✍ मराठी साहित्य, संस्कृती आणि लेखनाचे व्यासपीठ
प्रवेश करा | सदस्य व्हा
मिसळपाव
मिसळपाव मराठी साहित्य

Main navigation

  • मुख्य पान
  • पाककृती
  • कविता
  • नवीन लेखन
  • भटकंती

मी आज केलेला व्यायाम...!!

म
मोदक यांनी
Wed, 11/02/2016 - 17:16  ·  लेख
लेख
. नमस्कार, गेली दोन वर्षे मी जमेल तसे सायकलवर भटकत आहे आणि शक्य त्या राईडचे लेख लिहीत आहे. यादरम्यान एक गोष्ट लक्षात आली, मिपावरील लेख वाचून किंवा आपल्या मित्रांच्या संगतीने अनेक लोकांना सायकल चालवावीशी वाटली आणि बहुदा अशा एखाद्या ट्रिगर मुळे अनेक लोक उत्साहाने आणि नियमीतपणे सायकल चालवत आहेत. मला व्यनीमधून अनेकांनी सायकलबाबत प्रश्न विचारले आणि तेथेही पुढील प्रगती कळवत आहेत. व्यायामाचे फायदे येथे कोणाला समजावून सांगावेत अशी परिस्थिती नक्कीच नाही. तसेच आपल्या सर्वांच्या व्यस्त दिनक्रमामुळे अनेकदा इच्छा असूनही व्यायाम होत नाही हे ही तितकेच खरे आहे. मग आपण या धाग्यावर "आज केलेला व्यायाम" नोंदवत राहूया. व्यायाम करणे आवश्यक आहे मग तो कोणत्याही प्रकारे करा. सायकल चालवा, सकाळी फिरायला जा, पळा, सूर्यनमस्कार घाला, योगासने करा, जिम मध्ये घाम गाळा पण नियमीतपणे काहीतरी करा आणि येथे नक्की नोंदवा. आपल्यामुळे आणखी बरेच लोक प्रोत्साहन घेतील आणि व्यायामाला नक्की सुरूवात करतील. मग... आज किती व्यायाम केला..? ************************************************************** काही डिस्क्लेमर्स. १) या धाग्याचा उद्देश "जास्तीतजास्त लोकांनी व्यायाम करावा" इतकाच आहे. २) आपल्या व्यायामाच्या अनुषंगाने अनेकांना अनेक शंका असू शकतात त्या येथे बिन्धास्त विचारा. मिपाकर भरपूर उत्साही आहेत आणि अनेक वेगवेगळ्या प्रकारात निष्णात आहेत. माझीही शँपेन (उर्फ चंपाग्ने) हाफ / फुल मॅरेथॉन पळतो, वेल्लाभट नियमीतपणे जिम करतो, शैलेंद्र, प्रशांत मालक, डॉ श्रीहास, आनंदराव, (शेफ) केडी असे अनेक मुरलेले सायकलिस्ट लोक आहेत. डॉक्टर खरे आणि एक्काकाका वैद्यकीय सल्ले देतातच. अशा अनेक अनुभवी लोकांना आपले पेटारे उघडण्यासाठी उद्युक्त करूया. ३) ही कोणतीही स्पर्धा नाहीये त्यामुळे स्वतःशी प्रामाणिक राहून येथे नोंदी करा. फायदा तुम्हालाच मिळणार आहे. :) ************************************************************** टीप - येथे अवांतर पोस्ट शक्यतो टाळाव्यात. बाकी संपादक मंडळ व चालक-मालक समर्थ आहेतच. :)
वर्गीकरण
लेखनविषय (Tags)
क्रीडा
लेखनप्रकार (Writing Type)
विचार
अनुभव

प्रतिक्रिया द्या
112300 वाचन

💬 प्रतिसाद (496)

प्रतिक्रिया

आज कार्डियो ...

देशपांडेमामा
Mon, 11/14/2016 - 12:26 नवीन
१. ट्रेड मिल ब्रिस्क वॉकिंग - २० मि. (७.५ ते ७.८ च्या वेगाने) २. दोरीवरच्या उड्या - ४५० ३. क्रॉस ट्रेनर - २० मि. ४. स्ट्रेचिंग - १० मि. देश

८ नो. पासून पोहायला शिकतोय.

