!! सुरेख !
सुरेख कविता!
मस्त आहे कविता
मस्त आहे कविता
वा!!!!
अतिशय सुंदर कविता !!!
मनाला भावली. अति सुंदर