✍ मराठी साहित्य, संस्कृती आणि लेखनाचे व्यासपीठ
प्रवेश करा | सदस्य व्हा
मिसळपाव
मिसळपाव मराठी साहित्य

Main navigation

  • मुख्य पान
  • पाककृती
  • कविता
  • नवीन लेखन
  • भटकंती

Cashless

न
निओ१ यांनी
Sat, 11/19/2016 - 01:32  ·  लेख
लेख
नोटबंदी जाहीर झाली व ९ ला सकाळी सगळीकडे आहाकार माजला की काय असे वातावरण निर्माण झाले होते. माझ्याकडे रोख रक्कम फक्त ३४० रु होती. तर.. घरी आम्ही चार लोक आहोत. १. महिण्याचा किराणा - कार्ड पेमेंट २. गाडीसाठी पेट्रोल - कार्ड पेमेंट ३. औषधे - कार्ड पेमेंट ४. नेट बील - कार्ड पेमेंट ५. फोन बील - कार्ड पेमेंट ६. लाईट बील - कार्ड पेमेंट ७. सिलेण्डर - कार्ड पेमेंट ८. टिव्ही रिचार्ज - कार्ड पेमेंट ९. ड्रिक्स - कार्ड पेमेंट * यातील कित्येक लोकांना कार्ड मशीन घेण्यास मी गेल्या दोन वर्षापासून सांगत होतो व सकारण, उदाहरण देऊन पटवून दिले होते. त्यांनी ती घेतली होती. आम्ही हॉटेल व इतर जागी जात नाही, पण तेथे पण आता सरास कार्ड पेमेंट घेतात. प्रश्न होता रोजच्या खर्चाचा, म्हणजे भाजी, फळे इत्यादी. नियमित असलेली २-३ दुकाने निवडली त्यांना माझे काम व माझे पैसे कसे रोख नसतात हे समजवले व त्यांना नेट बॅन्कीग शिकवले, त्यांच्या खात्यात त्यांच्यासमोर पैसे मोबाईलद्वारे (IMPS payment) कसे येतात व तुम्हाला लगेच कसे मिळतात हे शिकवले. अगदी पान टपरीवाल्याला देखील व त्यांनी ते मान्य देखील केले कारण नवीन पध्दतीने खात्यात पैसे जमा झाल्याचा मोबाईल मासेज लगेच येतो व त्यांना कळते की ह्या व्यक्तीने पैसे दिले. दुसर्‍याला पैसे कसे द्यावे हे शिकवले, आपले पैसे, आपला पासर्वड आपला OTP कसा जपावा व का हे समजवले. हे झाले आमचे रामायण! पण गल्लीमध्ये अनेक असे होते की त्यांना हे समजणे अवघड होते. १. गेली अनेक महिने मी एक रु. देखील जास्त न घेता सर्वांची लाईट बील्स ऑनलाईन भरत होतो. त्यांना त्याचा फायदा आता पण झाला या १० दिवसामध्ये व इतर काही गोष्टीमध्ये देखील. २. गॅस बुकिंग देखील करत होतो. पण आता रक्क्म जमा करताना अडचण येत होती, कारण माझा व्यवसाय, माझे उत्त्पन व मी भरत असलेली रक्क्म यात ताळमेळ करणे अवघड गेले असते. ९ तारखे पासून मी किमान माझ्या जवळपास असलेल्या व ऑनलाईन व्यवहार करत नसलेल्या अनेकांना नेट बॅकिंग व कार्ड वापरण्याचे फायदे शिकवले, काही शिकले काही धडपडत आहेत, पण शिकत आहेत. माझ्या माहितीमध्ये असलेला एकही व्यक्ती एक ही दिवस एटीमच्या बाहेर उभा राहिला नाही गेल्या दहा दिवसात, मला वाटते हे माझे यश असावे. माझ्या हाती एवढे होते, तर एवढीच समाजसेवा करु शकलो. पुढील काही दिवस ही असेच निघून जातील. काही तासापुर्वीच एके ठिकाणी वाचले होते, तिरुपतीला १ मिनिटच्या दर्शनासाठी २४ तासाची किम्वा कधी कधी त्यापेक्शा मोठी रांग असते....! माझ्याकडे अजून ही ३४० रु आहेत. दिनांक १९-११-१६
वर्गीकरण
लेखनविषय (Tags)
समाज
लेखनप्रकार (Writing Type)
विचार

प्रतिक्रिया द्या
17092 वाचन

💬 प्रतिसाद (112)

प्रतिक्रिया

चांगले काम केलेत! धन्यवाद!