शलभ
Mon, 11/14/2016 - 21:37 नवीन
८ नो. पासून पोहायला शिकतोय. एक दिवसाआड धावायचा विचार आहे बरेच दिवस पण अमलात येत नाहीय. तरीही काल १० किमी पुर्ण केलं मास्टेक रन मधे.

८ नो. पासून पोहायला शिकतोय.

सूड
Tue, 11/15/2016 - 14:40 नवीन
८ नो. पासून पोहायला शिकतोय.
अभिनंदन!!
↩ प्रतिसाद: शलभ

व्यायाम सुरू आहे.

एस
Mon, 11/14/2016 - 22:12 नवीन
व्यायाम सुरू आहे.

व्यायाम सुरू आहे.

एस
Mon, 11/14/2016 - 22:12 नवीन
व्यायाम सुरू आहे.

आज अजीबात ईच्छा नव्हती .....

डॉ श्रीहास
Tue, 11/15/2016 - 08:53 नवीन
पण When in doubt Pedal it out ! असं म्हणत आळस झटकत उठलो ... २४.२२ किमी , २१.२ किमी/तास वेगानी १.०८ तासात ९५३ कॅलरीज खर्चुन सायकलींग केलं.... आजपासून MTB , Road Bike ला काही दिवस विश्रांती .

आज ३९ किमी सायकलिंग करून

मोदक
Tue, 11/15/2016 - 12:05 नवीन
आज ३९ किमी सायकलिंग करून हाफिसात पोहोचलो.

मस्त!

अनिरुद्ध.वैद्य
Tue, 11/15/2016 - 17:55 नवीन
सायकलनी ४० किमी दुर ऑफिसात! भारीये. ट्रॅफीक प्रॉब्लेम्स येत नाहीत का?
↩ प्रतिसाद: मोदक

हाफिस २० च किमी लांब आहे..

मोदक
Tue, 11/15/2016 - 18:00 नवीन
हाफिस २० च किमी लांब आहे.. मी सायकलच चालवायची म्हणून मुद्दाम पुण्याबाहेर पडून "नवीन कात्रज बोगदा - जुना कात्रज बोगदा - स्वारगेट - हाफिस" असा लांबचा रूट घेतो. ट्रॅफिकचा आजिबात प्रॉब्लेम येत नाही. आपण निवांत रस्त्याच्या बाजूने जात रहायचे.
↩ प्रतिसाद: अनिरुद्ध.वैद्य

हाफिस ते घर 21 किमी.

मोदक
Tue, 11/15/2016 - 22:18 नवीन
हाफिस ते घर 21 किमी.
↩ प्रतिसाद: मोदक

अछा ओके!

अनिरुद्ध.वैद्य
Wed, 11/16/2016 - 15:32 नवीन
मी विचार केला होता, पण हिंजवडीच ट्रॅफिक बघुन हिंम्मत नाही झाली :)
↩ प्रतिसाद: मोदक

ऑफिस कोणत्या फेजमध्ये आहे..?

मोदक
Wed, 11/16/2016 - 16:14 नवीन
ऑफिस कोणत्या फेजमध्ये आहे..? आणि घरापासून वाकड पुलाचे अंतर किती आहे..?
↩ प्रतिसाद: अनिरुद्ध.वैद्य

फेज २

अनिरुद्ध.वैद्य
Wed, 11/16/2016 - 16:33 नवीन
क्वॉड्रॉन आयटी पार्क. वाकड ब्रीज अंतर साधारण १० किमी आहे, पण नंतरचे ८ किमी भयानक गर्दी!
↩ प्रतिसाद: मोदक

भूमकर चौकातून - मेझ्झा ९ व

मोदक
Wed, 11/16/2016 - 16:59 नवीन
भूमकर चौकातून - मेझ्झा ९ व नंतर नेहमीच्या रस्त्याने पुढे.. असे जाणे जमेल का सायकल ने..?
↩ प्रतिसाद: अनिरुद्ध.वैद्य