संदीप डांगे
Sat, 11/19/2016 - 01:43 नवीन
चांगले काम केलेत! धन्यवाद!
  • Log in or register to post comments

मला काहीच फरक पडला नहीं. फ़क्त

विवेकपटाईत
Sat, 11/19/2016 - 09:16 नवीन
मला काहीच फरक पडला नहीं. फ़क्त पिटीएम् फोन मध्ये टाकले. आमचा बनिया कार्ड आधीच घेत होतो. (त्याचे म्हांने थोडाफार कर सरकारला दिला तर काही जास्त नुकसान होत नाही. आजकाल त्याची विक्री वाढलेली आहे. आजूबाजूचे दुकानदार हि बहुतेक लवकरच कार्ड घेणे सुरु करतील. या वर्षी नक्कीच कर देणार्यांची संख्या वाढेल.
  • Log in or register to post comments

छान काम केलेत.

यशोधरा
Sat, 11/19/2016 - 09:36 नवीन
छान काम केलेत.
  • Log in or register to post comments

गुड जॉब.

एस
Sat, 11/19/2016 - 10:01 नवीन
गुड जॉब.
  • Log in or register to post comments

चांगले काम केलेत. इकडे काय

कंजूस
Sat, 11/19/2016 - 10:32 नवीन
चांगले काम केलेत. इकडे काय कोणी न विचारता त्याला सांगायला गेलो की त्यांना संशय असतो यामध्ये याचा काहितरी डाव असणार.सावध राहावे लागते.
  • Log in or register to post comments

छान

निनाद
Sat, 11/19/2016 - 11:25 नवीन
छान केले आहे काम! आवडले. प्राप्त परिस्थितीला दोष देत बसण्यापेक्षा त्यावर मार्ग शोधणे जास्त चांगले. तेच तुम्ही केल्याने लिखाणात एक प्रकारची पॉझिटिव्हिटी वाटली. व्यवसाय करणार्‍यांना साधारणपणे पैसे 'येतात' हे लक्षात आले की पैसे येण्याचा अजुन एक मार्ग उघडायला ते नेहमीच तयार असले पाहिजेत. उत्तम व्यावसायिकाने तर पैसे येण्याचे जितके जास्त मार्ग उघडता येतील तेव्हढे उघडले पाहिजेत.
  • Log in or register to post comments

छान केले आहे काम! आवडले.

शलभ
Mon, 11/21/2016 - 18:22 नवीन
छान केले आहे काम! आवडले. प्राप्त परिस्थितीला दोष देत बसण्यापेक्षा त्यावर मार्ग शोधणे जास्त चांगले. तेच तुम्ही केल्याने लिखाणात एक प्रकारची पॉझिटिव्हिटी वाटली.
+१११११११
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: निनाद

हे भारी काम केलेत.

मोदक
Sat, 11/19/2016 - 11:53 नवीन
हे भारी काम केलेत.
  • Log in or register to post comments

प्रचंड कौतुक आहे

पैसा
Sat, 11/19/2016 - 12:55 नवीन
प्रचंड कौतुक आहे! शक्य तेवढ्या लोकांना नेट साक्षर आणि अर्थसाक्षर केले पाहिजे. निनादच्या धाग्यावर मी आयएमपीएस बद्दल (नेट बँकिंग मोबाईल अ‍ॅपवरून) लिहिले होते. http://www.misalpav.com/comment/899677#comment-899677 लोकाना समजावण्यासाठी याचा काही उपयोग झाला तर बघा.
  • Log in or register to post comments

माझ्याकडे येणाऱ्या

सुबोध खरे
Sat, 11/19/2016 - 13:08 नवीन
माझ्याकडे येणाऱ्या रुग्णांकडून मी चेक घेतो, payTM हि आहे, एका रूग्णाने chillr म्हणून aap वरून पैसे दिले. माझे स्वतःचे HDFC बँकेचे PAYZAPP म्हणून अँप आहेच. यातील काहीच करण्याची तयारी नसणाऱ्या रुग्णांना मी रोख रक्कम घेऊन या म्हणून सांगतो. जुन्या नोटा खपवायचा प्रयत्न करणारे लोक रोज येतात. स्पष्ट शब्दात "नकार" माझी स्वागत सहायिकाच देते. माझे रिपोर्ट मी लगेच देतो हे माहित नसलेल्या काही लोकांकडे पैसे नसतात पण ते नंतर चेक आणून देतात आणि रिपोर्ट घेऊन जातात. रोज चेक भरायला बँकेत जावे लागते जी माझ्या घरापासून २०० मीटर वर आहे. १६ तारखेला एकदा जाऊन माझ्या जुन्या आणि नव्या नोटा भरून आलो. एक तास रांगेत बसलो होतो मासिक आणि व्हाट्स अँप घेऊन. अन्यथा काही त्रास नाही. महानगर गॅस, वीज, पाणी, एम टी एन एल, मोबाईल इ सर्व बिले जालावरच्या भरत असल्याने रांगेत उभे राहणे कधीच बंद केले आहे. एकदा "त्रास होतो" म्हटलं कि मनाला त्रास होतो आणि "नाही होत" म्हटलं मानसिक शांतता असते.
  • Log in or register to post comments

स्वाईप

निनाद
Sat, 11/19/2016 - 16:51 नवीन
तुमच्याकडे कार्ड स्वाईप मशिन का घेतले नाही? कार्डाने पैसे देणे घेणे सोपे होईल. शिवाय कार्ड आहे म्हंटल्यावर पैसे नाहीत चेक घ्या वगैरे सबबी आपोआपच कमी होऊ शकतील.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: सुबोध खरे

प्रश्न

निनाद
Sat, 11/19/2016 - 16:53 नवीन
प्रश्न फार आगाऊ किंवा वैयक्तिक होत असेल तर क्षमस्व!. उत्तर दिले नाही तरी चालेल.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: निनाद

कार्ड स्वाईप मशिन घेण्यासाठी

सुबोध खरे
Sat, 11/19/2016 - 19:32 नवीन
कार्ड स्वाईप मशिन घेण्यासाठी एच डी एफ सी बँकेत गेलो होतो परंतु त्यांनी त्याला ८ दिवस लागतील असे सांगितले परत तुम्हाला करंट अकाउंट उघडायला लागेल असे सांगितले. माझा लष्करात असल्यापासूनचे पगाराचे खाते आहे. शिवाय एन के जी एस बी बँकेत करंट अकाउंट आहे. ते सोडून अजून एक खाते उघडायचे आणि त्याची उस्तवार करायची आली. . शिवाय २. २५ % टक्के कमिशन लागेल सांगितले आहे. मशीनचे ४५० रुपये महिना अधिक. पूर्वी बरेच ग्राहक २. २५ टक्के देण्यास तयार होत नसत.(१००० रुपयावर २५ रुपये देण्यापेक्षा ते माझ्या दवाखान्याच्या इमारतीतच ए टी एम आहे तेथून रोख रक्कम काढणे पसंत करत हे आमच्या खालीच असलेला सौंदर्य प्रसाधनांचा घाऊक विक्रेत्याने सांगितले). मर्सिडीझ घेतली तरी ऍव्हरेज किती देते विचारणे हि भारतीय मनोवृत्ती आहे. सरकारने हे २- २.२५% कमिशन रद्द केले तर कार्डाची स्वीकृती बरीच वाढेल असे तो म्हणाला. त्यातून बँकेतील कर्मचार्याना "घरचं झालं थोडं आणि व्याह्यांनी धाडलं घोडं" अशी परिस्थिती झाली आहे. मशीन स्वाईप करण्याबद्दल प्रात्यक्षिक देण्यासाठी माणूस येईल त्याला अधिक वेळ लागेल. माझ्या दोन्ही स्वागत सहायिकाना प्रशिक्षण देणे आवश्यक आहे आणि मी चेक घेतो किंवा रोख घेतो तेंव्हाही पावती देतोच. माझे फारसे काही अजून तरी अडलेले नाही. बहुसंख्य रुग्ण "माझ्याकडेच" येणारे असतात. एखादा त्यातल्या त्यात स्वस्त कुठे असा बाजारहाट करणारा असतो असा रुग्ण गेला तरी मी फार चिंता करीत नाही. स्वस्तात सेवा मिळेल हे माझे ब्रीद नाहीच. उत्तम सेवा मिळेल हेच ब्रीद आहे. त्यामुळे मी थोडे दिवस थांबायचं ठरवलं आहे.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: निनाद

ग्रेट!