नॉट दॅट सुटेबल

अनिरुद्ध.वैद्य
Wed, 11/16/2016 - 17:09 नवीन
मेझा ९ पर्यंत जरातरी सुटेबल, पण नंतर तीनपदरीचा दोनपदरी रस्ता होत असल्याने मारामारी असते लिटरली. मी मागुन जायचा विचार करतोय, सुस, चांदे अन नंतर हिंजवडी. रस्ता बराय, पण एक २ ३ किलोमीटरचा पॅच खराब आहे. ह्या विकेंडी सायकल दुरुस्त करुन नेक्स्ट वीक सुरुवात करावी असा विचार आहे. किंवा हायवेनीच सकाळी साडेसात वाजता वगैरे निघुन ट्राय करीन.
↩ प्रतिसाद: मोदक

सूस चांदे नांदे रस्त्यावरील

बाळ सप्रे
Wed, 11/16/2016 - 17:23 नवीन
सूस चांदे नांदे रस्त्यावरील ट्रॅफिक वाढत चाललय. अजिबात सायकल फ्रेंडली नाही .. सायकलने जायचा निर्णय घेतलाच असेल तर खूप खबरदारी घ्यावी !!!
↩ प्रतिसाद: अनिरुद्ध.वैद्य

मी भूमकर चौक ते फेज २ पर्यंत

अप्पा जोगळेकर
Mon, 11/21/2016 - 16:38 नवीन
मी भूमकर चौक ते फेज २ पर्यंत दररोज जात होतो आत्ता आत्ता पर्यंत. काही प्रॉब्लेम नाही ट्रॅफिकचा. उलट ४ सीझन नंतर जबर चढ आहे. तिथे ट्रॅफिक असेल तर अजून चांगले. चढ आणि ट्रॅफिक मुळे चांगली प्रॅक्टिस होते. नंतर घाटातल्या राईडला ही प्रॅक्टिस बरी पडते. चांदे रस्ता फालतू आहे.
↩ प्रतिसाद: अनिरुद्ध.वैद्य

धन्यवाद बाळदादा,

अनिरुद्ध.वैद्य
Mon, 11/21/2016 - 22:03 नवीन
आज तिकडुन गेलो होतो बाईकनी बघायला. पण आता वाटतंय चांदे शक्य नाही. दोनेक किमीच्या पॅच मध्ये रस्ता पुर्ण उखडल्या गेलाय. तेव्हा आपलं विकेण्डलाच सायकल फिरवणे चांदणी चौक, फर्ग्युसन रोड पाषाण सर्कल ते परत चांदणी चौक. एक चांगला लूप होतो. अप्पा, दंडवत. त्या भागातुन मोटरसायकल नेणं जिकीरीचं होतं, तिथनं सायकलनी गेलात __/\__
↩ प्रतिसाद: अनिरुद्ध.वैद्य

आजचा व्यायाम.....

देशपांडेमामा
Tue, 11/15/2016 - 16:50 नवीन
काहिच नाहि.. ऑफिसच्या कामामुळे आज व्यायाम नाही झाला :-( उद्या नक्की !! देश

माझा आजचा (छोटासा) व्यायाम...

राम राम मिपा
Tue, 11/15/2016 - 17:07 नवीन
दररोज ३० मीन्स ब्रिस्क वॉल्क + रन ने सुरुवात झाली आहे .... लवकरच पुढची पायरी गाठू ! -Better Late Than Never

१५-११-१६

वेल्लाभट
Tue, 11/15/2016 - 18:33 नवीन
गेल्या ७ पैकी ४ दिवस १.५ किमी धावलो

८००० स्टेप्स अ‍ॅपमधे दाखवल्या

खटपट्या
Tue, 11/15/2016 - 22:06 नवीन
८००० स्टेप्स अ‍ॅपमधे दाखवल्या पुशअप्स १५*४ सेट्स बेंचप्रेस १०*४ सेट्स ट्रायसेप्सचे विविध व्यायाम. आहार - सकाळे एक मोठा कप दुध दुपारी - एक मुदी तेरीयाकी राइस विथ भरपूर चिकन रात्री - छोले आणि दोन पोळ्या व्यायामानंतर लगेच अर्ध्या तासात अर्धा स्कूप व्हे पावडर मिश्रण.