निनाद
Mon, 11/21/2016 - 10:30 नवीन
ग्रेट! उत्तम सेवा मिळेल हेच ब्रीद आहे. वा! अजुन काय हवे? ग्रेट!!
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: सुबोध खरे

सरकारने हे २- २.२५% कमिशन

अप्पा जोगळेकर
Mon, 11/28/2016 - 12:02 नवीन
सरकारने हे २- २.२५% कमिशन रद्द केले तर कार्डाची स्वीकृती बरीच वाढेल असे तो म्हणाला. हे २ टक्के सरकारला मिळत नाहीत. अ‍ॅक्वयरर बँक (म्हणजे ज्यांचे मशीन आहे ती कंपनी), व्हिसा (नेटवर्क कंपनी) आणि बँक हे सगळे त्यांच्या त्यांच्या कमिशनचे पैसे कापून घेतात. हे पैसे मर्चंट (म्हणजे व्यापारी - या केसमधे तुम्ही स्वतः मर्चंट आहात) यानेच भरणे अपेक्षित आहे. अर्थात व्यापारी ते अप्रत्यक्षपणे ( म्हणजे ओव्हर ऑल किमत किंवा फीमधे वाढ करुन) वसूल करु शकतात. आणि त्यात काही गैर नाही. व्हिसा/मास्टरकार्ड, अक्वायरर कंपनी यांनी सुद्धा कमिशन घेणे गैर नाही. नाहीतर त्यांचा धंदाच बंद होईल.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: सुबोध खरे

फक्त ४५० रुपये महिन्याचे कसे

अप्पा जोगळेकर
Mon, 11/28/2016 - 12:13 नवीन
फक्त ४५० रुपये महिन्याचे कसे काय लावले ते कळत नाही. कमिशन पण त्यांनाच मिळणार आणि मशीनचे भाडे सुद्धा तेच घेणार हा उफराटा प्रकार आहे. फारतर मशिनचे दीपॉझिट घेणे ठीक आहे.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: अप्पा जोगळेकर

आयकर विभागाची काम करायची काय

संदीप डांगे
Sat, 11/19/2016 - 13:14 नवीन
आयकर विभागाची काम करायची काय पद्धत असते? म्हणजे निनावी तक्रार वगैरे करता येते काय? कारवाई च्या वेळेस मांडवली होत नसते ना? सात आठ जणांना 'फस्ट ह्यांड' अनुभव द्यायची फार इच्छा आहे! ;)
  • Log in or register to post comments

हो करता येते, व करावी देखील.

निओ१
Sun, 11/20/2016 - 00:58 नवीन
हो करता येते, व करावी देखील. देशाची फसवणूक म्हणजे पुर्ण १२५ कोटी लोकांची फसवणूक असे मी मानतो. जे सरळ मार्गाने जात नाही आहेत त्यांना सरळ मार्गावर घेऊन येणे हे तर पुण्य झाले ना?
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: संदीप डांगे

त्या सात / आठ जणांत मिपाकर

टवाळ कार्टा
Mon, 11/21/2016 - 09:29 नवीन
त्या सात / आठ जणांत मिपाकर (किंवा ट्रकवाले) किती? =))
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: संदीप डांगे

फारच छान उपक्रम

जीवना
Sat, 11/19/2016 - 17:33 नवीन
फारच छान उपक्रम
  • Log in or register to post comments

उत्तम काम केलतं!!! :)

कॅप्टन जॅक स्पॅरो
Sat, 11/19/2016 - 18:12 नवीन
उत्तम काम केलतं!!! :)
  • Log in or register to post comments

उत्तम

टीपीके
Sun, 11/20/2016 - 00:35 नवीन
सध्या आमचेही हेच प्रयत्न चालू आहेत पण तुमच्या इतके यश नाही मिळाले. पण लवकरच मिळेल अशी अशा आहे
  • Log in or register to post comments

समजवणे अवघड आहे खरे, पण

निओ१
Sun, 11/20/2016 - 00:54 नवीन
समजवणे अवघड आहे खरे, पण प्रयत्न चालू ठेवा यश हे धेय्य नसावे.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: टीपीके

अतिशय स्पृहणिय काम केले आहे

डॉ सुहास म्हात्रे
Sun, 11/20/2016 - 00:43 नवीन
अतिशय स्पृहणिय काम केले आहे तुम्ही !! कठीण काळात इतरांकडे बोटे न दाखवता उलट दुसर्‍यांना मदत करण्यात तुम्ही दाखवलेली सकारात्मकता खूपच भावली.
  • Log in or register to post comments

माझे मराठी (ऑनलाईन) जरा वाईट

निओ१
Sun, 11/20/2016 - 00:52 नवीन
माझे मराठी (ऑनलाईन) जरा वाईट आहे, पण मी ऑनलाईन कसे पैसे देवाण-घेवाण करावेत या बद्दल लिहतो आहे. निनाद यांनी पण लिहलेला लेख वाचला. त्यातून प्रेरणा मिळाली आहे.
  • Log in or register to post comments

निओ१, प्रश्न पैसे घेणार्रच

कंजूस
Mon, 11/21/2016 - 10:20 नवीन
निओ१, प्रश्न पैसे घेणार्रच मशीन लावायला तयार नाहीत. मुळात ब्यान्क व्यवहारच दाखवायला तयार नाहीत. क्याशच द्या म्हणतात.
  • Log in or register to post comments

माझ्या माहितीनूसार Bank रोख

निओ१
Sun, 11/27/2016 - 17:41 नवीन
माझ्या माहितीनूसार Bank रोख रक्क्म घेणे जास्त खर्चिक आहे, कारण रकमेची हताळणी आहे. उलट कॅशलेस मध्ये त्यांना फायदा आहे म्हणूण तर अनेक जागी तुम्हाला कॅशलेससाठी सुट मिळत असते.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: कंजूस

अहो ते वेगळे सांगत आहेत

पैसा
Sun, 11/27/2016 - 23:33 नवीन
कॅशलेस व्हायला बॅकांना प्रॉब्लेम नाही तर लहान धंदेवाले, दुकानदार, हॉटेलवाले यांच्याशी आपला रोजचा संबंध येतो ते लोक आपली सगळी ट्रॅन्झॅक्शन्स बँकेत येऊ द्यायला तयार नाहीत असे ते म्हणत आहेत. (कारण अर्थातच त्याना त्यांचे खरे उत्पन्न उघड व्हायला नको आहे.)
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: निओ१

देश बदल रहा है । :)

डॉ सुहास म्हात्रे
Mon, 12/05/2016 - 15:15 नवीन
देश बदल रहा है । :) पुरावा येथे पहा.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: पैसा

केवळ इतकच कारण नाही

अनुप ढेरे
Mon, 12/05/2016 - 15:37 नवीन
कॅशलेस होणं सोपं नाही. ब्यांका त्या POSच भाडं घेतात. (हजार रु महिना बहुधा), वर इंटरनेटचा खर्च, २% चार्ज. छोट्या दुकानदारांना हे तोट्याचं आहे. यापुढे ग्रिवंस रिड्रेसल ढिसाळ आहे. एखादं ट्रांझॅक्षन अडकलं/ अर्धवट झालं तर दाद मिळेलच याची हमी नाही.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: पैसा

भारी कौतुक आहे तुमचं! सहीच.

वेल्लाभट
Mon, 11/28/2016 - 11:31 नवीन
भारी कौतुक आहे तुमचं! सहीच. कौतुकास्पद कार्य.
  • Log in or register to post comments

माझी पण चिमूट

पैसा
Sat, 12/03/2016 - 14:53 नवीन
आमच्याकडे भांडी घासायला बाई येते ती नेपाळी आहे. पण तिच्याकडे आधार कार्ड आहे. (नेपाळी लोकांबाबत नागरिकत्वाचे काय नियम आहेत माहीत नाही. कारण गुरखे सर्रास सगळ्या भारतभर दिसतात.) तिचा बँक अकाउंट उघडून देण्यासाठी फॉर्म वगैरे आणला आहे. आता जन धन मधे खाते उघडून देईन. तिच्या घरात फक्त मुलाचा बॅंक अकाउंट आहे म्हणे.
  • Log in or register to post comments

त्या अमेरीकन विसा / मास्टर

पुष्कर जोशी
Sat, 12/03/2016 - 15:13 नवीन
त्या अमेरीकन विसा / मास्टर कार्ड च्या बोडख्यावर इतके पैसे नका वाहू .तर जमेल तिथे नेट बॅंकीग / IMPS / UPI वापरा .. !
  • Log in or register to post comments

अगदी

निनाद
Mon, 12/05/2016 - 02:54 नवीन
अगदी खरे! रुपे वापरा किंवा नेट बॅंकीग / IMPS / UPI वापरा!
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: पुष्कर जोशी