मागच्या आठवड्यात सोमवार ते

सही रे सई
Tue, 11/15/2016 - 23:31 नवीन
मागच्या आठवड्यात सोमवार ते बुधवार नियमित १ तास जिम मध्ये जाऊन व्यायाम केला. गुरुवार शुक्रवार आणि पुढे विकांताला काही जमले नाही जायला. परत काल सोमवारी जिम ला गेले होते. या वेळी सुरुवाती पासून जाणवलेली गोष्ट म्हणजे मी नेहमी काही काळाची सुट्टी (२-३ महिने )नंतर परत व्यायामाला सुरुवात केली कि पहिले २-४ दिवस चांगलेच दुखते अंग. या वेळी असे अजिबात झाले नाही. बर व्यायाम सुध्धा कमी नव्हे केलेला. याचा अर्थ माझा फिटनेस बरा होता या वेळी असा होऊ शकेल का?

असा अर्थ काढू शकता. जेव्हा

खटपट्या
Tue, 11/15/2016 - 23:56 नवीन
असा अर्थ काढू शकता. जेव्हा आपण सुरवात करतो तेव्हा टीशू दुखावतात (नक्की शब्द काय वापरावा माहीत नाही) जेव्हा तुमचे अंग दुखले त्यावेळी टीशु पुर्ववत झाले नसावेत. स्नायुना आरामाचीही तीतकीच गरज असते. व्यवस्थीत आराम मिळाला असल्यास अंग दुखणार नाही. म्हणून बहूतेक एका प्रकारचा व्यायाम आठवड्यातून एकदा करावा असे म्हणतात. (वजन कमी करण्याचे कार्डीओ व्यायाम यात येत नाहीत)
↩ प्रतिसाद: सही रे सई

दॅट्स अ गुड साइन

अनिरुद्ध.वैद्य
Wed, 11/16/2016 - 16:11 नवीन
वर खटपट्या ह्यांनी म्ह्ण्टलेय तसे ते दुखावतात, त्यांना नंतर योग्य आहार अन विश्रांतीची गरज असते. अन ह्यावेळी दुखले नाही, म्हणजे फिटनेस नक्कीच चांगला झालाय! ह्याविषयी अजुन थोडे: जेव्हा आपण व्यायामाला सुरुवात करतो, तेव्हा स्नायुंना व्यायामाची सवय नसते अन म्हणुन ते ओव्हर वर्क आउट होतात. ओव्हर वर्कआउट झाल्यांनंतर बहुतेकवेळा ते अकडतात किंवा दुखतात. ते बहुधा एक प्रकारचे अ‍ॅसीड तयार झाल्याने होते (मला नक्की ठाउक नाहनाही) इंटरनेटवर वाचलेल्या माहीतीप्रमाणे मसल्सच्या पेशी, मसल्स वापरात असतांना तुटतात अन पुन्हा जुळतात. जेव्हा आपण व्यायाम करतो, तेव्हा ते जास्त काम करतात अन मग पुन्हा जुळतात. ह्या तोडपाण्यात बर्‍याचदा आपले स्नायु अकडतात. तेव्हा थोडी रेस्ट घेतली की ते पुर्ववत होतात. हा कालावधी साधारण ४८ तासांचा असतो. मग ४८ तासांनी परत तोच व्यायाम केला असता, तीच प्रोसीजर पुन्हा होते, पण ह्यावेळी स्नायुंना थोडा कमी त्रास होतो अन आपण हळु हळु पुर्ण इफेक्टीव्ह होतो. दरवेळी जेव्हा स्नायु तुटतात, तेव्हा परत जुळतांना त्यांची क्षमता थोडीशी वाढते. म्हणुन त्रास कमी कमी होत जातो अन आपला फिटनेस वाढतो. अन ही सगळी प्रक्रीया भरपुर कॅलरी खाणारी असल्याने, असे म्ह्ण्टले जाते की स्ट्रेंग्थ ट्रेनिंगमध्ये कॅलरीज व्यायाम झाल्यानंतरही जळत राहतात. ह्या सायकलचा उपयोग जीमींगमध्ये स्प्लीट वर्कआउट करुन अधिक क्षमतेने व्यायाम करवुन घेतला जातो. ४८ तासांची एका मसल गृपला विश्रांती म्हणजे नेम़कं काय तर आपण त्या कालावधीत दुसर्‍या मसल गृपला व्यायाम द्यायचा. सुरुवातीस अपर बॉडी पहिल्या दिवशी, लोअर बॉडी दुसर्‍या दिवशी अन कोअर (म्हणजे पोट, कंबर अन पाठ) तिसर्‍या दिवशी असे स्प्लीट करत व्यायाम केले, तर विविध स्नायु डेव्हलप होत जातात अन फिटनेस वाढतो.
↩ प्रतिसाद: सही रे सई