पोस्टमधे बरीच फेकाफेकी आहे

संजय क्षीरसागर
Mon, 12/05/2016 - 12:48 नवीन
(१) ९ ला सकाळी सगळीकडे आहाकार माजला की काय असे वातावरण निर्माण झाले होते. माझ्याकडे रोख रक्कम फक्त ३४० रु होती. प्रश्न होता रोजच्या खर्चाचा, म्हणजे भाजी, फळे इत्यादी. आम्ही हॉटेल व इतर जागी जात नाही माझ्याकडे अजून ही ३४० रु आहेत. दिनांक १९-११-१६ म्हणजे दहा दिवस घरच्यांनी काही खाल्लंच नाही ? (२) १. महिण्याचा किराणा - कार्ड पेमेंट २. गाडीसाठी पेट्रोल - कार्ड पेमेंट......९. ड्रिक्स - कार्ड पेमेंट यातल्या एकाही व्यावहारात कार्ड चार्जेस लागत नाहीत ? का कार्ड चार्जेस हा प्रकारच तुम्हाला माहिती नाही ? (३) १. गेली अनेक महिने मी एक रु. देखील जास्त न घेता सर्वांची लाईट बील्स ऑनलाईन भरत होतो. NEFT तुमच्याकडे फ्री आहे ? का NEFT ला बँक चार्जेस पडतात याची तुम्हाला कल्पनाच नाही? २. गॅस बुकिंग देखील करत होतो गॅस बुकींगला, ऑन लाईन पेमंट चार्जेस न लावणारी ही कंपनी कोणती आहे ? (४) माझ्या माहितीमध्ये असलेला एकही व्यक्ती एक ही दिवस एटीमच्या बाहेर उभा राहिला नाही गेल्या दहा दिवसात, मला वाटते हे माझे यश असावे. याचा अर्थ, दहा दिवस तुमच्या ओळखीत कुणी एक रुपया सुद्धा रोखीत दिला नाही ? कुठल्या भ्रमात आणि काय लिहीता आहात ? तुमच्या जनजागृतीबद्दल बाकीच्यांनी कौतुक केले आहेच! पण डोळे उघडे ठेवून व्यावहार केलेत आणि लिहीलेत तर बरे.
  • Log in or register to post comments

काही उत्तरे

पैसा
Mon, 12/05/2016 - 13:26 नवीन
(२) १. महिण्याचा किराणा - कार्ड पेमेंट २. गाडीसाठी पेट्रोल - कार्ड पेमेंट......९. ड्रिक्स - कार्ड पेमेंट यातल्या एकाही व्यावहारात कार्ड चार्जेस लागत नाहीत ? का कार्ड चार्जेस हा प्रकारच तुम्हाला माहिती नाही ?
आमच्याकडे तरी को ऑप स्टोअर किंवा तत्सम मोठ्या स्टोअरमधे स्वतंत्र कार्ड पेमेंट चार्जेस लागत नाहीत. एमारपी मार्जिनमधे अ‍ॅडजस्ट करत असावेत. रोजचे मासे वगळता इतर कोणतीही वस्तू डेबिट क्रेडिट कार्डाने घेता येते.
(३) १. गेली अनेक महिने मी एक रु. देखील जास्त न घेता सर्वांची लाईट बील्स ऑनलाईन भरत होतो. NEFT तुमच्याकडे फ्री आहे ? का NEFT ला बँक चार्जेस पडतात याची तुम्हाला कल्पनाच नाही?
आमच्या सिंडिकेट बँकेत सेव्हिंग अकाउंटमधून एनईएफटी फुकट आहे. तसेही लाईट बिल एनईएफटीने नव्हे तर डेबिट्/क्रेडिट कार्ड किंवा इंटरनेट बँकिंग असलेल्या अकाउंटमधून होते. क्रेडिट कार्डाला एका ठराविक रकमेपर्यंत चार्ज नसतो. डेबिट कार्ड्/इंटरनेट बँकिंगला कोणताही चार्ज नसतो.
२. गॅस बुकिंग देखील करत होतो गॅस बुकींगला, ऑन लाईन पेमंट चार्जेस न लावणारी ही कंपनी कोणती आहे ?
भारत गॅसच्या पोर्टलवर ऑनलाईन पेमेंट करून सिलेंडर प्रीपेड मागवता येतो. स्वतंत्र चार्जेस नाहीत. इतर गोष्टींना आपला पास. पण दुकानदार वगैरे लोक इतकेही अडाणी नसतात. कालच आमच्या दूधवाल्या दुकानदाराला विचारले की जेव्हा सुटे पैसे नसतील तर आयएमपीएस ने पैसे ट्रान्सफर केले तर चालेल का. तो हो म्हाणाला.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: संजय क्षीरसागर

भारत गॅसच्या पोर्टलवर ऑनलाईन

मराठी कथालेखक
Mon, 12/05/2016 - 13:35 नवीन
भारत गॅसच्या पोर्टलवर ऑनलाईन पेमेंट करून सिलेंडर प्रीपेड मागवता येतो. स्वतंत्र चार्जेस नाहीत.
भारत गॅसला ऑनलाईन पेमेंट करताना चार्जेस लागतात. अर्थात कार्डवर मिळणार्‍या रिवॉर्ड पॉईंट मुळे बरोबरी होते , त्यामुळे तोटा होत नाही (निदान माझ्या कार्डवर तरी) शिवाय डिलिवरी करणारा जास्त मला (म्हणजे माझ्यावतीने जे सिलिंडर स्वीकारतात त्यांना) जास्त पैसे मागू शकत नाही हा फायदा.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: पैसा

नाही लागले

पैसा
Mon, 12/05/2016 - 14:25 नवीन
आत्ताच डेबिट कार्डाने प्रीपेड सिलेंडरचे पैसे भरले. एक पैसा पण जास्त गेला नाही.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: मराठी कथालेखक

ऑनलाईन ?