दरवेळी जेव्हा स्नायु तुटतात,

सही रे सई
Wed, 11/16/2016 - 22:34 नवीन
दरवेळी जेव्हा स्नायु तुटतात, तेव्हा परत जुळतांना त्यांची क्षमता थोडीशी वाढते. म्हणुन त्रास कमी कमी होत जातो अन आपला फिटनेस वाढतो. मला पण हेच वाटल या वेळी. म्हणजे पूर्वी माझे मसल्स एव्हढे तयार नव्हते या व्यायामासाठी. पण खूप वर्ष कमी अधिक व्यायाम केल्यामुळे त्यांची मुळची ताकद वाढली आणि त्यामुळे या वेळी काही महिन्यांच्या गेप नंतर सुध्धा हा त्रास झाला नाही कारण एक कमीत कमी ताकद तयार झाली होती मसल्स ची.
↩ प्रतिसाद: अनिरुद्ध.वैद्य

जी

अनिरुद्ध.वैद्य
गुरुवार, 11/17/2016 - 13:10 नवीन
आता अंडी + दुधाचा सपोर्ट घेउन व्यवस्थीत आहार प्लॅन करा!
↩ प्रतिसाद: सही रे सई

किंचित दुरुस्ती

विंजिनेर
Fri, 11/18/2016 - 02:58 नवीन
किंचित दुरुस्ती/छिद्रान्वषीपणा - ह्याला Delayed Onset Muscle Soreness. असं म्हणायचं. तो acute muscle soreness पेक्षा वेगळा असतो. acute muscle soreness, लॅक्टिक अ‍ॅसिड स्नायूंत साठल्यावर, फटिगमुळे जाणवतो - जो व्यायामानंतर काही वेळातच नाहीसा होतो. Delayed Onset Muscle Soreness - जो दुसर्‍या दिवशी म्हणजे बर्‍याच तासांनी - विश्रांती काळात जाणवतो - खरं "बॉडी बिल्डिंग" ह्या विश्रांतीच्या काळात होतं. जर तुम्हाला आता तो जाणवत नाही ह्याचा अर्थ असा की तुमच्या शरीराला त्या तीव्रतेच्या व्यायामाची "सवय" झालीये - म्हणून स्नायूंना (सूक्ष्म) चिरा जात नाहीत - म्हणून Delayed Onset Muscle Soreness जाणवत नाही. म्हणजे व्यायामाची तीव्रता वाढवायची वेळ आलीये.,
↩ प्रतिसाद: अनिरुद्ध.वैद्य

म्हणजे व्यायामाची तीव्रता

सही रे सई
Fri, 11/18/2016 - 05:47 नवीन
म्हणजे व्यायामाची तीव्रता वाढवायची वेळ आलीये. हो तो पण विचार केला आहेच. फक्त २-३ दिवस खोकला सर्दीने बेजार झाले आहे त्यामुळे खूप जास्त वाढवला नाहीये व्यायाम.
↩ प्रतिसाद: विंजिनेर

येस!

अनिरुद्ध.वैद्य
Mon, 11/21/2016 - 22:08 नवीन
हा अ‍ॅक्युट मसल सोअरनेस्स, ८ - ९ किमी जॉग केल्यावर जाणवतो. अन मग जॉगींग संपुन नुसतं कसबस रेटणं उरत. हा त्रास कसा संपवावा?
↩ प्रतिसाद: विंजिनेर

आजची सुटी...

डॉ श्रीहास
Wed, 11/16/2016 - 16:21 नवीन
१२*२ असे २४ जोर मारले बास्स एवढच केलं...... उद्या पासुन सायकलींग सुरू.

पंधरा मिनीटे फुलपाखरी

सूड
Wed, 11/16/2016 - 16:43 नवीन
पंधरा मिनीटे फुलपाखरी तडाख्याचा सराव आणि मग दहा मिनीटे दैनंदिन जलतरण.

फुलपाखरी हात का पाय (कंबर

बेकार तरुण
गुरुवार, 11/17/2016 - 05:48 नवीन
फुलपाखरी हात का पाय (कंबर खरेतर !) हा स्ट्रोक शिकायला मला सगळ्यात जास्ती वेळ लागला होता !!
↩ प्रतिसाद: सूड

फुलपाखरी तडाख्याचा

बाळ सप्रे
गुरुवार, 11/17/2016 - 15:15 नवीन
फुलपाखरी तडाख्याचा
हा हा हा हा फ्रीस्टाइल - मोकळी पद्धत ब्रेस्ट स्ट्रोक - छातीठोक बॅक स्ट्रोक - पाठमोरी :-)
↩ प्रतिसाद: सूड

काहीच्याकाही भारी !

वेल्लाभट
Fri, 11/18/2016 - 08:10 नवीन
काहीच्याकाही भारी !
↩ प्रतिसाद: बाळ सप्रे

फुलपाखरी तडाखा! लोहल!

वेल्लाभट
Fri, 11/18/2016 - 08:11 नवीन
फुलपाखरी तडाखा! लोहल!
↩ प्रतिसाद: सूड

सायकलनेच हाफिसला....

किरण कुमार
Wed, 11/16/2016 - 17:19 नवीन
गेली महिनाभर ऑफीसला जाणे येणे सायकलवर चालू आहे, रविवारी काही मित्रांसोबत मांढरदेवीला सायकल दामटली एकूण जाणे येणे १५० किमी पडले, त्यात कात्रजचा छोटा आणि मांढरदेवीचा साधारण ८-९ किमी चा घाट चढलो. एकूणच धमाल राईड झाली. सोबत मिपाकर केदार दिक्षित आणि बाकी तीन भिडू होते. रोजचे अपडेट्स काही फारसे नाही घर ते ऑफीस केवळ १२ किमीचे अंतर आहे त्यामूळे सायकल हा उत्तम पर्याय वाटतो.तेवढाच काय तो व्यायाम.

३३२ किमि

प्रशांत
Wed, 11/16/2016 - 21:53 नवीन
या महिन्यात आतापर्यंत ३३२ किमि सायकलिंग झाली. रोज येथे टाकणे शक्य झाले नाहि. उद्यापासुन अपडेटत जाइल (सायकल चालवल्यास ;) ) यात दिनांक १२ ला सिंहगड वारी पहिल्यांदा झाली.. Image removed.

मी samsung health (google S

निओ१
Wed, 11/16/2016 - 23:30 नवीन
मी samsung health (google S Health) हे वापरत आहे, मला खूप मदत होत आहे.

In google Play S Health App.

निओ१
Wed, 11/16/2016 - 23:30 नवीन
In google Play S Health App.
↩ प्रतिसाद: निओ१

आज ३९ किमी सायकलिंग करून

मोदक
गुरुवार, 11/17/2016 - 15:21 नवीन
आज ३९ किमी सायकलिंग करून हाफिसात पोहोचलो.

(No subject)

वामन देशमुख
गुरुवार, 11/17/2016 - 15:50 नवीन
Image removed.
↩ प्रतिसाद: मोदक

काल Racquetball खेळलो

अनुप कोहळे
Fri, 11/18/2016 - 00:05 नवीन
खुप दिवसांनी Racquetball खेळलो काही मित्रांसोबत ४५ मिनीटे. अमेरिकेत सध्या थंडी पडायला लागल्यामुळे बाहेर सायकलिंग बंद झाल्यातच जमा आहे. शनिवार किंवा रविवारी करावे लागेल.