मराठी कथालेखक
Mon, 12/05/2016 - 14:48 नवीन
ऑनलाईन ? मग सध्या हे चार्जेस काढून घेतले असतील.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: पैसा

HP Gas On-Line Booking

संजय क्षीरसागर
Mon, 12/05/2016 - 15:05 नवीन
7.The transaction charges for opting online payment would be borne by you over and above the cost of the refill (Currently it is Rs 7/- per transaction). 8.In case the refill could not be delivered at the residence of the consumer due to various reasons or booking cancelled by the consumer, the amount paid would be refunded/adjusted against next booking after deducting the online payment transaction charges.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: मराठी कथालेखक

:)

मराठी कथालेखक
Mon, 12/05/2016 - 15:09 नवीन
:)
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: संजय क्षीरसागर

करून बघा ब्वा!

पैसा
Mon, 12/05/2016 - 15:55 नवीन
क्रेडिट कार्डला ५ ₹ ४१ पैसे transaction चार्जेस आहेत आणि डेबिट कार्डला nil.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: मराठी कथालेखक

काहीच उत्तरे नाहीत!

संजय क्षीरसागर
Mon, 12/05/2016 - 14:15 नवीन
आमच्याकडे तरी को ऑप स्टोअर किंवा तत्सम मोठ्या स्टोअरमधे स्वतंत्र कार्ड पेमेंट चार्जेस लागत नाहीत. एमारपी मार्जिनमधे अ‍ॅडजस्ट करत असावेत. हे सर्वज्ञात आहे. रोजचे मासे वगळता.... तोच तर प्रश्न आहे. त्यांचे ३४० रुपये १० दिवस तसेच राहीलेत ! आमच्या सिंडिकेट बँकेत सेव्हिंग अकाउंटमधून एनईएफटी फुकट आहे. लकी आहात. तसेही लाईट बिल एनईएफटीने नव्हे तर डेबिट्/क्रेडिट कार्ड किंवा इंटरनेट बँकिंग असलेल्या अकाउंटमधून होते. त्यांनी गल्लीच्या बिलांचं `ऑनलाईन' पेमंट केलं आहे, याकडे लक्ष वेधतो. क्रेडिट कार्डाला एका ठराविक रकमेपर्यंत चार्ज नसतो. डेबिट कार्ड्/इंटरनेट बँकिंगला कोणताही चार्ज नसतो. तपासून पाहा. BOI प्रत्येक NEFT ला चार्जेस लावते. टिडीएस रिटर्नच्या प्रत्येक ५४ रुपयांसाठी NEFT ला २.८५ चार्जेस लागतात. कार्ड चार्जेसवर जोगळेकरांनी स्वतंत्र धागा काढला आहे. तुम्ही वाचला असेलच. भारत गॅसच्या पोर्टलवर ऑनलाईन पेमेंट करून सिलेंडर प्रीपेड मागवता येतो. स्वतंत्र चार्जेस नाहीत. पुन्हा तुमचं नशीब ! HP Gas On-line बुकींगला ६ रुपये चार्ज आहे. इतर गोष्टींना आपला पास माझं नशीब ! पण दुकानदार वगैरे लोक इतकेही अडाणी नसतात. कालच आमच्या दूधवाल्या दुकानदाराला विचारले की जेव्हा सुटे पैसे नसतील तर आयएमपीएस ने पैसे ट्रान्सफर केले तर चालेल का. तो हो म्हाणाला. माझा दुधवाला चेक घेतो. बहुतेक दुकानदारांनी कार्ड पेमंटला चार्जेस लागतील असे बोर्ड लावलेले दिसतात.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: पैसा

:))

पैसा
Mon, 12/05/2016 - 14:36 नवीन
तोच तर प्रश्न आहे. त्यांचे ३४० रुपये १० दिवस तसेच राहीलेत !
अहो ते जैन आहेत ना! त्याना मासे बिसे काय लागत नाय!
त्यांनी गल्लीच्या बिलांचं `ऑनलाईन' पेमंट केलं आहे, याकडे लक्ष वेधतो.
मी गल्लीचे नाही, पण एकूण चार बिले दरमहा ऑनलाईन भरते. २ गोव्यातली आणि दोन महाराष्ट्रातली. कधीच एक्स्ट्रा पैसे लागले नाहीत.
तपासून पाहा. BOI प्रत्येक NEFT ला चार्जेस लावते. टिडीएस रिटर्नच्या प्रत्येक ५४ रुपयांसाठी NEFT ला २.८५ चार्जेस
टीडीएस रिटर्न बद्दल काय माहीत नाही बुवा, आमच्या बँकेत एक लाख पर्यंत एनईएफटीला णो चार्जेस. पण मी काय म्हन्ते, लाईट बिलासाठी एनईएफटी करावी लागतच नाही ना! तुम्ही सगळ्यांनी सिंडिकेट बँकेत खाती ट्रान्सफर करा बघू असं म्हटलं असतं, पण ती झैरात होईल म्हणून नकोच ते!
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: संजय क्षीरसागर

काही विनोद बरे आहेत.... सो ओकेज!

संजय क्षीरसागर
Mon, 12/05/2016 - 14:44 नवीन
आता खुद्द लेखक काय म्हणतात ते बघू.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: पैसा

तुम्ही स्वतःला सीए म्हणवता

निओ१
Mon, 12/05/2016 - 22:29 नवीन
तुम्ही स्वतःला सीए म्हणवता यावर माझा आता विश्वास राहिला नाही... =))
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: संजय क्षीरसागर

तुम्ही BOI चं नेट बँकिंग

रॉजरमूर
Mon, 12/05/2016 - 18:37 नवीन
तुम्ही BOI चं नेट बँकिंग वापरता काय ? गेल्या ८ दिवसापासून BOI च्या साईटवर लॉगिन केल्यावर संगणकावर ह्या Application security error Image removed. संदेशाचा पडदा झळकतोय त्यामुळे अजिबात ट्रँजॅक्शन करता येत नाहीये . त्यात उल्लेख केलेल्या पाचही गोष्टी मी करत नाहीये त्या आधी व्यवस्थित सुरु होते नेटबँकिंग. डोक्याला ताप झालाय , त्यामुळे १ दिवसाआड बँकेत चकरा मारायला लागतायत. सगळे ब्राउजर वापरले पण उपयोग नाही. बँकवाले पण व्यवस्थित माहिती देत नाहीत. नसून अडचण असून खोळंबा . Image removed.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: संजय क्षीरसागर

इतर कुणा ग्राहकाला हा असा

असंका
Mon, 12/05/2016 - 18:39 नवीन
इतर कुणा ग्राहकाला हा असा मेसेज येतोय का ते बघितलंत का? का ही समस्या आपल्यापुरती मर्यादित आहे?
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: रॉजरमूर

!!!!!!

रॉजरमूर
Wed, 12/07/2016 - 10:59 नवीन
इतर कुणा ग्राहकाला हा असा मेसेज येतोय का ते बघितलंत का? का ही समस्या आपल्यापुरती मर्यादित आहे?
माझ्यापुरतीच मर्यादित असावी . एवढे दिवस गैरसोय कोण सहन करील ?
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: असंका

इतर कुठल्या मशीनवरुन लॉग इन

असंका
Wed, 12/07/2016 - 11:21 नवीन
इतर कुठल्या मशीनवरुन लॉग इन करुन बघितलंत का? किंवा समजा ३जी वापरुन बघितलंत का?
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: रॉजरमूर
  • 1
  • 2
  • 3
  • ›
  • »

लेखन करा

लेखन करा

मिसळपाव वर स्वागत आहे.

प्रवेश करा

  • नवीन खाते बनवा
  • Reset your password
मिसळपाव.कॉम बद्दल
  • 1आम्ही कोण?
  • 2Disclaimer
  • 3Privacy Policy
नवीन सदस्यांकरीता
  • 1सदस्य व्हा
  • 2नेहमीचे प्रश्न व उत्तरे
लेखकांसाठी
  • 1लेखकांसाठी मार्गदर्शन उपलब्ध
  • 2लेखन मार्गदर्शन
संपर्क
  • 1सर्व मराठीप्रेमींचे मनापासून स्वागत!
  • 2अभिप्राय द्या
  • 3संपर्क साधा
© 2026 Misalpav.com  ·  Disclaimer  ·  Privacy Policy मराठी साहित्य व संस्कृतीसाठी  ·  प्रवेश  |  सदस्य व्हा