सायकल चालवली थोडीशी.

एस
Fri, 11/18/2016 - 07:54 नवीन
सायकल चालवली थोडीशी.

वाह

मोदक
Fri, 11/18/2016 - 08:30 नवीन
वाह
↩ प्रतिसाद: एस

१५३.९ किलोमीटर....

डॉ श्रीहास
Sun, 11/20/2016 - 22:30 नवीन
आज पहील्यांदाच १५० किमी पेक्षा जास्त सायकलींग केलं... १०० किमी केलं होतं ह्यापुर्वी पण १५० ची बातच काही और असते... १५३.९ किमी, ६:५६ तास,२२.१किमी/तास वेग !!

वाह.. १५०+ किमीसाठी ताशी२२+

बाळ सप्रे
Mon, 11/21/2016 - 14:12 नवीन
वाह.. १५०+ किमीसाठी ताशी२२+ किमीचा वेग म्हणजे खूपच चांगला आहे.. अभिनंदन..
↩ प्रतिसाद: डॉ श्रीहास

धन्यवाद...

डॉ श्रीहास
Mon, 11/21/2016 - 20:43 नवीन
कौतुकाचे दोन शब्द उत्साह व्दिगुणित करतात..... पुनश्च धन्यवाद आणि तुमचं देखील अभिनंदन दिल्ली मारल्याबद्दल _/\_.
↩ प्रतिसाद: बाळ सप्रे

हा वीकान्त दिल्ली हाफ

बाळ सप्रे
Mon, 11/21/2016 - 14:36 नवीन
हा वीकान्त दिल्ली हाफ-मॅरॅथॉनचा होता. मार्ग नेहरू स्टेडीयम, इंडीया गेट, राजपथ, राष्ट्रपतीभवन, संसद असा असतो. दिल्लीची नोव्हेंबरमधील थंडी, अजिबात चढ-उतार/खाच खळगे नसलेला मार्ग यामुळे ही मॅरॅथॉन धावपटूंमधे 'वैयक्तिक विक्रमां'साठी प्रसिद्ध आहे. इथे विजेते धावपटू तर हाफ मॅरॅथॉन एका तासाच्या आत पूर्ण करतात. मलाही या मॅरॅथॉनने निराश केले नाही. वैयक्तिक सर्वोत्तम वेळ १:५९ वरून १:५३ अशी सुधारता आली. प्रदूषण (स्मॉग) च्या बातम्यांमुळे गेले ३-४ आठवडे सर्व धावपटू चिंतेत होते. पण प्रत्यक्षात तसा काहीही अनुभव आला नाही. प्रदूषण निवळले असावे अथवा बातम्या अतिरंजित होत्या. कोणीही धावताना मास्क लावून धावताना दिसले नाही.

अभिनंदन..!!!

मोदक
Mon, 11/21/2016 - 15:23 नवीन
अभिनंदन..!!!
↩ प्रतिसाद: बाळ सप्रे
  • «
  • ‹
  • 2
  • 3
  • 4
  • 5
  • 6
  • 7
  • 8
  • 9
  • 10
  • ›
  • »

लेखन करा

लेखन करा

मिसळपाव वर स्वागत आहे.

प्रवेश करा

  • नवीन खाते बनवा
  • Reset your password
मिसळपाव.कॉम बद्दल
  • 1आम्ही कोण?
  • 2Disclaimer
  • 3Privacy Policy
नवीन सदस्यांकरीता
  • 1सदस्य व्हा
  • 2नेहमीचे प्रश्न व उत्तरे
लेखकांसाठी
  • 1लेखकांसाठी मार्गदर्शन उपलब्ध
  • 2लेखन मार्गदर्शन
संपर्क
  • 1सर्व मराठीप्रेमींचे मनापासून स्वागत!
  • 2अभिप्राय द्या
  • 3संपर्क साधा
© 2026 Misalpav.com  ·  Disclaimer  ·  Privacy Policy मराठी साहित्य व संस्कृतीसाठी  ·  प्रवेश  |  सदस्य व्हा